हकनाक वेदनांचा येथे जमाव बसतो..

Submitted by दुसरबीडकर on 7 September, 2014 - 08:26

पाऊसलेखणीने जमिनीत काव्य कसतो..
कवितेत जिंदगीच्या तो एकरूप दिसतो..!!

म्हणतात कैक आधी जोडी खिलार होती..
आता खुटा रिकामा दारी उदास हसतो..!!

सत्कार सोहळ्याला ज्याच्याकडून शाली..
बांधावरी बिचारा तो बोडखाच असतो..!!

नुसताच आसवांचा अंदाज बांधल्याने,
रोपास भावनेच्या बघ कोंब येत नसतो..!!

इतक्या सुरेल ताना घेऊ नकोस दुःखा..
हकनाक वेदनांचा येथे जमाव बसतो..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
९९७५७६७५३७

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली
सगळे खयाल आवडले
इतक्या सुरेल ताना घेऊ नकोस दुःखा..<<< ही ओळ सर्वाधिक आवडली

पाऊस लेखणीने<<< असा एक स्पेसबार द्या मधे
धन्यवाद व शुभेच्छा

मनपुर्वक आभार वैवकु,समिरजी..विस्तृत प्रतिसादासाठी..!!
वैभवजी तो शब्द तसाच घेतला आहे..पावसाची लेखणी या अर्थाने..!

तरहीला जरा बदलावे लागेल.

इतक्या सुरेल दु:खा घेऊ नकोस ताना

गुस्ताखी माफ!

गझल शिक्षकाना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा

आवडली