घोकंपट्टी

Submitted by सोनू. on 8 February, 2013 - 18:24

' समजून घ्या, नुसती घोकंपट्टी नको ' ... कित्तीवेळा ऐकले असेल हे वाक्य! पण कितीही समजुन घेतले तरीही परीक्षेत आठवण्यासाठी पाठांतर करावेच लागायचे मला.
आम्लात निळा लिटमस तांबडा होतो. आम्लाचे गुणधर्म समजले, लिटमसचे समजले, पण निळा की काळा, तांबडा की पिवळा हे लक्षात ठेवण्यासाठी किती pH चा कोणता रंग, त्यांचे मूलद्रव्य कोणते व कोणती रासायनीक प्रक्रिया होते हे सगळे लहान मुलांना समजून देणार का? त्यापेक्षा ' कोयल सी तेरी बोली कुकूकुकू कुकू कुकूकुकू ' या गाण्याच्या चालीवर 'आम्लात निळा लिटमस, तांबडा होतो तांबडा तांबडा होतो' हे परीक्षेत हमखास आठवेल असे का लक्षात ठेवू नये? काही गोष्टी आपोआप लक्षात राहतात, कसे ते नाही माहीत, जसे लिटमस तांबडा व निळा आहे (जांभळा नकोय) आणि आम्लं व अल्कं त्यांच्यावर प्रक्रिया करतात. पण जोड्या कशा लावणार?
तर अशा बर्याच क्लृपत्या असतील तुम्ही ' समजून घेऊन देखिल आयत्यावेळी परीक्षेत गोची होऊ नये ' ( Wink ) म्हणून पाठ केलेल्या, त्यांची उजळणी करायची ही जागा. बरेचदा असेही होते की काहीतरी असंबद्ध गोष्टं आठवते पण ते कशासाठी लक्षात ठेवले़य ते आठवत नाही किंवा त्यांचे पूर्ण वाक्य आठवत नाही. कदाचित इथल्या कोणीही तसेच लक्षात ठेवले असेल आणि काही गमती आठवतील..
घोकंपट्टी चांगली व आपल्या घरच्या लहानांना अशी पद्धत शिकवा असे सांगत नाहीय. मजा म्हणून आठवून पाहूया हा साधा, सोपा आणि सरळ मुद्दा आहे, तरी कोणी ' आजकालची शिक्षणपद्धती ' वगैरे डोस देवू नयेत ही विनंती.

तर चला लिहूया घोकंपट्टी Happy

पहिल्या महायुद्धाची कारणे - यूआशरामबाता
यूरोपीय राष्ट्रांचा साम्राज्यवाद
क्रमक राष्ट्रवाद
स्त्रास्त्र स्पर्धा
राजनैतिक वैमनस्य
हत्वाकांक्षी कैसर विल्यम दुसरा
बाल्कनचा प्रश्न
तात्कालिक कारण (आॅस्ट्रीयन राजकुमाराची सर्बियामध्ये हत्या)

बघा, आजही २० वर्षांनंतर नीट सांगता येतेय. ही आहे माझी घोकंपट्टी !!! Lol

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मणके ( vertebrae ) सात बारा पाच पाच चार Happy एकूण मणके किती विचारले तर मला यांची बेरीज करायला लागायची कारण ते वेगळं लक्षात नाही ठेवलं कधी. त्यांचे आकार त्यांच्या जवळच्या मुख्य अवयवाप्रमाणे.

शाळेत असतांना बे ते ३० पाढे पाठ होते. ८वी का ९वीत असतांना मित्राच्या डोक्यात खूळ आलं की आपण ३० च्या पुढचे पाढे पाठ करूया. मित्र म्हणाला की ५० पर्यंत सगळे करायचे आणि पुढे फक्त मूळ संख्यांचेच करायचे. या बौद्धिक चापलुशीवर आम्ही दोघे मनसोक्त हसलो होतो.

नंतर कॉलेजात असतांना मी ३१ ते ४० पर्यंत पाढे पाठ केले होते. गंमत म्हणून!

-गा.पै.

साती, जवळच्या मुख्य अवयवासारखा आकार म्हटलय मी. लंबार जवळचा मुख्य अवयव किडनी आणि थोरॅसिक जवळ हार्ट. आता स्टमक नी लंग्ज् का नाहीत नका विचारू .. रहायचं लक्षात की किडनी नी हार्ट आहे. मग त्यांच्या योग्य जोड्या जागेवरून लागायच्या. आमी तुमच्यासारखे डाॅक्टर नाय म्हणून काय एकदम पण हे नाय हां ...

सही है गापै, लय भारी.
आमच्याकडे संध्याकाळी लाईट गेल्यास आई ' पाढे म्हणा अंधारात लुडबुडण्यापेक्षा ' अशी आज्ञा द्यायची. तेव्हापासून त्या पाढ्यांबद्दल आकस !!! ताईला ३० पर्यंत, मी १७-१८ पर्यंत नी बाळा १२-१३ पर्यंत अशा उतरत्या क्रमाने येत होते. मग बाळा माझ्या पुढेही गेला पण मला त्यात काही करावेसे मुळीच वाटले नाही. १ ते १० मधे सगळी कामे होतात खरंतर त्यामुळे ' गरज नाही आणि सक्ती चालणार नाही ' या कारणांमुळे माझा पास.

मस्त धागा आहे..
बारावीत integral 0 -II/2 log(sinx) हे टीपीकल इंटीग्रल स्टेप्स सकट घोकून घेतलं होतलं..
आजही त्यतल्या सगळ्या स्टेप्स जशा च्या तशा आठवतात.. Happy

हुशार लोकांच्या हुशार गमती..

मला फारच लहानपणी कंचेभागुबेव पाठ केलेलं आठवतंय. तेवढ्या फॉर्म्युल्यावर बरेच शालेय गणित निभावले होते.
बाकी घोकंपट्टी टाइपचा अभ्यास १० वी नंतर बहुतेक फक्त टिवायबीएस्सीलाच केला होता. टॅक्सोनॉमीसाठीच अर्थात. तेव्हा हज्जारो झाडांची नावे त्यांच्या फॅमिल्यांसकट तोंडावर होती. आता काहीही लक्षात नाही. त्यामुळे कसं काय लक्षात राह्यलं होतं याचे फॉर्म्युलेही लक्षात नाहीत.

एम ए ला असताना जागतिक रंगभूमीचा इतिहास शिकवणारे इतके भारी होते की ते शिकवतानाच सगळं पाठ होऊन गेलं.
नंतर एम एफ ए ला गेल्यावर अजून तपशीलात जाऊन जागतिक रंगभूमीचा इतिहास होता दोन सेमिस्टर्स, आणि कपड्यांचा इतिहासही होता दोन सेमिस्टर्स. या दोन विषयांमधे तुंबळ घोकंपट्टी असायची. इतरांपेक्षा मला अवघड पडायच्या कपड्यांच्या इतिहासातल्या गोष्टी कारण बाकीच्यांनी अनेक नावे लहानपणापासून ऐकलेली असायची. मी पडले देशी. माझी अ पासून सुरूवात. ग्रीक, रोमन कपड्यांची नावे तर उच्चारांपासून घोळ. पण शिकवणारे चांगले होते म्हणा किंवा शिकवण्याची पद्धत वेगळी होती म्हणा... निभावले कसेतरी..

एक आणि एकच प्रतल.... .. प्रमेय पाठ करुन ठेवण्याची शिक्षा शिक्षकांनी केल्याने दहावीत भुमितीत चांगले मार्क पडले Happy

आम्ही हि demand आणि supply चा Curve लक्षात ठेवण्य साठी दोन दखवन्यचअय बोटाची खून बांधली hoti
पहिले बोट Demand आणि दुसरे बोट supply. Light 1

लोक्स फारच उपयुक्त धागा योग्य वेळेत वर काढलात
अनुभवी मंडळीनो
प्लीज माझ्या बारावीच्या सायन्स PCM (biology नाही त्याला) साठी आठवतील तेवढ्या युक्त्या सांगा....

फोर्स = मास × असिलरेशन या फॉर्मुल्या साठी आम्ही बलमा हा शब्द लक्शात ठेवलेला.

बल = फोर्स
मा = m × a = mass × acceleration

मस्त धागा पण
घोकंपट्टी आणि एखादी अभ्यासातली गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी केलेली युक्ती यात गल्लत होते आहे काय?

अजुन एक
स्कॅटीव्हक्रोमॅफेकोनिकॉझि Wink

आदन पवा उईपु - आग्नेय दक्षीण, नैरुत्य पश्चिम, वायव्य उत्तर, ईशान्य पूर्व ...
ह्म्म....

मला वायव्य सरहद्द प्रांत - पाकीस्तान त्यामुळे वायव्य लक्षात रहायची.
ईशान्येकडील राज्ये म्हणून ईशान्य.
त्यांच्या विरूद्ध काय ते लक्षात राहायचं. अगदीच नैरुत्य मौसमी वारे म्हणून ती पण फिक्स करता यायची गोंधळ झालाच तर. हे आदन पवा उईपू छान आहे.

इंग्रजीसारखं नॉर्थ ईस्ट हा प्रकार आजकाल उत्तरपूर्व म्हणून रूढ व्हायला लागलाय खरा. पण उपदिशा लक्षातच ठेवायच्या म्हटल्या तर कोणा दोघींमधे कोणती हे नुसतच लक्षात ठेवणं मला खूप जड जायचं/जातं. मी तर पूर्वेकडे तोंड केल्यावर उजवीकडे कोणती हे करताना पण भारताचा नकाशा डोळ्यासमोर आणते आणि पूर्वेकडे बघायला मान उजवीकडे वळवल्याचा विचार करते किंवा वळवते पूर्वेकडे बघायला. नी मग डावं-उजवं करते.
आपण लय हुश्शार Wink

मस्तय धागा आणि ट्रिका. शाळेतल्या आठवणी जागा झाल्या, पण स्वताच्या नाही. माझे फ्रेंडस बरेच वापरायच्या अश्या क्लृप्त्या मला मात्र कधीच हे अंगवळणी न पडल्याने धाग्यात भर टाकू शकत नाही. Sad

पण एक मात्र आहे, डीडीएलजे लक्षात राहिल्याने दिलवाले दुल्हनिया `ले जायेंगे' कि `ले आयेंगे' मध्ये गोंधळ उडत नाही Wink

अरेच्चा! एकपण घोकंपट्टी आठवेना..!

रासायनिक सूत्रे सापडायची अशा तावडीत. काय काय चाली लावलेल्या त्यांना Proud
कवितांवर जास्त प्रेम असल्याने त्या तालासूरांसकट टकाटक पाठ असायच्या. Happy

धागा छान आहे.

Pages