'लव्ह जिहाद'मुळे युवतींना मोबाईल वापरास बंदी

Submitted by छोटी on 5 September, 2014 - 00:36

'लव्ह जिहाद'मुळे युवतींना मोबाईल वापरास बंदी....

http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4672875175381485119&Se...

सकाळ मधली बातमी आणी त्या वरच्या प्रतीक्रिया...

काय आहे 'लव्ह जिहाद'? खरच अस काही आहे का? असेल तर काय उपाय? ह्या वर थोडी चर्चा.....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्राचीन काळी चॅस्टिटी बेल्ट म्हणुन लोखंडी बेल्ट अaसत. ते स्त्रीच्या कमरेला बसवुन त्याला समोरुन कुलुप लावायची सोय होती. त्याची किल्ली नवर्‍आकडे असायची.

एकदम सेफ

( किल्ली हरवली तर नवरे काय करत असत ? )

http://en.m.wikipedia.org/wiki/Chastity_belt

काय आहे 'लव्ह जिहाद'? खरच अस काही आहे का?
>>>>>>
लिहा बिनधास्त, भाबडेपणा दाखवण्यात मजा नाही Wink

देशाच्या गृहमंत्र्यांना सुद्धा लव्ह जिहाद काय आहे हे माहीत नाही म्हणे.
म्हणजे नक्कीच ही काहीतरी काल्पनिक गोष्ट असणार.

http://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=1&sqi=2&v...

मीही एका सहकार्‍याच्या मोबाईलवर रेकॉर्ड केलेले भाषण ऐकले होते. त्यात त्या बाईने 'क्ष' 'य' 'झ' जातीच्या हिंदु मुलींना जिहादींनी फसवून लग्न केल्यास,अनु क्र.रु.५,रु.२.५ व रु.१.५ लाख देण्यात येतील याचा उच्चार केला होता.

देवकी हो,
मागे मी सुद्धा हे जातीनिहाय लव जिहाद प्रकरणाबद्दल एके ठिकाणी वाचले होते आणि त्यावरून काही जातीयवादी हिंदू आपापसात भांडत होते.
ज्या जातीच्या मुलीला फसवल्यास जास्त भाव त्या जातीतल्या लोकांचे असे म्हणने होते की आमच्या जातीतील मुली फसवणे कठीण असल्याने जास्त भाव, आणि यावरून भांडण पेटले होते. कोणाचे काय तर कोणाचे काय ..

देशाच्या गृहमंत्र्यांना सुद्धा लव्ह जिहाद काय आहे हे माहीत नाही म्हणे.
>>>>>>>
काही म्हणा, पण ती हिंमत शिवसेनेनेच दाखवावी. महाराष्ट्रात जर कोणी हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावर एखाद्या पक्षाचा समर्थक असेल तर तो भाजपाच्या आधी सेनेचाच.

या प्रकाराबद्दल काही दिवस पूर्वी बी बी सी च्या एका कर्यक्रमाचा व्हीडीओ फेसबुक वर पाहीला होता. ज्यात उत्तम चर्चा झाली. गोर्‍या मुलींचे तेथील पाकीस्तानींना फार वेड व ते त्यांना सोपे सावज समजतात. ब्रिटीश मुलींना अशा रीतीने फसवणूक करून नंतर वेश्याव्यवसायात ढकलण्याचे प्रकारांबद्दल चर्चेत कुणा ब्रिटीश खासदारानी चिंता व्यक्त केली ब्रिटन मधले मा बो कर या बद्दल अधिक सांगू शकतील. मला त्या चर्चेत एक विशेष बाब जाणवली ती अशी की त्यातल्या मुस्लीम समाजात सुधारणा करू इच्छिणार्‍या प्रतिनिधीनी अस म्हटल की या घटनांकडे ज्याला महिला बळी पडल्या असा एक गुन्हा ( crime against women ) म्हणून पहाव, दोन समाजांमधे तेढ निर्माणकरणारी घटना ( ethnic or racial crime )अस पाहू नये. कायदेशीर जी काय कारवाई करायची ती मात्र जरूर करावी. भारतात ही असच व्हायला हव अस मला वाटत.

या घटनांकडे ज्याला महिला बळी पडल्या असा एक गुन्हा ( crime against women ) म्हणून पहाव, दोन समाजांमधे तेढ निर्माणकरणारी घटना ( ethnic or racial crime )अस पाहू नये. कायदेशीर जी काय कारवाई करायची ती मात्र जरूर करावी.
>>>>

सहमत, योग्य विचार मांडलाय.
या प्रकारे विचार केल्यासच याचा बीमोड करणे तुलनेत सोपे होईल, अन्यथा चर्चाही खुसफुसतच होतील.

काही म्हणा, पण ती हिंमत शिवसेनेनेच दाखवावी. महाराष्ट्रात जर कोणी हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावर एखाद्या पक्षाचा समर्थक असेल तर तो भाजपाच्या आधी सेनेचाच.>>>> ते खूप आधी. आता सगळे मूगाची पोती जवळ ठेवून बसतात.विशेषतः रझा अकॅडमीने,मुंबईत जे १-१.५ वर्षांपूर्वी पोलीस महिलांच्याबाबतीत वर्तन केले होते त्यावेळी फार जाणवले.त्यावेळी शबाना आझमी, जावेद अख्तर वगैरे मंडळींनी निषेधाचा ब्रही काढला नव्हता.
अर्थात २ समाजापेक्षाही कोणत्याही स्त्रीचा विनयभंग जास्त गंभीर आहे.

काही संकेतस्थळांवरील संदर्भ

महाविद्यालयीन तरुणींना (केवळ मुस्लिमेतर) परिचित करून घ्यायचे, मैत्री वाढवायची, आपल्या जाळ्यात ओढायचे, त्यांच्या धर्मावर टीका करत राहायची आणि इस्लामचे उदात्तीकरण करायचे, त्यांना त्यांच्या कुटुंबापासून फूस लावून तोडायचे, आणि मग त्यांना धर्मगुरूकडे नेऊन धर्मांतरित करायचे, स्वखुषीने लग्न केल्याचे भासवायचे (कागदावर सह्या घेऊन), एकदा शरीरसबंध झाला की सोडून द्यायचे. या कामाचे रीतसर पैसे, दुचाकी आणि अन्य भेटवस्तू घ्यायच्या आणि पुढील मुस्लिमेतर मुली शोधायला कॉलेज कॅम्पस वर चकरा मारायच्या. अशाप्रकारे हळूहळू मुस्लिम जनसंख्या वाढवत न्यायची. ही चळवळ “लव्ह जिहाद” अथवा “रोमियो जिहाद” या नावाने पोलीस, गुप्तहेर खाते आणि याकामाशी परिचित असलेले सामाजिक कार्यकर्ते, संशोधक, यातील न्यायालयीन कामकाजाशी सबंधित न्यायमूर्ती व वकील आणि काही पत्रकार यात सुपरिचित आहे. परंतु आम जनतेला अजून याचा सुगावा लागलेला नाही. ‘जिहाद’ च परंतु एक नवीन रूप घेऊन पुढे आला आहे.

लव्ह जिहादमागे सिमी आणि लष्कर-ए-तोयबासारख्या दहशतवादी संघटना सक्रिय असल्याचा मुद्दा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या पांचजन्य आणि ऑर्गनायझरमधून मांडण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात कथित ‘लव्ह जिहाद’वर चर्चा काही थांबण्याचं नाव घेत नाहीय. ‘ऑल इंडिया पर्सनल लॉ’ बोर्डाचे उपाध्यक्ष आणि शिया धर्मगुरु कल्बे सादिक यांनी वाराणसीत बोलताना ‘जो मुस्लिम लव्ह जिहाद करत असेल त्याला ठार मारायला हवं’ असं वक्तव्य केलंय.

'लव्ह जिहाद'ला उत्तर देण्यासाठी आता शिवसेना रणांगणात उतरलीय. आता, 'लव्ह जिहाद'ला 'लव्ह त्रिशूळ'मधून उत्तर देण्याचा बेत शिवसेनेनं आखलाय.

हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्नानंतर धर्म परिवर्तनसाठी दबाव टाकणाऱ्या लव्ह जिहादला राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं तीव्र विरोध दर्शवलाय. हिंदू मुलींना लव्ह जिहादचा अर्थ आणि धोके समजवा, जेणेकरून त्या फसणार नाहीत, असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

लव्ह जिहाद प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. पोलिसांच्या चौकशी रणजीत कोहली उर्फ रकीबुलनं एक धक्कादायक माहिती दिलीय. रकीबुल सरकारी अधिकाऱ्यांना आणि न्यायव्यवस्थेतील अनेक लोकांना मुली पुरवायचा.

मी एक रेकॉर्डेड भाषन एकल होत एका समाजसेविकेचे त्यांचे नाव आता आटवते नाहीये त्या अशा मुलींचे पुर्णवसन करतात. त्यांनी त्यात म्हंटले आहे हींदु मुलींबरोबर लग्न केल की त्यांना पैसे मिळतात.

सामान्य लव म्यारेजमध्ये किती मुली फसवल्या जातात ? जर त्यांचे प्रमाणही चिंताजनकच असेल तर. लव जिहाद ही वेगळी कॅटॅगरी करायची गरज रहात नाही.. लव म्यारेजमधील फसवणुक ही एकच कॅट्यागरी पुरेसी आहे.

... अरेंज म्यारेज करुन पस्तावलेला भाबडा हिंदु पुरुष

न्या. सुरेंद्र भार्गव यांचा लव्ह जिहाद या संदर्भातला माहीतीपूर्ण लेख. http://magazine.evivek.com/?p=6526 लेख प्रदीर्घ आहे. ‘दि व्हॉईस फॉर जस्टिस’ या चेन्नईस्थित मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी काम करणार्‍या अ-राजकीय नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेने केरळमधील हिंदू घरातील मुली गायब होण्याच्या घटनांवर आधारित बातम्या, जन्मभूमी तसेच मल्याळम मनोरमा या प्रतिष्ठित नियतकालिकात वारंवार प्रकाशित झाल्यानंतर या बातम्यांच्या आधारे ‘लव जिहाद’चा अभ्यास करायचे ठरवले. या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून, देशाच्या सार्वभौमत्वाला असलेला धोका लक्षात घेऊन ‘व्हॉईस ऑफ जस्टिस’ने या प्रश्नाचा सखोल अभ्यास केला. त्यासाठी तज्ज्ञांची समिती गठित केली. या समिती मधे उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सुरेंद्र भार्गव यांच्या नेतृत्वाखाली देशभरातल्या 7 व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये भटके विमुक्त परिषदेच्या अध्यक्षा प्रा. सुवर्णा रावळ यांचा समावेश होता. या समितीने संस्थेला जो अहवाल सादर केला, त्या अहवालाचे साररूप म्हणजे हा लेख. यातील मह त्वाचे मुद्दे असे.

....अशाच एका प्रकरणातील आरोपीचा जामीन अर्ज नाकारताना न्यायमूर्ती शंकरन यांनी काही महत्त्वपूर्ण माहितीची नोंद केली. ( हे वाचण्या सारख आहे. या सांगोवांगीच्या गप्पा नाहीत. ही एका न्यायाधीशाची महत्वपूर्ण निरीक्षणे आहेत व न्यायाधीश लोक सबळ पुराव्या शिवाय काही लिहीत नाहीत. )
....फक्त हिंदू मुलींचे धर्मांतर होते असे नाही, तर ख्रिश्चन मुलीही याला बळी पडत होत्या. त्यांच्याही बाबतीत आधी प्रेम व नंतर धर्मांतर केले जात असे.
सत्य जनतेपुढे आणण्यासाठी संस्थेने एक सत्यशोधक समिती नियुक्त केली. यामध्ये केरळ राज्य वगळून इतर राज्यातील नि:पक्ष तज्ज्ञमंडळी होती.
1. सुरेंद्र भार्गव – भूतपूर्व न्यायाधीश, सिक्कीमउच्च न्यायालय – जयपूर (राजस्थान)
2. टी.एस. राव – भूतपूर्व डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस – हैद्राबाद (आंध्र प्रदेश)
3. गुरुचरणसिंह गिल – भूतपूर्व अतिरिक्त ऍडव्होकेट जनरल – जयपूर (राजस्थान)
4. डॉ. आय.बी. विजयालक्ष्मी MD, DM. बालरोगतज्ज्ञ, हृदयरोगतज्ज्ञ, स्तंभलेखिका – बंगळुरू (कर्नाटक)
5. डॉ. सुवर्णा रावळ – अध्यक्षा, भटके-विमुक्त जाती विकास स्वयंसेवी संस्था – भिवंडी (महाराष्ट्र)
6. पी. गणपती – उद्योगपती – चेन्नई
7. एस. रवी – वकील – चेन्नई
8. रमेश पी. गर्ग – औषधनिर्मिती सल्लागार

....फसवल्या गेलेल्या मुलींनी मुलाखतीला येण्याचे टाळले. पण बरीच पालक मंडळी आली. त्यांच्या दृष्टीने हा वैयक्तिक प्रश्न राहिला नसून तो सबंध समाजापुढील समस्या बनलेला आहे. त्यांनी त्यांच्या मुली गमावल्या, पण दुसऱ्यांची तशी गत होऊ नये यासाठी त्यांनी लोकांमध्ये जागृती करण्यास वाहून घेतले आहे आणि मुलींचे आयुष्य बरबाद करणाऱ्यांविरुध्द लढा सुरू केला आहे. समितीला या सत्यशोधनाच्या कामात फसवणूक झालेल्या मुलींचे पालक, सामाजिक संस्था आणि तज्ज्ञ व्यक्तींनी मोलाचे सहकार्य केले.

या समितीने काय शोधायचे होते?...सत्यशोधक समितीची कार्यपध्दती...सत्यशोधन समितीपुढे झालेल्या कथनांची झलक....सत्यशोधन समितीचे निष्कर्ष....समितीने केलेल्या शिफारशी या सार्‍या बद्दल (वादविवादा च्या धुरळ्यात न हरवता) मा बो करांनी जाणून घ्याव व मग आपल मत बनवाव.

<<<<अशाच एका प्रकरणातील आरोपीचा जामीन अर्ज नाकारताना न्यायमूर्ती शंकरन यांनी काही महत्त्वपूर्ण माहितीची नोंद केली. ( हे वाचण्या सारख आहे. या सांगोवांगीच्या गप्पा नाहीत. ही एका न्यायाधीशाची महत्वपूर्ण निरीक्षणे आहेत व न्यायाधीश लोक सबळ पुराव्या शिवाय काही लिहीत नाहीत. )>>>

याच केसमध्ये पुढे न्यायमूर्ती शशिधरन नाम्बियार यांनी तपास थांबवण्याचे आदेश दिले. (दोन्ही केसेसमध्ये आरोपी तरुणांची नावे तीच आहेत.) तसेच पोलिसांच्या तपासपद्धतीबद्दल आश्चर्य व्यक्त केले
.

http://www.dnaindia.com/india/report-love-jihad-kerala-high-court-stays-...

इथे दोन्ही न्यायाधीशांच्या निकालांचा उल्लेख आहे.

सामान्य लव म्यारेजमध्ये किती मुली फसवल्या जातात ?
>>>
पण फरक आहेच ना दोघांत. परिणामांत आणि गांभीर्यातही. जर तसा काही फरक नाही असे आपले म्हणने असेल तरच मोठी पोस्ट लिहितो.

मयेकर दुव्यांबद्द्ल आभार. या प्रकारां मधील एका केस च्या बद्दल हे आहे. न्या. नाम्बीयार यांनी पोलीस तपासाच्या कार्यपध्दतीवर आक्षेप घेउन तपासाला स्थगिती दिली असे दिसते. तर न्या.शंकरन यांनी - " लव्ह जिहाद वगैरे असा काही प्रकार अस्तित्वातच नाही "- अशा अर्थाचा डी जी पी जेकब यांचा अहवाल स्वीकारण्यास नकार दिला हे डी एन ए च्या बातमीत समजत.… >>>>>एडीएफ आणि पीएफआय या संघटनांची विद्यार्थ्यांसाठी ‘कॅम्पस फ्रंट’ नावाची शाखा आहे. ती शैक्षणिक संस्थांमध्ये आणि व्यावसायिक महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या तरुणींना धर्मांतरास प्रोत्साहन देते.…सौदी अरेबियातील काही संस्था या धर्मांतराच्या कामास, तरुणांकरिता शिष्यवृत्ती या नावाखाली पैशांचा पुरवठा करते.…उत्तर प्रदेश, पुणे, बंगळुरू येथेही धर्मांतराची अशी प्रकरणे आहेत व बऱ्याच हिंदू मुलींचे इस्लाममध्ये धर्मांतर केले गेले आहे.…गेल्या चार वर्षांत केरळमध्ये अशा प्रेमप्रकरणांतून मुलींच्या धर्मांतराच्या 300 ते 400 तरी घटना घडल्या आहेत आणि पोलीस खात्यानुसार असे विवाह हे समाजात तणाव निर्माण करू शकतात. >>> अशी निरीक्षणे न्या. शंकरन नोंदवतात. तपासाला स्थगिती देणारे न्या. नाम्बीयार यांनी ही सर्व निरिक्षणे चूक आहेत अस म्हटल्याच वाचनात आल नाही. कुणी वाचल असेल तर तस लिहाव. आणखी एक बाब म्हणजे डी ए न ए च्या बातमीत ३००-४०० चा आकडा ३००० -४००० होतो. हे उपसंपादकांच्या डुलक्यांमुळे असावे. फर्स्ट पोस्ट मधील बातमी बद्द्ल इतकच लिहावस वाटत की मुस्लिम पुरुषांच धर्मांतर करून त्यांना हिंदू करून मग त्यांना घटस्फोट देऊन वेश्याव्यवसायात ढकलले जाणे याची शक्यता फारच कमी असावी Wink प्रेमभंगाच दु:ख मात्र त्याच्या नशीबी येउ शकत हे खरे. लव्ह जिहाद च्या घटनांकडे स्त्रियांप्रती केला जाणारे फसवणूकीचे गुन्हे याच नजरेने बघायला व कठोर कायदेशीर कारवाई करायला हवी अस मला वाटत. बाकी मुस्लीम तरुणांच्या प्रेमात पडायच की नाही? धर्मांतर करायच की नाही ? इस्लाम मधील बहुपत्नीत्वाची प्रथा व तलाक-तलाक-तलाक ची व त्या पेक्षाही भयंकर म्हणजे वेश्याव्यवसायात ढकलले जाण याच रिस्क-रिवार्ड अ‍ॅनेलिसिस करण्याच स्वातंत्र्य मुलींना व त्यांच्या आई-बापांना असायला हव नाही का?

मयेकर,
ही केरळमधलीच सॉर्ट ऑफ रिव्हर्स लव्ह जिहाद संबंधी इन्टरेस्टिंग बातमी.

ह्या बातमीला तुम्ही दिलेली टॅग लाईन ही तुमची स्वता:ची आहे.

ह्या बातमी मध्ये कुठेही अस म्हंटलेल नाही की हा रिव्हर्स लव्ह जिहाद चा प्रकार आहे.

केरळ मध्ये गेली अनेक दशके फक्त कम्युनिस्ट आणि काँग्रेसची राजवट चाललेली आहे. त्या पार्श्वभुमीवर लव्ह जिहाद संबधी तिथल्या कोर्टाचे निर्णय आणी सरकारची भुमिका ही लव्ह जिहादच्या प्रकरणाच्या वाढत्या प्रकाराला
आळा बसावा अशी आहे.

लव्ह जिहाद सोडा, पण आंतरधर्मीय विवाहात हिंदु मुलीना विवाहापुर्वी धर्म बदलाची सक्ती केली जाते, हे मी स्वता:च्या पाहीलेल्या केसेस आहेत. उगाच बोलाची कढी नाही.

जर मुलगी एखाद्या क्रिश्चन मुलाशी लग्न लावणार असेल तर चर्चमध्ये लग्न होण्यापुर्वी मुलीला धर्म बदल करुन आपल्या धर्मात घेतले जाते आणी मगच चर्च लग्नाची परवानगी देते.

ईतर सर्व वेळेला भारत हा सर्व धर्म समभाव असणारा देश ? पण जेव्हां लव्ह जिहाद तेंव्हा हे लोक मुग गीळुन गप्प बसतात ?

लव्ह जिहादवर बोलायला सोप्प आहे. पोटच्या पोरीवर अशी वेळ न येवो !! पण आली मग सांगा तुमचा काय असेल पवित्रा ?

आता वेळ लोकानी जागृत होण्याची आहे. ( कधी होणार माहीत नाही) ह्या असल्या चार- दोन अतीरेकी टाळक्यान्मुळे अख्खा मुस्लिम समाज भयग्रस्त होतो. जे लोक कधी कोणाच्या अध्या मध्यात नसतात, त्याना पण सन्शयाने बघीतले जाते, आणी तिथेच दोन धर्मात तेढ वाढायला सुरुवात होते.

खरे तर हिन्दु असो वा मुस्लिम वा ख्रिश्चन, या सर्वानी एकत्र येऊन आपली बाजू स्पष्ट मान्डली पाहीजे. या असल्या प्रवृत्तीन्चा पूर्ण निषेध केला पाहीजे. दन्गली असो वा बाकी कारण, आपल्या देशात आता भान्डणे वाढतच चालली आहेत, जी पूर्ण बन्द झाली पाहीजे.

लग्न होण्यापुर्वी मुलीला धर्म बदल करुन आपल्या धर्मात घेतले जाते आणी मगच चर्च लग्नाची परवानगी देते

....,..

Proud

जोशीबुवा,

लव जिहाद आणि तुमी लिहिलेला हा मुदा या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत.

हिंदु धर्म हा मिश्र संततीला आपली मानत नाही.

१ उद . तुमच्या पुण्याच्या पेशव्याने - बाजीरावाने मस्तानीच्या मुलाला ब्राम्हण जात मिळावी म्हणु प्रयत्न केले होते.पाण ब्रह्मवृंदाने नकार दिला. म्हणुन तो मुस्लमान झाला . अsha मुलाना हिंदु लोक संपत्त्च्या वाट्यातही दुयम मानतात . वारसाला धार्म आणी ईस्टेट दोन्हे नाकारले जाते.

२. आता दुसरे उलट उदाहरण .. बहाद्दुर शहा जफरची आई हिंदु होते. तो मात्र बादशहा बनु शकला. मुसलमान / ख्सिश्चन अशा वार्साना धर्म आणि इस्टेट दोन्हे देतात.

तामुळे क्रिस्चन किंवा मुस्लिमाशी लग्न करताना हिंदुने दर्म बद्लायचा हे प्रथा आली.

ते या नाही त्या कारणाने जोडायचा प्रयत्न करतात आणि आमच्या सर्व प्रयत्नान्ची परिणिती तोडण्यात होते... तोडणे हा उद्देश नसेलही...

लव जिहाद

एका कुत्र्याच मच्छरावर प्रेम होत. दोघांनी लग्न केल. प्रणयराधना करताना मच्छराने कुत्र्याला किस केल. व कानाचा हलकेच चावा घेतला. मग कुत्र्याने सुद्धा मच्छराला किस केल व नाजुकपणे चावा पण घेतला.

नंतर कुत्रा मलेरिया ने मेला.
व मच्छर रेबीज होउन मेला.
.
.
.

तात्पर्य: लव जिहाद ला बळी पडून दुसर्या धर्मात लग्न कराल तर असच होणार...

विदूषक , विनोद चांगला करताय.
पण कुत्र्याच्या आणि डासाच्या स्पेसिज वेगवेगळ्या असतात धर्म नव्हे आणि हिंदु असो की मुस्लिम माणूस एकच स्पेसिजचा असतो इतपत बायॉलॉजी तुम्हाला येतच असेल.

संमि,
आपण दिलेली उदाहरणे बाजीराव-मस्तानी, बहादुर जफर शहा हि पुराणातील झाली. ती बरोबर असो वा चूक, तरी आजच्या घटनेबद्दल चर्चा करताना आजच्या समाजाची स्थिती बघावी, आजचे कायदे बघावेत, न की इतिहासातील उदाहरणे द्यावीत असे मला वाटते. Happy

धर्म नव्हे आणि हिंदु असो की मुस्लिम माणूस एकच स्पेसिजचा असतो इतपत बायॉलॉजी तुम्हाला येतच असेल.

>>>>>>>>.

यावरून एक सहज मनात विचार आला (माझे बायोलॉजी कच्चे असल्याने Wink ) ,
भारतीय वंशातील, युरोपियन, आप्फ्रिकन निग्रो, पुर्वेकडचे आशियाई हे सर्व मानवच असले तरी अंगकाठी, शरीररचना, प्रत्येकाची वेगळी आणि भिन्न असते, तर अश्यांमध्ये लग्न झाल्यास होणार्‍या संततीत काही फिजिकल कॉम्प्लिकेशन येण्याची अतिरीक्त शक्यता असू शकते का?
अगदीच मुर्खपणाचा प्रश्न असेल तर माफ करा Happy

अश्यांमध्ये लग्न झाल्यास होणार्‍या संततीत काही फिजिकल कॉम्प्लिकेशन येण्याची अतिरीक्त शक्यता असू शकते का?
-----
(जर असलेच तर) अशा प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स एकाच प्रान्त/ जात/ धर्मात होणार्या विवहातुन निर्माण झालेल्या सन्ततीत नसणार आहे ़ का?

ऋन्मेष , अभ्यास वाढवा.
बहादूरशहा जफरला पुराणात घालताय!
कुफेहेपा?
Happy

भारतातल्या एकंदर जनतेच्या वंशाविषयी, संकराविषयी कधी वाचलं नाही का?
इंटरेस्ट असेल तर वाचा.

Pages