खड्यातून गाडी चालविताना घ्यायची काळजी

Submitted by किरण कुमार on 30 July, 2014 - 03:22

मान्सून सुरु झाला , मनपाच्या कृपेने रस्त्यावर खड्डे पडायला चालू झाले. त्याची कारणे खूप आहेत त्याबाबत वेगळ्या धागा काढून चर्चा करु. अशा खड्यातून रोजचा प्रवास करावा लागतोच आपल्याला त्यातून उद्भवणारे पाठीचे आजार किंवा अपघात गंभीर असू शकतात. विशेषतः दुचाकीवर आपटल्यावर हॉस्पीटलच गाठावे लागते.तर मग काय करावे आणि करु नये लिहा आपपल्या अनुभवावरुन.

अवांतर : आपल्या परिसरातील खड्डॅ बुझविण्यासाठी पुणे मनपाची एक यंत्रणा कार्यन्वित आहे, तुम्ही तिथे फक्त फोनद्वारे तक्रार करायची आहे. (०२०-२५५०१०८३). खड्डा २४ तासात बुझविणार असा दावा आहे पालिकेचा.

ही आजच्या सकाळ मधली लिंक
http://epaper2.esakal.com/30Jul2014/Enlarge/PuneCity/Pune1Today/index.htm

पुण्यात गाडी चालविताना मी तरी पुढील गोष्टी आवर्जून सांगेल.

१) कोणतीही टू व्हीलर चालविताना बस,ट्रक, डंपर अशा जड वाहनांपासून चार हात लांब राहून चालवा.
२) गाडीला डिस्क ब्रेक असतील तर पावसाळ्यात स्कीड होण्याची शक्यता वाढते, दोन्ही ब्रेक एकाच वेळी वापरा, वळणावर शक्यतो ब्रेक टाळा.
३) खड्याचा अंदाज घेवून खड्यातून गाडी पुढे नेऊ नका तो किती खोल आहे याची कल्पना नसते. जर स्कूटी किंवा अ‍ॅक्टीवा सारख्या छोट्या टायरची गाडी असेल तर छोट्या खड्यातही अडकते.
४) हेल्मेट घालाच
५) आपल्या गाडीचे एबीसी (accelerator brake clutch) वेळोवेळी चेक करा
६) रत्यावर खडी किंवा ऑईल पसरले असेल तर शक्य तितक्या हळू चालवा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खड्डा २४ तासात बुझविणार असा दावा आहे पालिकेचा. >>>>>>>. कशाने ते देखील सांगावे ........आणि ते बुजवणार आहे बुझविणार नाही ( आग बुझवावी) खड्डा बुजवावा ....

नोबिता आणी डोरेमानचे बाम्बु कॉप्टर कसे राहील?( कैसे रहेगा). शोध लावा रे कुणीतरी.
>>>
आपण खुप मोठ आहोत ना त्या कॉप्टर ला पेलवनार नाही आता त्या नोबिता आणी डोरेमानचे वजन ५ किलो असेल मिळुन ते पण.आप्ले ४३+ हाय ना.

खड्डा २४ तासात बुझविणार असा दावा आहे पालिकेचा. >>>>>>>. कशाने ते देखील सांगावे .......>>
खड्डा पाण्याने बुजविला जाइल,

आपण खड्ड्यातून चाललो आहोत याची जाणीव खड्डोखड्डी ठेवावी. कधीमधी टाळकं सटकून आपणच खड्ड्यातून जोरात जातो! तसेच खाड्ड्याला चुकविण्याचा प्रयत्न करत करत खड्ड्याबाहेर पडू नये याची काळाजी घ्यावी!
- स्वानुभवावर आधारित.

<<कशाने ते देखील सांगावे --> दुसरा खड्डा खणून त्यातील दगड-मातीने!

हिंजेवाडी फेज 3 पासून दूर रहावे.
कारण फेज 3 मधल्या खड्ड्यांमधुन रस्ता शोधूनही सापडत नाही.

पण दोन नवीन दिसत होतं. ते कसं काय ?

या आधी ओपन केले असेल आनि नंतर खड्ड्यात पडला असणार मग गजनी......... Happy

असो
महापालिकेकडून करण्यात येणारी खड्डे दुरुस्ती ही अत्यंत तकलादू स्वरुपाची असते ज्यामूले पुढच्या पावसात दुरुस्त केलेला खड्डा वाढण्याची शक्यता असते.

हे विनोदी लेखन आहे? >> असेल. लेखात ईसकाळची लिंक दिली आहे, आणि तो फार विनोदी पेपर आहे असे ऐकून आहे.