ऊन पावसाचा खेळ

Submitted by स्वप्ना_तुषार on 21 July, 2009 - 14:14

आज मला एकान्त हवाय , जिवाचा आकान्त हवाय...
बरबट्लेल्या जगाच्या घाणीन मन अगदी ऊबून गेलय ...
पाऊस पडुन गेला तरी मन उदास करुन ऊन गेलय

मी विचारल पावसाला " अरे होतास कुठे इतके दिवस? तुझ्यासाठी बोललेय मी नवस..."
गूढ हसून पाऊस म्हणाला " अग इथच तर होतो तुझ्यापाशी , तुलाच तर जपत होतो बसून उशाशी..
पण तुल आपल ऊनच बर , तुम्हा माणसाना सुखापेक्शा दु:ख हव हेच खर.."

मी म्हटल " खर रे बाबा , जीवन हा तर ऊन पावसाचा खेळ, बसवणा-यालाच बसवता येतो मेळ
बाकी सुखापेक्शा दु:ख बर आणि तुझ्यपेक्शा ऊनच खर...
तू आपला चार दिसाचा ऊन आमच्या आयुश्य भराच ..
कश्ट आणि दु:खापेक्शा मला ओझ वाटत हार तु-याच.."

माझी सारी कथा ऐकुन पाऊस मनाशीच हसला...काहिच न बोलता निघुन गेला

गुलमोहर: 

थोड टायपिंगकडे लक्ष दिले तर कविता अजून छान वाटेल

तेही जमेल. आता तर सुरुवात आहे.
.........................................................................................................................
आयुष्याच्या पाऊलवाटी, सुख दु:खांचे कवडसे
कधी काहीली तनमन झेली, कधी धारांचे व़ळसे

दु:खामुळेच आहे सुखाची किंमत....... ऑपरेटिंग करताना काळजी घ्या..... कल्पना