विधानसभेत भाजपा विरुद्ध शिवसेना झाल्यास कोण मारेल बाजी?

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 August, 2014 - 16:33

सर्वप्रथम नमूद करू इच्छितो, राजकारणासंबंधी एक्स्पर्ट कॉमेंट देणे हा माझा प्रांत नाही तर उगाच उसना आव आणायचा नाहीये. सध्या आमच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप वर दोन गटात (खरे तर तीन गटात) पेटलेल्या चर्चेला इथे घेऊन आलोय.

विषय आहे - जर भाजपा आणि शिवसेनेत बिनसले आणि निवडणूकपूर्वी युती तुटली तर निकालात बाजी कोण मारेल?

१) मोदींच्या पुण्याईवर (कर्तुत्वावरही बोलू शकतो) भाजपा सरस ठरेल?
२) बाळासाहेबांच्या महाराष्ट्रात मराठी माणूस आजही शिवसेनेच्या बरोबर उभा राहील?
३) दोघांत भांडण तिसर्‍याचा लाभ, (ज्याची शक्यता फारच कमी दिसतेय सध्या) ?

माझे मत - मी लोकसभेत मोदींना बघून भाजपाच्या पारड्यात टाकले असले तरी विधानसभेत मराठी माणसांचा (म्हणवणारा) प्रादेशिक पक्ष शिवसेनेलाच प्राधान्य देईन. माझ्यामते बहुतांश मराठी माणूस उघडपणे कबूल करो वा न करो ऐनवेळी धनुष्यबाणावरच शिक्का मारून येईल. यात शिवसेनेला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास निकालानंतर पुन्हा युती होऊन ते भाजपाच्या सपोर्टवर सरकार स्थापतील. जेणेकरून केंद्रातील भाजपा सरकारशीही सूत जुळून राहील आणि महाराष्ट्राच्या विकासाला अडथळा येणार नाही.

अर्थात, बाळासाहेबांनतर शिवसेनेने जनतेचा विश्वास बरेपैकी गमावला असूनही दोघांमधील एक पर्याय निवडताना जनता आपले मत शिवसेनेच्या पारड्यात टाकेल. त्यामुळे मोदी यांच्या नावाची कितीही हवा झाली असली तरी भाजपा केवळ दबावतंत्र अवलंबवेल मात्र युती तोडायची हिम्मत ते शेवटपर्यंत दाखवणार नाहीत.

असो, याउपर युती फुटल्यास इतर मित्रपक्ष तसेच मनसे वगैरे काय कोणाशी युती करतील आणि काय नवीन गणिते बनतील यावर जाणकारांनी आपली मते मांडली तर त्यातील काही मुद्दे मला आमच्या ग्रूपवर टाकून राजकीय चर्चेत कच्चा लिंबू समजल्या जाणार्‍या माझ्या स्वताचा भाव वधारता येईल.

आभारी आहे,
ऋन्मेऽऽष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाजप आणि शिवसेना एकत्रच निवडणुका लढणार आहेत नाहीतर ना भाजपचा मुख्यमंत्री होऊ शकत ना शिवसेनेचा. हा कल सकाळ ने घेतलेल्या सलग चार सर्व्हे मध्ये टिकुन राहिला आहे.

मला राजकारण कळत नाही पण चर्चेत उडी मारायची खुमखुमी कांही जात नाहीं.

बाळासाहेबांनंतर - व विशेषतः उद्धव- राज संघर्षामुळे - शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची फळी अजूनही प्रभावी वाटत असली तरीही मराठी मतदारांचा कल मात्र पूर्वीसारखा फक्त शिवसेनेकडेच आहे/राहील असं गृहीत धरतां येण्याची परिस्थिती आतां नसावी. शिवाय, ज्या तरूण मराठी मतदारांवर शिवसेनेची खरी भिस्त होती, ती आत्तांची नवीन मराठी तरूण मतदार पिढी शिवसेनेच्या बाण्याने तितकीच भारावलेली दिसत नाही, हेंही स्पष्ट आहे. तिसरं, शिवसेनेतून बाहेर पडलेले नेते ज्या पक्षांत गेले तिथं बव्हंशी चांगलेच स्थिरावले; यामुळेही शिवसेनेच्या कार्यपद्धतिबद्दल लोकांच्या मनात शंकेची पाल चुकचूकणंही स्वभाविक आहे. या सर्वाचं भान ठेवलं, तर शिवसेना युति तोडण्याचा विचार करेल हें असंभव व तसा विचार केला तर घातकच ठरण्याची शक्यता अधिक.
भाजप महाराष्ट्रात पाय रोवून उभा आहे याचं श्रेय बव्हंशी शिवसेनेलाच आहे , हेंही तितकंच खरं. शिवसेना व भाजप कार्यकर्त्यांतली धुसपूस नेहमींचीच असूनही दोन्ही पक्षांची युति अभंग ठेवणं महाराष्ट्रात उभयपक्षीं हिताचं आहे, ह्या शहाणपणाला केवळ सार्वत्रिक निवडणूकीतील यशामुळे भाजप तिलांजली देईल, हेंही असंभव. त्यामुळे, अधिक जागा मिळवणं, मुख्य मंत्री कोणाचा इ.इ. मुद्द्यांवरून या दोन पक्षांत बोलाचाली झाली तरी प्रकरण गुद्दागुद्दीवर येणार नाही एवढं शहाणपण दोन्ही पक्ष दाखवतीलच. [ अर्थात, राजकारण शहाणपणावर आधारित असतंच असंही नाहीं, पण स्वार्थावर तरी असतंच ना ! Wink ]

भाऊसाहेब,

तुमच्या प्रतिसादातील हे एक विधान विशेष नाही पटले.

>>>शिवसेनेतून बाहेर पडलेले नेते ज्या पक्षांत गेले तिथं बव्हंशी चांगलेच स्थिरावले<<<

आयाराम गयारामांना पदे देऊन खुष करून एकगठ्ठा मतांचे राजकारण करत आधीपासून आत असलेल्यांची गळचेपी करण्याचे व्यावसायिक धोरण दोन्ही काँग्रेस पक्षांनी अंगिकारलेले असल्यानेही असे होऊ शकले. छगन भुजबळ, राणे हे लोक सेना सोडून आपल्याकडे आले नाहीत तर आपले काही खरे नाही असे काही त्यांना वाटत नव्हते. नेते त्यांच्याकडेही होतेच. पण हे लोक आल्याआल्या त्यांना भली मोठी पदे दिल्यामुळे सेनेला मोठ्ठी खिंडारे पाडण्यात यश मिळाले.

आल्याआल्या त्यांना भली मोठी पदे दिल्यामुळे सेनेला मोठ्ठी खिंडारे पाडण्यात यश मिळाले.

म्हणजे ज्याना पदे दिली त्या व्यक्ती लायक होत्या हेच सिद्ध होते ना ?

>>>म्हणजे ज्याना पदे दिली त्या व्यक्ती लायक होत्या हेच सिद्ध होते ना ?<<<

नाही जामोप्या,

त्यांना पदे दिल्याशिवाय त्या आपल्यात आल्या नसत्या आणि शिवसेनेसमोर हरावे लागले असते ह्याची जाणीव होती हे सिद्ध होते.

मोठं मन करून स्वीकारावं लागणार आहे हे तुम्हाला! थोडं अवघड जाईल, पण जमेल.

बेफिकीरजी, इतर पक्षांनी शिवसेनेतून बाहेर पडलेल्याना महत्व देवून सामावून घेतलं तें स्वार्थापोटींच, याबद्दल दुमत नसावंच. पण नंतर ते त्या त्या पक्षात स्थिरावले हेंहीं खरं. भास्कर जाधव हे कांही भुजबळ, राणेंसारखे शिवसेनेत मोठे नेते नक्कीच नव्हते; इतरांप्रमाणेच, आपण अपमानित झाल्याने बाहेर पडलो, असं तें म्हणतात [ खरं खोटं, देव जाणे ! ]. पण राष्ट्रवादीत येवून ते मंत्री झाले, प्रदेशाध्यक्षही झाले !

भास्कर जाधव हे दखल घेण्याईतपत नक्कीच मोठे होते. पण त्यावेळी बाळासाहेबांचा कल राणेंकडे आणि रामदास कदमांकडे जास्त होता आणि त्यामु़ळे जाधवांचे तिकीट कापले गेले, म्हणुन ते बाहेर पडले.

या चर्चे मधे विदर्भाची निर्मीती याअनुषंगाने देखिल मतदान कुणाला करावे हा मुद्दा विचारात घ्यावा असे मला वाटते.

http://www.mapsofindia.com/my-india/politics/congress-leaders-who-left-t...

बीजेपीत निवडुन आलेत त्यापैकी मूळचे काँग्रेसचे किती , हेही पहा जरा.

स्वतःचा पक्ष काँग्रेसमुक्त करता येत नाही , ते लोक देश काँग्रेसमुक्त करणार आहेत म्हणे !

Proud

>>> संमि | 25 August, 2014 - 10:09

http://www.mapsofindia.com/my-india/politics/congress-leaders-who-left-t...

बीजेपीत निवडुन आलेत त्यापैकी मूळचे काँग्रेसचे किती , हेही पहा जरा.

स्वतःचा पक्ष काँग्रेसमुक्त करता येत नाही , ते लोक देश काँग्रेसमुक्त करणार आहेत म्हणे !

फिदीफिदी
<<<

आपण काय म्हणत आहोत ते आपल्यालाच समजत नसेल तर काय होते ह्याचे उत्तम उदाहरण आहे हा प्रतिसाद!

कारण शिवसेनेने मुंबई पालिकेत विकासासाठी केलेली अफाट कामे. गुळगुळीत रस्ते. कचरामुक्त मुंबई हि कामे लोकांच्या नजरेपुढे आहेत. >>

मुंबई चे सिंगापूर, शांघाय होईल त्यावेळी होईल, पण अजून ही खड्डेमुक्त मुंबई रस्ते हे दिवास्वप्न आहे. शिवसेनेने पालिकेमध्ये सत्ता असून चांगले रस्ते केले नाहित. फक्त उड्डाणपूल आणि एक्स्प्रेस वे बनवला म्हणजे महाराष्ट्र प्रगती पथावर आणला असे होत नाही. भाजपा ने मागच्याच आठवड्यात सांगितले की, शिवसेनेला मुंबईत पालिकेतून हद्दपार करा, ती आपोआप क्षीण होइल. खूप मोठ्या प्रमाणावर पैसे लागतात निवडणुका लढवायला. मनसे नेते बघा, आता जेनेटिक प्रोब्लेम म्हणून निवडणूक लढवणार नाही आहेत. तीच अवस्था शिवसेनेची होईल काही वर्षांनी.

सडेतोडजी,
१] माझा मुद्दा एवढाच होता कीं शिवसेनेतून बाहेर पडलेल्या नेत्यांमुळे सेनेच्या कार्यपद्धतिबद्दल शंकेची पाल लोकांच्या मनात चुकचूकत असावी. प्रत्येक अशा नेत्याच्याबाबतींत कारण वेगवेगळीं असतीलही. [ भास्करशेठना मीं बर्‍यापैकीं ओळखतों पण मुद्दा व्यक्तीगत नाहींच आहे ]
२] काँग्रेसचे प्रचारप्रमुख नारायण राणे यानी स्वतंत्र विदर्भाला पाठींबा व्यक्त करून भाजपच्या बालेकिल्ल्यात झेंडा रोवण्याचा प्रयत्न चालवलाय. माझी स्वतःची अशी धारणा आहे कीं स्वतंत्र विदर्भाला असलेला काँग्रेसचा असला नाटकी पाठींबा किंवा सेनेचा जाहीर विरोध इत्यादींचा येत्या निवडणूकीत तरी खास प्रभाव पडणार नाही. स्वतंत्र विदर्भाची मागणी आतां जोरदारपणे पुढे रेटायची कीं नाहीं व असल्यास केंव्हां, हें आतां भाजपाच्याच हातांत असल्यासारखे आहे, असं नाही वाटत ?

भाजपा ने मागच्याच आठवड्यात सांगितले की, शिवसेनेला मुंबईत पालिकेतून हद्दपार करा, ती आपोआप क्षीण होइल. >> मग भाजपानेदेखिल महानगपालिकांच्या निवडणुका लढवु नयेत. काय माधुकरी मागुन निवडणुका लढव्तात काय सोज्ज्वळ भाजपेयी??

भाऊसाहेब
स्वतंत्र विदर्भाला पाठिंबा देणे ही राणेंची हतबलतेमधुन निर्माण झालेली राजकीय गरज आहे. स्वतंत्र विदर्भामागुन मग स्वतंत्र कोकणाची मागणी पुढे रेटण्याचा डावही असु शकतो (येनेकेन प्रकारेण मुमं बनायचे आहेच).

बाकी विदर्भात मेट्रो , रस्ते यांमार्फत भाजपानेच विकास केला असे दाखवुन ३-४ वर्षात वेगळ्या विद्रभाची मागणी पुढे रेटायची असे भाजपाचे गणित असावे.

काय माधुकरी मागुन निवडणुका लढव्तात काय सोज्ज्वळ भाजपेयी?? >> हेच तर आपले दुर्देव आहे. कुठलाही पक्ष सत्तेत आला कि ओरबाडायला लागतो, त्यामुळे आपल्या शहरातील रस्ते कधीच सुस्थितीत राहत नाहित. सगळीकडे हात मारणे सुरु होते. भाजपा, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, मनसे - एकाला झाकावे आणि दुसरा बाहेर काढावा अशी परिस्थिती आहे. वर्ष वर्ष योजना कागदा वर बनत असतात पण कुठे काही हलत नाहि. साधा नगरसेवक वर्षभरात बुडाखाली fortuner, XUV ५०० सारख्या गाड्या घेऊन फिरू लागतो, ५-६ flat निघतात ५ वर्षामध्ये.

<< ... विकास केला असे दाखवुन ३-४ वर्षात वेगळ्या विद्रभाची मागणी पुढे रेटायची असे भाजपाचे गणित असावे.>> वेगळा विदर्भ मागण्यामागे हेतू फक्त विकासाचाच होता कीं वेगळ्या विदर्भात सत्ता मिळण्याची दाट शक्यता हा होता, यावर गणिताचं उत्तर अवलंबून असावं. केंद्रात सत्ता आल्यामुळे कदाचित ही मागणी रेटण्याची गरज भाजपाला आत्तां भासणार नाही व युतिमधले मतभेदही त्यामुळे आयतेच तात्पुरते बासनात बांधून ठेवतां येतील.
कोकणात सध्यां वातावरण आपल्याला अनुकूल आहे का , याबद्दलच राणे साशंक असावेत. त्यामुळे, निवडणूकीच्या निकालानंतरच 'स्वतंत्र कोकण'चा नारा द्यायचा कीं नाहीं हें नारायणराव ठरवतील ,असा एक कयास.

मुंबई मनपामध्ये आणि बाकी बरेच ठिकाणी भाजपा शिवसेनेचा सहकारीच आहे. >> चोर चोर मौसेरे भाई Happy
आता भूक वाढली आहे दोन्ही पक्षांची, बरेच वर्ष राज्य आणि देश पातळीवर उपासमार झाली आहे.

गेली १-२ वर्षे सेनेतून बरेच लोक बाहेर पडत होते आणि कॉंग्रेस राष्ट्रवादीत जात होते. त्या आधीही राणे, त्यांचे १० समर्थक आमदार, राज ठाकरे, संजय निरुपम आणि फार पूर्वी भुजबळ वगैरे फुटले होते. साधारणपणे सेना फुटली कि मीडियाला बातम्या द्यायला चेव येतो असे दिसून येते. आता सेनेत इनकमिंग सुरु झालेय आणि यामध्ये मुळचे सैनिक (फाटक, सुभाष बने, गणपत कदम) येत आहेतच पण कॉंग्रेस आघाडीचे पण अनेक नेते-कार्यकर्ते सेनेत येत आहेत तरी मीडिया आता जुन्या निष्ठावान सैनिकांचे काय होईल या टाइपच्या बातम्या देतेय. प्रवेश दिला म्हणजे सगळ्यांना तिकीट मिळेलच असे नाही. पश्चिम महाराष्ट्रात जिथे सेनेकडे तुल्यबळ उमेदवार नाहीत तिथे या नवीन लोकांना काही प्रमाणात तिकिटे मिळतील. ह्या इनकमिंग नेत्यांची वक्तव्ये ऐका. हे म्हणत आहेत कि आमचे समर्थक, जनताच आमच्यावर आघाडी सोडण्यासाठी दबाव टाकत आहे.
बाकी आघाडी सोडून चाललेले कित्येक लोक (यात विद्यमान आमदारही) असे आहेत की जे मिळाल तर धनुष्यबाण/कमळ घेवून लढू नाहीतर अपक्ष लढू पण कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढणार अस म्हणत आहेत. ही खरे तर सोनिया आणि पवार साहेबाना विचार करायला लावणारी परिस्थिती आहे. खास करून राष्ट्रवादीला एवढी मोठी गळती पहिल्यांदाच लागली आहे. लोकसभेला आमदार केसरकर, गावित, संजय काका पाटील, कपिल पाटील वगैरे दुरावले. आता विजय कांबळे, राम पंडागळे, अनिल बाबर, आमदार पाचपुते, कथोरे, माजी मंत्री सूर्यकांता पाटील ही गेल्या काही दिवसातली नावे. याखेरीज स्थानिक पातळीवर पण बरेच लोक राष्ट्रवादीला सोडून जात आहेत.
कॉंग्रेस आघाडी सत्ता गमावणार हे त्यांचेच नेते/कार्यकर्ते चांगल जाणून आहेत.

फाटक, सुभाष बने, गणपत कदम)>> यामागे नारायणनीती नाही ना याचा सेनानेत्यांनी सावधपणे शोध घ्यावा असे वाटते. राणेंचा उजवा हात राजन तेली हेदेखिल सावंतवाडीतून राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढणार अशी बातमी होती.

बाकी आपापले पक्ष सोडुन चाललेले हे बुडत्या जहाजावरले उंदीर आहेत.

फुगलेले ढेकुण अजुन त्यांची पिलावळ वाढवतील, जी आणखीन जोमात त्यांचा कार्यभाग सुरू करतील.

सध्या जो पर्याय आहे तो स्विकारणे हेच जनतेच्या हातात आहे, ते खरंच ढेकुण आहेत का जनतेचे सेवक हे जनताच पाहील.

बोटारीया ची लक्षणं आहेत Biggrin .
अनिल शिरोळे जणू गायब झालेत .
लोकसभा निवडणुकीत सगळ्यांच्या नजरेत येण्यासाठी धडपडणारा हाच माणूस का असा प्रश्न पडलाय .

..यामागे नारायणनीती नाही ना याचा सेनानेत्यांनी सावधपणे शोध घ्यावा
सुभाष बने, कदमांना तिकीट मिळणार नाहीत कारण रत्नागिरी जिल्ह्यात त्या ठिकाणी विद्यमान आमदार सेनेचेच आहेत. सावंतवाडीतून राजन तेली एनसीपीकडून इच्छुक आहेत मात्र राणेंचा त्याला विरोध आहे.राणे आणि त्यांच्या मुलांमुळे राजन तेली त्यांना दुरावले आहेत. नारायण राणे सावंतवाडीतून प्रवीण भोसलेंची शिफारस पवारांकडे करतील. राणे म्हणत आहेत कि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कॉंग्रेस बरोबर एनसीपीचा उमदेवार पण मीच ठरवणार.मात्र कोकणी जनता राणेंना अजून एक दणका देणार आहे.निवडणुकीनंतर राणे आणि त्यांचे दोन्ही कार्टून घरी बसणार अशीच शक्यता आहे.

नुसत्या हवेवर जिंकता येणार नाही - शिवसेना...
अश्या शब्दात शिवसेनेने भाजपला फटकावले आहे. निरनिराळ्या राज्यात ज्या पोटनिवडणुका झाल्यात त्यात भाजपचा दारूण पराभव झाल्याने सेनेने हे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रात जागावाटप करताना भाजपच्या ह्या पराभवाचा फायदा शिवसेनेला होवू शकतो.

असे म्हणतात कि जेव्हा बोट बुडण्याची शक्यता वाटते तेव्हा सर्वप्रथम उंदीर बाहेर पडतात. युतीचा विजय सहज आहे असे समजून बरेच जन तिकडे पळू लागलेत पण ह्या निकालामुळे त्याला थोड्याफार प्रमाणात आळा बसेल असे वाटते.ह्या निकालामुळे पक्ष सोडणाऱ्या बऱ्याच जणांना असे वाटू शकेल कि आपली बोट बुडतेय म्हणून आपण पळतोय. पण कदाचित ज्या बोटीकडे आपण पळतोय तीच बुडायची शक्यता आहे. आपली बोट स्थिर राहायची नि आपण ज्या बोटीकडे पळालोय तीच बुडायची.

चला म्हणजे कॉंग्रेज आणि राष्ट्रवादीतील नेते 'उंदिर' आहेत हे तुम्हाला मान्य आहे तर . Happy

Pages