नदीला सागराची ओढ असली तर असू द्या ना

Submitted by मिल्या on 25 September, 2014 - 04:09

नदीला सागराची ओढ असली तर असू द्या ना
मला तुमच्यामधे थोडा तरी सागर दिसू द्या ना

नका सांगू मला प्रेमात पडण्याचे नफे तोटे
तुम्ही फसलात ना! आता मलासुद्धा फसू द्या ना

जरासे मौन धरले तर तमाशा केवढा करता
मला माझ्याच सान्निध्यात घटकाभर बसू द्या ना

तगादा आत्महत्येचा कशाला लावता मागे?
गिधाडांनो मला जमिनीस तर आधी कसू द्या ना

किती ढाळाल नक्राश्रू, व्यथांना पाहुनी माझ्या
किती मी सांत्वने सोसू, मला थोडे हसू द्या ना

मला ही जिंदगी तर एक सोडा बाटली वाटे
सुखे मिळतील, आधी दु:ख सारे फसफसू द्या ना

बिया होऊन जगण्याचा वसा मी घेतला आहे
भले रुजणार कोठे ज्ञात नाही तर... नसू द्या ना

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जरासे मौन धरले तर तमाशा केवढा करता
मला माझ्याच सान्निध्यात घटकाभर बसू द्या ना

तगादा आत्महत्येचा कशाला लावता मागे?
गिधाडांनो मला जमिनीस तर आधी कसू द्या ना>>>> जबरी! हृदयास भिडते.

नदीला सागराची ओढ असली तर असू द्या ना
मला तुमच्यामधे थोडा तरी सागर दिसू द्या ना >>>>>वा !

नका सांगू मला प्रेमात पडण्याचे नफे तोटे
तुम्ही फसलात ना! आता मलासुद्धा फसू द्या ना >>>>> वा वा !

जरासे मौन धरले तर तमाशा केवढा करता
मला माझ्याच सान्निध्यात घटकाभर बसू द्या ना>>> क्या बात !

किती ढाळाल नक्राश्रू, व्यथांना पाहुनी माझ्या
किती मी सांत्वने सोसू, मला थोडे हसू द्या ना >>>>> आह ! मस्त मस्त !!

बिया होऊन जगण्याचा वसा मी घेतला आहे
भले रुजणार कोठे ज्ञात नाही तर... नसू द्या ना>>>>> सुंदर !

मला तुमच्यामधे थोडा तरी सागर दिसू द्या ना<<व्वाह !

जरासे मौन धरले तर तमाशा केवढा करता
मला माझ्याच सान्निध्यात घटकाभर बसू द्या ना

मस्त .

गझल आवडली . Happy

रीया आभार

बेफी, सुप्रियाताई : तुमचे विशेष आभार.. मी जिथे जिथे हि गझल प्रकशित केली आहे तिथे तिथे अगदी न चुकता तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल.. तुमच्या ह्या उत्सहाचे खरेच कौतुक वाटले.