Submitted by पुरंदरे शशांक on 21 July, 2014 - 23:58
थेंबघुंगरु
थेंबघुंगरु घनात वाजे घुमड घनानी
चमकत राही अधुनि मधुनि दाही दिशातुनि
थेंबघुंगरु, अलगद सुटले कृष्णघनातुन
थेंबघुंगरु, बांधित पैंजण सरीसरीतुन
थेंबघुंगरु, चमकत पानी हिरवे होऊन
थेंबघुंगरु, सुंगध होते फुलाफुलातुन
थेंबघुंगरु, थिरकत रानी कधी झर्यातुन
थेंबघुंगरु, झळकत राही तृणपात्यातुन
थेंबघुंगरु, स्वैर निनादे कोसळताना
मल्हार घुमतसे, घनगंभीरसा धुंद तराणा
थेंबघुंगरु, तुटून आले सरसर खाली
गुंफून सरींच्या अगणित मिरवित रेशिमशाली
थेंबघुंगरु, सदा झुलतसे मनामनातुन
नाद तयाचा अखंड भुलवी.. कणाकणातुन
थेंबघुंगरु, ओघळती त्या नयनांमधुनी,
सांगून जात ती.. सुखदु:खाची कथा पुराणी
------------------------------------------------
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शशांक, मस्तच थेंबघुंगरु,
शशांक, मस्तच
थेंबघुंगरु, अलगद सुटले कृष्णघनातुन
थेंबघुंगरु, बांधित पैंजण सरीसरीतुन>>>>>:-)
थेंबघुंगरु... कल्पना खूप
थेंबघुंगरु...
कल्पना खूप सुंदर!!
सुरेख कविता!
जिव्हाळ रचना शशांकजी !
जिव्हाळ रचना शशांकजी !
खुपच छान...
खुपच छान...
वा! सुंदरच!
वा! सुंदरच!
पावसाच्या थेंबांची विविध रूपे
पावसाच्या थेंबांची विविध रूपे चांगली व्यक्त झाली आहेत.
शेवटचे कडवे विशेष.
खूपच सुंदर. मला तो थेंबघुंगरू
खूपच सुंदर. मला तो थेंबघुंगरू शब्द खूप आवडला, गोड आहे.
शशान्कजी! ___/\__ कित्ती गोड
शशान्कजी! ___/\__ कित्ती गोड कविता. आणी 'थेंबघुंगरू' हा सुन्दर नविन शब्द माबो शब्दकोशाला दिलात!
मागे कुणीतरी 'थेंबुटला' असा शब्द माबोला दिला होता.
<<थेंबघुंगरु, अलगद सुटले कृष्णघनातुन
थेंबघुंगरु, बांधित पैंजण सरीसरीतुन
थेंबघुंगरु, थिरकत रानी कधी झर्यातुन
थेंबघुंगरु, झळकत राही तृणपात्यातुन<< डोळ्यासमोर चित्र उभे केलत.
चांगलं जमलंय. आवडल .
चांगलं जमलंय. आवडल .
मस्त, नाजूक शब्दखेळ. आवडली.
मस्त, नाजूक शब्दखेळ. आवडली. थेंबघुंगरु.... टोटली फिदा !
आवडली ..मस्त
आवडली ..मस्त
khoop chaan ..thembghungru...
khoop chaan ..thembghungru... goad upama
अरे वा, सुंदर रे
अरे वा, सुंदर रे
मस्त. शेवट टचिंग !! मला पण
मस्त. शेवट टचिंग !!
मला पण थेंबघुंगरु हा शब्दच खूप आवडला.
थेंबघुंगरू...
थेंबघुंगरू... थेंबघुंगरू...
कसा मस्तं ताल आहे.
छान जमलीये कविता. तो शब्दं एक चोरला जाण्याची दाट शक्यता आहे... आधीच सांगून ठेवतेय, शशांक.
थेंबघुंगरू..किती सुंदर शब्द
थेंबघुंगरू..किती सुंदर शब्द आहे
कविता ही सुरेख!
वा! सुंदरच.थेंबघुंगरू.शब्द,
वा! सुंदरच.थेंबघुंगरू.शब्द, ताल मस्तं!!!!
(No subject)
वाह ! थेंबघुंगरू .....!
वाह !
थेंबघुंगरू .....!
वाचताना कानात वाजले घुंगरू !
वाचताना कानात वाजले घुंगरू !
अप्रतिम !
खूप खूप सुंदर! अप्रतिम!
खूप खूप सुंदर! अप्रतिम!
थेंबघुंगरू.. किती सुंदर शब्द!
आज पुन्हा वाचली!!
आज पुन्हा वाचली!!
फार गोड कविता आहे.
आज पुन्हा वाचली!!
आज पुन्हा वाचली!!
फार गोड कविता आहे.
खुप छान
खुप छान
मला पण थेंबघुंगरु हा शब्दच खूप आवडला. >>> + ११११