पॅचवर्क आणि एम्ब्रॉयडरी - काही नमुने

Submitted by मामी on 24 July, 2014 - 00:55

माझ्या आईने केलेले हे पॅचवर्कचे काही नमुने. खूप जुने आहेत. जवळजवळ ४० वर्षांपूर्वीचे. त्यामुळे काही ठिकाणी कापड थोडं विटलं आणि विरलं आहे.

ही शकुंतला. खरंतर आईला अजून तीन नायिका करायच्या होत्या. मत्स्यगंधा, दमयंती आणि अजून एक कोणीतरी होती. त्यांची चित्रं आईनं तिच्या एका आर्टिस्ट मैत्रिणीकडून काढून देखिल आणली होती. पण ते प्रोजेक्ट काही पूर्ण होऊ शकले नाही.

शकुंतलेच्या गजर्‍याकरता, गळ्यातल्या आणि हातातल्या फुलांच्या माळेकरता खूप छान आणि नाजूक टाके घातले आहेत. तिचे केसही अगदी बारीक टाक्यांनी भरले आहेत.

दिवाणखान्यातल्या सोफ्याच्या पाठीवर घालण्याकरता बनवलेली ही चित्रे.

ही एक लहान मुलांच्या बेडवरची चादर :

चादरीवरची चित्रे जवळून :

पॅचवर्कमध्ये त्यातील कॅरॅक्टरच्या कपड्यांसाठी आकर्षक डिझाईन असलेली कापडं लागत. त्यावेळीच्या कपड्यांच्या दुकानात ताग्यातून उरलेली शेवटची थोडी थोडी कापडं एका बॉक्समध्ये घालून स्वस्त्यात विकायला ठेवलेली असत. आई नेहमी अशी कापडं निवडून निवडून आणत असे. अ‍ॅक्च्युअली, अजूनही बॅगभर कापडं घरी आहेत. ती काढून टाकायला काही आई तयार नाहीये.

यापैकी शकुंतला मी फ्रेम करून घेणार आहे. बाकीच्यांचं काय करावं ते कळत नाहीये.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कसलं सुंदर पॅचवर्क आहे!

चादरी आणि सोफाबॅक्ससाठी केलेलं आर्ट्वर्क कापून, वेगळं करून, बॉक्स फ्रेम्समधे घालून डिस्प्ले करता येईल.

सुंदर आहेत सगळेच नमुने. शकुंतला खूप आवडली.

जी छोटी चित्र आहेत ती चौकोनी आकारात कापून एकाच फ्रेममध्ये किंवा छोट्या छोट्या फ्रेम्समध्ये लावू शकतेस.

अतिशय सुंदर, सफाईदार, सुबक आणि आकर्षक.

जर्नल सारखे एका मोठ्या वहीत चिकटवून ठेव.>>>> +१ तसेच सामीने सुचवलेली कल्पना पण छान आहे.
असे आणखी काही नमुने असलतील तर 'पॅचवर्कचे नमुने' असे एखादे छोटेखानी पुस्तक छापता येईल की. शिवाय त्यात वापर केलेल्या टाक्यांचे नावंही देता येतील.

अप्रतिम, शब्दात सांगण कठीण. मामी, तुम्ही म्हणता जुनी, पण अजुनहि कित्ती कित्ती फ्रेश वाटतात ह्या कलाक्रुती..किती बारीक काम आहे हे ,किती वेळ लागला असेल करायला . धन्य ती माऊली .साष्टांग दंडवत त्यांच्या कलेला. खुप खुप अभिनंदन. त्यांना नमस्कार कळवा. खाण तशी माती हे तुमच्याकडे बघुन कळतच. अशीच प्रगती होवो हीच शुभेच्छा.

मामी अप्रतीम कलाकुसर आहे. फार छान केलेय तुमच्या आईन्नी. जुन्या काळातले असले तरी चित्रे मात्र आताची वाटतात एवढी फ्रेश आहेत.:स्मित: मनीमाऊ, हत्ती, मेक्सिकन टोपीवाला उन्दिर. सगळे मस्त आलेत. निळ्याजर्द परकरातल्या मनीमाऊच्या चेहेर्‍यावरचे भाव फार मिश्कील आहेत.

मस्त! तुमच्या कन्येला पण कलाकुसरीची आवड आहे ना. तिच्या निमीत्ताने आईचा वारसा पुढे चालू द्या.

वॉव, सुपरफाईन भरतकाम आहे, पॅचवर्कही भारीये!
खरंच फ्रेम करून लाव, खोल्यांची शोभा वाढेल.

४० वर्षांपूर्वीचं कामही छान जपून ठेवलंय गं अगदी, मस्तच Happy

Pages