नाविन्यपुर्ण उत्पादनांच्या कल्पना

Submitted by सावली on 9 April, 2011 - 05:38

नेहेमीच मला नविन कुठल्यातरी उपयोगी उत्पादनांबद्दल सुचत असते. बहुतेक सगळे विचार नवर्‍याच्या कानापर्यंत पोचुन विरले जातात. मी "अरे, ऐक ना मला काहीतरी सुचलय.." असं म्हणाल्यावर तो प्रचंड वैतागत असणार. पण माझ्याकडे दुसरा श्रोता नसल्याने वैतागलेला श्रोताही चालवुन घेते. पुर्वी मी कुठल्यातरी मित्रमैत्रिणींना पकडुन माझ्या कल्पना ऐकवायचे.

फार पुर्वी माझी एक कल्पना होती की बिना ड्रायव्हरची गाडी असावी. तीला रस्ता फिड केला कि ती योग्य ठिकाणी आपोआप जावी वगैरे. नंतर काही वर्षांनी किमान प्रायोगिक तत्वांवर तरी अशी गाडी तयार झाली.

अजुन एक जुनी कल्पना होती त्यात थ्रीडी प्रोजेक्शन वापरुन व्यक्तीचा हॉलोग्राम कुठेही प्रोजेक्ट करता यावा. म्हणजे मग मिटिंग वगैरे साठी प्रत्यक्ष न जाताही समोरासमोर बोलण्याचा फायदा मिळेल. (व्हि.कॉ. पेक्षा चांगल्या प्रकारे) तेव्हा खरतर थ्रीडी वगरे इतके जोरात नव्हते. पण काही वर्षांपुर्वी हाही प्रयोग सफल झालाय.

अशा अनेक कल्पना असतात. त्यांना ठराविक एक विषय असा नसतो, या कल्पना सत्यात उतरण्यासाठी जे ज्ञान, भांडवल, स्किल लागेल ते माझ्याकडे नाही याची पुर्ण जाणीव असल्याने मी पुढे काहीच करत नाही. अशा कल्पना तुमच्याकडेही असतील. इथे या धाग्यावर त्या मांडाव्या असा माझा विचार आहे.
अशाच प्रकारची काही उत्पादने असतील आणि आपल्यालाच ती माहीत नसतील तर इतरांकडुन त्याचीही माहीती मिळेल. शिवाय कधी कुणी अशा उत्नादनांसाठी खरच प्रयत्न करुन बघितले तर अगदीच उत्तम.

या माझ्या काही कल्पना -
१.
मला लहान असताना असे वाटायचे की पाणबुडे पाण्यात जाताना ऑक्सिजन सिलिंडर
घेऊन जातात. त्याऐवजी पाण्यातलाच ऑक्सिजन काढुन घेत का नाहीत. यामुळे अमर्यादित सप्लाय मिळेल. आता असे काही उपलब्ध आहे की नाही माहीत नाही.
शिवाय आता अशा विघटनाला लागणारी उर्जा वगरे बर्‍याच गोष्टी मधे आहेत. पण प्रयोग करायला वाव आहे असे मला वाटते Happy

२.
वॉशिंग मशिन जी मन्युअल आणि ऑटोमॅटीक दोन्ही मोड मधे चालते. म्हणजे पाणि नसेल तेव्हा मॅन्युअल मोड मधे चालवायची. एरवी ऑटो मधे. (अशी असल्यास प्लिज सांगा)

३.
लहान मुलांचे कपडे वाळत घालायचे स्टँड मिळतात त्याला असंख्य चिमटे असतात. कपडे वाळल्यावर एक एक चिमटा काढायचा खुप कंटाळा येतो. एकाच बटनात सगळे चिमटे उघडले तर?

४.
अशा काचा ज्या पारदर्शक असतील पण सोलार पॅनेल सारख्या काम करु शकतील. याचे तर असंख्य उपयोग आहेत.

५. अशा काचा ज्या हवा फिल्टर करुन आत पाठवतील. म्हणजे धुळ येणार नाही पण हवा येईल.

६.
घराची फरशी धुण्यासाठी एक मशिन. बाहेर मिळते ते ऑफिस योग्य मोठ्ठ्या आकाराचे असते. घरासाठी छोटे सोपे हवे. अजुन एक मिळते ते भारतातल्या धुळीत चालणारे नाही असे वाटते. भारतीय वापरासाठी एक बनले पाहीजे.

(आता लिहायला गेले तर अजुन काही नीट आठवेना. जसे आठवेल , सुचेल तसे इथे टाकत जाईन)

माझा हा गुण लेकीमधेही ट्रान्सफर झालाय असे वाटतेय कारण तीही तीच्या एक एक कल्पना मला सांगत असते. त्याही खाली लिहिते. (बिचारे तीचे बाबा Wink )

१.
मागे एक मॅग्नेटीक ब्लॉक्स वापरुन ट्रेन सदृश्य काहीतरी केलं आणि मला येऊन म्हणाली हा व्हॅक्युम क्लिनर आहे. तो घरभर स्वतःच फिरतो आणि कचरा काढतो. भरला की कचर्‍याच्या डब्यात टाकतो आणि बॅटरी संपली की चार्ज होतो. ( असा मार्केट मधे आहे हे तीला माहीत नाही अजुन)

२.
एक बोट सदृश्य काहीतरी केल आणि म्हणाली ही पाणबुडी आहे ती पाण्यात बुडते, पाण्यावर तरंगते आणि मग हवे असेल तेव्हा उडते पण. Happy ऑल इन वन. Wink

३.
अजुन एक बोट बनलीये, जी बोट त्सुनामी आली तरीसुद्धा बुडत नाही. त्यावर तरंगते.

तुमच्याही कल्पना इथे येऊद्यात. न जाणो कुणाला प्रयोगासाठी, कुणाला नविन उद्योग सुरु करण्यासाठी उपयोगी येतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भुंगा,
धाग्याचा उद्देश वरती लिहीला आहे
" अशा कल्पना तुमच्याकडेही असतील. इथे या धाग्यावर त्या मांडाव्या असा माझा विचार आहे.
अशाच प्रकारची काही उत्पादने असतील आणि आपल्यालाच ती माहीत नसतील तर इतरांकडुन त्याचीही माहीती मिळेल. शिवाय कधी कुणी अशा उत्नादनांसाठी खरच प्रयत्न करुन बघितले तर अगदीच उत्तम."

"तुमच्याही कल्पना इथे येऊद्यात. न जाणो कुणाला प्रयोगासाठी, कुणाला नविन उद्योग सुरु करण्यासाठी उपयोगी येतील."

बरोबर....... कळलं.....

जनरली आवाक्यातल्या आणि स्वतः करून बघायच्या कल्पना पटकन कोणी इथे का टाकेल प्रयोग व्हायच्या आधी...... आणि ज्या निव्वळ आवाक्याबाहेर आहेत त्यावर का वेळ घालवायचा असा आपला एक माझा अंदाज होता.......

पण चर्चा आणि देवाणघेवाण व्हायला हरकत नाही Happy

हो म्हणजे स्वतःच्या आवाक्यातल्या कुणी टाकणे थोडे कठीण आहे. पण..
समजा मला सोलार एनर्जी या विषयात काहीच गती नाही. म्हणुन ती कल्पना मला आवाक्याबाहेरची वाटली. तरी दुसर्‍या कुणाला ती अगदी आवाक्यातली वाटली तर तो / तो त्यावर प्रयोग करेल.
किंवा माझ्या आवाक्यातलीही आहे पण मुळात मला संशोधनात रस नाही तर इतर कुणि त्यावर काम करु शकेल.
कॉलेज मधे जेव्हा प्रोजेक्ट साठी कल्पना लागतात तेव्हा यातल्या एखाद्या कल्पनेवर काम करता येईल असे.

लॅपटॉप आणि मोबाईल फोनच्या चार्जरांचा जटाभार जिकडे तिकडे वागवताना (आठवण ठेवून!) प्रचंड वैताग येतो. वायरलेस चार्जिंग करता आले तर किती छान होईल. Happy

आधी लिहील्याप्रमाणे -

अजुन एक जुनी कल्पना होती त्यात थ्रीडी प्रोजेक्शन वापरुन व्यक्तीचा हॉलोग्राम कुठेही प्रोजेक्ट करता यावा. म्हणजे मग मिटिंग वगैरे साठी प्रत्यक्ष न जाताही समोरासमोर बोलण्याचा फायदा मिळेल. >>> याचा उपयोग या निवडणुकीत केला जातोय म्हणे Happy

http://www.narendramodi.in/good-governance-and-development-are-the-only-...

वायरलेस चार्जिंग करता आले तर किती छान होईल.>>>>>

मोबाईलच्या मागे आणि लॅपटॉप च्या वरच्या बाजुला सोलर पॅनल लावले आणि या दोन्ही गोष्टी सौर उर्जेवर पण चार्ज करता आल्या तर बरे होईल

मोबाईलच्या मागे सोलर पॅनल >> असे फोन जपानमधे ३/४ वर्षापूर्वी लाँच केले होते. ते फ्लॅपवाले होते. वरच्या फ्लॅपवर सोलारपॅनल होते. पण त्याचवेळी स्मार्टफोन्सची लाट आली आणि हे फोन काहीसे मागे पडले

माझ्याकडे एक व्हीडीओकॉनचा मोबाईल आहे. अगदी बेसिक फोन आहे. रीलायन्स डिजिटलमध्ये दहा हजराच्या खरेदीवर फ्री मिळाला होता. तो सोलर चार्जिंगवर चालतो. बरेच दिवस सतिश जहाजावर जाताना हा फोन घेऊन जातो. चार्जिंग करायची भान्गड राहत नाही. शिवाय फोन चांगला दणकट आहे. Happy

का सावली का? हा धागा सार्वजनिक नव्हता केलेला !

मस्त धागा आहे आणि अनेक कल्पना देखिल Happy

आपल्याकडे ऑटोगिअर चारचाकी भारतात फारशा नाहीतच! आहेत त्या खूप महाग आहेत, अशा स्वस्त गाड्या निघायला हव्यात

Interactive kitchen-
आपण आत आ ल्यापासुन आपल्याशि सांवाद करावा!
आपण स्वयंपाक करतो ते व्हा काय काय संपत आलय काय आणायचं आहे ते आपण बोललं की आपल्या मोबाईल वर लिहुन रीमाईडर टाकावा ह्या कीचन सीस्टीम ने.

भारीच नाही?

फ्रीजात टाकुन द्यायचे पदार्थ, फ्रीजातुन टाकुन द्यायचे पदार्थ, एक्ष्पायर होणार्या वस्तु. सगळ्याची आठवण करुन द्यावी ह्या सीस्टीम ने!

टाटा स्काय ची जाहीरात पाहिलीत का ? ज्यात लढाक किंवा दुर्गम भागातल्या मुली विचारत असतात की टाटा स्काय च कनेक्श्न मिळेल का ? फोन वर उत्तर मिळते की आपल्या मोबाईलला जर रेंज आहे तर टाटा स्काय सुध्दा इथे चालेल.

मला प्रश्न पडला आहे की आपल्या घरातले केबल कनेक्शन् साठी डिश आणि सेट टॉप बोक्स ची आवश्यकता का असते ? त्या ऐवजी एका सीम कार्ड वर केबल का चालत नाही ?

आता तर ३जी, ४जी सुरु झाले आहे. यामुळे स्पीड हा प्रश्न नसावा. असे असताना प्रायोगीक तत्वावर कुठे इंटरनेटवर केबल चालु आहे का ?

नसल्यास का नाही याचे उत्तर कुणी जाणकार देतील का?

पेरू (देश नाही फळ) आणि डाळींबाच्या बिया काढून देणारे मशीन हवे आहे. मला किडनीस्टोनचा त्रास आहे Sad

मॉल मधे कपड्याला/मालाला सेन्सर असतात तसे घरातल्या प्रत्येक महत्वाच्या वस्तूला लावता यायला पाहिजे.
आणि आपल्या हातात एक यंत्र, त्या वस्तूचा कोड नं दाबला की ती जिथे असेल तिथे एक बीप /अलार्म वाजवेल.

ऋन्मेऽऽष,

डाळिंबाचे दाणे न चुरडता रस काढणारे मशीत गल्फमधे वापरात होते. अझीम मशीन म्हणत त्याला. ( मेड इन पाकिस्तान ) हे हाताने चालवायचे असे. एका वाटी सारख्या एका भांड्यात दुसरी वाटी दाबून बसवायची असे.
पण त्या दोन्ही वाट्यात गॅप असे. त्यामूळे बिया ठेचल्या जात नसत. डाळिंब मात्र सोलावे लागत असे. याच मशीनने संत्रे आणि अननस यांचाही रस निघत असे.

डाळिंबाचे सिरप ग्रेनेडाईन या नावाने मिळते.

किडनी स्टोनवर गोक्षुरादी गुग्गुळ हे रामबाण औषध आहे. बैद्यनाथचे आहे. पत्थ्य ( टोमॅटो, पालक, वांगी, पनीर टाळायचे. चिंच, मूळा, धणे खायचे. )

किडनी स्टोनवर बस्ती हा उपाय फारच प्रभावशील आहे. एकदा केल्यास परत कधीच त्रास उद्भवत नाही. पण परत-परत केल्यास पचन संस्था इन्टॅक्ट रहाते.

mi_anu लय भारी.. बनव्तेस क? माझी प्री ऑरडर घे! माझी पण! माझा चश्मा शोधण्यासाठी अती उपयोगी पडेल Happy

Pages