Submitted by सतीश देवपूरकर on 1 January, 2013 - 00:38
गझल
मला ओरबाडून तो काळ गेला!
हिरावून सर्वस्व तो काळ गेला!!
न आले कुणीही मला हात द्याया.....
लुबाडून अस्तित्व तो काळ गेला!
किती फोडला जीवघेणाच टाहो!
झुगारून आकांत तो काळ गेला!!
किती हिंस्र होता पशूंचा गराडा.....
मला त्यात सोडून तो काळ गेला!
किती झुंजले जीवना! मी तुझ्यास्तव....
मला मात देवून तो काळ गेला!
अता पेटल्या मेणबत्त्या, मशाली!
कळ्या मात्र तोडून तो काळ गेला!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मास्तर, जमलं बघा!
मास्तर,
जमलं बघा!
छान !!!
छान !!!
खूप छान !! .रचना मुसल्सल
खूप छान !!
.रचना मुसल्सल आहे.. सत्य घटनेचा सन्दर्भही आहे या बाबी विषेश आवडल्या
अ ह्या अलामतीचा स्वरकाफिया आहे तो अधिकृतपणे चालत नसला तरी माझ्यासाठी ही गझलच आहे
छान ...आवडली
छान ...आवडली
सर्व रसिकांचे आभार!
सर्व रसिकांचे आभार!
मस्त
मस्त
भुप्र कसोशीने पाळलं आहे.
भुप्र कसोशीने पाळलं आहे.
चांगली मांडलीत व्यथा
चांगली मांडलीत व्यथा
चांगली गझल-----आवडली
चांगली गझल-----आवडली
आवडली
आवडली
सर्व रसिकांचे
सर्व रसिकांचे आभार!
स्वरकाफिया वापरण्याचा एक प्रयत्न होता!
प्रोफेसर स्वरकाफिया म्हणजे
प्रोफेसर स्वरकाफिया म्हणजे काय?
हे झेंगाट येथील मान्यवर
हे झेंगाट येथील मान्यवर सांगतील
हे झेंगाट येथील मान्यवर
हे झेंगाट येथील मान्यवर सांगतील<<<<<<:हाहा:
जर हे झेंगाट आहे तर ते गझलेत
जर हे झेंगाट आहे तर ते गझलेत घेतले कशाला आणि ते काय आहे हे जर मान्यवरांनी सांगणे अपेक्षित आहे तर आपण काय करत आहोत हेच कळालेले नाही असे मानावे का?
मान्यवर म्हटल्यावर बेफीजी का
मान्यवर म्हटल्यावर बेफीजी का चिडले बुवा ? की झेंगाट म्हणाल्यामुळे चिडले असावेत ?
मी चिडलेलो नाही. मी गप्प
मी चिडलेलो नाही. मी गप्प पडलेलो आहे.
गप्प पडलेलो आहे.<< बर बर पडा
गप्प पडलेलो आहे.<<
बर बर पडा तुम्ही गप्प मी बसतो गप्प
मी गप्प पडलेलो
मी गप्प पडलेलो आहे.<<<<<<<<<<छान ओळ!
घ्या!! आता ह्यावरूनचीही गझल
घ्या!! आता ह्यावरूनचीही गझल वाचावी लागणार
मग गीत लिही
मग गीत लिही