आता कशाला शिजायची बात - जागू - क्रिस्पी लाडू

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 September, 2014 - 05:40
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी खजूर
अर्धा वाटी मिल्क पावडर
अर्धा वाटी कुरमुरे
पाव वाटी ड्राय फ्रुट्स आवडीनुसार (कापून)

क्रमवार पाककृती: 

खजूराच्या बिया काढून टाकाव्यात व खजूर कुस्करून घ्या.
आता वरील सगळे साहित्य एकत्र करा आणि पिठ मळतो तसे मळून एकजीव करा. मिळून येण्यास अजून खजूराची आवश्यकता असेल तर घाला.
ह्या मिश्रणाचे लाडू वळा. चवीला कुरमुर्‍यांमुळे क्रिस्पी लागतात.

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी १
अधिक टिपा: 

ह्या लाडूंमध्ये चॉकलेट किसून तसेच राजगिरा टाकूनही अजून चविष्ट बनवीता येतात.
खजूरामुळे लोहयुक्त आहार मिळतो.

माहितीचा स्रोत: 
मायबोली गणेशोत्सवाच्या उपक्रमामुळे आमची पाकसिद्ध बुद्धी अशी चाळवली जाते.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागू, आयडिया छान आहे. पण बहुतेक दोन प्रोसेस्ड घटक वापरले गेलेत.
कुरमुरे आणि मिल्क पावडर.

दिनेशदा Happy

सामी धन्स.

भरतजी मला लक्षात नाही आले धन्स लक्षात आणून दिल्याबद्दल. आता बदल नाही करत फक्त सगळ्यांना वाचायला राहूद्या. कॉम्पीडीशनसाठी खुप छान छान रेसिपी आल्या आहेत गणेशोत्सवात. Happy

जागू,

स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद! परंतू, दोन 'तयार' / 'प्रोसेस्ड' पदार्थ आपल्या नियमात बसत नसल्याने नाईलाजाने आम्हाला ही पाककृतीत स्पर्धेत ग्राह्य धरता येणार नाही. आपण समजून घ्याल अशी खात्री आहे. तसदीबद्दल क्षमस्व!