मनाप्रमाणे कधी तरी मी जगू नये का?

Submitted by मृण_मयी on 10 July, 2014 - 08:42

मनाप्रमाणे कधी तरी मी जगू नये का?
स्पृहा मलाही फुलावयाची असू नये का?

जगात नाही, घरात नाही, मिठीत नाही
कुठेच वेड्या मनास थारा असू नये का?

फुटून जाईल ऊर कोंडून ठेवल्याने
किमान डोळ्यांतुनी जखम भळभळू नये का?

फिकट तरी जागतेपणी लावतेच कुंकू
निदान स्वप्नी सशक्त मळवट भरू नये का?

असेल वर्षा ऋतू घरातील कोरडा जर
तहानलेल्या वसुंधरेने भिजू नये का?

उगाच निर्माल्य फत्तरावर कशास व्हावे?
सजीव आलिंगनी फुलाने फळू नये का?

किती करावे उपास-तापास मृण्मयीने?
अपूर्णतेला नियोग देखिल घडू नये का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जगात नाही, घरात नाही, मिठीत नाही
कुठेच वेड्या मनास थारा असू नये का?

फुटून जाईल ऊर कोंडून ठेवल्याने
किमान डोळ्यांतुनी जखम भळभळू नये का?

फिकट तरी जागतेपणी लावतेच कुंकू
निदान स्वप्नी सशक्त मळवट भरू नये का?

असेल वर्षा ऋतू घरातील कोरडा जर
तहानलेल्या वसुंधरेने भिजू नये का?

उगाच निर्माल्य फत्तरावर कशास व्हावे?
सजीव आलिंगनी फुलाने फळू नये का? <<< सुंदर

जगात नाही, घरात नाही, मिठीत नाही
कुठेच वेड्या मनास थारा असू नये का?

व्वा

अवांतरः ही देखील प्रोफेसरांचीच गझल समजून पुढे जाऊन पुन्हा मागे आलो.

वा वा वा कुर्बान !

बरेच शेर भिडले !!

पावसासारख्या खूप दिवसांनी आलात पण चिंब झाल मन !!

पोस्टत रहा प्लिजच

- सुप्रिया.

जगात नाही, घरात नाही, मिठीत नाही
कुठेच वेड्या मनास थारा असू नये का?

यावरून माझाही एक शेर आठवला

श्वासात ना कुणाच्या ना स्पंदनात आहे
मी एकटीच येथे माझ्या जगात आहे

-सुप्रिया.

अनेक शेर आवडले

गझल पुन्हापुन्हा वाचावी वाचत रहावी असे वाटतेय

धन्यवाद ह्या अनुभवासाठी

रदीफ वर जान कुर्बान

किती करावे उपास-तापास मृण्मयीने?
अपूर्णतेला नियोग देखिल घडू नये का?

व्वा. मत्लाही आवडला.

काहीतरी चांगले वाचायला मिळणार ही अपेक्षा पुर्ण झाली.

"शब्दांत जितके गुंतावयाचे, गुंतून झाले" पासुन तुम्ही लिहिलेले सगळे वाचतोच..
शुभेच्छा..