एका मायबोलीकराची कहाणी !

Submitted by कवठीचाफा on 27 June, 2008 - 14:28

एका मायबोलीकराची कहाणी !
*****************
उन्हे उतरुन बराच वेळ झाला होता, एव्हाना उकाड्याने हैराण झालेल्या त्याने दरवाजे खिडक्या उघडुन येणार्‍या गारव्याला वाट करुन द्यायला सुरुवात केली होती. घरातल्या बंद पडलेल्या ए.सी.चा नाद त्याने सोडून दिला होताच, संध्याकाळ उलटल्या नंतरच्या या गारव्याचे रात्र चढत जाईल तसे हाडे गोठवणार्‍या थंडीत रुपांतर होईल याचीही कल्पना होतीच त्याला.
दिवसभराच्या कामामुळे आलेला थकवा शरीराला गलितगात्र बनवत होता. पण पोटात उसळलेला भुकेचा आगडोंब शांत करण्यासाठी स्वयंपाक करणे भाग होते. पण याच गोष्टीचा त्याला विलक्षण कंटाळा आला होता. किचनमधल्या रेफ़्रिजरेटर मधे काही सापडते का? ते पहायलाच हवं होत. कंटाळलेल्या हलचाली करत तो रेफ़्रिजरेटरकडे गेला त्याच्या नशीबाने त्यात अर्धे कलिंगड शिल्लक होते, शिवाय दुधही होतेच अशीच एक दोन करता करता साठलेली केळी न खराब होता तशीच होती. " चला आज याच्यावरच भागवुन घेउ" मनात विचार करत त्याने सापडलेला खजीना किचन टेबलवर ठेवला. समोरच्या जेवणाकडे (?) पहात असताना त्याला आगदी मनाच्या आतुन आपल्या घरची आठवण नेहमी प्रमाणेच प्रकर्षाने झाली.
किती सुखाचे दिवस होते ते, आईच्या उबेत तिच्या हाताने घास खाताना जे समाधान, आनंद मिळत होता त्याची तुलना कशाशीच करता येणार नाही. आज जरी तो एका आगदी सर्वसंपन्न फ्लॅट मधे रहात असला तरी आपल्या मुंबईतल्या घराची सुरक्षीततेची भावना त्याला ईथे नक्कीच मिळत नव्हती.
मग आपण इथे नक्की का आलो ? भारतातल्या नोकर्‍या आपण का बरं नाकारल्या ? पैसा,? हेच कारण सोडून दुसरे तरी काही डोळ्यासमोर येत नव्हते. या अस्वस्थ करणार्‍या विचारात त्याचे जेवण (?) कधी संपले ते कळलेच नाही.

दिवसभराच्या दगदगीमुळे त्याला लगेचच झोप यायला काहीच हरकत नव्हती. पण आज कदाचीत घरच्या आठवणीने जरा जास्तच अस्वस्थ केल्यामुळे असेल पण आज झोप यायला तयार नव्हती. टि.व्ही. पहायची सोय नव्हती त्याचे आवडते कार्यक्रम ईथे दिसणारच नव्हते.

एव्हाना रात्र बर्‍यापैकी वर चढली होती. आतामात्र बेडवर पडून निद्रादेवीची आराधना करण्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता. बेडवर पडल्या पडल्या मनातल्या विचारांचे उलटसुलट प्रवाह एका दिशेने नेण्याचा प्रयत्न करण्याचा एक नवीन उद्योग त्याने चालु केला. इतक्यात दारवरची बेल वाजली ! ! ! !

आपल्याला भास झाला असेल क्षणभर वाटून गेले. कारण इतक्या उशीरा येउ शकणारे कुणी त्याला आठवत नव्हते. पण पुन्हा एकदा बेलने आपल्या मंजुळ आवाजाने त्याचा तो समज चुकीचा असल्याचे दाखवुन दिले. आता मात्र दरवाजा उघडणे गरजेचे होते. मनातले आश्चर्य दडपत त्याने दरवाजाच्या मुठीला हात घातला.
समोरचा मोकळा पॅसेज पाहील्यावर त्याला जरा विचित्रच वाटले 'कुणीच नाही?' मनातला प्रश्न ओठातुन बाहेर पडला. चुकुन आपल्या अपार्टमेंटची बेल कुणी तरी वाजवली असेल असे समजुन त्याने दरवाजा बंद करण्यासाठी हात लांबवला मात्र, अंगावरुन थंडगार वार्‍याचा झोत घरात शीरल्याची जाणीव त्याच्या अंगावर शहारा आणत गेली. कसाबसा दरवाजा बंद करुन त्याने रुम हिटर्स कडे नजर टाकली. ते तरी व्यवस्थीत काम देत होते. पण आता घरात थंडीचे प्रमाण जास्त जाणवत होते हे नक्की. हे असे कसे झाले? यापुर्वी हा असा अनुभव कधीच त्याला आला नव्हता.

एकवेळ ती थंडी परवडली पण आता घरात आपल्याखेरीज कुणीतरी आणखी वावरत असल्याची ती एक वेगळी जाणीव त्याच्या काळजाचा ठोका चुकवुन गेली. पण हा ही आपल्या मनाचा खेळ असावा असे समजुन त्याने बेडवर अंग टाकले. दिवसभराच्या थकव्याचा काही ना काही परीणाम जाणवणारच अशी मनाची समजुत काढुन त्याने झोपी जाण्याचा आपला प्रयत्न पुन्हा पहील्यापसुन चालु ठेवला.
कदाचीत दमल्यामुळे असेल, कदाचीत त्याच्या प्रयत्नाचा परीणाम असेल पण त्याला झोप लागली.
आपण कितीही गाढ झोपलो तरी आपल्या मनातला एखादा रक्षक जागा असतो, त्यामुळेच आजुबाजुला काही अनपेक्षीत घटना घडायला लागली की आपल्याला ताबडतोब जाग येते. त्याचे ही तसेच झाले. क्षणभर त्यालाही कळेना आपल्याला जाग कशाने आली. आजुबाजुला नजर टाकत असतानाच त्याच्या सर्व जाणिवा काम करायला लागल्या, आणि मघाची ती घरात कुणी असल्याची जाणिव आता तिव्र प्रमाणावर जाणवायला लागली होती.
किती तरी वेळ तो एकाच जागी गोठल्यासारखा बसुन राहीला, पण अखेरीस मनाचा हिय्या करुन त्याने आपले अपार्टमेंट तपासुन पहायचे ठरवले. एका एका रुमचे लाईट्स लावत तो मनातल्या मनात आठवतील तितक्या देवांचे जप करत होता.
सगळे घर तपासुन झाले कुठेही कसलाही मागमुस नव्हता त्यामुळे अखेरीस त्याने पुन्हा झोपी जाण्याचा निर्णय घेउन बेडरुमची वाट पकडली.
तर बेडरुमचे लाईट्स बंद,!!!!!!!!!!!!!!!!!!!!

आता मात्र भितीने काळजाचे ठोके एखाद्या इंजीनच्या वेगात पडायला लागले. त्याच्या कानात ते स्पष्ट ऐकु येत होते. कसाबसा बाहेरच्या रुम मधला टॉर्च काढला आणि बेडरुम चा दरवाजा उघडून त्याचा प्रकाशझोत आत सोडला.........
रुम रिकामी दिसायला हवीच होती पण समोर जे काही दिसले ते पाहुन त्याची बोबडीच वळली. वेळेवर काहीही आगदी किंकाळी मारायचेही न सुचल्याने त्याने सरळ बाहेर धुम ठोकली. जवळच त्याच्या एका मित्राचे घर होते त्याच्याकडे जाउन आश्रय घेतला.

सकाळपर्यंत तो तापाने पार फ़णफ़णला. आता त्याची आपल्या घराकडे जायची हिंम्मत होत नाहीये, आगदी दिवसाढवळ्या सुध्दा.

आजही आपला हा मित्र स्वतःच्या घराकडे फ़िरकलेला नाही आणि त्याचा तापही उतरलेला नाहीये,

महत्वाचा प्रश्न 'तो' कोण ???????????? तर ते तुम्हीच शोधायचेय.

पाहू सापडतो का?

एकच क्ल्यु देतो सध्या तो मायबोलीवरुन गायब आहे. Happy

गुलमोहर: 

मायबोलीवरून गायब मंडळी बरीच आहेत

कार्टा, श्रिनी, जगनबुवा, पर्टू, किरू, आज काल बी देखील गायब आहे.
मला वाटते श्रिनी च असावा 'तो'

रॉबीनहुड पण गायब आहेत. पण त्यांनी नोकरीसाठी देश सोडल्याचे ऐकिवात नाही.

च्यायला का? पण तो मुंबईचा नाहीये. मग कोण बर हा?

तो मी नव्हेच! Happy Biggrin
दीपक
"People come into your life for a reason or a season. They bring joy and lessons!!!"

कंटाळलेल्या हलचाली करत तो रेफ़्रिजरेटरकडे गेला त्याच्या नशीबाने त्यात अर्धे कलिंगड शिल्लक होते, शिवाय दुधही होतेच अशीच एक दोन करता करता साठलेली केळी न खराब होता तशीच होती. " चला आज याच्यावरच भागवुन घेउ">>>>>>>>>.
हे असल जेवण करणारा आणि सध्या गायब असणारा एकच प्राणी आहे.
मी ओळखल रे चाफ्या.
हा तर आपला जीटॉक वाला दोस्त जो रात्री ९ वाजता आपल्याला भेटायचा. Happy
तोच ना रे?
.............................................................

ह्म्म्म, मला पण कळले रे चाफ्फ्या Happy

>>>>> पण समोर जे काही दिसले ते पाहुन त्याची बोबडीच वळली
अब्बे समोर काय दिसल ते सान्ग ना आधी!
...;
आपला, लिम्बुटिम्बु

हा तर आपला जीटॉक वाला दोस्त जो रात्री ९ वाजता आपल्याला भेटायचा.>>>>.
इथे क्ल्यु आहे लिम्बुशेठ. (शेत करतोय म्हणून शेठ :))
चाफ्याशी रात्री जीटॉक वर गप्पा मारल्यावर काय होणार दुसरं. त्याला काहिबाहि नसलेल्या गोष्टीच दिसणार की.
Happy
.............................................................

झकास Happy

.................................................................................................................................
** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **

रुनी, हो तो मी नव्हेच. आणि मी गायबलो नाहीये.. एकदा गायबलो तर माझ्या गळ्यात त्या अँजेलाला बांधुन मोकळा झाला होता ह्यो चाफ्फा. Wink तात्पर्य तुम्ही आता मायबोलीवरुन गायब झालात तर चाफ्फा त्याचा असाच पंचनामा करणार त्यामुळे आता हे परवडण्यासारखे नाही.

झकास शी सहमत.. कलिंगड, दुध, केळी असल जेवण जेवणारी व्यक्तिचे आकारमान चांगले असावे हे नक्की... चाफ्या मी ओळखले रे Happy

तो मी नक्कीच नाही. कारण असा प्रसंग येड्यावर आला असता तर बेडरूम मधली "ती चीज" येड्याला बघून धूम पळाली असती. आपल्या मित्राकडे जाऊन तोंड लपवून बसली असती. तिला प्रचंड ताप वगैरे आला असता आणि "त्या चीजे"चा मित्र म्हणाला असता "हिला येड्याने झपाटलेले दिसते!!"

महत्वाचा प्रश्न 'तो' कोण ???????????? तर ते तुम्हीच शोधायचेय.>>>>>>>
बक्षीस आहे का काही? Proud
'kedar123' का? एक अंदाज.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
Order is for idiots. Genius can handle chaos.

केदार१२३ च असणार... जेवणाचे जिन्नस वाचुनच कळेल !!
श्र चा प्रश्न मला पण!! बक्षिस आहे का??

-----आईच्या उबेत तिच्या हाताने घास खाताना जे समाधान, आनंद मिळत होता त्याची तुलना कशाशीच करता येणार नाही.-----
आईने भरवतानाचा फोटो. Happy

----त्यात अर्धे कलिंगड शिल्लक होते, शिवाय दुधही होतेच अशीच एक दोन करता करता साठलेली केळी न खराब होता तशीच होती. " चला आज याच्यावरच भागवुन -------
Happy

तो केदार१२३ च. हल्ली म्हणजे ३-४ दिवस मायबोलीवर दिसत नाही. खरडवहीत "९ वाजता" चा उल्लेख.

ए चाफा........ ही असली कोडी का रे घालतोयस?

>>>> ही असली कोडी का रे घालतोयस?
मी पहिल्यान्दा "असली काडी का रे घालतोयस?" अस वाचल! Proud
कित्ती सार्थ हे ना??? Lol
.
अश्विनी, अगदी अगदी! तोच तो वनटूथ्री!

चए चफ्फाचा, चत्तरउ चरोबरब अहेआ चका चते चंगसा चना !

इथे ज्या महोदयांचा उल्लेख सर्वात जास्त वेळा झालाय आणि आपल्या देशात बहुमताचे राज्य आहे त्यामुळे 'तो' हा केदार १२३
च आहे हे समस्त मायबोलीकरांच्या साक्षीने केद्याची क्षमा मागुन मान्य करतो. Happy
त्याचं झालं असं की केदार चार-पाच दिवस मायबोलीवर येणार नव्हता ( काहीतरी काम होते हो ! ) जाताना तब्बेत बरोबर नाही असं काहीसं म्हणाला. त्याचाच फायदा घेउन मी हा कल्पनाविस्तार केला. केदार सुखरुप आहे Happy
पण एकंदरीत केद्याचं खादी प्रेम चांगलच प्रसिध्द आहे तरं जवळपास सगळ्यांनीच त्याला त्याच्या जेवणावरुन ओळखला Lol

सॉरी यार केद्या ! Happy
.................................................................................................................................
** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **

..............................आपला हा मायबोलीकर जीवाच्या आकांताने पळत सुटला. आजपर्यंत त्याच्या आयुष्यात भितीचा लवलेश नव्हता. पण आज जे काही त्याने पाहील, त्याचा विचारही मनाला नकोसा वाटत होता. आता पुन्हा घरी परत जायला तो तयार नव्हता. आता काय बर कराव. विचार करत तो बागेत बसला. तरी बागेत इतरही लोक होते म्हणून बर नाहीतर एकट्याने बागेत. बापरे . इतक्यात त्याला त्याचा मित्र आठवला. त्याच घर तस जवळच होत.त्याच्याकडे जाव का? त्याला सांगाव का आपल्याला काय दिसल ते? त्याचा विश्वास बसेल का आपल्यावर? मुळात आपण 'ते' पाहील त्यावर आपला तरी विश्वास आहे का नक्की ? का मनाचे खेळ म्हणायचे? कधीतरी मनातली भिती अशी मूर्त रूप घेते आणि मूळात जे नाहीच ते आपल्याला कधी जाणवत का?. लहानपणी आपण गूढ कथा, भय कथा वाचायचो पण तेंव्हा अशी भिती कधीच वाटली नाही. पण आज घरापासून दूर आल्यावर एकटेपणाची, असूरक्षेततेची आणि भितीची भावना प्रबळ झालीये.
..
विचार करता करता आपण आपल्या मित्राच्या घराची वाट चालू लागलो आहोत हे त्याला आत्ता जाणवल. आज आपल मन आपल्या कह्यात का बर नाही. आता आपण मित्राच्या घराच्या अगदी जवळ आलोत. त्याला नक्की काय आणि कस सांगाव ह्याची मनात जुळवाजूळव करायला हवीये. ते त्याला सुसंगत पणे सांगायला हवय. नाहीतर तो ह्याला आपला इब्लीसपणा समजायचा. खर तर त्याला ते पुन्हा आठवण नकोस वाटत होत. पण काही इलाज नव्हता. तो थंडगार वार्‍याचा झोत. तो गारठलेला शिसारी आणणारा स्पर्श, अचानक खोलीत आलेला गारवा. आणि ते जे बेडवर काहीस दिसल ते? नक्की दिसल का आपल्याला? ते लाल भडक गुंजासारखे डोळे. आपल्याकडे रोखून बघणारे. ते पूर्ण दिसल नाही. पण ते डोळेच इतके भयानक होते की जर आपण जर का ते पूर्ण पाहील असत तर? विचारानेच त्याच्या काळजाच पाणी झाल.
..
आता तो मित्राच्या घराच्या दरवाज्या बाहेर उभा होता. बेल वाजवण्यासाठी त्याने बेल वर हात नेला. पण त्याआधीच मित्राने दरवाजा उघडला. जणू त्याची वाट बघत असल्यासारखा.मित्राला बघून त्याच्या जिवात जीव आला. आत येऊन तो सोफ्यावर बसला.मित्राला आता कस सांगाव ह्या विचारात तो होता. पण इतक्यात आत्तापर्यंत लक्षात न आलेली गोष्ट त्याला जाणवली. समोरच्या खूर्चीवर कुणीतरी होत. त्याच्याकडे रोखून बघत. तेच ते गुंजासारखे लाल भडक डोळे. तोच तो खोलीतला शहारा आणणारा गारवा. आणि त्याच्या कडे बघून स्मीत करणारा त्याचा मित्र आणि त्याचे लाल भडक डोळे..................................
**************************************************************
चाफ्या चू. भू. द्या. घ्या. Happy

केद्या! सही रे!!
तुझ्या त्या मित्राच्या लालभडक डोळ्यांवरून पु. लं. चे एक वाक्य आठवले. "रात्री झोप झाली नसावी किंवा जरा जास्त झाली असावी!"

काय मित्रान्नो.. मी बरोबर म्हटले होते ना? आता चाफ्फ्याने माझ्या नंतर केदारच्या नावासमोर फुली मारली असणार... आणि आता दात विचकुन असा खदखदा हासत असणार... असो आता जो पण मायबोलीकर गायब होइल त्याच्या नावे चाफ्फा असाच शंख करणार. बघु या आता कोणता बकरा सापडतो त्याला. Wink

केद्या लेका, तु आख्खी भयकथाच लिहून टाकली ! मान गये उस्ताद Happy ( तो मित्र मी नव्हे हो ! मि आपला इथेच भारतात असतो ) Happy नारायण धारप भेटले का रे कुठे ?
सम्याला अनुमोदन गायबलेल्यांच्या नावे शंख करण्याचा उद्योग माझ्यासहीत सगळ्यांवर करण्यासाठि जाहीर निमंत्रण ! Lol

.................................................................................................................................
** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **

नक्की कोणत्या साहित्यप्रकारात मोडते हे लेखन? कोडं म्हणावं तर उत्तर शोधायला हे मायबोलीकर काय खातात पितात ते माहित असायला हवे. (तसे काही लोकांना माहित आहे असे दिसते, माझ्या तरी वाचनात आले नाही) Happy मायबोलीबाहेर एकमेकांशी संपर्क असणार्‍या एका ग्रुपपुरतेच किंवा एका ठरावीक बीबीवर गप्पा मारणार्‍या लोकांपुरतेच हे मर्यादित राहणार. मग हे 'कथा साहित्य' मध्ये का? एखाद्या वाहत्या बीबीवर टीपी म्हणून ठीक आहे- असे माझे मत!
चाफ्फा, असली कोडी घालण्यापेक्षा भयकथा लिहायला लागा. Light 1

लालु आपण जर त्या मायबोलीकराच्या शोधाचा प्रयत्न न करता फक्त कथा म्हणुन वाचलीत तर कथाच आहे हो ही ! कोडे वगैरे काही नाही Happy
.................................................................................................................................
** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **

कथा नाहीये, निदान पूर्ण नाहीये.

कथा आहे?? तुमच्या पूर्वीच्या चांगल्या भयकथा वाचलेल्या आहेत, एकदम असा दर्जा का घसरला? Happy आणि कोडे नाही तर मग शेवटी 'तुम्ही शोधायचं, क्लू देतो' वगैरे कशाला? ते काही नाही, हे असली कथा/कोडे नको. चांगली भयकथा लिहा. आणि तो केदार एका मराठी चित्रपटाची कथा लिहीत होता त्याचं काय झालं? cbgd.

पुर्वर्ध खुप इन्तेरेस्तिन्ग होत पण उत्तरर्ध मत्र निरशा करुन गेला

चाफ्फ्या, मस्तच.
केदार, तुझी वरकडी !!
अनघा

unpredictable Lol