कोणता आरोप बाकी राहिला माझ्यावरी ?
भोग तोही कोर माझ्या रंगल्या भाळावरी
जेव्हढी झाली उधारी फिटव आता पावसा
कर तुझ्या शेतीस माझ्या आज तू नावावरी
कोरडी तर कोरडी पण भाकरी तर दे मला
पोट भरल्यावर सुचू दे ओळ दुष्काळावरी
भोवताली फक्त विक्रय चालतो बहुधा इथे
फूल कोमेजून जावे उमलल्या देठावरी
वेळ कातर, हृदय हळवे, जीवघेणी शांतता
सांजवेळी बांध फुटतो 'खुट्ट'ही झाल्यावरी
चांदणे ओतून सगळे फिकटलेला चंद्र मी
भाळली ना शर्वरी ना लाभली आसावरी
संपले आयुष्य पण ना समजले माझे मला
धावलो होतो कुणाच्या जन्मभर मागावरी ?
लपवताना आसवे आईस होते पाहिले
पाहिली नाही कधी मग वाहती गोदावरी
वाटले आयुष्य होते रुंद रस्त्यासारखे
आज कळले चालणे आहे जणू धाग्यावरी
....रसप....
२ जुलै २०१४
http://www.ranjeetparadkar.com/2014/07/blog-post.html
संपले आयुष्य पण ना समजले माझे
संपले आयुष्य पण ना समजले माझे मला
धावलो होतो कुणाच्या जन्मभर मागावरी ?<<< वा
गझल आवडली.
छान गझल
छान गझल
१,३,६,७ - वा , सूंदर
१,३,६,७ - वा , सूंदर
कोरडी तर कोरडी पण भाकरी तर दे
कोरडी तर कोरडी पण भाकरी तर दे मला
पोट भरल्यावर सुचू दे ओळ दुष्काळावरी <<सुंदर >>
छान गझल
सुरेख!
सुरेख!
वेळ कातर, हृदय हळवे, जीवघेणी
वेळ कातर, हृदय हळवे, जीवघेणी शांतता
सांजवेळी बांध फुटतो 'खुट्ट'ही झाल्यावरी
वा
sagale sher mast
sagale sher mast
२,३,५ खूप आवडले धन्यवाद
२,३,५ खूप आवडले
धन्यवाद
>> संपले आयुष्य पण ना समजले
>>
संपले आयुष्य पण ना समजले माझे मला
धावलो होतो कुणाच्या जन्मभर मागावरी ?
<<
वा!
सर्व शेर आवडले
सर्व शेर आवडले
संपले आयुष्य पण ना समजले माझे
संपले आयुष्य पण ना समजले माझे मला
धावलो होतो कुणाच्या जन्मभर मागावरी ?
व्वा.
संपले आयुष्य पण ना समजले माझे
संपले आयुष्य पण ना समजले माझे मला
धावलो होतो कुणाच्या जन्मभर मागावरी ?.... मस्त!
संपादित - लपवताना आसवे आईस
संपादित -
लपवताना आसवे आईस होते पाहिले
पाहिली नाही कधी मग वाहती गोदावरी
नवा शेर छानच रे
नवा शेर छानच रे
रसप, नवा शेर ह्या गझलेत घेतला
रसप,
नवा शेर ह्या गझलेत घेतला आहेत हे ठीक आहे, पण ओळींची अदलाबदल केली तर वेगळी जमीन तयार झाली तरीही शेर अधिकच प्रभावी होईल असे आपले वाटले.
भूषणदादा, 'गोदावरी' हा काफिया
भूषणदादा,
'गोदावरी' हा काफिया डोक्यात (मनात) आधीपासूनच होता. पण साजेसा आशय उमलून येत नव्हता. गोदावरीच्या पुराबद्दल एक लेख वाचला आणि मिसरा सुचला - 'पाहिली नाही कधी मी वाहती गोदावरी'. कारण आमच्या औरंगाबादपर्यंत पोहोचेपर्यंत गोदामाई फारच रोडावलेली असते. हा मिसराही काही दिवस तसाच रेंगाळत होता आणि ईव्हेन्च्युअली एक वेगळाच विचार सुचला व हा शेर तयार झाला.
आधीपासूनच मनात असलेला काफिया व त्यावरूनच सुचलेला मिसरा ह्यामुळे शेर बनायच्या संपूर्ण प्रोसेसमध्ये हा शेर प्रस्तुत गझलेशीच नातं सांगत असल्याने मी तुम्ही सांगताय तसा विचार करूच शकलो नाही.
ह्यापुढे असा विचार नक्की करत जाईन.
धन्यवाद !
वाटले आयुष्य होते रुंद
वाटले आयुष्य होते रुंद रस्त्यासारखे
आज कळले चालणे आहे जणू धाग्यावरी
आज कळले चालणे आहे जणू
आज कळले चालणे आहे जणू धाग्यावरी<<< व्वा