समजू शकलो नाही केव्हा तुझे बहाणे!

Submitted by सतीश देवपूरकर on 16 September, 2012 - 09:33

गझल
समजू शकलो नाही केव्हा तुझे बहाणे!
किती मला जीवना! करावेस तू दिवाणे!!

निदान आली जरा जरा कल्पना सुखाची;
नवीन वेषात दु:ख आले जुनेपुराणे!

निमित्त मी, दाद, ही तुला! ह्या तुलाच टाळ्या!
तुझाच पावा, तुझेच गाणे, तुझे तराणे!!

मनापासुनी डोकेफोड करत मी गेलो!
कधी शहाणे....कधी भेटले....दीडशहाणे!!

अहोरात्र मी एक अनामिक गुणगुण करतो!
जीवन माझे म्हणजे आहे सुरेल गाणे!!

चखणा म्हणुनी हवेच होते त्यांना काही.....
मी दिसल्यावर त्यांस मिळाले चणेफुटाणे!

दातओठ खातात अबोला असतो तेव्हा;
ताडताड बोलती जणू उडतात फुटाणे!

नावारूपा मीही आलो, हे न थोडके.....
तुझ्याप्रमाणे माझे नव्हते थोर घराणे!

जागोजागी दबा धरोनी मचाणं होती!
भाग्यवान मी म्हणून चुकले सर्व निशाणे!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

निदान आली जरा जरा कल्पना सुखाची;
नवीन वेषात दु:ख आले जुनेपुराणे!

निमित्त मी, दाद, ही तुला! ह्या तुलाच टाळ्या!
तुझाच पावा, तुझेच गाणे, तुझे तराणे!!

हे शेर आणि

अहोरात्र मी एक अनामिक गुणगुण करतो!

हा मिसरा

आवडले

चखणा म्हणुनी हवेच होते त्यांना काही.....
मी दिसल्यावर त्यांस मिळाले चणेफुटाणे!

दातओठ खातात अबोला असतो तेव्हा;
ताडताड बोलती जणू उडतात फुटाणे!

अहो टोचेश्वरा आधीच profspd ह्या आयडीच्या गझला रोज ३ ह्या प्रमाणात येत असताना तुम्ही प्रा. सतीश देवपूरकर ह्या आयडीच्याही गझला वर आणत आहात (आपल्या प्रतिसादाने गझल वरच्या पानावर येत आहेत )
किती अत्याचार सहन करू शकणार आहेत माबोकर नै का??

तेच म्हणतोय मी. प्रोफेसर पाडतातच आहे दिवसाला १० गजला.

माबोच्या प्रत्येक पानावर तेच तेच नाव आणि भीषण यमक जुळवलेल्या गोष्टी बघुन माझे डोके मधे मधे सरकतेच.

प्रोफेसरांनी, १ कोटी गझला रचण्याचे आव्हान स्विकारले आहे त्यामुळे सावधान डोके बडवायची पाळी येईल.

नावारूपा मीही आलो, हे न थोडके.....
तुझ्याप्रमाणे माझे नव्हते थोर घराणे!

अगदी खरयं! कधी कधी कमळातही चिखल निपजत असतो.
आणि मग त्या चिखलाला कमळापेक्षा महानता प्राप्त झाल्याचा भास होत राहतो.
Happy

मुट्या तुझ्या सौंदर्यबोधाची गरळ लागलास का ओकायला
तुझा हे कल्पनादारिद्य झाकून तरी ठेव, नाही तर टाचून घे वेडा कुठचा