बॉल मिल गया!

Submitted by लाल्या on 15 July, 2014 - 02:50

काही मुलं टेनिस क्रिकेट खेळत आहेत. खेळता खेळता चेंडू जमिनीतल्या एका होल (गोल खड्डा) मध्ये जातो. हे होल डायामीटर मध्ये चेंडू पेक्षा १ मिमी जास्त आहे, आणि जवळ जवळ एक फूट खोल आहे. मुलं युक्तीने तो चेंडू बाहेर काढतात आणि पुर्ववत खेळायला लागतात. त्यांना पुन्हा ते होल बुझवावंसं देखिल वाटत नाही.

मुलांनी काय केलं?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यांना पुन्हा ते होल बुझवावंसं देखिल वाटत नाही. >>>

कारण त्यानंतर ते टेनिस ऐवजी गोल्फ खेळू लागतात.

१. त्यांनी एक ट्रेन्ड साप पाळलेला असतो. त्याला शेपटीला धरून तोंडाची बाजू आत सोडली की तो बॉल वर घेऊन येतो.
२. द्रोणाचार्यांसारखे एक गुरू तिथे धनुष्य बाण घेऊन उभे आहेत.
३. चुलीवरच्या फुंकणीला पुढे पुंगी जोडून फुंकले असता होलमधे कॅटरिना चक्रीवादळ निर्माण होऊन बॉल वर येतो.
४. बॉलला भावनिक आवाहन करून
५. बॉल निघत नाही हे पाहून सगळे एका मंदीरात भजन म्हणतात. एकत्रित शक्तीमुळे बॉल तरंगत वर आलेला दिसतो.

इतर उपाय : कोळसा काढायचा चिमटा एक फूटापर्यंत जाऊ शकत असल्याने चिमटीत धरून बॉल काढता येऊ शकतो.

बॉल कुठे मरायला गेला असं म्हणुन मुलं प्लँचेट करतात आणि खालती गेलेल्या बॉलला वरती बोलवतात. Wink

त्या होलच्या बाजुलाच दुसरं मोठ्ठं सहा इंच डायामिटरचं १'४" खोलीचं होल बनवुन ते पहिल्या होलला जोडतात. बॉल घरंगळत मोठ्या होलमध्ये येतो, आता बॉल हात घालुन काढणं शक्य होतं. आस्पास पाणी नाहि हे गृहित धरुन... Happy

लाल्याजी टेक इट इझी, Happy
बॉल खड्यात गेल्या गेल्या मुलांना टीव्हीवर दाखवल्या जाण्यार्‍या बोअरवेल मध्ये पडलेल्या मुलगा अडकलेल्या शोची आठवण होते. लागलीच मुळ खड्याला धक्का न लावता २ फुट अंतर सोडुन मोठ्हा खड्दा काढण्यात येतो. (येथे लेक टॅपिंगचा पण प्रयोग करण्याबद्दल विचार मंथन होते, पण मुळ खडा पाण्याने भरलेला नसलेने ती आयडीया फेटाळुन लावणेत येते) तेथुन मग एक आडवा बोगदा काढण्यात येतो. आणि अश्या प्रकारे बॉल त्या बोगद्यातुन बाहेर येतो.
आणि परत त्याच होल मध्ये बॉल गेलेस याच पधतीने बाहेर येइल, म्हणुन ते होल तसेच ठवण्यात यावे यावर आवाजी बहुमत होते... हुस्स्स्य्य्य्य्य

मुले एका बारिक काडीच्या टोकाला फेविक्विक / फेविकॉल लावतात, काडी बॉलला चिकट ते आणि बॉल वर येतो.

टेनिसच्या बॉलने खेळलेलं क्रिकेट ( एक टप्पा आउट वगैरे)
किंवा
क्रिकेटच्या बॅटने खेळलेलं टेनिस.

वाटणं गेलं उडत.
आजकाल पोरांचा पाकेटमनी भर्पूर असतो. भोक गेलं खड्ड्यात म्हणून नवा बॉल आणतात अन आपला गेम सुरू ठेवतात.

बॉल भारतातल्या खड्डयात पडला असेल तर अमेरिकेतुन बरोबर त्याच्या खाली ड्रिल करत जायचं म्हणजे बॉल अमेरिकेत पडेल Lol

अश्या धडाधड प्रतिक्रिया माझ्या गाण्यांना किंवा कवितांना आल्या असत्या तर>>> सोप्प आहे. नाव असच काहितरी द्यायच आणि कुटप्रश्न विभागात पोस्ट करायच Wink आत मात्र कविता लिहायची.

नाहितर असा एखादा प्रश्न टाकुन त्याखाली कविता / गझल टाकायाची Happy

नशीब ते होल म्हणजे गोल खड्डा लिहिले नाहीतर माझा आजचा अक्खा दिवस दिवाणखान्यातला बॉल कसा बाहेर काढायचा याचे डोके खाजवण्यात गेला असता.

बाकी पाणी ओतून मुले बॉल बाहेर काढतीलसे वाटत नाही. ओल्या टेनिस बॉलने क्रिकेट खेळणे बोर प्रकार आहे. मग आबादुबी सुचते.

अ‍ॅक्च्युअली क्रिकेटपेक्षा आबादुबी मस्त!
>>>>>
हो पण त्याची मजा क्रिकेट खेळून पोट भरल्यावरच Happy

ते सोडा, आणखी एक शंका, ते पाणी खड्ड्यात ज्या स्पीडने ओतू त्याच स्पीडने झिरपू लागले तर .... ?
आधीच इथे दुष्काळ, त्यात या अश्या अघोरी आयडीया ..

अघोरी आयडीया???.....त्यापेक्षा "लगोरी" आयडीया कशी आहे?

Pages