खैरु

Submitted by nikhil_jv on 17 July, 2009 - 04:28

विविध जातीधर्माची माणसे एकत्र नांदणार्‍या आपल्या या देशात कधी कोण कुठल्या रुपाने आपल्याला मदत करेल ते सांगता येणार नाही. तेव्हा त्या व्यक्तीकडे आपण चांगला माणुस म्हणुनच बघतो. त्या व्यक्तीच्या जातीधर्माला तेव्हा काहीच महत्व राहत नाही. कारण त्या व्यक्तीने वेळप्रसंगी आपल्याला केलेली मदत आपली जात बघुन केलेली नसते. मग काहीवेळा आपल्यालाच आपल्या कृत्याचा पश्चाताप होतो. मग असेच प्रसंग जातीचे बंधन झुगारुन प्रत्येकाकडे माणुस म्हणुन बघायला पवृत्त करतात. आपल्या जातीचा अभिमान नक्की असावा पण त्याच बरोबर दुसर्‍याच्या जातीचाही आदर करायलाच हवा. खरतर प्रत्येकाने प्रत्येकाला माणुस म्हणुनच ओळखावे. इथे जातीधर्माचे विश्लेषण करण्याचे कारण म्हणजे खैरु. एक मुस्लिम मुलगी. हिंदूंमधे वावरणारी. आपल्या धर्माप्रमाणेच हिंदू धर्म मानणारी, त्याचा आदर करणारी. सर्व रितीरिवाज पाळणारी.

खैरुची आणि माझी ओळख सत्संगमध्ये झाली. आम्ही सर्व नरेंद्र महाराजांच्या सत्संगमध्ये जातो. तिथेच खैरुही यायची. सर्वांशी ओळख करता करता खैरुशीही माझी ओळख झाली. तिने मला तिच नाव सांगितल्यावर मला खरच काही आश्चर्य वाटल नाही. कारण तिच्या राहणीमाना वरुन ती मुस्लिम आहे असे वाटतच नाही. आणि ती अख्खलित मराठी बोलते. आणि तिच्या बोलण्यावरुन तर संशय घ्यायला मार्गच नाही. सांगायचा मुद्दा हाच की तिने नाव सांगितल्यावर मला आश्चर्य वाटल नाही पण तिच कौतुक जरुर वाटल. ती बी.कॉम आहे. आणि साधारण माझ्याच वयाची असावी. असा माझा अंदाज. मी काही तिच वय विचारल नाही. पण तिच्याशी गप्पा मारायला कोणालाही आवडेल अशीच आहे ती. साद्या सरळ पंजाबी ड्रेसमध्ये वावरणारी. हसताना गालावर खळी पडणारी खैरु म्हणजे बघताक्षणी कोणालाही प्रेमात पाडेल अशीच आहे.

सुरुवातीला आम्ही एकमेकांना अहोजाहो करायचो. पण तो अहोजाहो कधी एकेरी वर आला ते कळलच नाही. चांगली मैत्री झाली आमची. अगदी बर्‍याचदा आम्ही संत्संगवर तसेच पर्सनल गोष्टींवरही चर्चा करायचो. अशीच चर्चा करताना तिने आपल्या घरच्या सर्व गोष्टी मला सांगितल्या. ती सांगत होती तिच संपूर्ण शिक्षण इथेच झाल. ३ बहिणी, २ भाऊ आणि आईवडील अस कुंटुंब आहे त्यांच. २ बहिणींच लग्न झाल आहे. आणि ही सर्वात लहान म्हणुन वडीलांची लाडकी . तिच्या घरात वडील एकटेच कमावते. मोठा भाऊ थोडा वाईट वळणाचा त्यामुळे त्याचे घरात लक्ष नसते. दुसरा भाऊ अजुन शिकतो आहे.

एकुण सर्व बर्‍यापैकी चालल होत. पण २६जुलै २००५चा पुरात तिचे वडील तळमजल्यावर राहणार्‍या एका कुटुंबाला वाचवायला गेले आणि पाय घसरुन पडले. डोक्याला खूप मार लागला होता. इलाज करण्यासाठी बाहेर जाता येत नव्हते. आणि त्यातच त्यांचा मृत्यु झाला. घरातल्या कर्त्या आणि ते ही वडीलांचा असा अचानक मॄत्यु झाल्यावर कुटूंबाची घडी कशी अस्ताव्यस्त होते याची जाणीव मला तेव्हा झाली.

खैरु सांगत होती वडील गेल्यावर मोठ्या भावाने सर्व जवाबदारी घ्यायला हवी होती पण तो.. त्याच वर्णन करताना ती म्हणते "माझ्या मोठ्या भावासारख सर्वानी जगायला हव. काही टेंशन नाही. आपल्याला दोन वेळेच जेवण मिळतय. उलट कोणी बोलु नये म्हणुन सतत बाहेर रहाव. कोणाच ऐकण्याची गरज नाही" पण लहान भावाबद्दल ती फारच हळवी होते. ती म्हणते "वडील गेल्यावर त्याने आपले शिक्षण लगेजच थांबवले आणि तो नोकरीला लागला. आता सर्व जवाबदारी त्याच्यावरच आहे. ती कळंबोळीला अकाऊंटंट म्हणुन जॉब करते. याच दरम्यान तिची माझ्या वडीलांशी भेट झाली आणि वडीलांनी तिला सत्संगचा मार्ग दाखवला. तेव्हापासुन तिला आमची ओढ लागली आहे. ती आली की बर्‍याच गप्पा करते. माझ्याशी, आईशी, पप्पाशी अगदी दिलखुलास बोलते. अगदी सर्व प्रॉब्लेम्स डीसकस करते.

एकदा असच खैरुशी गप्पा करताना तिने एका मालवणी कुटुंबाबद्दल मला सांगितल. हे मालवणी कुटुंब म्हणजे, खैरुचे वडील ज्यांना पाण्यातून वाचवायला गेले ते. त्या कुटुंबाबद्दल खैरु मला सांगायला लागली तेव्हा मला खर आश्चर्य वाटल. मला वाटत होत की तिचा थोडा राग असावा त्यांच्याबद्दल पण ती तर त्यांचे गोडवे गात होती. एक प्रसंग तर तिने एवढा हास्यास्पद सांगितला की आमची दोघांची हसुन पु.वा. झाली. खैरुचे वडील अखेरचा घटका मोजत असतानाच प्रसंग ते मालवणी कुटुंब आपल्या मालवणी मिश्रित हिंदीमध्ये खैरुच्या नातेवाईकांना कथन करत होती. ते वाक्य तिने मला सांगितल "तोंड मे फेस आया, मग मै पानी डाला. खरच खूप हसलो त्या वाक्यावर आम्ही.

खैरुने आपली गाडी त्या कुटुंबाकडे वळवली होती. आणि त्या कुटुंबाबद्दलच ती अखंडपणे बोलत होती. सुरुवात तिने तिच्या जीवाभावाच्या मैत्रिणीपासून केली. ती खैरुपासून दोन तीन वर्षाने लहान. पण खूपच साधी आणि सरळ मुलगी जी मुंबईत वाढली असली तरी तिने अजुन गेट वे ऑफ इंडीया पाहिला नाही. खैरु तिच्या बद्दलही फार हळवी झाली होती. सतत माझी मैत्रिणी म्हणण्यामध्ये तिला तिच्याबद्दल किती आपलेपणा आहे हेच जाणवत होत. पण ती मैत्रिण फार उदास असते. वर्षभरापूर्वीच तिचा भाऊ ट्रेन अ‍ॅक्सिडंटमध्ये गेला. याचा तिने फारच धसका घेतला आहे. भावावर तिचा खूप जीव होता. ती त्याला विसरुच शकत नाही. जरासा विषय काढला की लगेज रडते. कुठेतरी तिला बदलण्याची भावना खैरुमध्ये दिसत होती. त्यासाठी मला ती म्हणत होती, "तिला पण आपल्या सत्संगमध्ये आणायला हव. पण मी तिच्यावर जबरदस्ती करणार नाही. ती स्वखुशीने यायला हवी" मला जाणवल की हिला माझी मदत हवी आहे पण ते ती स्पष्टपणे सांगत नव्हती. ती कदाचित मी बोलतोय का याची वाट पहात असावी. मी नुसत तिला म्हटल की तिला एकदा घरी घेऊन येना.. तर ती संद्याकाळीच तिच्यासोबत हजर.

तिने आमच्या सर्वांशी तिच्याशी ओळख करुन दिली. प्रतिसाद देताना ती फक्त हसली. नंतर आईनेच तिच्याशी बोलायला सुरुवात केली. आई तिला नाव, गाव, पत्ता, बाबा काय करतात, आई काय करते, किती भावंडे आहात वगैरे वगैरे विचारत होती. ती मोजक्याच शब्दांत त्याची उत्तर देत होती. मध्येच मी आणि खैरु काही जोक्स करायचो. आणि आम्ही दोघेच हसायचो. ती क्वचितच स्मित हास्य करायची. आमच्या घरात खैरु फारच कम्फर्टेबल असते. काही घेताना, मागताना ती अजिबात लाजत नाही. आणि आम्ही अशा गोष्टींचा रागही धरत नाही. मी मात्र त्या मुलीकडे अधुन मधुन पाहत होतो. साधी, सरळ आणि काहीअंशी खैरुशीच मिळतीजुळती मला वाटली. तिच्या बोलण्यावरुन मला जाणवत होत आपल्या भावंडांव्यतिरिक्त कोणत्याही मुलाशी ती कधीच बोलली नसावी. कारण मी तिला आमच्या गप्पांमध्ये सामील करण्याचा प्रयत्न केला होता. पण मी काहीही विचारल तरी ती खैरुला विचारायची "काय ग? काय विचारल ग?" थेट माझ्या प्रश्नाना तिने कधीच उत्तर दिले नाही.

खैरुच्या मनात मात्र काहीतरी वेगळच चालल होत. दुसर्‍यादिवशी जेव्हा मला ती भेटली तेव्हा तिने मला प्रश्न केला "कशी वाटली माझी मैत्रिण?" मी म्हटल छान आहे. पुढे मी तिला विचारल देखील ती मुलांशी बोलत नाही का? खैरु म्हणाली घरातल्यांनी तिला जाम जखडुन ठेवल आहे. ती कॉलेजमध्ये पण कोणत्याही मुलांशी बोलत नव्हती. मी तिच शिक्षण विचारल. खैरु म्हणाली ती पण बी.ए आहे. पण तिच्या मोठ्या बहिणीने प्रेम विवाह केला. आता ती देखील त्या मार्गाने जाऊ नये म्हणुन तिला जास्त घरातून बाहेर पाठवत नाहीत. कधी कुठे गेलीच तर माझ्यासोबत जाते बाकी तिला मैत्रिणी पण जास्त नाहीत. तिच्या ज्या भावाच अ‍ॅक्सिडंट झाल तोच तिचा भाऊ आणि जवळचा मित्र पण होता. पण तो गेल्यापासून तर ती फारच उदास झाली आहे. जास्त कोणाशीच बोलत नाही. मी तिला गेली दहा वर्ष ओळखतेय आणि तिच यापुढे चांगल व्हाव अशी माझी मनापासून इच्छा आहे. तिच्यासाठी मी तिच्या घरच्यांशी भांडण देखील करेन. खैरु अखंड बोलत होती आणि मी ऐकत होतो. बोलता बोलताच खैरुने एक गुगली टाकली. माझ्यामते तिला तुमच्यासारख घर मिळाल तरच ती खुश राहु शकेल. यावर मी फक्त स्मितहास्य केल. पण तिने मला नक्कीच कोड्यात टाकल होत.

मी विचार करत होतो. ती खरच खूप छान मुलगी होती. पण तिच्या घरच वातावरण अशा गोष्टींसाठी पुरक नव्हतच. लागलीच मी खैरुला फोन केला. आणि तिने टाकलेल्या गुगलीबद्दल तिला विचारल. ती म्हणाली तुझ काय मत आहे? मी म्हटल थोडा विचार तर करुदेत... तर ती म्हणाली तुझ कुठे आहे का? आता मी तिला माझ्या आधीच्या अफेअरबद्दल काय सांगणार.... म्हणुन मी म्हटल तस नाही पण एकदाच तिला भेटल्यावर लगेजच कस सांगु? आणि तिच घरच वातावरण.. तिने माझा शब्द तोडतच म्हटल ते मी बघेन. तुझ काय ते सांग? मी म्हटल आधी तिला तर विचार.. ती म्हणाली ती अगदीच वेडी आहे तिच्या घरचे लग्न ठरवतील आणि ही कोणाशीही संसार करायला तयार होईल. मला कळत नव्हत ही मला एवढी गळ का घालते आहे. मी खैरुला म्हटल तिला रविवारी परत घरी घेऊन ये ना? तिने हो म्हटले.

रविवारी संध्याकाळी दोघीजणी आल्या. काळ्या कलरचा ड्रेस घातलेली ती खैरुची मैत्रिण खरच खूप छान दिसत होती. मला पाहिल्यावर ती हसली. तिला आमच्या मनात काय चाललय याची खरच कल्पना नव्हती. मी अधुन मधुन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचो पण ती बोलतच नव्हती. काही विचारल तरी ती खैरुलाच विचारायची. मी खैरुला म्हटल ती माझ्याशी बोलतच नाही. त्यावर ती म्हणाली आम्ही मंगळवारी डी मार्ट मध्ये जाणार आहोत. काही सामान खरेदी करायच आहे. तिथे तू अचानक ये. मी म्हटल ठीक आहे. त्याप्रमाणे मंगळवारी तिने फोन करुन आठ वाजता डी मार्ट मध्ये पोहोचायला सांगितल.

मी तिकडे आठ वाजता पोहोचलो आणि मी खैरुला फोन लावला तर ती माझ्या मागेच उभी होती. तिच्या मैत्रिणीनेच तिला सांगितल की तो बघ निखिल... पण तिला माहित नव्हत की मी फोनवर खैरुशीच बोलत आहे. मी त्यांना बघुन आश्चर्यचकीत भाव चेहर्‍यावर आणला. खैरुनेही चेहर्‍यावर तेच भाव आणत मला विचारल इथे कुठे? मी म्हटल मला शर्टस घ्यायचे होते म्हणुन मी इथे आलोय. तर ती म्हणाली चला तर एकत्रच शॉपिंग करुया. खरतर त्याचसाठी मी आलो होतो. आता मात्र त्या मॉलमध्ये फिरताना तिच्याशी बोलण्याची संधी आली होती. मी म्हटल तिला नेहमी इथुनच सामान खरेदी करतेस? त्यावर ती हो म्हणाली. माझ्याशी बोलायला पहिलाच शब्द तिचा तोंडुन आला होता. मला थोड बर वाटल. पुढे माझ्या प्रत्येक प्रश्नाला ती हो किंवा नाही असच उत्तर देत होती. त्यानंतर आम्ही तिथे पानीपुरी आणि मग आईस्क्रीम खाल्ल. मग त्यांना रिक्षात बसवुन मी घरी गेलो.

अगदीच दुसरी भेट असली तरी ती मला आवडायला लागली होती. कारण दुधाने तोंड पोळल्यावर ताक देखील फुंकुन पिणार्‍या माझ्यासाठी तिच योग्य मुलगी आहे अस मला वाटायला लागल होत. दुसर्‍या दिवशी मी खैरुला फोन केला आणि तस सांगितल तर तिने मला धक्काच दिला. ती म्हणाली चांगली गोष्ट आहे पण तू देखील तिला आवडायला हवास. मी खैरुला म्हटल अर्थातच तिची संमती असेल तरच आपण हे प्रकरण पुढे नेऊया. पण मनातून मी विचार करत होतो.... अशी काय ही??? आधी माझ्या मनात हिनेच तिच्याबद्दल भरल आणि आता ही आवडीनिवडीच्या गोष्टी का करते? खैरु मला पुढे म्हणाली की ती घाबरते अशा गोष्टींना. मग मी म्हटल आपण इथेच सोडुया का विषय तर म्हणाली नाही आपण तिला अस सोडायच नाही. मला तर खैरु काय बोलतेय आणि तिच्या मनात काय चाललय तेच कळत नव्हत. नंतर परत थोडी हसत खुश होत म्हणाली "आम्ही शुक्रवारी दादरला जाणार आहोत, तिच्या आत्याकडे. आम्ही अर्धातास तिथे थांबु त्यानंतर तू आम्हाला शिवाजी मंदिर जवळ भेट." मी म्हटल "अशाने तिला संशय येईल...." तर म्हणाली "येऊदेत. कळुदेत तिला." मी म्हटल ठिक आहे. मग भेटल्यावर मी तिला प्रपोज करु का? नको....असे ती हसत हसत ओरडुन म्हणाली. अस करशील तर ती कधीच बोलणार नाही. मी म्हटल मग तुझ्या मनात तरी काय आहे??? ती म्हणाली तू ये तर खर.

मी त्या दिवशी ऑफिसला सुट्टी घेतली. दहा वाजता घरातून निघालो, आणि बरोबर साडेअकराला दादरला पोहोचलो. उन्हाळ्याचे दिवस आणि या वर्षीचे ऊनतर जास्तच होत. मी शिवाजी मंदिरच्या अपोजिट एक झाड आहे. त्या झाडाच्या सावलीखाली उभा होतो. मी खैरुला फोन केला तर ती म्हणाली आम्हाला अजुन अर्धातास तरी लागेल. अस करत करत एक वाजला. आणि खैरुने मला फोन केला. आम्ही विसावा हॉटेल मध्ये जेवायला चाललो आहे. तिथेच आपण भेटुया. मी म्हटल ठिक आहे. मी तिकडे पोहोचलो तर या दोघी तिथे वेटींगमध्ये उभ्या होत्या. मी खैरुला हाय केल आणि म्हटल इथे कुठे? तर ती आश्चर्यचकीत भावाने म्हणाली हिच्या आत्याकडे आलो होतो... पण तू इथे कसा? मी म्हटल ऑफिसच थोड काम होत त्यासाठी इथे आलो होतो. या आमच्या दोघांमधील चर्चा ती शांतपणे ऐकत होती. मी म्हटल चला एकत्रच जेवु. खैरु म्हणाली चालेल.

थोड्यावेळाने आम्ही आत गेलो. खैरु मुद्दाम तिच्या बाजुला बसली नाही आणि मला तिने तिच्या शेजारी बसवल. आम्ही ऑर्डर केली आणि गप्पा मारत जेवत होतो. मला खैरु म्हणाली तुझ काम झाल का? आता फ्री आहेस का? मी म्हटल हो.. ती लगेज म्हणाली चला सिद्धीविनायकला चालतच जाऊ. तिच्या त्या मैत्रिणीच खैरुपुढे काहीच चालत नाही अस मला जाणवल..कारण ती हो देखील म्हणाली नाही आणि नाही देखील म्हणाली नाही. मी तर फिरण्यासाठी तयारच होतो. आम्ही चालत चालतच सिद्धीविनायकला जात होतो. मला खैरु खुणेने म्हणाली तू बोलायला सुरुवात कर्..मग मी तिच्याशी बोलायला सुरुवात केली. सुरुवात शिक्षणापासूनच. ती म्हणाली बी.ए. मी विचारल कोणत कॉलेज ती म्हणाली सी.के.टी.. मी मनात म्हटल हीपण सिकेटीचीच आणि नाव देखील आर वरुनच. आर मला लकी आहे की काय??? बस! फक्त एवढच संभाषण आमच्यात झाल. तिला अजुन बोलत करण मला जमलच नाही.

आम्ही दर्शन घेतल मग परतीचा प्रवास. तिथुन मात्र टॅक्सी केली. पण ती खैरु त्या टॅक्सीवाल्याचा बाजुला जावुन बसली.... आम्हाला म्हणाली मला पुढे बसायला आवडत. नंतर मागे वळुन मला म्हणते "निखिल आपण दादर-पनवेल बसने जाऊया...ट्रेनमध्ये गर्दी असेल्...मी मान डोलावली. आम्ही बसस्टॉप जवळ पोहोचलो. बस लागलेली होती. संपूर्ण बस खाली होती. खैरु मैत्रिणीला म्हणाली मी वाशीला उतरणार आहे माझ थोड काम आहे तू निखिलसोबत जा...या तिच्या बोलण्याने मी खूष झालो. पण तिच्या मैत्रिणीने काहीच उत्तर दिले नाही. बसमध्ये चढल्यावर खैरु परत मैत्रिणीला म्हणाली मी उतरणार आहे तर तू निखिलच्याच बाजुला बस्..आणि मग माझ्याकडे मोर्चा वळवत म्हणाली निखिल पोहोचल्यावर तिला रिक्षात बसवुन मग तू घरी जा... मी परत मान डोलावली. पण ती मैत्रिण बिचारी हे सर्व सहन करत होती. काहीच बोलत नव्हती. मी तरी काय बोलणार माझ्या मनात पण तर तेच होत. ती बसली माझ्या बाजुला. मी तिला काहीही विचारल तर आता ती खुणेनेच हो किंवा नाही म्हणत होती. पुढे वाशी आल. खैरु उतरली. मैत्रिणीला म्हणाली मी येते... तर मैत्रिण काहीच बोलली नाही.

ती पण कसला तरी विचार करत होती... ती आपल्याच विचारात गर्क, बसमध्ये खिडकीवर डोक ठेऊन बाहेर बघत होती. आणि बसच्या वेगाने सुटलेला वारा जेव्हा तिचे केस विस्कटत होता, तेव्हा तिच्यावर विचारांच किती ओझ आहे हेच जाणवत होत आणि त्या ओ़झ्याखाली तिची होणारी घुसमट जाणवत होती. ती स्वतःचे विचारच मांडु शकत नव्हती. एका जास्त ओळख नसणार्‍या माणसासोबत आपण प्रवास करत आहोत.... हेच तिच्या मनात असणार पण ते ती मोकळेपणाने बोलतच नव्हती. ती ना कोणत्या गोष्टीला सहमती दर्शवत होती ना विरोध करत होती... खरच! अशा ही स्वभावाची माणस असतात. पुढे आमच्यात काही जास्त संवाद घडलाच नाही. पनवेल आल्..आम्ही उतरलो...मी तिला रिक्षात बसवल...आणि मी माझ्या वाटेने घरी गेलो.

दुसर्‍या दिवषी परत खैरुचा फोन...खैरु हसतच Congratulations! मी म्हटल काय झाल? तर ती म्हणाली तुमच्या परिने(परि हे खैरुने तिला ठेवलेले नाव) मला विचारल. मी पण आनंदात म्हटल..काय? तर खैरु म्हणते परिने मला सकाळीच विचारल.."तुमच्या मनात तरी काय आहे?" मला वाटल ही एवढ्या आनंदात सांगतेय म्हणजे लग्नाचीच खबर देतय की काय... पण हिच्या आनंदाच कारण वेगळच होत. म्हणते मी जसा प्लॅन केला होता तसच घडतये. मी उत्सुकतेने विचारलच मग तू काय म्हणालीस? तर म्हणाली मी तिला म्हटल तुला कळल नाही का? आमच्या मनात काय आहे ते? त्यावर मैत्रीण हसली. मग आता विचार करुन मला सांग...खैरुने तिच्या विचारात आणखी एका विचाराची भर घातली. मी म्हटल चला एकदाच तिला कळलतरी...तर खैरु म्हणते तिच्या भल्यासाठी मी तिच्या घरच्यांशी भांडेन पण...फार फार तर माझ्याशी संबंध तोडतील किंवा माझ्या थोबाडीत मारतील... तेही मी सहन करेन.. पण तिच्यासाठी तुमचच घर योग्य आहे..खरच खैरुच्या या विश्वासाच कौतुक कराव तेवढ थोड आहे. तिचा एवढा विश्वास होता आमच्यावर. आणि मग मला तरी कुठे तिचा विश्वासघात करायचा होता. कारण तिने ठरवलेली मुलगी योग्यच होती.

खैरु मला आता रोजच्यारोज तिच्याबद्दल सांगु लागली. आणि मी पण उत्सुकतेने तिला सर्व विचारायचो. एकदा खैरु म्हणाली. मी तिला तुला फोन करायला सांगते. मी म्हटल ती फोन करेल का? कारण खरच या गोष्टींची तिला सवय नव्हती. तरी खैरुने जबरदस्तीने तिला फोन करायला लावलाच्..आमच्यातील संवाद पुढील प्रमाणे होते.
मी: कशी आहेस?
ती: बरी आहे
मी: रागावली आहेस का?
ती: नाही
मी: तू माझ्याशी मैत्री करशील का?
ती: पण मी अजुन त्याचा विचार नाही केलाये...आतापर्यंत आपण फक्त दोनदाच भेटलोय
(मी मनात म्हटल माझा मैत्री हा शब्द तिने प्रेम ऐकलाकी काय)
मी: मग आपण सारखे सारखे भेटु शकतो का?
ती: मी घरातून जास्त निघत नाही
मी: का?
ती: घरातल्यांना ते आवडत नाही
मी: मग मला जर तुझ्याशी लग्न करायचे असेल तर
( मी डायरेक्ट विषयाला हात घातला)
ती: माझ्या घरचे संमती देणार नाहीत
मी: पण माझ तुझ्यावर प्रेम आहे हे मी दाखवणार नाही, तुला रितसर मागणी घालेन
ती: घरचे माझ्यावर संशय घेतील
मी: मग मी विचार सोडुन देऊ का?
ती: मी अस कुठे म्हटलये, पण माझ्यावर दया दाखवुन माझ्याशी लग्न नको करुस
मी: दया कसली.. तू खरच मला आवडतेस.. तुझा स्वभाव मला आवडतो
ती: मी दाखवला तो माझा स्वभाव नाहीये... मी खूप रागीट आहे
मी: राग सर्वांनाच येतो
ती: मला थोडा जास्तच येतो
मी: मग मारतेस की काय?
ती: (हसूनच ) आता मी ठेवते...

दुसर्‍या दिवशी मी खैरुला सगळा वृत्तांत सांगितला. खैरु म्हणाली तू थोडा स्टायलिश राहतोस म्हणुन कदाचित ती घाबरते आहे. मग मी आता काय कराव अस तुझ म्हणण आहे? मी म्हटल. ती म्हणाली काही नको आता फक्त धीर धर्..बाकी मी बघते. संद्याकाळी तिचा परत फोन आला. तू शनिवारी काय करतोयस? मी म्हटल अजुन काही ठरल नाही. ती म्हणाली ठिक आहे. शनिवारी मी तुझ्याशी तिची एकांतात भेट घालुन देईन. त्यात तुम्ही काय ते ठरवा. आणि तेच फायनल असेल. मी म्हटल चालेल.

मी शनिवारची वाटच पहात होतो. आणि शनिवार उजाडला. पण सकाळपासूनच जोरदार पाऊस पडत होता. मला वाटल आजचा प्लॅन फिस्कटतोय बहुतेक. तितक्यात खैरुचा फोन "काय करायच?" "एवढ्या मुश्कीलीने तिला राजी केलये" मी म्हटल पडुदेत पाऊस... पण भेटायच नक्की. सुदैवाने दुपारनंतर पावसाचा जोर ओसरला. खैरुचा परत फोन आला. मला म्हणाली "गुड न्युज" मी म्हटल भेटण्याच्या आधीच राजी झाली की काय. तर म्हणते "ते नाहीरे पाऊस गेला." "तुमच्यापेक्षा मलाच जास्त टेंशन होत" त्यानंतर तिने अडीज वाजता भेटायचे ठरवुन फोन ठेवला.

तो दिवस माझ्या आयुष्यातला खरच चांगला दिवस होता. मी याच खुशीत होतो, की ती मला नाही म्हणाणारच नाही. आणि त्याप्रमाणेच वागत होतो. पण माझ अस तिला गृहित धरण किती चुकीच होत. हे मला तिला भेटल्यावर कळल. खरच! अशा ही मुली असतात. ज्यांना प्रेम वगैरे या गोष्टी किती फुटकळ वाटतात. त्या मुली आपल्या तत्वानुसार जगत असतात. अशा मुली कोणी आपल्याला भुरळ घालतो आहे म्हणुन त्याच्या जाळ्यात फसत नाहीत. किंवा त्यांच्यापुढे पैशाच आमिष चालत नाही. त्यांची मते स्पष्ट असतात. आणि कोणामुळे ही ती बदलु शकत नाहीत. असाच अनुभव आला मला त्या खैरुच्या मैत्रिणीला भेटल्यावर. तिने बोलताना आपल सर्व आयुष्य माझ्यासमोर उलगडुन दाखवल. आणि भविष्यही वर्तवायला ती विसरली नाही. पण तिचा प्रत्येक विचार मला पटत होता. आणि मला विचारात टाकत होता. आणि त्यात मी स्वतःला पडताळुन पाहत होतो. मला स्वत:कडुनच अपेक्षित उत्तर मिळत नव्हत. ती भेट खरच सस्मरणीय होती. विचार करायला लावणारी. अशा मुली चारचौघात कशा वागतात. आपल मत त्यांच्याबद्दल कसे बनते. पण प्रत्यक्षात त्या फारच हुशार असतात. जिथे आवश्यक आहे तिथेच आपल मत स्पष्टपणे मांडणार्‍या असतात.

ती भेट संपली. तिने अजुनही आपल उत्तर मला सांगितल नव्हत. पण मला ते समजल होत. माझी नाराजी दिसत होती. पण मी ती लपवतच तिला बाय केल. आणि खैरुला फोन लावला. खैरु म्हणाली "काय मग? काय ठरवलत? यंदा कर्तव्य आहे का नाही? तिच्या या प्रश्नांना बगल देऊन मी तिच्या मैत्रिणीचे कौतुक करायला सुरुवात केली. मी खैरुला सारख म्हणत होतो. "खरच अशीच मुलगी मला हवी. तिचे विचार तिची वागणुक" सर्व मला आवडल. ती म्हणाली पण तिला तू आवडलास का? त्यावर मी म्हटल तिने अजुन तस मला काहीच सांगितल नाही. त्यावर ती म्हणाली "तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे". "एवढा मोठा निर्णय ती लगेजच कसा घेईल". "सगळ्या मुली सारख्या नसतात." तिच हे बोलण एवढ संशयास्पद होत की मला वाटल की यांना माझ्या आधीचे अफेअर माहित आहे की काय? आणि मग त्यामुळे मला धडा शिकवण्यासाठी हे सर्व नाटक रचल होत की काय? मी विचार करतच फोन ठेवला

दुसर्‍या दिवशी मी खैरुला भेटायला बोलावल. ती एकटीच आली. मला खरतर माझ्या आधीच्या अफेअरबद्दल सांगायच होत म्हणुन मी खैरुला बोलावल होत. मी तिला सर्व खरं सांगितल. त्यावर ती म्हणाली "तुझ्या भुतकाळाशी मला काही देणेघेणे नाही." "तू माणुस म्हणुन मला चांगला वाटलास म्हणुन मी यात मध्यस्थी केली." "पण तिला थोडा वेऴ दे." "सर्व झटपट मिळण्याची अपेक्षा करु नकोस." "आणि हो तिला तुझ्या भुतकाळाविषयी काही सांगु नकोस, नाहीतर ती लगेजच तुला नाही म्हणेल."

मला कळत नव्हत मला हा धडा ठरवुन दिला जातो आहे की हे सर्व नकळतच घडत आहे. पण मला यातून चांगला धडा मिळाला होता हे नक्की. अगदी त्या दिवसापासून माझा एकुणच दृष्टीकोन बदलला. कधी कधी आपल्याला कोणी समजावण्यापेक्षा आपल्या आयुष्यातच असे प्रसंग घडतात. आणि तेच आपल्याला शिकवुन जातात.

समाप्त

गुलमोहर: 

छान! मांडलय पण छान.. लिहीत रहा..पुलेशु

मी तिला रितुविषयी सर्व खरं सांगितल>>
रितूचा संदर्भ कुठाय? नजरचुकीने वाचाय्चा राहीला बहुतेक...

कथा नाही समजली...

dreamgirl
ज्या अर्थी माझा दृष्टीकोन बदलला म्हणुन लिहिल आहे त्या अर्थी माझ्या आधीच्या अफेअर विषयी लिहिण गरजेच होत पण तो विषय फारच पर्सनल होता. पण यात अशी काही वाक्य आहेत ज्यावरुन अंदाज येऊ शकतो.
................................................................................................................
ज्याला आपण आपल मन म्हणतो..ते कधीतरी आपल्या ताब्यात असत का?

कथा छान आहे, पण धागे तुट्ल्यासारखे वाटतात.

मला कळत नव्हत मला हा धडा ठरवुन दिला जातो आहे की हे सर्व नकळतच घडत आहे. पण मला यातून चांगला धडा मिळाला होता हे नक्की. अगदी त्या दिवसापासून माझा एकुणच दृष्टीकोन बदलला. कधी कधी आपल्याला कोणी समजावण्यापेक्षा आपल्या आयुष्यातच असे प्रसंग घडतात. आणि तेच आपल्याला शिकवुन जातात. >>>>>>> हे नीट समजलं नाही....

कथा छान लिहिली आहेस.अजुन नीट मांडणी करता आली तर बघ.
------------------------------------------------------------------------------------

ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

अनघा
याआधी मला जो काही अनुभव आला. त्यानंतरची माझी एकुण बदललेली वागणुक आणि बदललेल मत यासर्व गोष्टींना छेद देत हा प्रसंग घडला. आणि माझा एकुण दृष्टीकोन बदलला. मी आधीच्या अफेअर विषयी अजुन डिटेलमध्ये लिहले नसल्यामुळे बर्‍याच जणांचा शेवटच्या पॅरावरुन संभ्रम निर्माण झाला असेल. पण वरील कथेतील काही वाक्य त्यावर प्रकाश टाकतील.

उदा.
दुधाने तोंड पोळल्यावर ताक देखील फुंकुन पिणार्‍या माझ्यासाठी तिच योग्य मुलगी आहे अस मला वाटायला लागल होत

................................................................................................................
ज्याला आपण आपल मन म्हणतो..ते कधीतरी आपल्या ताब्यात असत का?

निखील,
मला खरच कळले नाही ह्याला कथा म्हणण्यासारखे ह्या लेखनात काय आहे?
ना काही कथानक आहे ना काही घटना आहेत..
लेखनाचे शिर्षक 'खैरु' पण तिच्याबद्दल वेगळे वाटावे असे काहीच नाही..मला तरी ती सर्व साधारण मुलगी वाटली..
लेखनाची सुरुवात जातीधर्म आणि आपल्या आयुष्यात येणारे लोक ह्यावरुन आहे..आणि त्याचा ईतर लेखनाशी काहीही संबध नाही....
खैरु ची मैत्रिण.. "ती" अस तुला काय बोलली ? "तिचे" आयुष्य असे काय वेगळे होते की तु असा Enlightened झालास?
दोन तिन वेळा भेटुन , "तिने" काही जास्त न बोलुन दिखील तुला तिचा स्वभाव कसा कळला?
रितु चा विषय जर पर्सनल आहे तर तिचा उलेख तरी कशासाठी??
निखील, एकदा स्वतःला विचारुन बघ ..तुझ्ह्या आयुष्यातील ही घटना अशी तु Public Forum वर मांडावी का??
आणि dont mind पण हे सगळे तुझ्या आयुष्यात घडत असल्याने तुला ते खुप interesting वाटणे सहाजीक आहे..पण बाकी कोणाला ते interesting वाटणे कठीण आहे...
I couldnt find any substance in the whole article! तुला काय म्हणायचे आहे हे कळणे दुर पण तुला नक्की काही म्हणायचे आहे का हा प्रश्न पडला..मला तरी..
रागवु नकोस्..मला जे वाटले ते मी प्रामाणीक पणे संगितले आहे.
कथेपेक्षा "मेरे डायरी के कुछ पन्ने" असे वाटले.

निखिल,

माझाही स्वातीसारखाच गोंधळ झाला आहे. हे "ललित" आहे का "कथा" आहे का "कोणाशी तरी बोलायचेय" या प्रकारात मोडते हे कळले नाही. तु शीर्षक खैरु असे दिले असले तरी खरी नायिका(?) ती तिची मैत्रीणच दिसत आहे.

जर हा लेख "काल्पनिक" नसुन "प्रत्यक्षात घडलेला " असेल तर मला आशा आहे की तु यातील पात्रांची नावे बदललेली असतील. तुला ओळखणारे कोणी इथे असतील तर तु आणि यात वर्णन केलेल्यानाही ओळखत असतील तर त्याना तु कोणाबद्दल लिहित आहेस हेही कळेल. जेव्हा आपण एखाद्या मुलीबद्दल लिहितो तेव्हा तिची नावे इ जितकी गुप्त राहतील तितकी चांगली. उगाच त्याना त्रास होउ नये याची दक्षता घेणे अतिशय आवश्यक आहे.

धन्यवाद.

सहमत. डायरीतील काही पाने असे शीर्षक द्यायला हवे होते. शिवाय त्या मुलीने नक्की काय म्हटले तेही सांगायला हवे होते.

हो मला काल मैत्रिणींचेही मेसेज आले. पण लिंक आहे म्हणून बरे आहे. निदान नाव दिसत तरी.