Submitted by जयदीप. on 6 August, 2014 - 11:05
कुण्या निष्पर्ण झाडाला उषेची पालवी यावी
तुझ्या स्पर्शातुनी गझले नवी सुरुवात जन्मावी
तुझ्या दारात आशेचा किरण येतो पहाटेला
नको राहूस तू तेव्हा तुझ्या स्वप्नातल्या गावी
जरासे पाहिल्यावरती बसावा आरसा झिंगत
तुझ्या डोळ्यात बघताना नशेलाही नशा व्हावी
तुझा रस्ता तुला शोधत कधीचा हिंडतो आहे
कितीदा हाक मारावी, कितीदा ठेच लागावी?
जगाच्या वाळवंटावर पुन्हा मी पाहिले पाणी
अरे निष्ठूर आयुष्या किती आहेस मायावी!
तुझ्या माझ्यातले नाते असेही व्हायचे होते
जशी वार्यात आशेवर जिवाची ज्योत तेवावी
जयदीप
जयदीप
विषय:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आवडली अनेक ओळी खूप सहज
आवडली
अनेक ओळी खूप सहज वाटल्या आवडल्या
तुझ्या दारात आशेचा किरण येतो पहाटेला
नको राहूस तू तेव्हा तुझ्या स्वप्नातल्या गावी<<<<<सर्वाधिक आवडला
मनाच्या वाळवंटावर ..... >>> असे करू शकाल तर करून पहाल का . न पटल्यास चुभुदेघे
तुझा रस्ता तुला शोधत कधीचा
तुझा रस्ता तुला शोधत कधीचा हिंडतो आहे
कितीदा हाक मारावी, कितीदा ठेच लागावी?
जगाच्या वाळवंटावर पुन्हा मी पाहिले पाणी
अरे निष्ठूर आयुष्या किती आहेस मायावी!<<<
सुंदर शेर!
गझल आवडली.
सुंदर
सुंदर
गावी आणि मायावी सर्वात विशेष
गावी आणि मायावी सर्वात विशेष वाटले.
सर्वांचे मनापासून आभार
सर्वांचे मनापासून आभार
नाही आवडली विशेष.
नाही आवडली विशेष.
समीर जी...प्रांजळ
समीर जी...प्रांजळ प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद
वैभव सर...
मनाच्या असं मला तेव्हा सुचलं नव्हतं...मी पूर्णतः जगाचाच विचार करत होतो...
कारण जगात आलेल्या रुक्ष अनुभवांबद्द्ल मला बोलायचं होतं
चु भु दे घे
जगाच्या वाळवंटावर पुन्हा मी
जगाच्या वाळवंटावर पुन्हा मी पाहिले पाणी
अरे निष्ठूर आयुष्या किती आहेस मायावी!
सुरेख…
ओके आता नेमके समजले धन्यवाद
ओके आता नेमके समजले धन्यवाद जोशी
मायावी वाह वा !
मायावी वाह वा !