निसर्गाच्या गप्पांच्या २२ व्या भागाच्या पदार्पणासाठी सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.
सनईचा सूर कसा वार्याने भरला
ढगांचा ढोल घुमू लागला,
बिजलीचा ताशा कसा कड कड कडाडला,
पाऊस फुलांचा वर्षाव सोबतीला,
आला आला आला आला गणराज आला
तर अशा निसर्गाच्या वाद्यांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होते. बाप्पाच्या पाहुणचाराची तयारी निसर्गानेही भरभरून केलेली असते. आषाढ, श्रावण सरींनी तृप्त झालेली, तृप्तीच्या आनंदात बहरणारी धरा पाचूचा हिरवाकंच पदर डोईवर घेऊन बाप्पाच्या स्वागताला दुर्वांच्या पायघड्या घालून तयारीत बसते. जोडीला असतात खास गौरी-गणपतीला लागणारी तेरड्याची फुले, गणेशाची लाडकी जास्वंद, सुगंधाची उधळण करणारा सोनचाफा , जाई, जुई, पारीजातक, गुलाबाची फुले.
गणपतीचे नाव जरी घेतले तरी त्याचे गोंडस रूप नजरेसमोर तरळते. कोणत्यही कलाकाराला भुरळ पाडेल असेच आहे बाप्पाचे रुप. निसर्गही पुढे सरसावून आपली कलाकारी बाप्पाच्या चरणी अर्पण करत असतो. आपणही पर्यावरण स्नेही पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून हा निसर्गाचा ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया.
वरील प्रस्तावना मायबोली नि.ग. प्रेमी आय.डी उजू कडून. तसेच खालील बाप्पाचे चित्र उजूची कन्या इशिका हिने भाज्यांच्या सहाय्याने रंगवले आहे.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

नवरात्री च्या हार्दिक
नवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा!
सध्या आमच्या कडे "दुपार
सध्या आमच्या कडे "दुपार शेंद्री" ला भर भरुन कळ्या आल्या आहेत..:)


भर दुपारी, ११ ते १२ च्या सुमारास लालबुंद फुलं उमलतात....
नवरात्रीच्या शुभेच्छा. आमच्या
नवरात्रीच्या शुभेच्छा.
आमच्या सोसायटीत होते निगडीचे झाड, तोडले आता.:राग:
अश्विनशुद्धपक्षी अंबा बैसली
अश्विनशुद्धपक्षी अंबा बैसली सिंहासनी हो !
प्रतिपदेपासुनी घटस्थापना ती करून हो !
ब्रम्हा विष्णू रुद्र, आईचे पूजन करीती हो !
उदो बोला उदो, अंबाबाईमाऊलीचा हो !
उदोकार गर्जती, काय महीमा वर्णू तिचा हो !
अजून आठवतेय मला ही आरती.
हो दा!नवरात्रात रोज सकाळी आणि
हो दा!नवरात्रात रोज सकाळी आणि संध्याकाळी म्हणतो आम्ही ही आरती...
नवरात्र माझ्या जावेकडे असते आणि गणपती माझ्याकडे..
आज हिरवा. देवीचा / समृद्धीचा
आज हिरवा. देवीचा / समृद्धीचा / बहराचा / नवचैतन्याचा / निगचा (:डोमा:) रंग.
सुदुपार... हे दुपार शेंद्री
सुदुपार...
हे दुपार शेंद्री चे फुल... फोटो रात्री घेतल्यामुळे धुसर आलाय आणि फुलं पण मिटायला आलं होतं....


मोनाली छान फोटो..
तो निर्गुडीच्या पानाचा लेप
तो निर्गुडीच्या पानाचा लेप कसा लावायचा कुणी सांगु शकेल का? किंवा निर्गुडीचे तेल कुठे मिळेल ते.>>>>अरे, कुणीतरी उत्तर द्या ना.
मलाच पाहिजे आहे. 
पाय लचकला वाट्ट! कुठे
पाय लचकला वाट्ट!


कुठे धडपडले क्यामेरा घेऊन....
पानं मिक्सर मधुन वारिक करा,
पानं मिक्सर मधुन वारिक करा, लेप लावा, कापडी पट्टी गरम पाण्यातुन गच्च भिजवुन त्यावर बांधा, वरुन गरम पाण्याच्या पिशवीने शेका.... ( माझी मैत्रीण सांगते आहे... :))
जिप्स्या कसा करतात ते माहीत
जिप्स्या कसा करतात ते माहीत नाही. पण पाने वाटून लेप लावून त्यावर शेक दिलास तर आराम पडेल. तेल एखाद्या आयुर्वेदीक मेडीकलच्या दुकानात विचार.
लचकला नाही, उजव्या गुढग्याला
लचकला नाही, उजव्या गुढग्याला काहितरी मार लागलाय (कधी, कुठे, कसं ते काहीच आठवत नाहिए). मध्येच जीवघेणी कळ येतेय.
डॉक्टरकडे जाऊन पेनकिलर घ्यायची नाही आहे. 
धन्स जागू, सायली
जिप्सी, कुठल्याही औषधाच्या
जिप्सी, कुठल्याही औषधाच्या दुकानात निगडी / निर्गुडीचे तेल माग ( खरं तर कुणाला तरी सांग ) दु़ख दबाव लेप म्हणूनही एक लेप तयार मिळतो. ( त्याला मस्त वास येतो )
ओक्के दिनेशदा. दिनेशदा,
ओक्के दिनेशदा.
दिनेशदा, तुम्हाला वेळ मिळाल्यास मला फोन कराल का?
तो निर्गुडीच्या पानाचा लेप
तो निर्गुडीच्या पानाचा लेप कसा लावायचा कुणीतो निर्गुडीच्या पानाचा लेप कसा लावायचा कुणी सांगु शकेल का? किंवा निर्गुडीचे तेल कुठे मिळेल ते.>> अरे पाण्यात निरगुडीची पाने टाकुन उकळवायचे व झेपेल इतक्या गरम पाण्यात पाय टाकुन बस व शेक घे.
वर बाकिच्यांनी सांगीतलेय तसा लेप लावलास तरी चालेल. कोणत्याही आयुर्वेदीक दुकानात मिळेल की ते तेल. ठाण्यात पाहु का? नाहितर भावाला सांगुन डोंबिवलीहुन पाठवु शकेन. ऑफिसला जातोयेस का?
जिप्सी बजरंग लेप म्हणुन पण
जिप्सी बजरंग लेप म्हणुन पण मिळतो, (मेडीकल स्टोअर्स मधे),पावडर असते... आपल्या आंबीहळदी सारखीच
लोखंडी छोट्या कढईत थोड्या पाण्यात भिजवुन खदखद शिजवुन जरा कढत्तच लावा... लगेच फरक पडेल...
धन्यवाद मोनाली/सायली
धन्यवाद मोनाली/सायली
भावाशी बोललेय रे. तो ऑफिसला
भावाशी बोललेय रे. तो ऑफिसला येताना आणेल. (होप तो निलगिरीचे ना आणो.
उगाच मला पण फोनवर कन्फ्युज करत होता. 
दुपारी फोन कर त्याला.
थँक्स मोनाली. दुपारी त्याच्या
थँक्स मोनाली.
दुपारी त्याच्या डेस्कवर जातो.
जिप्स्या, विपू बघ रे.
जिप्स्या, विपू बघ रे.
चांदीच्या वर्खाबाबत मायबोलीवर
चांदीच्या वर्खाबाबत मायबोलीवर नेहमीच विचारले जाते.
एक लेख बघा.
मिठाईच्या कोणत्याही दुकानात चांदीचा वर्ख लावलेली मिठाई हमखास आढळते, पण ती खाण्यास योग्य आहे का, असा प्रश्न हमखास प्रत्येकाच्या मनात येतो. याचबरोबर फक्त चांदीचाच वर्ख बनवता येतो का, की इतर मूलद्रव्यांचाही वर्ख बनवता येतो?
लाटता येण्यासारख्या कोणत्याही धातूपासून वर्ख बनविता येतो. मात्र वर्ख बनविण्यासाठी तन्य व प्रसरणशील धातू सोयीचा असतो. धातू जेवढा अधिक तन्य व वर्धनशील असतो तेवढा अधिक पातळ वर्ख तयार करता येतो. उदा. सर्वात तन्य असलेल्या सोन्याचा ०.०००००७५ सेंमी. जाडीचा वर्ख बनविता येतो. वर्खासाठी धातुशुद्धताही असावी लागते. कारण अशुद्ध घटकांमुळे धातूची तन्यता कमी होते. वर्ख सामान्यपणे ०.००५ सेंमी. वा त्याहून पातळ असतो.
सोन्याचांदीचे वर्ख सर्वसाधारणपणे घरगुती पातळीवर व मुख्यत्वे लाकडी हातोडय़ाने ठोकून तयार करतात. याकरिता अतिशुद्ध सोन्याच्या वा चांदीच्या पत्र्याचे छोटे तुकडे घेतात. त्यांच्यामध्ये चिवट कागदाचे वा श्ॉमॉय चामडय़ाचे तुकडे घालून एकावर एक रचतात. नंतर या चवडीवर लाकडी हातोडय़ाने ठोके देऊन वर्ख तयार करतात. प्रत्येक ठोक्यानंतर चवड फिरवितात. यामुळे पुढील ठोका दुसऱ्या जागी बसून पत्रा प्रसरण पावत जातो. या पद्धतीने दीर्घ काळाने हळूहळू प्रसरण पावत जाऊन पत्र्यापासून अतिशय पातळ असे वर्खाचे मोठे तुकडे तयार होतात.
चांदीचा वर्ख पानांचे विडे, मेवामिठाई आणि अन्य खाद्यपदार्थ सजविण्यासाठी, तसेच दंतवैद्यकात व विद्युत विलेपनातही वापरतात. वर्ख म्हणून खाण्याच्या पदार्थात या मूलद्रव्यांचा वर्ख वापरला जातो, पण यासाठी ही मूलद्रव्ये शुद्ध स्वरूपात असावी लागतात. वर्ख स्वरूपात चांदी, सोने ही मूलद्रव्ये निष्क्रिय असतात. चांदीच्या वर्खासाठी चांदी ९९.९% इतकी शुद्ध असणे आवश्यक आहे. एका किलोमागे चांदीचा वर्ख हा १ मि.ग्रॅमपेक्षा कमी असावा, जर जास्त प्रमाणात चांदी शरीरात गेल्यास अर्जयिा हा आजार उद्भवतो.
हल्ली खूपदा चांदीच्या वर्खाऐवजी अॅल्युमिनिअमचा वर्ख वापरला जातो. आरोग्याच्या दृष्टीने ते घातक आहे. शरीरात अॅल्युमिनिअमचं प्रमाण वाढल्यास चेतासंस्थेवर व मेंदूवर वाईट परिणाम होतो.
शुभदा वक्टे (मुंबई), मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
http://www.loksatta.com/navneet-news/curiosity-silver-foil-968377/
माझ्याकडे कोरफडीला फुलं आली
माझ्याकडे कोरफडीला फुलं आली आहेत.
इथे पहा
http://www.maayboli.com/node/50980
निगवर पोस्ट टाकली आणि काहि
निगवर पोस्ट टाकली आणि काहि तासातच निर्गुडीचे तेल अगदी ऑफिसपोच (घरपोच सारखं वाचाव
) मिळाले.
मोनाली, मनापासुन धन्यवाद!!!!
अरे वा.. मोनाली, सो नाईस ऑफ
अरे वा.. मोनाली, सो नाईस ऑफ हर!!!
जिप्स्या.. रिझल्ट कळव रे लावलंकी.. विगरस एक्सरसाईझेस मुळे अधून मधून गुडघा दुखतो ..
(बरं झालं जिप्स्या चाही दुखत असल्याने कुणी वय झालंय असं म्हणू शकत न्हाय मला
)
छत्रपती शिवाजी महाराजांचेही
छत्रपती शिवाजी महाराजांचेही गुडघे दुखत असत !
मोनाली, मनापासुन धन्यवाद!!!!
मोनाली, मनापासुन धन्यवाद!!!! स्मित>>> इश त्यात काय. नेकी कर और भुल जा. बाय आता.
दिने>>श......... कै
दिने>>श.........
कै च्या कैच !!!!!
पाय लचकला वाट्ट! फिदीफिदी
पाय लचकला वाट्ट! फिदीफिदी फिदीफिदी फिदीफिदी

कुठे धडपडले क्यामेरा घेऊन.... स्मित>>>>>>>>>>>
अरे काय चाल्लय का? त्या गुर्जींच्या गुढग्यांवरून थेट शिवाजी महारांच्या गुढग्यापर्यंत? व्हाया वर्षूज गुढगे?
मानुषी,
मानुषी,
मानु
मानु

Pages