अटलांटा GTG १८ जुलै २००९

Submitted by राहुल on 12 July, 2009 - 23:05

थोडक्यात वृत्तांत -

दि. : १८ जुलै
वेळ : संध्याकाळी ६:०० ते १०:३०
ठिकाण : 'मो' ह्यांच्या घरी

एखाद्या अनोळखी ठीकाणी, काही अनोळखी लोकांना भेटून.... 'कसली धम्माल केली' अशी प्रतिक्रीया येणे हे मायबोलीकरांना नवीन नाही. हेच मायबोली कुटुंबाचे यश आहे असे म्हणता येईल. आजपर्यंत अनेक मायबोलीकरांनी असेच अनुभव घेऊन त्याबद्दल इथे वृत्तांत लिहीले आहेत.

अटलांटा GTG सुद्धा ह्याला अपवाद नव्हता. ७ मायबोलीकर आणि त्यांचे कुटंबीय ह्यांनी ३ - ४ तास एकत्र जमून धमाल केली.

सुरुवात, मी मायबोलीकर कसा(कशी) झालो(झाले ), इथुन झाली. माबोवरचे सध्याचे ताजे विषय, विशेष लक्ष पुरवावे असे बाफ.... थोडक्यात रोज पार्ले/बारा/शिट्टी/पुपु/अटलांटा बाफ वरचे ड्वायलॉग पुढे चालू....

माबोकरणींनी खादाडीची जय्यत तयारी केलीच होती. बटाटेवडे, सामोसे, पावभाजी, पुलाव खात खात गप्पा चालू राहिल्या.
food.jpg

('एक्झोटीक डेझर्ट' चा विषेशोल्लेख इथे आवश्यक आहे. Proud ).
exotic.jpg
निघायच्या आधी पुणे-मुंबईकरांच्या वविसाठी फोन वरून शुभेच्छा दिल्या.
आणि पुन्हा भेटायच्या तयारीवर सगळ्यांनी निरोप घेतला.

त.टी. : माझ्या ऑर्कुटवर GTG चे फोटो टाकले आहेत.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राहुल
तू अगदी एका वाक्यात उत्तरे द्या सारखा वृत्तांत लिहीलायस, जरा संदर्भासहित स्पष्टीकरण सारख २ पानं लिही बघु Happy

आर्जे, मिटींग मिनिट्स पण ह्या वृ पेक्षा डीटेल मधे असतील Uhoh

अडमा, त्या एक्झोटीक डेझर्ट्चं नाव काय??

सुसकाळ लांटाकर्स Happy

------------------------------------------
दिल का भँवर करे पुकार, प्यार का राग सुनो
प्यार का राग सुनो रे S

अडमा, पन्नाला त्या एक्झॉटिक डेझर्ट चे नाव सांग ना! (जर तुला अजूनही आठवत असेल तर ;))

हो, मला पण सांग ना त्या एक्झॉटिक डेझर्ट चे नाव Wink

>>माबोकरणींनी खादाडीची जय्यत तयारी केलीच होती.
माबोकर जेन्ट्सांनी काय केलं मग? Proud

अडमा, तुझे 'त्रिगोळे-पुष्कराज आणि पांढरा गुलाब' चुकून एकेमेकांवर बदाबद पडल्यासारखे का दिस्ताहेत? Proud

लोकहो... हा घ्या वृत्तांत... Happy
______________________________________________

मागच्या वर्षी अटलांटात असताना अटलांटा-जॉर्जिया असा बीबी काढून इथे कोणी आहे का ह्याची चाचपणी केली होती पण लव्हइन ह्या एकच आयडी ने तो ही सुमारे दोन महिन्यांनी प्रतिसाद दिला होता. दरम्यान अज्जूकाशी तिच्या युनिव्हरसिटी बद्दल गप्पा झाल्या होत्या. इथे कोणीच नाही अशी जवळ जवळ खात्री असल्याने ह्या वेळी परत आल्या नंतर अटलांटा बीबी उत्खनन करून वर काढायची तसदीही मी घेतली नाही.
पण कोणे ही एके दिवशी अचानक अटलांटा बीबी वर मो ह्यांची काहितरी पोस्ट आली आणि ह्या बीबी वर वर्दळ चालू झाली. डेट्रॉईटकर, मी आणि मो असे तिघांचे ह्या बीबी चे टिआरपी वाढवायचे प्रयत्न चालू असताना काही शिट्टीकर, फ्लोरीडावासी आणि बाराकर नाकं मुरडायच्या निमित्ताने का होईना पण तिथे येऊन त्याला हातभारच लावून गेले. Wink
जरा नियमितपणे वर्दळ चालू झाल्यावर आणि "तुम्ही कुठे आम्ही कुठे" वगैरे गप्पा झाल्यानंतर मग "एकदा भेटुया" अश्या बर्‍याच पोस्ट झाल्यावर शेवटी गटग ची वेळ आणि तारीख ठरली. मो च घर मध्यवर्ती असल्याने त्यांनी स्वखुषीने यजमानपद स्विकारलं. तेव्हाच अ‍ॅडमिन नी जॉर्जिया चा नवा ग्रुप स्थापन केला आणि आमच्या गटग साठी नविन लेखनाचा धागा सुरु करून आमच्या उत्साहाला साडे-तीन , चार की काय ते चांद लावले. (प्रमोशन मिळायच्या जस्ट आधीच्या कशी लोकं उत्साहात कामं करतात, initiatives वगैरे घेतात.. हे तसच कायतरी होतं की काय अशी शंका दुसर्‍याच दिवशी झालेल्या नविन अ‍ॅडमिनच्या घोषणेनंतर तमाम अकरांच्या मनात येऊन गेली. Light 1 )
इकडे मेन्यू ठरवा ठरवी चालू असतानाच डेट्रॉईटकर हे "आर्जे" अश्या नव्या आवतारात अवतरले आणि त्यांनी सर्व शक्ती/रिसोर्सेस/ प्रतिष्ठा वगैरे जे काय मिळेल ते पणाला लावत रोमातल्या अकरांना जागं करायला सुरुवात केली. त्यांनी पणाला लावलेलं सगळं कामी येऊन ११ मोठे आणि ४ लहान असे १५ आणि १ मोठा टेंटेटिव्ह अशी बर्‍यापैकी गर्दी खेचण्यात त्यांनी यश मिळवलं. मेन्यूच्या चर्चेत मिसळीच नाव ऐकून एका उदार अंतःकरणाच्या शिट्टीकरणीने आम्हाला मिसळीचा मसाला पोस्टाने पाठवला. पण दरम्यान पावभाजीचा बेत ठरल्याने मिसळ कॅन्सल करावी लागली. पण त्या मसाल्याचा वापर पुढच्या गटगला नक्की केला जाणार असून (जर ती मिसळ चांगली झाली तर) त्यावेळी जॉर्जिया-शिट्टी मैत्री कराराचा ठराव ही मांडण्याचा विचार आहे. (ह्या करारा अंतर्गत मसाले आणि पुस्तके ह्यांची देवाण-घेवाण आणि एकमेकांच्या बीबींचे टिआरपी "प्रतिष्ठीत" बीबींपेक्षा वाढवणे असे २ महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत.)
सगळ्यांनी महत्त्वाचे पदार्थ घेऊन झाल्यानंतर डेझर्ट मी घेतलं. (अगदी काहीच जमलं नाही तर २ डब्बे आईस्क्रिम घेऊन जाता येईल असा "सुज्ञ" विचार त्यामागे होता. Wink ) दरम्यान अ‍ॅडमिनने दिलेल्या सजेशन नुसार वविकरांना फोन करण्याचा निर्णयही पक्का झाला आणि फोन नंबर ची देवाण घेवाण झाली.
सर्व तयारी झाल्यावर अखेर तो दिवस उजाडला.
जरा अंदाज घेण्यासाठी फोन केला तेव्हा आर्जे आणि परिवार तिथे पोचल्याचे समजले. मग मी आणि रोहित (माझा मित्र) धावत पळत, एक दोन दा रस्त्ता चुकून वगैरे मो च्या घरी पोचलो. तो पर्यंत तिथे लव्हईन (विनायक) आणि पिव्ही (पूर्वा) पोचले होते. सगळ्या पदार्थांची मांडामांड चालू होती आणि ते बघून मला लगेचच वडापाव खायला सुरुवात करायची इच्छा होत होती. पण माझ्या चेहेर्‍यावरचे एकंदर भाव ओळखून राहूल (मिस्टर मो) ने स्प्राईट आणि सालसा-चिप्स आमच्या समोर आणून ठेवलं. Proud
तितक्यात भावना (fiona) आणि सुनित ह्यांनीही एंट्री मारली आणि नक्की येणार होते ते सगळे आले.
आर्जे हा सगळ्यात सिनियर माबोकर असल्याने त्याला गटग चं प्रास्ताविक करायचा आग्रह केला गेला आणि त्याने ही तो स्विकारला. पण राहूल ने तो रोमातला असला तरी तितकाच सिनीयर आहे असा दावा केला आणि त्याचा प्रत्यय आम्हाला पुढच्या चर्चेदरम्यान आलाच. त्याने माबोवरच्या कुठल्या कुठल्या "फेमस" अश्या जुन्या "घटना" सांगून आम्हाला स्तंभित, अचंबित वगैरे केले.. Proud
लोकांच्या अश्या प्रतिक्रिया पाहून राहूल ने "मी च मोहिनी (मो) ला माबोवर आणलं आणि आता ती अ‍ॅक्टीव् होऊन, गटग वगैरे आयोजित करून कानमागून येऊन तिखट व्ह्यायचा प्रयत्न करते आहे" अशी पुस्ती ही जोडली.
सगळे जण एकमेकांना नीट ओळखत नसल्याने आधी राऊंड ऑफ ईंट्रोडक्शन करूया अशी सुचना आर्जे नी त्याचा प्रास्ताविकात मांडली. त्याप्रमाणे ही चर्चा चालू असताना प्रत्येकाच्या माबोवरच्या एकूण अनुभवाबद्दल ही प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम झाला. माझ्या आयडी चा नक्की अर्थ काय असा फेमस प्रश्ण इथेही विचारला गेला. (आता मात्र रंगिबेरंगी वर लिहायलाच हवं एकदा. Happy ). आणि माझा मायबोलीवर चा "अनुभव" ह्यावर बोलताना लोकांनी ती चर्चा सारेगमप, लिखाणावरील प्रतिक्रिया अश्या obvious विषयांकडे नेलीच ! त्यामूळे उपस्थीत सगळे पक्के रोमातले आहेत हे ही सिध्द झालं. Proud
हल्ली जूना आयडी टाकून नविन आयडी घ्यायची फॅशन आली आहे. (जसे आर्जे, सँटी इ.) त्यामुळे काही उपस्थितांनी ही फॅशन जूनीच आहे असं समजून अज्जूका म्हणजेच हवा-हवाई, झक्की म्हणजेच जूने अ‍ॅडमिन (खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे असंही काहितरी ऐकू आलं तेव्हा मागून), हवा-हवाई म्हणजेच असामी अशी काही भन्नाट स्टेटमेंट मारली आणि बाकीच्यांची हहपुवा झाली. Lol
राऊंड ऑफ ईंट्रोडक्शन जरा जास्तच म्हणजे सुमारे २ तास वगैरे झाल्यावर सगळयांना एकदम भूकेची जाणीव झाली. मो नी केलेला वडापाव, शिल्पा म्हणजे सौ. आर्जे ह्यांनी केलेली पावभाजी आणि भावना ने केलेले सामोसे ह्यावर मंडळी तुटून पडली. उपस्थित पालक वर्गापैकी दोघांनीही एकदम जेवणं शक्य नव्हतं त्यामूळे मो, पूर्वा, शिल्पा ह्यांनी आधी मुलांना संभाळायची जबाबदारी घेतली. सगळं महिला मंडळ थांबलेलं बघून भावना ही थांबली. आग्रह करून ही तिने सुनित बरोबर जेवण ज घेतल्याचं बघून बाकीचं महिला मंडळ दिग्मूढ (म्हणजे काय ते त्यांनाही नक्की कळलं नाही) वगैरे झालं होतं. Proud पूर्वा ने केलेला पुलाव आणि गव्हाची खीर प्ण अत्यंत भारी होती. मी आत मधे त्यावर ताव मारत असताना बाह्रेर परत "hi. hello" सुरू झालं. बघितलं तर जरा गुढ आणि सोफेस्टीकेटेड वाटणारा तो १ टेंटेटिव्ह हजर झाला होता. तो आदित्य बेडेकर (अबे) असल्याचं नंतर कळलं.
आमची जेवणं झाल्यावर वडिल वर्गाने मुलांचा ताब घेतला आणि महिला मंडळ आत जेवायला गेलं. बाह्रे अबे ची इंट्रोडक्शन चालू होती. इतक वेळ चालू असलेल्या "उथळ" आणि "पांचट" गप्पा बंद होऊन अचानक गप्पांची इंटलेक्चूअल पातळी फारच वाढली. गुगल भारी की अ‍ॅपल भारी, माबो ला अजून काय काय सुविधा देता येतिल, त्याचे टेक्नीकल डिटेल्स, शेअर मार्केट, गुगल अ‍ॅडस, गुगल अ‍ॅप्स इ. इ. इ.
सगळे जण जरी विशिष्ठ शहरवासी नसले तरी कधी ना कधी प्रत्येकाचा विशिष्ठ शहराची संबंध आलेलाच आहे. त्यामूळे "वाण नाही पण गूण.." म्हणातात त्याप्रमाणे प्रत्येक जण मतं देतच होता... गुगल भारी की अ‍ॅपल.... ठोका... !!!! Proud गप्पांच्या ह्या "उंचावलेल्या" दर्जाचं नक्की कारण "अबे चं आगमन" हे होतं की " महिलांचं दुसर्‍या खोलीत जाणं" हे.. हे मात्र शेवटपर्यंत कळू शकलं नाही.. Wink
सगळ्यांची जेवणं झाल्यावर मी आणि रोहीत नी बनवलेलं एक्झोटीक डेझर्ट एकदाच बाहेर आलं.. आर्जे ला मी त्यावर व्हिप्ड क्रिम घालायला सांगितल्यावर त्याने पूर्ण बोलभर क्रिम त्यावर ओतलं... मो नी आत येऊन नक्की काय चाललय ते जाणून घ्यायच्या आधीच " हे कसलं एक्झोटीक डेझर्ट ??????????" अशी जोरदार प्रतिक्रिया दिली. ती ऐकून भावना आत आली आणि ह्याचं नाव काय असं मला विचारलं... नाव फार मोठं आहे सगळ्यांना एकदम च सांगतो असं मी म्हणत असताना आत कोणी तरी "नाव" घेतयं अशी बातमी बातमी पसरली... पण ते नाव डेझर्ट चं आहे हे समजल्यावर सगळ्यांचा एकदम भ्रमनिरास झाला...
तर आता सगळ्यांसाठी एकदम.. ते डेझर्ट Choco dipped strawberies with wheaped cream on top of lemon jello असं होतं.. Proud
ते झाल्यावर पुस्तकांची देवाण धेवाण... फोटो काढणे वगैरे झालं आणि मग वविकरांना खो द्यायचा होता... निरज चा नंबर आर्जे च्या मोबाईल वर होते.. आणि आम्हाला त्याच्याच मोबाईल वरून फोन करायचा होता.. त्यामूळे मग माझ्याकडे असलेले पुणेकरांचे नंबर लावयचे ठरवलं... सगळ्यात रिलाएबल असा (गैर)समज पुनमवैनींबद्दल असल्याने आधी त्यांना फोन लावला.. तर उचलला नाही.. मग म्हंटलं मिन्वाज्जी एका जागी बसून गुढग्याला मलम चोळत असतील तर त्यांना फोन कराव.. तर त्याही गायब.. !! साजिरा ही जागेवर नाही... मग आम्ही नाद सोडून द्यायचं ठरवलं.... पण मिन्वाज्जींनी विशिष्ठ शहरी पणा न करता कॉलबॅक केला आणि मग मिन्वाज्जी, कार्याध्यक्ष, अआ, अर्भाट, साजिरा ह्यांचाशी आम्ही चालू घडामोंडींबद्दल वार्तालाप करून ववि साठी शुभेच्छा दिल्या... Happy
आर्जे म्हणाला तसं काही ओळख नसताना अनोळखी ठिकाणी जमून धम्म्म्माल केली असा टिपीकल मायबोली अनूभव आम्ही सगळ्यांनी घेतला.. "पुढचं गटग सगळ्यांच्या सवडीने आमच्या घरी करू" असा आग्रहपूर्वक प्रस्ताव आर्जे आणि शिल्पा ह्यांनी मांडलाच आहे.. बघूया कधी जमतय.. Happy

त.टी. : सर्व घटना खर्‍या असल्या तरी वृत्तांत लिहिताना तपशिलात आणि क्रमात थोडेफार बदल केलेले आहेत. इथे कोणालाही कोणत्याही प्रकारे दुखावण्याचा अथवा व्यक्तीगत पातळी वर काहीही बोलण्याचा हेतू नाहिये. तेव्हा सर्व माबोकरांनी दिवे घ्यावें. Happy

वृतांत तो आला आला.....धन्यवाद अडम!!
लयी मजा आली.....धन्यवाद मो,आर्जे गटग ठरवल्याबद्दल.
--------------------------------------------------------------------------------
भिंतीला कान असतात आणि पाठीला डोळे!!!

आवडला बरं का व्रुतांतं....आणि एक्झॉटीक डेझर्टचं नाव आत्ताशी कळलं आम्हाला.....आणि हो...गप्पांचा दर्जा खरच वाढला होता...मला तर वाटलं होतं की आपण असेच बोलात राहीलो असतो तर आदी (वय वर्ष - १० महीने), आदीत्य (वय वर्ष - १.५) आणि अर्हन (वय वर्ष - १.५) यानीही अ‍ॅपल आणि गुगल बद्द्ल आपली मतं व्यक्त केली असती....

व्रुतांत बरोबर की व्रुतांतं....?

एकमेकांच्या बीबींचे टिआरपी "प्रतिष्ठीत" बीबींपेक्षा वाढवणे >>> Lol

भारी लिहिलस. हहपुवा Happy

छान जमलाय हो वृत्तांत .. पण महिलावर्गाला दिलेल्या टोमण्याचा निषेध ..

अडमा... ह्याला म्हणतात वृत्तांत.
जबरी लिहीला आहेस रे...

जबरीच अडम. देर आये दुरुस्त आये!! Happy

>> त्याने माबोवरच्या कुठल्या कुठल्या "फेमस" अश्या जुन्या "घटना" सांगून आम्हाला स्तंभित, अचंबित वगैरे केले..
Biggrin , घटना इथे नमूद करण्यासारख्या नाहीत, नाहीतर परत एक वादळी चर्चा सुरू व्हायची Wink

>> सगळं महिला मंडळ थांबलेलं बघून भावना ही थांबली. आग्रह करून ही तिने सुनित बरोबर जेवण ज घेतल्याचं बघून बाकीचं महिला मंडळ दिग्मूढ (म्हणजे काय ते त्यांनाही नक्की कळलं नाही) वगैरे झालं होतं.
Biggrin
अडमा, तुला महिलामंडळाच्या भावना नीट कळल्या नाहित हे दिसून येतेय!

>> पण माझ्या चेहेर्‍यावरचे एकंदर भाव ओळखून राहूल (मिस्टर मो) ने स्प्राईट आणि सालसा-चिप्स आमच्या समोर आणून ठेवलं.
Lol
अगदी आल्या आल्या पासून चेहेर्‍यावर खादाड भाव होते तुझ्या Wink

>> बघितलं तर जरा गुढ आणि सोफेस्टीकेटेड वाटणारा तो १ टेंटेटिव्ह हजर झाला होता.
Rofl

>>>> बर ते 'नाव' इकडे घेऊन टाक.. तेवढीच प्रॅक्टीस
तो कसला नाव घेतोय? त्याला फक्त 'तिचं' नाव काय ते विचारलं तर केवढा लाजला.

झकास लिहिला आहेस अडमा वृत्तांत. Happy
आणी ते नाव घ्यायचं राहुन गेलं ते अत्तातरी घे Wink

अडम आणि आर्जे,
मस्तच.

अडम, केवढी शक्ती आहे बघ तुझ्या वॄत्तांतात, तू विजिगिषूलापण खेचून आणलंस.
हे कधीच घडलं नव्ह्तं Lol

आता मी SJ ला पण खेचून आणतो बघ ;).
विजीगिषु ... वेल्कम.

मग म्हंटलं मिन्वाज्जी एका जागी बसून गुढग्याला मलम चोळत असतील तर त्यांना फोन कराव.. >>> एक तर या वयात जरा ऐकायला कमी येतं त्यातून बस पकडायची गडबड... बस पकडायला धावताना वगैरे मी मोबाइल पाठीवरच्या ब्यागेत नीट ठेवून देते हो.... आरे हातातून पडलाबिडला म्हणजे 'हे' रागावले असते ना.. Proud

कॉलब्याक केला ना पण, म्हंण्ल हेराकडून काय वार्ता मिळतेय ते पहावं.. तर हेर आपला खाऊन पिऊन सुस्तावलेला Happy

धन्यवाद सगळ्यांना... Happy

विजीगिषु वेलकम... एसजे दिसल्या नाहीत कुठे अजून.. Happy

एस्जे नी आताशी आय डी घेतला आहे. लवकरच येतील इथे. Happy

अडम वृत्तांत खूप छान लिहीला आहेस. वाचताना मजा आली.
सगळ्या मंडळींना पहिल्यांदा भेटते आहे अस वाटल नाही. Wasn't sure what to expect before coming down. मायबोली माझ्यासाठी नवीन नाही. पण मी मायबोलीवर active नसल्याने आणि आधी कोणाला ओळखत नसल्याने थोड bore होईल अस वाटल होत. पण माझा अनुभव अगदी वेगळा होता. सगळे एकदम casual होते. आणि मायबोली common thread मुळे सगळ्यांना बोलायला खूप विषय होते. Everyone - bachelors (with some recently engaged), newly weds & couples like us w/kids were on the same page.
सगळे पदार्थ उत्तम झाले होते. मो तु केलेले वडे एकदम छान. वडापाव खाताना मुंबईची आठवण झाली. आमच सगळ मित्र मंडळ शिवाजी पार्कवर SPG चा वडापाव खायला जायचो. आणि खाता खूप TP गप्पा मारत बसायचो. आपल्याही 'महिला मंडळाच्या' अश्या छान गप्पा झाल्या. भावना तुझे सामोसे आणि आप्पे आर्याला खूप आवडले. ते खाल्यावर बाकी जेवणाला तिने सुट्टी दिली. पुर्वा पुलाव आणि खीर firstclass. आणि अडमच 'exotic dessert' was truely exotic.
सगळ्यांना भेटून खूप छान वाटले. आता पुढच्या GTG ला आमच्याकडे यायच. तेव्हा मिसळ नक्की.

अरे वा! SJ, वेलकम.
RJ नी तुला आणायचं एकदम मनावर घेतलं तर! Happy
>> सगळ्या मंडळींना पहिल्यांदा भेटते आहे अस वाटल नाही
अगदी बरोबर! पटेश! Happy
तुझंही मनोगत छान आहे ग!

फायनली SJ आपण आलात तर मायबोलीवर. वेलकम !!
अरे हो आणि तुझ्या पोस्ट वाचुन आठवलं, अडम व्रुतांत मध्ये मी बनवलेल्या आप्प्यांना विसरुनच गेला कि
Sad

हो.. पण तू बनवलेल्या समोश्यांनी अप्प्यांना झाकोळून टाकलं.. Happy मी ते खाल्लेच नाही म्हणून लिहायचं राहिलं.. !

एस्जे वेलकम.. Happy टायपायला लाग आता अ‍ॅक्टिवली..

अड्मा, अरे जरा भावनाच्या भावनांचा विचार कर्....अरे ते आप्पे तीने बनवले होते....सामोसे विकतचे होते...आणि तु आप्पे खाल्ले नाहीत्....असं कसं झालं.....ये आप्पोंका सरासर अपमान है!!!!

येह न्याय नही अन्याय है (सांगा कुठल्या सिनेमातील डायलॉग आहे ?) Wink

Pages