विषय क्र. २ मन्या

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 24 June, 2014 - 03:26

मन्या , मनोज बाळकॄष्ण जोशी,उंची ४ फुट १० इंच. लहानपणी ब्रेन ट्युमर ने त्रस्त होता ऑपरेशन केल्यावर उंची तेवढी वाढली नाही. म्हणतात ना मुर्ती लहान पण किर्ती महान, त्यातला काहीसा. हा जेव्हा आमच्या नगरात रहायला आला तेव्हाच त्याची ओळख झाली. नविन घर बांधकाम चालु होते, हा घराला पाणि टाकायला अधुन मधुन येत असे. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. आणि बि.कॉम. ला आम्ही सोबतच आलो. मन्या अभ्यासात खुप हुशार. मी त्या मानानी साधारणच. आम्ही दोघान्हीही अभ्यास सोबत करायचे ठरविले. अभ्यास तर करत होतो. पण माझे अकाऊंट,सांख्यिकी हे विषय कच्चे होते. मन्याने ट्युशन लावली होतीच मग तो सरावाचे पश्न मला देत असे, व मला नाही आल्यास समजाऊन सांगत असे. त्याच्या शिकवणीत मी बराच शिकलो. जेव्हा परिक्षेची वेळ आली तेव्हा ठरविले कि २ वाजता बरोबर लघवीला बाहेर यायचे आणि काही शंका असल्यास मी त्याला विचारायची. झाले पेपरचा दिवस उजाडला , मराठी ,इंग्रजी पेपर व्यवस्थित गेले. अकाऊंट हौ सरला. सांख्यिकीला मात्र आम्ही वेगवेगळ्या रुम मधे विभागल्या गेलो. माझा पेपर उत्तम चालला होता. तरी मी २ वाजता बाहेर आलो. मन्या आला नाही. पेपर सुटला तसा मन्या रडायला लागला. म्हणे माझा २० मार्काच प्रश्न गेला. म्हटल मला तो पुर्ण आला. तु २ ला का बाहेर आला नाही मी सांगितले असते. मन्या अजुन रडायला लागला. तेव्हा तोच म्हणे तु लेका गुरुला पुरुन उरला. पुढे मैत्री घट्ट होत गेली.

रिझल्ट लागला मन्याला त्या विषयात माझ्यापेक्षा कमी मार्क्स मिळाले. नंतर आमच्या वाटा बदलल्या तो संगणक प्रशिक्षण घेऊ लागला. मला तेव्हा संगणकाची खुप भीती वाटत होती, कारण फी सुध्दा तेवढीच जास्त होती. आणि हा आपला क्रिकेटच्या गाऊंडवर संगणकाच्या गप्पा मोठ्या दिमाखात सांगत असे. कारण आमच्या पैकी एकानेही तेव्हा संगणक पाहीला नव्हता. लोटस, फोक्सबे, फॉक्सप्रो, वर्डस्टार. हेच त्याचे विषय असत. आम्हाला नवल वाटायचे. पण कोर्स करण्याची हिंमतच होत नव्हती.

मन्या कोर्स पुर्ण करुन कंपनीत १८००/- रु पगारावर लागलाही आणि आम्ही अजुन क्रिकेटच खेळत होतो. पुढे याच अनुभवाचे भरोशावर मन्या अर्बन बँकेत लागला. आणि मी संगणक शिकायचे ठरविले, CCA कोर्स पुर्ण केला. पण नोकरी मिळाली ती सुशिश्कीत बेकार म्हणुन रु. ३००/- वर. ती सोडुन मी औरंगाबाद ला पळालो, तोपर्यंत DTP केले होते. औरंगाबाद ला १८००/- वर मलाही नोकरी मिळाली. मग आम्ही दुरावलो. पुढे १ वर्षात मी औरंगाबद सोडुन अकोला आलो. मग पुन्हा एकत्र आलो.

एक दिवस अकोल्या वरुन अजिंठा येथे सायकलने जायचे ठरले. मन्या येणार नाही याची मला जाणिव होती. मी म्हटले आपण तुझ्या लुनावर जाऊ. तो तयार झाला. अजिंठा जायचे दिवशी ऐणवेळी मी सायकल काढली. मन्या म्हटला मी सायकलवरच येणार. तु यावे म्हणुन मी खोटे बोललो. तो तयार झाला. अकोला- अजिंठा सायकल ट्रिप अजुनही स्मरणात आहे.

मन्याचे लग्न झाले, पण पुत्र सुख नव्हते. कारण ब्रेन ट्यमरने आधीच घात केला होता. मन्याने दत्तक घ्यायचे ठरविले व ते पुर्णता पक्के करुन १ मुल दत्तक घेतले. शिवाय बँकेत अभ्यासाचे जोरावर ऑफिसरही झाला. घरदार, गाडी असा हा मन्या स्वस्थ बसेल तो कसा. पुन्हा क्रिकेटची टीम एकत्र आली ती क्रिकेट खेळण्यासाठी नव्हे तर एका बचत गटाची स्थापणना करण्याचे ठरुन. महिना २०० /- रु. गुंतवायचे ते बँकेत भरायचे त्यातुन ज्याला १०, २० हजार पाहिजे (बचत गटा पैकी) त्यांना अगदी अल्प दरात लोन मिळते. आज त्याचेच प्रयत्नातुन आम्ही पती+पत्नी धरुन ३४ सदस्य झालो. जसाजासा बचत निधी वाढत जाती तसातसा फायदा होईल हे शास्त्र धरुन आता नियमावलीही आकारात आणली. आणि हे सर्व काम तोच एक मन्या पाहतो. या शिवाय शेअर मार्केटचेही उत्तम ज्ञान त्याला आहेच. मन्या, गन्या, अज्या, मी मुक्या, सुध्या, दिप्या राज्या, मोट्या अशी भावासारखी मित्र मंडळी आहे. अशा मित्राचा म्हणुनच हेवा वाटतो.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users