मार्केट टॉक - आउटलूक

Submitted by केदार on 27 January, 2010 - 13:28

सेन्सेक्स आज ४९० पाँईटसने घसरला. पुढे काय?

१. २० ऑगस्टला मार्केट पडले पण २१ ला मार्केट गॅपने उघडले (१०४) व सुरु झालेली रॅली ( १४९२१) आक्टो १७ ला १७३२६ ला थांबली. (मध्ये एकदा दोन तीन दिवस पडून १५३९८ लेव्हल ला सपोर्ट घेऊन परत ही रॅली झाली.
२. नंतर तिथून खाली येऊन १५९०४ पर्यंत परत एकदा मार्केट खाली आले. (नोव्हे ३)
३. नोव्हे ३ पासून परत मार्केट वर गेले नोव्हे २५ पर्यंत १७१९८.
४. नोव्ह २७ ला गॅप डाउन ने मार्केट ओपन झाले. ( ओपन १६७१८ , हाय १८७१८, लो १६२१०, क्लोज १६६३२)
५. नंतर साईडवेज कधी वर कधी खाली करत ६ जानेवारीला हायस्ट पाँईट म्हणजे १७२९० ला गेले.

ह्या सर्व डेटाचा टेक्नीकल अ‍ॅनॅलिसिस केला तर बर्‍याच कन्फुझिंग लेवल्स सापडतात. पण नेमका ह्यावेळी मग इतिहास लक्षात घेऊन मागे मार्केट मध्ये काय घडले ह्यावर विचार केला. दर जानेवारीत गेले ५-६ वर्षे मार्केट पडते.

दिड-दोन आठवड्यांपूर्वी मी आणि उपास बोलताना त्याने विचारले की नंतरच्या लेवल्स काय असतील. त्याचाशी बोलताना मार्केट लवकरच खूप पडुन फर्स्ट सपोर्ट लेव्हल १६२०० वर जाईल असे सांगीतले होते. तेंव्हा मार्केट १७,७०० च्या आसपास होते, व १६,२०० कुठेही बोर्डवर येतील असे दिसत नव्हते. पण आज मार्केट १६,२८९ ला आहे.

उद्या एक्सापरीचा गुरुवार असल्यामुळे त्याचाही परिणाम होणार.

पुपुवर गेल्या आठवड्यात लिहीले होते की पैसे गोळा करा. आता ती वेळ येऊ घातली आहे. कालचा फॉल १६,२०० ला टच झाला नाही म्हणजे ह्या सपोर्ट लेव्हल तो थांबेल का? हे पाहायला आणखी दोन तीन दिवसांची गरज आहे पण इथे जर लगेच सपोर्ट मिळाला नाही तर नंतरचा सपोर्ट साधारण १५,३०० ते १५,५०० आहे असे वाटते.

पैसे असतील तर अनेक चांगले सेक्टर्स - मेटल्स, इन्फ्रा आणि फार्मा हे चांगले वाटत आहेत, जर अजून खाली घसरले तर नक्कीच ह्यात नक्कीच गुंतवणूक करायला सुरु करावी.

* हे सर्व माझे अंदाज आहेत, जे चुकीचेही असू शकतात. (असतात) आपले पैसे निट विचार करुन गुंतवा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाय द वे रिलायन्स २०० डीएमएच्या खाली गेलाय. >> अजून खाली जाणे अपेक्षित आहे का? विकत घ्यावा का आता?

माहीत नाही. मी रिलायन्सच्या वाटेला जात नाही.

रिलायन्सपेक्षा अडाणीवाल्यांचे शेअर्स जास्त फळ देतील असं वाततं. मेच्या पहिल्या पंधरवड्यात घेऊन थोडे कमवले होते. नंतर घेतले नाहीत हे चुकलं.

सहमत आहे रॉबीनहूड
अभ्यासूंन्नी हा धागा चालू ठेवावा..

सन फार्मा बद्दल काय मत?
मध्यंत्री एच्सी एल टेक मध्ये बोनस शेअर्स इश्यू झाले होते. मार्केट मध्ये जो जनरल सेन्स ऑफ हॅपीनेस होता तो हळू हळू जातो आहे. अच्छे दिन म्हणून तसे हातात काहीच येत नाहीये हे पचनी पडते आहे लोकांच्या. बजेटच्या दिवशी पण युफोरिआ असा नव्हताच यावर्शी.

रिलायन्स १००० कधी क्रॉस करेल? करेल का?

सन फार्मा, कधिही घ्या, चांगले रिटर्न देतोच देतो, मि २ महिन्यपुर्वि ९०० ला घेतला, अजुनहि विकला नाहि, आनि रिलायन्स कडुन कधिही काहिही अपेक्शा ठेवु नये.

आज सन फार्मा ५२ वीक्स बेस्ट फिगर टच केली आहे. तो जरा पडे परेन्त वाट पहावी लागेल.
चांगले मिड कॅप लार्ज कॅप सुचवा ना.

unitech @ Rs 8.73 purchased today

काही माहिति देऊ शकाल ?

Pages