कडूशार

Submitted by समीर चव्हाण on 8 August, 2014 - 00:12

जगण्याची चव जात राहिली
जी तुझिया पश्चात राहिली

बोलाया बोलतो कसनुसे
की इच्छा गेल्यात राहिली

कडूशारशी सय एखादी
गोड स्मृतींच्या आत राहिली

तरंग उठले, तरंग विरले
धाकधुकी डोहात राहिली

तिच्या पुढे-मागे दुनिया पण
ती कोठे कोणात राहिली

वीतभराच्या घरात वारा
आस जशी डोळ्यांत राहिली

मिणमिणणे खुपले कायमचे
झळाळी न लक्षात राहिली

समीर चव्हाण

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा व्वा! अतिशय सुंदर गझल!

तरंग उठले, तरंग विरले
धाकधुकी डोहात राहिली

मिणमिणणे खुपले कायमचे
झळाळी न लक्षात राहिली

हे शेर सर्वाधिक आवडले.

उत्तम!

बोलाया बोलतो कसनुसे
की इच्छा गेल्यात राहिली

तरंग उठले, तरंग विरले
धाकधुकी डोहात राहिली
<< व्वा !व्वा !

तिच्या पुढे-मागे दुनिया पण
ती कोठे कोणात राहिली .....हा सर्वाधिक आवडला . Happy

सगळे शेर कमीजास्त आवडले
वीतभराचे घर ही कल्पना खूप आवडली
सय म्हणजे सुखद / गोड स्मृती असा मला माहीत असलेला अर्थ आहे त्यामुळे कडुशारशी सय असे म्हणणे लक्षात आले नाही क्षमस्व .

सगळ्यांचे आभार.

वैभवः माझ्याकडील उपलब्ध दोन संदर्भांप्रमाणे सय चा अर्थ आठवण असा होतो.
कुठेही गोड वा सुखद असे काहीही नाही आहे.

धन्यवाद.

सय ह्या शब्दाचा अर्थ चांगली / गोड आठवण असा होतो की नाही ह्याबद्दल मलाही काही माहीत नाही, मला फक्त त्या शब्दाचा अर्थ आठवण असा होतो इतकेच माहीत आहे.

चु भु द्या घ्या

गझल आवडली...

जगण्याची चव जात राहिली
जी तुझिया पश्चात राहिली

तरंग उठले, तरंग विरले
धाकधुकी डोहात राहिली

समीरजी ,बेफीजी धन्स
माझ्याकडचा अर्थ कुठल्याही संदर्भाशिवाय मी लावलेला होता माझ्या ऐकीव माहीतीवरून . आणि मला शब्दकोषात अर्थ शोधायला फारसे आवडत नाही त्यामुळे आपल्याला तसदी पडली. क्षमस्व .
चुभुदेघे

वाह समीरजी.. गझल आवडली Happy

जगण्याची चव जात राहिली
जी तुझिया पश्चात राहिली

तिच्या पुढे-मागे दुनिया पण
ती कोठे कोणात राहिली