ववि२००९:- सांस्कृतिक कार्यक्रम पोस्ट क्र. ४ - अंताक्षरी

Submitted by ववि_संयोजक on 14 July, 2009 - 04:13

आ $ आ $ आ $ आ $ आ $ आ $ आ $ आ $ आ $ आ $ आ $ आ $
चाफा बोलेना $$ चाफा चालेना $
चाफा खंत करी काही केल्या फुलेना....
चाफा बोलेना....

ना जाने कहाँ से आयी है,
ना जाने कहाँ को जाएगी
दिवाना किसे बनाएगी
ये लडकी....
किसी के हाथ ना आएगी ये लडकी....

काय वविकर? खेळ लक्षात येतोय का?
काय म्हणालात?
"लॉजिकल अंताक्षरी? "
नाही हो....
हरलात का?
अहो ही तर आपली नेहमीची अंताक्षरी.... Happy

इच्छुक उमेदवार... पटापट पुढे येऊन आपली कला दाखवा, आपल्याला एकूण ५ गट हवेत, प्रत्येक गटात ४ पार्टिसिपन्ट्स असतील.

दरवर्षी आपण अंताक्षरी निर्भेळ ठेवतो, यावर्षी थोडी भेसळ करतोय... Proud
घाबरू नका हो $$भेसळ म्हणजे मराठी आणि हिंदी मिक्स......

राऊंड १
यात २ फेर्‍या असतील.
या मध्ये पहील्या फेरीत सांस्कृतीक समितीचा मेंबर एक हिंदी गाणं म्हणेल, त्याच्या शेवटच्या अक्षरापासून गट क्र. १ पुढच्या गाण्याची सुरूवात करेल, पण ते गाणं मराठी असेल. मग गट क्र. २ हिंदी गाणं म्हणेल.. आणि पुढे... असा हा पहीला राऊंड अल्टरनेट गाण्यांचा असेल (म्हणजे एक हिंदी आणि एक मराठी) अशा पद्धतीने पहीला राऊंड पुर्ण झाला की दुसर्‍या राऊंडच्या सुरूवातीला सा.सं. में. यावेळी मराठी गाणं गाईल, यावेळी गट क्र. १ हिंदी गाणं म्हणेल.
या राऊंड मध्ये प्रत्येक गटाला प्रत्येक गाण्यासाठी १० गुण दिले जातील,
जितकी गाणी गायली जातील तितके मार्क्स मोजले जातील.
एखाद्या गटाला गाणं आलं नाही तर, पुढच्या गटाने त्याच अक्षरापासून सुरवात होईल असं गाणं गायलं पाहीजे.

राऊंड २
या राऊंडमध्ये एक बोल ठेवलेला असेल, यात हिंदी आणि मराठी सिनेमातल्या गाण्यांच्या एकूण १० चिठ्ठ्या मिसळून ठेवण्यात आलेल्या असतील. प्रत्येक गटातल्या एका पार्टिसिपंटने येऊन एक चिठ्ठी उचलून त्यात लिहीलेल्या गाण्याची हावभावातून नक्कल करून दाखवायची व त्या त्या गटाने ते गाणं ओळखायचं. प्रत्येक गटाला गाणं ओळखण्यासाठी २ पर्याय मिळतील, एक हिंदी आणि एक मराठी. हिंदी आणि मराठी दोन्ही साठी २ वेगवेगळे राऊंडस असतील.

प्रत्येक गटाला २ मिनिटात ३ संधी मिळतील त्यात जर योग्य गाणं ओळखता आलं नाही तर त्या गटाचे ५ मार्क वजा होतील. व ते गाणं पुढे प्रेक्षकांना पास करण्यात येईल, पुढच्या गटाला नविन पर्याय देण्यात येईल.

राऊंड ३
या राऊंड मध्ये २ फेर्‍या असतील.
या मध्ये सां.स.में. समोर ठेवलेल्या बोलमधून एक चिठ्ठी उचलून सिनेमाचं नाव सांगेल, ज्यां पार्टीसिपंट ना त्या सिनेमातील गाणं येत असेल त्यांनी हात करावा, हा बझर राऊंड असल्याने ज्या गटाने प्रथम हात वरती केला असेल त्यांना त्या सिनेमातलं गाणं गाण्याची संधी मिळेल, बरोबर गाण्यासाठी २० मार्क अधिक होतील, आणि चुकिच्या गाण्यासाठी ५ मार्क वजा होतील.

राऊंड ४
या राऊंडमध्ये २ फेर्‍या असतील.
पहील्या फेरीत मराठी तारे-तारकांच्या नावाच्या चिठ्ठ्या समोर बोल मध्ये असतील. सां.स.में. त्यापैकी एक चिठ्ठी उचलून त्यावरचं नाव वाचतील, त्या तारा-तारकाच्या एकूण ५ चित्रपटांची नावं ओळखायची आहेत. जो गट प्रथम हात वरती करेल त्याला प्रथम संधी देण्यात येईल. ज्यांना संपुर्ण ५ नावं ओळखता येतील त्यांना २० अधिक मार्क मिळतील, ओळखलेल्या चित्रपटाच्या अर्धवट संख्येला मार्क मिळतील ते असे ३ चित्रपट ओळखल्यास १०, ४ ओळखल्यास १५ मार्क आणि ५ ही ओळखल्यास २०.
या फेरीत काहीही ओळखता आलं नाही तरी मार्कस वजा होणार नाहीत. पण चुकिचा सिनेमा सांगितल्यास त्या गटाचे ५ मार्क वजा होतील.

प्रत्येक गटाला चित्रपट ओळखण्यासाठी जास्तीत जास्त १ मिनिटाचा वेळ मिळेल. जर ५ पैकी ५ चित्रपट ओळखता आले नाहीत तर तो पर्याय वगळून पुढच्या गटाला पुढचा पर्याय देण्यात येईल.
दुसरी फेरी तंतोतंत, फक्त हिंदी चित्रपट तारे-तारकांच्या सिनेमांसाठीची असेल.

फेर्‍या संपलेल्या आहेत, मिळालेले अधिक आणि वजा मार्क मोजून विजेता गट ठरवण्यात येईल..

चला तर मग, चित्रपट आणि गाणी याविषयी जास्ती अभ्यास करा आणि वविच्या स्पेशल अंताक्षरीची मजा घ्या. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अयाई गं Lol नीरजा, डोळ्यासमोर आलं गं. तिघी मिळून बिचारीचं बखोट धरुन खळबळवताय ! पूनम Light 1 घे गं बाई.
***************
ॐ नमश्चण्डिकायै |

मग तर पूनम दिसेनाशीच होईल आधीच तब्येत तोळामासा... Lol

केश्विनी,
ती दक्सची आयड्या आहे. माझी नाही. मी स्वतःचे पाय धुवीन झरा/ओढा/नदी/नाला/हौद्/तळं/डबकं जे काय असेल त्यात. Wink
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

ती तिघी म्हणाली ना ! बरं बरं पण तळं आणि डबकं बुजलं ना?
***************
ॐ नमश्चण्डिकायै |

काय चाल्लंय आं? संयोजक या टवाळांना शिक्षा करा हो काहीतरी. (किंवा डब्बलीने वर्गणी तरी घ्या.)
वविनंतर वृत्तांत लिहा म्हणलं, तर सार्‍या बायका पळ काढतील. आता इथे करताहेत फुकाची धुवाधूवी. Proud

---
असं एखादं पाखरू वेल्हाळ..

बायांच्या बोलण्यात मधे तोंड घातलंस ना.. आता बघ तुझीच धुलाई होते की नाही ते!! यंज्जॉय!! Wink

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

दिपक, वातावरण निर्मिती रे वविची ! वविनंतरचं तुम्ही लोक निस्तरा Proud
नीरजा, जे जे मधे येईल ते ते धुवायचं ना? Lol

***************
ॐ नमश्चण्डिकायै |

वविनंतरचं तुम्ही लोक निस्तरा>>>
ववित निस्तरण्यासारखे काय घडणार आहे? पाय घसरणार आहे का पावसामुळे? एक भा. प्र.

वविनंतर वृत्तांताची भिती दाखवली ना दिपकने, त्याबद्दल बोलतेय.

***************
ॐ नमश्चण्डिकायै |

पाय घसरणार आहे का पावसामुळे? >> पावसामुळे हे नमूद केल्याबद्दल धन्यवाद Proud

दक्षीणा, अत्यंत भा. प्र. ला तसेच भा. उ. दिल्याबद्दल अभिनंदन. Proud

करावं लागतं बाबा Wink

भा म्हणजे काय केपी? भावूक का? Lol
***************
ॐ नमश्चण्डिकायै |

अश्वे भा म्हणजे भावनेच्या भरात, भावाला भाव खात दिलेलं उत्तर.. Lol (कैच्या कैच :हहगलो:)

कराल तर निस्तराल. Proud

भावूक का?>>> Lol
थांबा हं आता.

केपी, आज काय खरे नाय तुझे!
भावनेच्या भरात कल्पनेच्या भरारीवर वर्षासंगे विहार!
-------------------------------------------------------------
'ज्याला कलाकार नाही बनता येत तो टीकाकार बनतो'

>>केपी, आज काय खरे नाय तुझे! >> किशोर त्याचं खरं कधी असतं ते तरी सांग. Lol

त्या वविच्या सुचनेत कपड्यान्चा वेगळा जोड, टॉवेल, रेनसुट वगैरे आणायला सान्गितलय
साबण आणायला, अन तो ही कोणता ते का नाही सान्गितल??? Proud
दक्षे, प्लिज नोट धिस सुचना!

लिम्ब्या
घे आता तुझ्यासमोर इतकं रामायण झालं तरी रामाची सीता कोण? Uhoh
धुलाईच्या पोष्टी वाचून तुला इतकं ही कळ्ळं नाही का?
अरे टाटा चा OK धुलाईचा साबण आण
छिक छिक छिक छिक Proud

अरे इथे वा सगळा धोबी घट जमा झालाय !!!
आयला आणि धोबीणी पण विभागवार (पक्शी : मुंबई/ पुणे, काही माहेरवाशीणी /काही ससुरवाशीणी ही) आहेत

सध्या चर्चा नको .....
पुढच्या सभेला अजेंड्यावर घ्या हा विषय, काय.....

Pages