Submitted by सुप्रिया जाधव. on 12 August, 2014 - 15:11
मानला ताईत.... बसला फास ज्याचा
पुत्र तो थरकाप उडवे काळजाचा
येथली स्थित्यंतरे त्याच्याचसाठी
आजही आहे तिच्यास्तव तोच साचा
कैफियत मांडू कशी माझी इथे मी
बोलताना वाटते जाईल वाचा
यायचा नाही तुला अंदाज माझा
लिंपलेला चेहरा, ह्रदयास खाचा
आरसा त्याच्या मनाचा तडकलेला
स्पर्शण्या धावू नको रुततील काचा
जेवढा काढायचा तो यत्न करतो
तेवढा चिखलात फसतो पाय त्याचा
लांबचा पल्ला तुला गाठायचा तर..
सोस कळ पायातली...झिजणार टाचा
पारदर्शी कोवळ्या पानांप्रमाणे
गाठता यावा तुझ्याही तळ मनाचा
-सुप्रिया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
येथली स्थित्यंतरे
येथली स्थित्यंतरे त्याच्याचसाठी
आजही आहे तिच्यास्तव तोच साचा
कैफियत माझी कशी मांडू इथे मी
बोलताना वाटते जाईल वाचा
पारदर्शी कोवळ्या पानांप्रमाणे
गाठता यावा तुझ्याही तळ मनाचा<<<<
सुंदर शेर
छान
छान
छान आवडली
छान
आवडली
पारदर्शी कोवळ्या
पारदर्शी कोवळ्या पानांप्रमाणे
गाठता यावा तुझ्याही तळ मनाचा >>> क्या बात है ..
पारदर्शी कोवळ्या
पारदर्शी कोवळ्या पानांप्रमाणे
गाठता यावा तुझ्याही तळ मनाचा>>>> अप्रतीम!
कैफियत माझी कशी मांडू इथे
कैफियत माझी कशी मांडू इथे मी
बोलताना वाटते जाईल वाचा
पारदर्शी कोवळ्या पानांप्रमाणे
गाठता यावा तुझ्याही तळ मनाचा
व्वा…
'हात त्या घालू नको रुततील काचा' ==> या मिसऱ्यामध्ये थोडी अजून सफाई हवी आहे माझ्या मते. (त्या -त्याला/त्यात )
एकंदर गझल मस्तच.
<<<<'हात त्या घालू नको रुततील
<<<<'हात त्या घालू नको रुततील काचा' ==> या मिसऱ्यामध्ये थोडी अजून सफाई हवी आहे माझ्या मते. (त्या -त्याला/त्यात )>>>>.
हो, मीही विचार करतेय 'त्या' वर
धन्यवाद मंडळी !
-सुप्रिया.
तुमच्या अप्रतिम गझलांसारखी
तुमच्या अप्रतिम गझलांसारखी नाही वाटली ही गझल.
क्षमस्व कमलेश पाटीलजी !
क्षमस्व कमलेश पाटीलजी !
व्वा..! छान गझल. काचा,
व्वा..!
छान गझल. काचा, कैफियत, तळ विशेष.
चांगली झालीये कि? ... मला तर
चांगली झालीये कि? ... मला तर आवडली...!!
अवांतर -मायबोलीच्या गझलकारांचं एक वेगळंस्टँडर्ड असल्याची जाणिव काही मुशायरा"नशीन" गझलकारांनी मला करून दिलीये...
मतला आणि 'आरसा' सर्वात छान
मतला आणि 'आरसा' सर्वात छान वाटले.
मुशायरानशीन
मुशायरानशीन
फार आवडली ...सगळेच शेर सुंदर
फार आवडली ...सगळेच शेर सुंदर .
शाम :)
शाम