मी नास्तिक आहे असा माझा समज आहे.... पण

Submitted by ब्रह्मांड आठवले on 10 July, 2014 - 10:23

सामान्य माणूस नास्तिक असू शकतो का ?
कारण मी नास्तिक आहे, असा माझा समज आहे. मी नास्तिक असण्याने इतरांना त्रास होतोय असं आजवरच्या वाटचालीवरून वाटलं नाही. पण मी नास्तिक का आहे याची कारणं मला माहीत असलीच पाहीजेत असा आजूबाजूच्यांचा आग्रह का ?
मग मिळेल ते वाचावं लागतं. म्हणजे असं वाटतं की आपण इतरांच्या कटकटीला वैतागून वाचतोय हे सर्व..
पण खरं म्हणजे
माझ्या नास्तिक असण्याशी माझा अंतर्गत झगडा चालू असतो. निरंतर.
मग सगळी तत्त्वज्ञानं थोडी थोडी, झेपेलशी चाळून मेंदू बधीर होतो. वाचनासाठी डोळे खोबणीतून बाहेर येतात आणि झोप न झाल्याने आता आत खेचले जाऊन मेंदूला चिकटतात.
मग मेंदूचं कामकाज सुरळीत चालत नाही. जडत्व येतं
मग वाटतं या मेंदूच्या हार्डवेअरचा निर्माता कोण ?
याला सूक्ष्म डीसी करंट पुरवणारा जनरेटर कुठला ?
मेंदूचं विचाररुपी सॉफ्टवेअर आणि त्याची प्रोग्रामिंग लँज्वेग लिहीणारा तो अभियंता कोण ?

बाळ जन्मताना त्याचे एकेक अवयव तयार होणं
त्यात चैतन्य निर्माण होणं
मग पूर्ण आकार आल्यावर
आईशी नाळेनं बांधलं जाणं
आईने पचवलेलच बाळाला आयतंच मिळणं
आणि बाहेर आल्यानंतर
आईला पान्हा फुटणं
हा कुठला प्रेग्राम असेल ब्वॉ ?
जन्मण्याआधीच लिंग, स्वभाव, रंग रुप निश्चित होणं
आणि हे सर्व
या अफाट ब्रह्मांडातल्या एका सूर्य नामक ता-याच्या
जीवसृष्टी असलेल्या एकांड्या ग्रहावर

या अशा प्रश्नांची उत्तर मिळेनाशी होतात, तेव्हां मग भीती वाटू लागते.
स्वतःच्या नास्तिक असण्याची

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कमालच करता राव तुम्ही पण, मग चर्चेला काय अर्थ आहे ?

दुसरे असे की पुर्वी काही चर्चांमधे "असे नेटच्या भरवशावर काय राहता ? त्यामधे मिळणारी सगळीच माहिती पुर्ण आणि बरोबर कुठे असते" असेही काही संवाद झाल्याचे आठवते.

आणि येथे विचारण्याचे एक महत्वाचे कारण असे की केवळ गुगल नव्हे तर लोकांचा जेन्युईन अभ्यास (अवांतर वाचन, इ.) असतो, अनुभव असतात आणि ती माहिती ते शेअर करू शकतात.

उदा. अशोकजी यांचे लेख/प्रतिसाद पाहिलेत तर त्यामधली माहिती ही कदाचित नेटवर सहजी मिळू शकणार नाही.
काही लोक वेगवेगळ्या कार्यांमधे असतात त्यातले प्रत्यक्ष अनुभव असतात.
अर्थात हे फक्त या एकाच विषयाबद्दल नाही, तर सर्वच चर्चांसाठी आहे.

महेश,
गूगलवर चर्चास्थळे अन चर्चांच्या असंख्य लिंक्स मिळतात.
रिचर्ड डॉकिन्स असे एक नांव ऐकले असेल तर त्या माणसाने काय लिहिले आहे ते दिसेल.
तुम्हाला एक्झॅक्टली काय वाचायचे आहे ते सांगितलेत तर बरे होइल.

महेश,तुम्ही असं विचारण्यापेक्षा...अमूक अमूक ठिकाणी असं म्हटलं आहे अथेईजम बद्दल...चर्च ऑफ सायंटॉलॉजी बद्दल माझे असे विचार आहेत्,असं विचारा की राव.

बर चला,चर्च ऑफ सायंटोलॉजीबद्दल तुमचं मत आहे ते मांडा.माहीत नसलं तर बाहेर वाचून मांडा.

ऐकून अन पाहून झालं, की मग मला सांगा, की ह्या ज्या काही आस्तिक्/नास्तिक चर्चा आहेत, त्या फक्त हिंदू ब्याशिंगसाठी होत आहेत. Happy
चर्चेत सहभाग घेणारे बहुसंख्य हिंदू असतील, तर येणारे दाखले, दर्शने अन संदर्भ हिंदूंचेच येणार. बरोबर??

{पक्का} नास्तिक :कोणालाही काही पटवायला जात नाही .संकटकाळी ज्याकाही उपाययोजना करायच्या त्या करतो आणि वाट पाहतो .

ओके ओके.
>>
मग चर्चेला काय अर्थ आहे ?

दुसरे असे की पुर्वी काही चर्चांमधे "असे नेटच्या भरवशावर काय राहता ? त्यामधे मिळणारी सगळीच माहिती पुर्ण आणि बरोबर कुठे असते" असेही काही संवाद झाल्याचे आठवते.
<<
याची गरज होती. Proud

आस्तिक असूनहि विचार करणारे लोक असतात ते जातीभेद ,उच्चनीचता, अंधश्रद्धाळू पणा, बुवाबाजी, भ्रष्टाचार करणे असे करत नाहीत. त्यांचा आस्तिकपणा फक्त स्वतः देवावर मनापासून विश्वास ठेवणे एव्हढयापुरता मर्यादित असू शकतो. ते सर्व काही देवावर सोडून काहीहि काम न करता स्वस्थ बसतात असे मुळीच नाही.
असे आस्तिक होणे मुळीच सोपे नाही. नदीत आंघोळ नि पूजा वगैरे केले तरी मनात देवा ऐवजी इतरच विचार चालू असतील तर ते कसले आस्तिक?
खरे तर इथले सगळे विवेचन कुठले तरी भोंदू आस्तिक, नास्तिक बघून केले जात आहे. हे असले लेबल लावण्याची गरज आहे का? इतर अनेक गुणदोषांनुसार माणसाची परीक्षा केली जाऊ शकते.

शिवाय आस्तिक चांगले नि नास्तिक नाही किंवा नास्तिक चांगले नि आस्तिक वाईट असेहि काही नाही!
पण बोलून चालून ही मायबोली - काहीतरी लिहायचे नि बाकीच्यांनी उलट सुलट, एकमेकांवर वैयक्तिक टीका असले करत बसतात.

@ झक्की

इथे मायबोलीचा अजिबातच संदर्भ नाही. माझ्यापुरते सांगायचे तर विषय मांडताना नास्तिक म्हणून मला पुन्हा पुन्हा स्वतःला तपासावंसं वाटतं. याबाबत इतरांच्या विचारांचे संस्कार क्षणभर बाजूला काढून स्वतःला काय वाटतं हे पहायला काहीच कमीपणा वाटत नाही.

आस्तिक लोकांनी व्याख्येच्या बाहेर येऊन आपण स्वतः आस्तिक का आहोत याचा विचार केला आहे का एव्हढेच हवे होते. वर अतरंगी यांनी त्या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे.

देव आहे किंवा नाही या चर्चेत काहीच अर्थ नाही. त्याची उत्तरं आपल्याला माहीतच आहेत.

ब्रआ
झक्कींच्या प्रतिसादांत बराच गूढार्थ असतो. त्याकडे काणा डोळा केल्यास धागे बंद पडायचे वाचतात व फ्यूचर जनरेशन्स उद्बोधक चर्चेस मुकतात.
ते तसेच राहू द्यावेत. जास्त प्रतिवाद करू नये, असे मी अनुभवातूण शिकलोय. Wink

*

महेश,
झालं का तुमचं? नास्तिक झाल्याझाल्या srd यांचा सल्ला ऐकून गायब झालात की कय?

मला बहुतेक वेळा वाटतं की मी नास्तिक आहे. पण "कोणाच्या का कोंबड्याने होईना, सूर्य उगवूदे" असा विचार मी केलाय. "हे मी काय करतेय, मला पटतय का?" असं वाटून पण काही गोष्टी केल्यात. खरच कठीण असतं नास्तिक होणं कधी कधी.

दुसरे जात धर्माचे चर्चेला येणार नाहीत ही समजूत आहे .ते नास्तिकपणावर बोलले तर त्यांचेच लोक खपवून घेत नाहीत .त्यामुळे तो मुद्दा बाजूला ठेवू .
नास्तिकांना कोणी सत्यनारायणाला ,गणपतीला बोलावल्यावर गेले म्हणजे लगेच ते काही आस्तिक होत नसतात .ते फक्त यजमानांचा आदर करतात .

ते फक्त यजमानांचा आदर करतात .>>>> तेवढे केले तरी पुरे होईल. काही उदाहरणे पाहिली आहेत , प्रसाद डस्ट्बीनमधे टाकून दिल्याची.एकतर प्रसाद घेऊच नका किंवा पेढा / शिरा आहे म्हणून नुसता खा.

तेवढे केले तरी पुरे होईल. काही उदाहरणे पाहिली आहेत , प्रसाद डस्ट्बीनमधे टाकून दिल्याची.>>> आईग्गं Sad
एकतर प्रसाद घेऊच नका किंवा पेढा / शिरा आहे म्हणून नुसता खा.>>> करेक्ट!

आणि आजारी असताना आईने कुठला अंगारा कपाळाला लावला तर तो निमूटपणे लावून घेतात .उगाच आईशी वाद घालत बसत नाहीत .परंतू स्वत: कधी कोणत्या स्वामी ,दैवताची विभूती आणणार नाहीत .

निव्वळ आस्तिक आणि निव्वळ नास्तिक लोक तसे कमी असतात. आस्तीकांच्या अमुक एका देवाधर्माविषयीच्या र्श्रद्धा प्रखर असल्यास असे लोक संकुचित विचारांचे असतात त्यांच्या समविचारी आणि समधर्माच्या लोकांसाठी ते उपयोगी असतात पण इतरांसाठी असतीलच असे नाही.सर्वधर्मसमभाव आणि एकेश्वरवादी लोकच खरे आस्तिक असावेत असे आपल्याला वाटते. जे नास्तिक 'आपण देव न मानून कुठे चुकत तर नाहीना?' असा विचार करतात, ते खरे नास्तिक होऊ शकत नाहीत.

कट्टर नास्तिक हा केव्हाही कट्टर आस्तीकापेक्षा श्रेष्ठ असतो.माणुसकी वगैरे प्रकार त्याच्या ठिकाणी आस्तीकापेक्षा काकणभर जास्त दिसून येतात असे आपले मत आहे. कदाचित प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकते. Happy

आस्तिकांची एक चांगली गोष्ट म्हणजे आपल्यापेक्षा कोणी मोठा आहे हे मानून मोकळे होतात .>>>>>> हे बरोबर नाही.
जो दिसत नाही त्याला मोठे म्हणुन मोकळे होतात. जे दिसत नाही त्याला मोठे म्हणण्यात काहीच कौतुकास्पद नाही आणि इगो पण हर्ट होत नाही.

ती डॉकिन्सची माहिती माझ्यासाठी नविन आहे. पहायला सुरूवात केली होती, पण अजुन एक सलग पाहणे झाले नाही.
पुर्ण पाहिल्यावर काही मुद्दे असतील तर इकडे घेऊन येईन.

आस्तिक नास्तिक चर्चेसंदर्भात खुप मोठे उदाहरण म्हणजे विवेकानंद आणि रामकृष्ण,
विवेकानंद तसे नास्तिक या कॅटेगरीतलेच होते आधी सतत प्रश्न करणे आणि तर्काने जाणून घेणे असे असायचे.
पण रामकृष्णांच्या भेटीनंतर त्यांच्या विचार पद्धतीत बराच बदल झाला.
ते म्हणाले होते की मी मुर्तिपुजेच्या विरोधात होतो आणि माझा गुरू तर कट्टर मुर्तिवेडा. Happy

एकदा त्यांच्या आईने काही एक नवस केला होता, तर स्वतःचा विश्वास नसताना सुद्धा आईला बरे वाटावे म्हणुन हा माणुस लोटांगण घालत कालीच्या दर्शनाला गेला होता (किंवा प्रदक्षिणा घातल्या होत्या)

तसा तर प्रत्येक नास्तिकामधे आस्तिक लपलेला असतोच. न+आस्तिक Happy

काल आस्तिक चा अर्थ शब्दार्थवर कळाला.आता एक छोटा प्रश्न...आस्तिक म्हणजे अस्थित्वावर विश्वास ठेवणारा,पुढे वेदांना प्रमाण मानणारा आस्तिक. आता,एखादा व्यक्ती वेदाला प्रमाण मानतो पण पुराणांना नाही,त्यातल्या देवांनाही नाहीच तर तो आस्तिक की नास्तिक? जर मी वेदालाही आणि तत्सम कशालाही प्रमाण मानत नाही परंतु जे अस्थित्वात असणारे सत्य आहे,त्यास प्रमाण मानतो तर मी आस्तिक की नास्तिक?

आस्तिक आणि नास्तिक या संज्ञा गोंधळात टाकणार्‍या वाटतात तशाच त्या सापेक्षी देखील आहेत.त्यामुळे निरीश्वरवादी आणि इश्वरवादी हा योग्य शब्द होतो.पण समजा एखादी व्यक्ती निसर्गाला परमेशवर मानत असेल तर ती निरीश्वरवादी की मूर्तीपूजा न मानणारी,असाही प्रश्न उपस्थित होतो.

आस्तिक्,नास्तिक्,मूर्तिपूजक,मूर्ती न पूजणारा,निरीश्वरवादी,ईशवरवादी,ज्ञात शक्तीला प्रमाण मानणारा आणि यातले काहीच न मानणारा... नेमकं कोण?

Interesting..
@B.A.
My android phone is not allowing dvngri fonts....sorry

एकदा अंनिसतल्या एका कट्टर नास्तिक मित्राला मी एक हायपोथिटिकल प्रश्न विचारला . समजा तू एका जंगलात गेला व तेथील आदिवासींनी तुला पकडले. एका शेंदूर फासलेल्या दगडा पाशी नेले आन सांगितले कि हा आमचा देव आहे व तू त्याच्या पाया पड तरच तुला सोडतो. नाही तर तुला खलास करीन. तर तू काय करशील? तो म्हणाला मी मेलो तरी चालेल पण पाया पडणार नाही. मी त्याला म्हणले तू पाया पडला म्हणजे लगेच आस्तिक झालास काय? जगला तरच तु तुझे कार्य व विचार यांचा प्रसार करु शकणार आहे. शिर सलामत तो पगडी पचास!
असो. जुन्या एडक्या दिवसातील किस्सा आहे Happy

>>जगला तरच तु तुझे कार्य व विचार यांचा प्रसार करु शकणार आहे. शिर सलामत तो पगडी पचास!

सत्यवचन श्रीमान !
असाच विचार इतिहासात काही लोकांनी केला होता, काही लोकांनी नाही केला.

Pages