क्रिकेट - २

Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40

क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इशांत पेटलायच.
भुवनेश्वरबद्दल इंटरेस्टींग सांख्यिकी : इयन बोथम आणि हॅडलीनंतर दोन सलग कसोट्यांत एका डावात पन्नास धावा आणि पाच बळी घेणारा तिसरा खेळाडू. चमकदार नामावळीत नाव लागले.

>>पेटलाय म्हणजे पार कचराच केलाय त्यानं इंग्लंडचा.. हि इस हॅविंग द टाइम ऑफ हिज करीयर स्मित
अगदी अगदी !!!
८ विकेट्स त्याला पाहीजेत...

Jadeja to Anderson, OUT, a run-out to end it all over! fitting finish to an hour of comedy batting from England, and what's more it is Jadeja who runs out Anderson, the two guys who were in the middle of all the talk in the lead-up to this Test, Anderson pushes this one towards the off side, sets off for the single, Plunkett hasn't, Jadeja pounces on that one, fires a direct hit to complete a famous win for India
JM Anderson run out 2 (6b 0x4 0x6) SR: 33.33

जिंकले..................

इशांत शर्माने त्याला घातलेल्या शिव्या भलत्याच मनावर घेतल्या !!!!
असं असेल तर दर मॅचच्या आधी त्याला शिव्या घालण्यास हरकत नाही !!

तिथे हा प्राणी शॉर्टपीच का टाकत होता ?
असा प्रश्न काल पडला होता. नि आज शॉर्टपीच वरच ५ विकेट्स! धन्य तो खेळ क्रिकेटचा!

आज म्हणजे आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे. अगदी शेवटचा गडी बाद होइस्तवर कुणि क्षेत्ररक्षणात ढिलाई केली नाही - विशेषतः जडेजाने केलेला शेवटचा धावचित!
मला स्वतःला शर्माच्या बाउन्सर वर अँडरसन, मोइन अली सारखा बाद झालेला बघायला आवडला असता!

धोनीचा इशांतला शॉर्ट बॉल टाकायला लावायचा निर्णय भलताच गट्सी होता and it paid off very well. इशांतचा स्पेल एकदम पाँटिंगला २००८ मधे टाकलेल्या स्पेलच्या जवळ जाणारा वाटला - quality मधे. कालची जाडेजाची इनिंग पण जबरदस्त होती. अँडरसन got carried away balling short balls.It was game changing inning. जाडेजाने अँडरसनला रन आऊट करून मॅच जिंकणे हा दैवी न्याय म्हणायचा का ? Wink

सामना संपल्यावर शमीचा इशांतला बॉल नेऊन देणे नि इशांतने पॅव्हिलियनमधे जाताना धोनीला पुढे व्हायला सांगणे नि धोनीने त्यालाच पुढे हो खूणावणे. Guess these are signs of team in harmony.

भारतीय गोलंदाजाने आंखूड टप्प्याच्या गोलंदाजीने इंग्लंडमधें इंग्लीश फलंदाजांची त्रेधातिरपीट उडवणे म्हणजे माझ्यासारख्या ज्येष्ठ नागरिकासाठी किती अत्यानंदाची गोष्ट आहे याची कल्पना कदाचित नवीन पिढीला येणार नाही ! याची देही , याची डोळां हें पहायला देणार्‍या ईशांतला यापुढे सर्व माफ !!!!

This is the first time two Indian bowlers have taken six-fors in the same Test. Bhuvneshwar, and now Ishant

बक्षिस समारंभ -
ईशांत शर्माने आजच्या 'शॉर्ट्-पीच' गोलंदाजीच्या डांवपेंचाचं श्रेय अगदीं खुलेपणाने धोनीला दिलं ! That's another feather in his cap to-day !!
अ‍ॅथरटनने पहिल्या दिवशींच्या कठीण परिस्थितीतल्या पुजाराच्या २६ धांवांचा मुद्दाम कौतुकाने उल्लेख करणं, हें औचित्यपूर्ण होतं.
अ‍ॅथरटनने कसोटीसाठी एक अशी उत्तम खेळपट्टी तयार केल्याबद्दल क्यूरेटरना धन्यवाद देणं याचंही अप्रूप वाटलं.
डेव्हीड बूनला मॅच रेफेरी म्हणून स्टेजवर आलेला पाहून बर्‍याच आठवणी जाग्या झाल्या. He had great presence on the field !

He had great presence on the field ! >> big presence म्हणायचेय का तुम्हाला ? Wink He was one of very nimble footed batsman I have ever seen, while playing spin. and looking at his size it was quite unbeliveble. 87 च्या World Cup चा शिलेदार होता तो. पाकिस्तानबरोबरच्या सेमी फायनलमधले ते अर्ध शतक अजून आठवतेय.

जिंकलो रे भाईईई ... नाचो ओओओ ... आपल्या सर्वांची इथली मेहनत वसूल झाली.. आज से कोई इशांत शर्मा को गाली नही देगा... फकस्त आफ्रिदीच्या हवे ते बोला .. व्हॉट ए विन व्हॉट ए विन .. रनआऊटच झाले असते इंग्लिशमन तरी काही वाटले नसते, पण इशांत शर्मा न धोनीने अक्षरशा हलवा केला त्यांचा .. सडनली ईंडिआ लूक्स फार बेटर टीम दॅन टीम ईंग्लंड.. विनिंग कॉम्बिनेशन जसे च्या तसे खेळवू शकतो बिनधास्त.. मात्र ईंग्लंडसमोर प्रश्नच प्रश्न आहेत कारण त्यांना आता जिंकायचे कसे हे शोधायचे आहे.. वासिम अक्रम बरोबर बोल्लाय, गिरे हुए को और पीटो.. बुकलून काढा आता त्यांना, मालिका विजय हवा आता .. बस्स आपला शारूख कोहली पण फॉर्ममध्ये यावा आता.. जिओ टीम ईंडिया .. चला आता गटारीच्या तयारीला लागा !!!

<< big presence म्हणायचेय का तुम्हाला ?>> Off the field, that he has even to-day ! Wink
तसा इंग्लंडचा स्पीनर टॉनी लॉक पण गरगरीत देहयष्टी असूनही स्लिपमधे सूर मारून 'शार्प' झेलही घ्यायचा !

Off the field, that he has even to-day >> LOL. guess he has managed to increase his presence even more. (I'm referring to him beingmatch refery) Lol

आजच्या विजयाचे कौतुक नि celebration होत असतानाच अजून ३ सामने बाकी आहेत हे लक्षात राहू दे भारतीय संघाच्या. २०१२ ची home series विसरू नका.

मार्श आनि बून काय जोडी होती आघाडीची ! कधी हळू हळू ५०-६० धावा बोर्डावर लावायचे कळायच देखील नाही. तसलेच ते ग्रीनीज आणि हेन्स !

फॅन मोडः अभिनंदन!!! मस्त जिंकले.. सुपर्ब!! जबरदस्त मॅच झाली. टेस्ट क्रिकेट झिंदाबाद! वानखेडे ला आपण फिरकी ला अनुकूल खेळपट्टी मागून सुद्धा घेऊन हारलसुद्धा, त्याची परतफेड झाल्यासारखं वाटलं. मस्त!!

टीकाकार मोडः
६ वर्षं, ५६ कसोटी खेळल्यावर आणी दुसर्यांदा ईंग्लंड दौर्यावर गेल्यावर सुद्धा जर ईशांत शर्माला धोनी ने हे सांगावं लागत असेल की तू ऊंच आहेस, बाऊन्सर्स टाक, तर कठीण आहे. आणी हे सांगितल्यामुळे पडलेल्या विकेट्स माझ्या नसून धोनीच्या आहेत (श्रेय) हे म्हणणं मला तरी श्रेय देण्यापेक्षा लांगूलचालन केल्यासारखं वाटलं.

हे म्हणणं मला तरी श्रेय देण्यापेक्षा लांगूलचालन केल्यासारखं वाटलं. >> मला नाहि वाटत तसे. तो लंचच्या आधीच्या शेवटच्या ओव्हरबद्दल बोलत होता. आपल्या टिपीकल स्टाईलनुसार शेवटची ओव्हर लवकर आटोपून (तीही आधीच्या ओव्हरमधे ३ चौकार मारल्यावर) जेवायला जावे असा टिपीकल भारतीय विचार इशांत करत असताना धोनीने एकदम about turn मारून बाऊन्सर्स टाक सांगावे हा धक्कादायक प्रकार होता. Happy

Pages