गझल
समजू शकलो नाही केव्हा तुझे बहाणे!
किती मला जीवना! करावेस तू दिवाणे!!
निदान आली जरा जरा कल्पना सुखाची;
नवीन वेषात दु:ख आले जुनेपुराणे!
निमित्त मी, दाद, ही तुला! ह्या तुलाच टाळ्या!
तुझाच पावा, तुझेच गाणे, तुझे तराणे!!
मनापासुनी डोकेफोड करत मी गेलो!
कधी शहाणे....कधी भेटले....दीडशहाणे!!
अहोरात्र मी एक अनामिक गुणगुण करतो!
जीवन माझे म्हणजे आहे सुरेल गाणे!!
चखणा म्हणुनी हवेच होते त्यांना काही.....
मी दिसल्यावर त्यांस मिळाले चणेफुटाणे!
दातओठ खातात अबोला असतो तेव्हा;
ताडताड बोलती जणू उडतात फुटाणे!
नावारूपा मीही आलो, हे न थोडके.....
तुझ्याप्रमाणे माझे नव्हते थोर घराणे!
जागोजागी दबा धरोनी मचाणं होती!
भाग्यवान मी म्हणून चुकले सर्व निशाणे!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१
माबोमोग्याम्बो फुस्स हुवा
माबोमोग्याम्बो फुस्स हुवा !!!!!!
अदखलपात्र फुसका प्रतिसाद!
अदखलपात्र फुसका प्रतिसाद! हसवता येत नसेल तर, किमान हसू तरी होवू नये माणसाने!
निदान आली जरा जरा कल्पना
निदान आली जरा जरा कल्पना सुखाची;
नवीन वेषात दु:ख आले जुनेपुराणे!
निमित्त मी, दाद, ही तुला! ह्या तुलाच टाळ्या!
तुझाच पावा, तुझेच गाणे, तुझे तराणे!!
हे शेर आणि
अहोरात्र मी एक अनामिक गुणगुण करतो!
हा मिसरा
आवडले
घराणे नी चणेफुटाणे आवडले.
घराणे नी चणेफुटाणे आवडले.
निदान आली जरा जरा कल्पना
निदान आली जरा जरा कल्पना सुखाची;
नवीन वेषात दु:ख आले जुनेपुराणे!
मस्त शेर आहे..
धन्यवाद भूषणरावा, स्वातीजी व
धन्यवाद भूषणरावा, स्वातीजी व वैभव फाटकजी!
चखणा म्हणुनी हवेच होते
चखणा म्हणुनी हवेच होते त्यांना काही.....
मी दिसल्यावर त्यांस मिळाले चणेफुटाणे!
दातओठ खातात अबोला असतो तेव्हा;
ताडताड बोलती जणू उडतात फुटाणे!
ए टोच्या येडा झाला काय रे
ए टोच्या येडा झाला काय रे उगाच कशाला गढा मुडदा वर काडतोस बे !!
टोच्याचा केमिकल लोच्या झालाय
टोच्याचा केमिकल लोच्या झालाय बहुदा. आर्र कोनी तरी ह्याला थांबिवश्याल का नाय? गजरा बशिवला ह्याचा
मुडदा "गढा" असता तर वर काढलाच
मुडदा "गढा" असता तर वर काढलाच नसता.
रोज १० गजलांचा रतीब पडतोय इथे, कसला "गढा" आणि काय.
अहो टोचेश्वरा आधीच profspd
अहो टोचेश्वरा आधीच profspd ह्या आयडीच्या गझला रोज ३ ह्या प्रमाणात येत असताना तुम्ही प्रा. सतीश देवपूरकर ह्या आयडीच्याही गझला वर आणत आहात (आपल्या प्रतिसादाने गझल वरच्या पानावर येत आहेत )
किती अत्याचार सहन करू शकणार आहेत माबोकर नै का??
तेच म्हणतोय मी. प्रोफेसर
तेच म्हणतोय मी. प्रोफेसर पाडतातच आहे दिवसाला १० गजला.
माबोच्या प्रत्येक पानावर तेच तेच नाव आणि भीषण यमक जुळवलेल्या गोष्टी बघुन माझे डोके मधे मधे सरकतेच.
प्रोफेसरांनी, १ कोटी गझला
प्रोफेसरांनी, १ कोटी गझला रचण्याचे आव्हान स्विकारले आहे त्यामुळे सावधान डोके बडवायची पाळी येईल.
वैवकु=मायबलीकर????
वैवकु=मायबलीकर????
नावारूपा मीही आलो, हे न
नावारूपा मीही आलो, हे न थोडके.....
तुझ्याप्रमाणे माझे नव्हते थोर घराणे!
अगदी खरयं! कधी कधी कमळातही चिखल निपजत असतो.
आणि मग त्या चिखलाला कमळापेक्षा महानता प्राप्त झाल्याचा भास होत राहतो.
मुट्या तुझ्या सौंदर्यबोधाची
मुट्या तुझ्या सौंदर्यबोधाची गरळ लागलास का ओकायला
तुझा हे कल्पनादारिद्य झाकून तरी ठेव, नाही तर टाचून घे वेडा कुठचा