मला शहाणे करायला तो नकार आहे!

Submitted by profspd on 6 July, 2014 - 05:41

मला शहाणे करायला तो नकार आहे!
तुझ्या नकारांमुळेच झालो हुशार आहे!!

हरेक गोष्टीस संमती मूक का मिळाली?
प्रतारणेचा नवीन बहुधा प्रकार आहे!

जगायला शिवशिवू कसा लागलो असा मी?
नशा जिण्याची अशी, जसा तो जुगार आहे!

उसंत निवृत्त जाहल्यावर मला मिळाली.......
तुझ्यात गझले, बुडावयाचा विचार आहे!

वरून ते साखरेपरी वर्ख फक्त आहे....
मला तुझ्या आतले समजते विखार आहे!

अशा विचारांमुळेच पायात जोम येतो.....
प्रवास खडतर कधी तरी संपणार आहे!

मिळेल जेवण तुम्हास रुपयात पाच म्हणती....
खरेच धादांत एक खोटा प्रचार आहे!

कसे समर्थन मिळेल कोणाकडून तुजला?
हरेक दावा तुझा दिसाया भिकार आहे!

करून मी दार बंद, बसतो तमात आता.....
उजाडणे जाहले अता जातवार आहे!

तुझ्या जराशाच फुंकरीने हुरूप आला.....
ब-या जरी जाहल्या न जखमा, उतार आहे!

उशीर केलास तूच मृत्यू तुझ्याकडोनी....
कधीच गुंडाळुनी जिणे मी तयार आहे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रोफेसर, तुम्ही माबो च्या मालकांचे जवळचे नातेवाईक आहात का?
का माबो चे मालक च आहात?

अगदी सिरीयसली विचारतो आहे.

गझल तितकी काही वाईट नाही.
वाचण्यात वेळ दवडल्याचा आनंद नसला तरी दु:ख पण नाही. Happy