मी नास्तिक आहे असा माझा समज आहे.... पण

Submitted by ब्रह्मांड आठवले on 10 July, 2014 - 10:23

सामान्य माणूस नास्तिक असू शकतो का ?
कारण मी नास्तिक आहे, असा माझा समज आहे. मी नास्तिक असण्याने इतरांना त्रास होतोय असं आजवरच्या वाटचालीवरून वाटलं नाही. पण मी नास्तिक का आहे याची कारणं मला माहीत असलीच पाहीजेत असा आजूबाजूच्यांचा आग्रह का ?
मग मिळेल ते वाचावं लागतं. म्हणजे असं वाटतं की आपण इतरांच्या कटकटीला वैतागून वाचतोय हे सर्व..
पण खरं म्हणजे
माझ्या नास्तिक असण्याशी माझा अंतर्गत झगडा चालू असतो. निरंतर.
मग सगळी तत्त्वज्ञानं थोडी थोडी, झेपेलशी चाळून मेंदू बधीर होतो. वाचनासाठी डोळे खोबणीतून बाहेर येतात आणि झोप न झाल्याने आता आत खेचले जाऊन मेंदूला चिकटतात.
मग मेंदूचं कामकाज सुरळीत चालत नाही. जडत्व येतं
मग वाटतं या मेंदूच्या हार्डवेअरचा निर्माता कोण ?
याला सूक्ष्म डीसी करंट पुरवणारा जनरेटर कुठला ?
मेंदूचं विचाररुपी सॉफ्टवेअर आणि त्याची प्रोग्रामिंग लँज्वेग लिहीणारा तो अभियंता कोण ?

बाळ जन्मताना त्याचे एकेक अवयव तयार होणं
त्यात चैतन्य निर्माण होणं
मग पूर्ण आकार आल्यावर
आईशी नाळेनं बांधलं जाणं
आईने पचवलेलच बाळाला आयतंच मिळणं
आणि बाहेर आल्यानंतर
आईला पान्हा फुटणं
हा कुठला प्रेग्राम असेल ब्वॉ ?
जन्मण्याआधीच लिंग, स्वभाव, रंग रुप निश्चित होणं
आणि हे सर्व
या अफाट ब्रह्मांडातल्या एका सूर्य नामक ता-याच्या
जीवसृष्टी असलेल्या एकांड्या ग्रहावर

या अशा प्रश्नांची उत्तर मिळेनाशी होतात, तेव्हां मग भीती वाटू लागते.
स्वतःच्या नास्तिक असण्याची

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवांतर :

प्रकाश घाटपांडे,

>> जगला तरच तु तुझे कार्य व विचार यांचा प्रसार करु शकणार आहे. शिर सलामत तो पगडी पचास!

सावरकरांनी असाच विचार केला. अंदमानात पिचून मारणे हे त्यांचे ध्येय कधीच नव्हते. इंग्रज सरकारने त्यांचे रत्नागिरीत पुनर्वसन करायचा प्रस्ताव मांडला. त्याबदल्यात सावरकरांनी राजकीय कार्य न करण्याची अट घातली.

या तडजोडीस सावरकरद्वेष्टे माफीनामा म्हणतात.

आ.न.,
-गा.पै.

अरे वा ! इथेही आले का सावरकर ? आता गांधीजी पण येतील. मग काँग्रेस, भाजप.. मज्जाच मज्जा.

डॉ. सुनील अहिरराव .. - तुमच्या स्वतःच्या विचारमंथनाचा वाटा किती या मतात ?

अरे आमच्या प्रश्नांना उत्तर देणारे कोणीच कसे नसावे बर? Uhoh
स्वामी विवेकानंद हे आस्तिक होते,कारण ते वेद मानायचे.
वेदान्त आणि पुराणांना ते मानत नसत. Happy
गापै,सावरकरांना मानतात तर..! गापै बदलले बरं... Wink

कारण ते वेद मानायचे.
<<
म्हणजे काय करायचे नक्की?
वेद हे अस्तित्वात असलेली पुस्तके/मौखिक परंपरेने पुढे आलेली काही काव्ये आहेत हे मान्य करायचे,
की वेद हे अपौरुषेय अर्थात, कुण्याही मानवाने लिहिलेले नाहीत असे मानायचे?
की वेदांत लिहिले आहे, तेच सत्य व संपूर्ण ज्ञान आहे. यापलिकडे काहीच नाही, असे म्हणायचे? थोडे कुराण अथावा बायबलच्या धरतीवर?

या तडजोडीस सावरकरद्वेष्टे माफीनामा म्हणतात.
<<
सावरकरांनी स्वतः हे असे कुठे लिहून ठेवले आहे, की फक्त भक्तांनी दिलेला हा रंग आहे?
अन तडजोडच करायची होती, तर तुरुंगात जायच्या आधी करायची होती की!

काल आस्तिक चा अर्थ शब्दार्थवर कळाला.आता एक छोटा प्रश्न...आस्तिक म्हणजे अस्थित्वावर विश्वास ठेवणारा,पुढे वेदांना प्रमाण मानणारा आस्तिक. आता,एखादा व्यक्ती वेदाला प्रमाण मानतो पण पुराणांना नाही,त्यातल्या देवांनाही नाहीच तर तो आस्तिक की नास्तिक? जर मी वेदालाही आणि तत्सम कशालाही प्रमाण मानत नाही परंतु जे अस्थित्वात असणारे सत्य आहे,त्यास प्रमाण मानतो तर मी आस्तिक की नास्तिक?>>>>>
रुढार्थाने नास्तिक! पणमाझ्यामते "अस्थित्वात असणारे सत्य आहे,त्यास प्रमाण मानतो " तर तुम्ही आस्तिकच. देव म्हणा, सत्य म्हणा की नियती म्हणा काही फरक पडत नाही."सगुण निर्गुण एकु गोविंदु रे".

झक्कींनी म्हटल्याप्रमाणे घरात कसोटीच्यावेळी देव आठवला नाही, डॉक्टर काय म्हणतात ते पहिल्यांदा पाहिले.त्यांच्यावर विश्वास ठेवला.
देवावर नाही,पण नियतीवर विश्वास आहे.तरीही देव्हार्‍यातील तेवते निरांजन,उदबत्तीचा ,फुलांचा संमिश्र वास
खूप फील होतो.अशावेळी मी त्रिशंकूच!

की वेद हे अपौरुषेय अर्थात, कुण्याही मानवाने लिहिलेले नाहीत असे मानायचे?>>>> हे प्रश्न आपल्याला पडतात.इतर धर्मात पुस्तकाबाहेर जायची सहसा कोणाची टाप नसते.

हे प्रश्न आपल्याला पडतात. इतर धर्मात पुस्तकाबाहेर जायची सहसा कोणाची टाप नसते.
<<
हे असले इतर धर्म आपले आदर्श आहेत काय?
असेच रूप हिंदू धर्माचे असावे अशी आपली इच्छा आहे काय?

नास्तिक वगैरे काही नसते.
जसे काळोख म्हणजे प्रकाशाचा अभाव तसे नास्तिक म्हणजे आस्तिकत्वाचा अभाव.

आस्तिकत्व विश्वासातून येते आणि विश्वास आपल्या आतून येतो, मारून मुटकून ना कोणाला आस्तिक बनवता येते ना एखाद्याचे आस्तिकत्व नष्ट करता येते.

नास्तिक लोकांना देव या संकल्पनेला विरोध करण्यापेक्षा आपल्या जीवनाचा शिल्पकार आपण नसून कोणी और ही आहे हे मान्य नसते.

पण प्रत्यक्षात सारेच काही आपल्या हातात नसते हे न कबूल करताही सर्वांनाच मान्य असते.

हे असले इतर धर्म आपले आदर्श आहेत काय?
>>> अजिबात नाही.
असेच रूप हिंदू धर्माचे असावे अशी आपली इच्छा आहे काय?>>>> नाही.कारण ते तसे नाहीच.चार्वाकादी मंडळी
इथेच होऊन गेली आहेत.

सावरकरांनी स्वतः हे असे कुठे लिहून ठेवले आहे, की फक्त भक्तांनी दिलेला हा रंग आहे?
अन तडजोडच करायची होती, तर तुरुंगात जायच्या आधी करायची होती की!>>>>>>> प्लीज, असं बोलू नका. दुसर्‍यांचे मतखंडन करताना एखाद्या देशभक्तावर राळ उडवतोय ते पहा. माझी जन्मठेप वाचा.किती काळ अनन्वित
शारीरिक व मानसिक यातना त्यांनी भोगल्यात.

देवकी या आधी अनेकवेळा या विषयावर महाचर्चा(?) घडलेल्या आहेत. तुमची तळमळ सगळेच समजून घेतील आणि सिरिअसली घेतील असे नाही Sad पण त्यामुळे नाराज होऊ नका.

विवेकानंद वेद मानायचे म्हणजे त्यातले कंटेंट,त्यातले अर्थ यांना मानायचे.बाकीचे प्रश्न रास्त आहेत्,पण विवेकानंदांची पत्रे मध्ये जेवढं वाचनात आलं आहे,तेवढं माहिती आहे...बाकी एक्झॅक्टली त्यांचा विचार वेदा-वेदांताबद्दल बाबत काय होता,हे विवेकानंदांचा अभ्यासक सांगू शकेल.(जरी त्यातले वाचले असले तरीही,त्यावर टिका एखाद्या अधिकारी व्यक्तीने करावी,माझी मते ही वै. आणि स्वतः पुरतीच मर्यादीत आहेत.)

देवकीताई उत्तर दिले आभारी आहे.कदाचीत मी फारच विचार करतोय याबाबत म्हणूनही एवढे प्रश्न बाहेर काढले असतील. Happy

पुस्तका बाहेर जायची टाप नसते<< अगदी खरं.पण असे धर्म माणसाला कमकुवत बनवतात.उदा.मु. धर्म.
बायबल बद्दल म्हणाल तर त्यांचेही असे दोन प्रवाद आहेत.आस्तिक-नास्तिक वगैरे.

सावरकर इथे अवांतर आहेत.

>>
दुसर्‍यांचे मतखंडन करताना एखाद्या देशभक्तावर राळ उडवतोय ते पहा. माझी जन्मठेप वाचा.किती काळ अनन्वित
शारीरिक व मानसिक यातना त्यांनी भोगल्यात.
<<

सुदैवाने माझे वाचन बरेच आहे. पुस्तकांची नांवे मलाही अनेक ठावकी आहेत. Wink

कुणी किती यातना भोगल्यात, त्यावरून कोण किती मोठा देशभक्त, हे ठरत नाही. अन हा मुद्दाच नाहिये येळेकर.

मुद्दा, किंवा माझा प्रश्न हा होता, की त्यांनी स्वतः "हे असे" लिहून ठेवले आहे काय? असल्यास कुठे? हे जाणून घेण्याची इच्छा आहे.

रच्याकने:

शिवाय, हा प्रश्न गापै यांना आहे. तुम्हाला नाही.

तेव्हा, कृपया या अवांतरात मधे पडू नये. धागा भरकटेल. कारण माझ्याही भावना या विषयात तीव्र आहेत. कुणी कुठे किती कशी राळ उडवली याचा हिशोबच मी करत नाहिये.

तथाकथित सावरकर भक्तांनी जर या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी असलेल्या सर्वच देशभक्तांची देशभक्ती मान्य केली, व गालीप्रदान बंद केले, तर या सावरकरभक्तांच्या उत्सवमूर्तींनाही कुणी काहीही म्हणणार नाही.

पण चारित्र्यहनन (जे कितीही सौम्य/'संयत' शब्दात केले तरीही) हाच ज्यांचा अजेंडा आहे अश्या संघिष्ट लोकांना कुणी समजवावे? या असल्या विचित्र विचारसरणीचा मला अत्यंतिक तिरस्कार आहे.

सावरकरांची देशभक्तीपर गाणी मीही तितक्याच खुल्या गळ्याने गातो, अन त्यातल्या भावनांनी माझाही गळा दाटून येतो. पण, त्या व्यक्तिमत्वाचे प्रोजेक्शन, व त्यांची नको तिथे केलेली तुलना. खुद्द सावरकरांच्याही कित्येक विचित्र वागणुकी, मते, यांचेमुळे कित्येक बाबींत ते मला आवडत नाहीत. ही नावड, माझे व्यक्तिगत मत बनून थांबलीही असती.

पण, नेटवर आल्यावर जे पाहिले, त्यानंतर, मुदलात सावरकर असतील त्यापेक्षा विकृतरित्या पेश करण्यास हीच संघिष्ट जाहिरातबाजी जबाबदार आहे, असे माझे मत झालेले आहे. आज ते असते, तर खुद्द सावरकरांनीही या भक्तांना -भगतांना म्हणा हवं तर- चामंगलेच झापडले असते, असे वाटते.

त्यामुळेच या विषयावरच्या प्रत्येक पोस्टला उत्तर दिलेच पाहिजे या निष्कर्षावर मी येऊन पोहोचलो आहे, हे या प्रतिसादापाठचे कारण आहे.

***
असो.
सावरकर विषयावर हे माझे लास्ट पोस्ट, या धाग्यावर.

विवेकानंद वेद मानायचे म्हणजे त्यातले कंटेंट,त्यातले अर्थ यांना मानायचे.बाकीचे प्रश्न रास्त आहेत्,पण विवेकानंदांची पत्रे मध्ये जेवढं वाचनात आलं आहे,तेवढं माहिती आहे...बाकी एक्झॅक्टली त्यांचा विचार वेदाबाबत काय होता,हे विवेकानंदांचा अभ्यासक सांगू शकेल.वेदान्तांचं त्यांना वावडं होतं हे मात्र नक्की.
<<
साहेबा,
आस्तिक शब्दाच्या व्याख्येत वेदप्रामाण्य मान्य करतो तो आस्तिक. अशी एक व्याख्या आहे.
जर त्यांना वेदांताचं वावडं होतं, तर, तुमच्याच आकलनानुसार ते 'आस्तिक' नव्हेत.
जरा मी लिंक दिलेला व्हिडू पहा. पुन्हा बोलू मग.

आस्तिक :कशावरतरी श्रध्दा असते .पण हे एक काचेचे भांडे आहे आणि ते लहान मोठे असू शकते .आस्तिकलोक हे भांडे फार जपत असतात परंतू याला कधीही तडा जातो आणि त्यातून बदका आवाज येतो .
नास्तिक :यांच्याकडे कोणतेही भांडे नसते .ते तुटण्याफुटण्याची काळजी नसते .काही कारणाने असे काही भांडे आपल्याकडे नसण्याचे वैषम्य वाटू लागते या नास्तिकांना .
तर या दोन लोकांच्या दोन दोलायमान स्थिती त्रासदायक असतात .

ओके.
आपण रुळावर येऊ.

आपण ज्या समाजात राहतो त्यात सर्वसाधारणपणे आस्तिक लोकांचे प्रमाण जास्त असते. आपण आस्तिक का आहोत या प्रश्नाचे उत्तर त्याच्याच साठी शोधायचे. आस्तिक असण्या नसण्याला आक्षेप नाही किंवा नास्तिक असण्या नसण्यालाही. आस्तिक समाजातून एखादा नास्तिक निपजतो तेव्हां त्याची स्वतःची विचारप्रक्रिया सुरू झालेली असते. याउलट आस्तिकाने आई वडील, समाज, गुरू या सर्वांनी सांगितले म्हणून हा विचार स्विकारलेला असण्याची शक्यता जास्त असते. लहानपणापासून झालेल्या संस्कारात पटणे न पटणे हा भाग कितपत असतो ? आपली श्रद्धा तपासून घेतल्यानंतर जर मनापासून पटले तर आस्तिक किंवा नास्तिक असणे यातलं काहीही स्विकारण्यात अडचण नसावी.

इतर धर्मातली उदाहरणं इथं न आलेली बरी. एकतर त्या धर्माचे प्रतिनिधी इथे कुणीच नाहीत. जेव्हां एखाद्या धर्माचे लोक अतिरेकी आहेत असे उल्लेख होतात तेव्हांही त्यांची बाजू मांडायला कुणीच नसते. जर इतर धर्माचे लोक असहीष्णू आहेत असे सुचवायचे असेल तर लोक इंग्लंड अमेरीका, ऑस्ट्रेलिया इथे धाव का घेतात, तिथेच सेटल का होतात हे पण पहायला पाहीजे. विचारस्वातंत्र्याची स्थिती इतर देशात काय आहे हे पण पहायला पाहीजे, डॅन ब्राऊन सारखा लेखक स्वधर्मावर जे काही लिहू शकतो तसं भारतात शक्य होईल का ? त्यावर सिनेमा येतो आणि त्यावर बंदी घाला म्हणून मागणी होत नाही यात सगळं काही आलं. आपण कुठे आहोते हे स्पष्ट करणारी ही घटना आहे. त्यांची श्रद्धा वेगळी आणि विचारस्वातंत्र्याबद्दल असलेली उदारता वेगळी. उगाचच संदीग्धता निर्माण करणा-या पोस्टस किमान या धाग्यावर तरी नकोत. विषयाशी संबंधित नसणा-या पोस्ट्सचीही गरज नाही. बंदी नाही.

>>.काही कारणाने असे काही भांडे आपल्याकडे नसण्याचे वैषम्य वाटू लागते या नास्तिकांना .<<
Happy काही कारणाने वा काही काळाने वा दोन्ही

धागाकर्तेच म्हणतात 'मी नास्तिक ...अंतर्गत झगडा ' वगैरे .प्रत्यक्ष बोलून न दाखवणारेही बरेच असतील .हेच वैषम्य .भांडे नाही ,श्रध्दारुपी काचेचे भांडे .त्यात कोणाला अपराधी वाटण्याचे काहीच कारण नाही .मनोगत व्यक्त केल्याने विचारांची देवाणघेवाण होते ."काही कारणाने/काळाने बदल होतो "हे खरंच बऱ्याचवेळा अनुभवास येते .

एका लेखकाची (जयवंत दळवी ?)कथा आहे .कथानायक फार भाविक आणि देवपूजेत गुंतलेला असतानाच निरोप येतो -'मुलगा बुडला .'अगदी याचवेळी ही घटना घडावी याचे त्याला वैषम्य वाटते .श्रध्देला तडा जातो .

आता मी गवत खाणारा असतो तर उपाशी राहिलो नसतो असे विचार सिंह करू लागला तर ते वैषम्य .
इथे प्रसिध्द व्यक्तीँची उदाहरणे घेण्यापेक्षा इतर उपमा घेण्याने अनाठायी वाद होणार नाहीत अशा तऱ्हेने एक विचार मांडण्याचा प्रयत्न आहे .

इब्लिस | 16 July, 2014 - 11:38 नवीन
हे प्रश्न आपल्याला पडतात. इतर धर्मात पुस्तकाबाहेर जायची सहसा कोणाची टाप नसते.
<<
हे असले इतर धर्म आपले आदर्श आहेत काय?
असेच रूप हिंदू धर्माचे असावे अशी आपली इच्छा आहे काय?>>>>> +१

<<
हे असले इतर धर्म आपले आदर्श आहेत काय?
असेच रूप हिंदू धर्माचे असावे अशी आपली इच्छा आहे काय?>>>>> -१०१

कारण हिंदू धर्माचे स्वरूप असे नाहीचे आणि नसणार पण !
सद्ध्या जर आजुबाजुला काही कल्ट असे करताना दिसत असतील तर ते काही चांगले नाहीये,
आणि कालांतराने त्या कल्टांमधे देखील बदल घडत जातील.
अजुन एक फतवेबाज कल्ट हे हिंदूधर्मात जरी दिसले तरी ते पुर्ण धर्माचे प्रतिनिधित्व करत नाहीत.

जर त्यांना वेदांताचं वावडं होतं, तर, तुमच्याच आकलनानुसार ते 'आस्तिक' नव्हेत.<<<इब्लिस बरोबर...वेदान्तात पुराणे येतात असे वाटल्याने तसे झाले.वेदान्त हा वेदांना आकलन करण्यासाठी निर्मिलेला भाग आहे. स्टेटमेंट मागे घेतले आहे.

तुम्ही दिलेला व्हिडीओ बघण्याची आवश्यकता वाटत नाही.कारण् एक,डॉकिन्स काय सांगणार त्याची पूर्वकल्पना होती.त्याचे दोन-तीन आर्टीकल वाचल्यानंतर,खात्रीच पटली.पण आता तो व्हिडीओ बघेन सावकाशीने वेळ काढून.मग विपु टाकतो किंवा इथेच टंकतो.

भांडे असण्याचे वैषम्य वाटणे<<< खरच अजूनही क्लीष्ट वाटते समाजायला.

आणखी एक प्रश्न आहे.या जगात धर्माचं अस्थित्व नसतंच तर ?विचार करा,त्या 'पा'मधल्या ऑरो च्या पृथ्वीसारखं जग बॉर्डरलेस तसं रिलीजनलेस असतंं तर? कुणी हमास नसता,कोणी तय्यबा-तालीबान नसता,कोणी व्हिएतनाम नसता,ना मुस्लीम असते ना ईसा...सगळे शास्त्रज्ञ निवांत झाले असते.बराच पैसा हातात खेळला असता.वेळ वाया घालवायला वेगळे पर्याय निघाले असते.मायबोली नुसत्या कविता,कथांवर चालली असती.(!) Happy

तर असा धर्म्,त्याचं आस्तिकत्व इ.वगैरे असले की अनेक सामाजीक वितुष्ट पाठून आलीच.

srd,
तुम्ही लिहिताना - श्रद्धेला तडा जातो. श्रद्धा ही जणू काचेचे भांडे.- अशी उपमा दिलेली आहे. ती समजली.
पण,
>>काही कारणाने असे काही भांडे आपल्याकडे नसण्याचे वैषम्य वाटू लागते या नास्तिकांना .<<
हे कसे काय? श्रद्धाळूंकडे असे काही असल्याचे वैषम्य मला का वाटायला हवे ते समजले नाही.

तर असा धर्म्,त्याचं आस्तिकत्व इ.वगैरे असले की अनेक सामाजीक वितुष्ट पाठून आलीच.>>>>

धर्म हे फक्त एक कारण झालं. एकाच धर्माच्या जातीच्या लोकांमधे सुद्धा वितुष्ट असतेच कि. लोकांना दुसर्‍याशी भांडायला कारण थोडीच लागतं? धर्म नसेल तर प्रांत, आर्थिक पत, रंग, जेंडर, स्वार्थ वगैरे वगैरे. काहिहि चालते.

Pages