निसर्गाच्या गप्पांच्या २२ व्या भागाच्या पदार्पणासाठी सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.
सनईचा सूर कसा वार्याने भरला
ढगांचा ढोल घुमू लागला,
बिजलीचा ताशा कसा कड कड कडाडला,
पाऊस फुलांचा वर्षाव सोबतीला,
आला आला आला आला गणराज आला
तर अशा निसर्गाच्या वाद्यांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होते. बाप्पाच्या पाहुणचाराची तयारी निसर्गानेही भरभरून केलेली असते. आषाढ, श्रावण सरींनी तृप्त झालेली, तृप्तीच्या आनंदात बहरणारी धरा पाचूचा हिरवाकंच पदर डोईवर घेऊन बाप्पाच्या स्वागताला दुर्वांच्या पायघड्या घालून तयारीत बसते. जोडीला असतात खास गौरी-गणपतीला लागणारी तेरड्याची फुले, गणेशाची लाडकी जास्वंद, सुगंधाची उधळण करणारा सोनचाफा , जाई, जुई, पारीजातक, गुलाबाची फुले.
गणपतीचे नाव जरी घेतले तरी त्याचे गोंडस रूप नजरेसमोर तरळते. कोणत्यही कलाकाराला भुरळ पाडेल असेच आहे बाप्पाचे रुप. निसर्गही पुढे सरसावून आपली कलाकारी बाप्पाच्या चरणी अर्पण करत असतो. आपणही पर्यावरण स्नेही पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून हा निसर्गाचा ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया.
वरील प्रस्तावना मायबोली नि.ग. प्रेमी आय.डी उजू कडून. तसेच खालील बाप्पाचे चित्र उजूची कन्या इशिका हिने भाज्यांच्या सहाय्याने रंगवले आहे.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

मस्त फोटो हेमाताई माझी
मस्त फोटो हेमाताई
माझी अत्यंत आवडीची फुलं 
जिप्सी, धन्यवाद. तुम्ही
जिप्सी, धन्यवाद. तुम्ही चांगल म्हणण्याला माझ्या लेखी फार महत्व आहे.
व्वा हेमा ताई, कसला सुरेख
व्वा हेमा ताई, कसला सुरेख फोटो काढलाय!
फोटो बघुन चंद्रकांत गोखले यांच्या ओळी आठवल्यात..
" झाडावरुन प्राजक्त ओघळतो त्याचा आवाज होत नाही,
याचा अर्थे असा नाही की त्याला इजा होत नाही!"
सप्तपर्णी ची फुलं कशी असतात?
मस्त फोटो पारिजातकाचा! पूर्वी
मस्त फोटो पारिजातकाचा! पूर्वी छान झाड होतं अंगणात पण बांधकामात गेलं. नवीन लावलं पण जगलं नाही.
हेमाताई मस्त फोटो
हेमाताई मस्त फोटो पारिजातकाचा. आमच्या सोसायटीत आहेत झाडं लकीली.
प्राजक्ताच्या फुलाचा फोटो छान
प्राजक्ताच्या फुलाचा फोटो छान पण ही फुलेही थोडी वेगळी आहेत. पाकळ्या थोड्या लांब वाटताहेत.
सप्तपर्णी ची फुलं कशी
सप्तपर्णी ची फुलं कशी असतात?>>>>सप्तपर्णीची फुले साधारण रातराणीसारखीच दिसतात.
याचे बोटॅनिकल नावः alstonia scholaris
इथे आहेत सप्तपर्णीची फुले आणि झाडाचा फोटो
http://3.bp.blogspot.com/-bOn00HtOpZc/TrL2O5AGrYI/AAAAAAAAA0U/KqQK1BWgaI...
अरे वा. हे सप्तपर्णी बघितलं
अरे वा. हे सप्तपर्णी बघितलं आहे कुठेतरी, आठवत नाही आता. हे नाव आहे माहितीच नव्हतं.
जिप्सी thanx.
छान आहे फोटो हेमाताई. याला
छान आहे फोटो हेमाताई.
याला सप्तपर्णी म्हणतात, वेलची सारखा वास आसतो, मला त्रास होतो याचा वास आला का,पण आज सोध लागला या झाडाच्या नावाचा, खुप झाड आहेत घराजवळ,त्याला शेंगा पण येतात ना?
अन्जू, रस्त्याच्या कडेला याची
अन्जू, रस्त्याच्या कडेला याची भरपूर झाडे असतात (निदान विक्रोळी-पवईला तरी आहेच).
वेलची सारखा वास आसतो,>>>>>पलक, अगदी अगदी.
अजुन कुणालातरी याच्या वासाचा त्रास व्हायचा, बहुतेक साधना (?).
हो जिप्सी, आता कधी तिकडे
हो जिप्सी, आता कधी तिकडे जायला मिळाले तर नीट लक्ष ठेवेन.
उत्तराखंड मध्ये मात्र
उत्तराखंड मध्ये मात्र सप्तपर्णी अशी दिसते.
(हा फोटो रानीखेतच्या चौबतिया बागेत काढलाय).
सॉलिड मस्त आहे हा फोटो,
सॉलिड मस्त आहे हा फोटो, जिप्सी.
जिप्सी, धन्यवाद... सध्या ही
जिप्सी, धन्यवाद... सध्या ही फुलं खुप दिसतायत, मी फोटो टाकणारच होती हे विचारायला की ही फुलं कसली?
उत्तराखंड मधली सप्तपर्णी व्वा! खुपच देखणी आहे...
दमेकर्यांना या वासाचा ( खरं
दमेकर्यांना या वासाचा ( खरं तर परागकणांचा ) खुप त्रास होतो.
जिप्स्या, मस्त फोटो.
व्वॉव्व सुंर्रेख फोटो
व्वॉव्व सुंर्रेख फोटो ,जिप्स्या..
आणी ममो ती प्राजक्ताची फुलं ही गोडमिट्टं दिस्ताहेत
जिप्सी, फोटो मस्त आलाय. लिंक
जिप्सी, फोटो मस्त आलाय. लिंक मध्ये आहे तशी सप्तपर्णीची झाडं ठाण्यामध्ये राम मारुती रोड वर दुशीकडे लावली आहेत. झाड ही हिरवं आणि फुलं ही हिरवी. छान दिसतात.
प्राजक्त आणि शिंपी+ त्याचा
प्राजक्त आणि शिंपी+ त्याचा बटवा छान. कोकणात ज्याला पुनई म्हणतात तेच सप्तपर्णी वाटतंय.
मनीमोहोर, छान फोटो.
मनीमोहोर,
छान फोटो.
उत्तराखंड मध्ये मात्र
उत्तराखंड मध्ये मात्र सप्तपर्णी अशी दिसते >>>>> ते हे झाड आहे जिप्सीभौ
- Indian or Himalayan Horse Chestnut - Aesculus indica
दसर्याच्या सर्वांना हार्दिक
दसर्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
सायली चं.गो.ची कविता मस्त आहे, आधीच्या पोस्टमधे लिहायला विसरले.
विजयदशमीच्या हार्दीक
विजयदशमीच्या हार्दीक शुभेच्छा.
वासना / क्रोध / मोह / लोभ / मद / मत्सर / स्वार्थ / अन्याय / अमानवता / अहंकार -- या दहा शत्रूंवर विजय मिळवायचा दिवस.
शोभिवंत माश्यांचे
शोभिवंत माश्यांचे प्रदर्शन
http://www.mid-day.com/articles/fish-exhibition-in-kandivali-begins-toda...
दिनांक: १ ते ६ ऑक्टोबर, २०१४.
वेळ: सकाळी १० ते रात्री ९
पत्ता: Aqua Life exhibiton, Kandivali Recreation Club, Opp. KES college, Shantilal modii Rd., Bhagat colony, Kandivali West, Mumbai 67.
प्रवेश फी: ६० रू.
दसर्याच्या सर्वांना हार्दिक
दसर्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
मी सोमवारी जाणार आहे. अजुन कोणी येणार आहे का?
केशर.. फोटोग्राफीची परवानगी
केशर.. फोटोग्राफीची परवानगी असेल तर अवश्य काढा आणि आम्हाला दाखवा इथे !
सर्वांना विजयादशमीच्या
सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
मनीमोहोर, पारिजातकाचा फोटो
मनीमोहोर, पारिजातकाचा फोटो खूप आवडला आणि सायलीने उद्धृत केलेल्या काव्यपंक्तिही!
सप्तपर्णीच्या फुलांचा फोटो खासच, जिप्सी.
सर्वांना विजयादशमीच्या
सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
सध्या रोमात ! धागा नियमित वाचणे सुरू आहे.
सायली.. सुंदर
सायली.. सुंदर कविता..
विजयादशमी च्या हार्दिक शुभेच्छा.. सर्वांना...
विजयादशमीच्या सर्वांना
विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!!
हि फुलांची रांगोळी आज सकाळी मी काढली (दिनेशदा ऐकताय ना "मी" काढलीय, तुमच्या "सुनबाईंनी" नाही. :फिदी:)
आणि थोड्या थोड्या वेळाने पाण्याचा स्प्रे मारत राहिलो. आत्तापर्यंत एकदम ताजी आहेत फुलं.


Pages