दही दलिया

Submitted by लक्ष्मी गोडबोले on 5 July, 2014 - 14:26
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तूप १ चमचा

दलिया १ वाटी

मीठ , पाणी.

फोडणीसाठी : १ चमचा तेल, मोहरी, जिरे, १ मिरची , ४ पाकळ्या लसुण , ४ पाने कढीपत्ता.

इतर साहित्य : एक वाटी दही , बारीक चिरलेला कांदा, शिजवलेले मिश्र मोड

क्रमवार पाककृती: 

एक वाटी दलिया पाण्यात धुवुन निथळुन घ्यावा.

एक चमचा तूप घेऊन त्यात तो दलिया परतावा. त्याचा रंग बदलून सुगन्ध येईल इतपत परतावा.

मग त्यात लागेल तितके पाणी आणि मीठ घालून मऊसर शिजवुन घ्यावा.

मग फोडणीचे साहित्य वापरुन फोडणी करावी.

शिजलेला दलिया, दही , कांदा आणि फोडणी मिसळुन घ्यावे.

दही दलिया तयार.

सोबत शिजवलेले मिश्र मोड घेतले होते. मोड , एक चमचा तेल, मीठ आणि हळद इतकेच घालून थोड्याश्याच पाण्यात शिजवले होते.

daliya3.jpg

वाढणी/प्रमाण: 
१ - २
अधिक टिपा: 

दलिया दही मोड हे अगदी पूर्णान्न आहे. मधुमेही रुग्णाना अगदी योग्य आहे. हाय प्रोटीन हाय फायबर आहे. सध्या रात्री पोटभर दलियाच घेतो. दलिया खिचडी आणि दलिया खीर घेतो. हा प्रकार आजच केला. तीन वर्शाच्या माझ्या मुलीलाही हे सगळे प्रकार आवडले आहेत.

माहितीचा स्रोत: 
प्रयोग
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नरेश वर चित्रात दिले आहे.

शिजवलेला दलिया, कच्चा कांदा, दही व फोडणी सगळे मिसळून घ्यायचे.

थोडा कांदा फोडणी करताना त्यात परतला तरी चालेल असे वाटते. पण मला तरी कच्चा कांदा आवडतो.

मस्तं पाककृती आहे! आवडली.

आजीची एक राजस्थानी हिवाळा स्पेशल दलिया पाकृ:
दलिया आणि मूठभर मूगडाळ, दोन्ही एकत्र शिजवून घ्यायचं. सुक्या खोबर्‍याचा तुकडा भाजून घ्यायचा. लसूण पाकळ्या, मिरं, भाजलेलं खोबरं आणि मीठ एकत्र वाटून तूप जिर्‍याच्या फोडणीत घालून परतायचं. वरून दलिया घालून मिसळायचं. हवंतर आणखी साजुक तूप घालायचं. वाटणात भाजलेला कांदा घेता येतो. लापशी कन्सिस्टन्सीचं करून, गरम असताना खायला मजा येते.

छान रेसिपी.
मृण्मयी फोडणी मस्तय Happy
बारीक किसलेला भोपळा घालुन दलिया पातळ शिजवुन घ्यायचा आणि मृण्मयीने सांगितली आहे तशी किंवा नुसती लसणाची फोडणी घालुन मस्त लागतं.

न्यु जर्सीत ओक ट्री रोडवर दिव्या आयुर्वेद नावाच्या दुकानात मिळतात. ते पोस्टाने पण पाठवतात वाटते.

दलिया मेरा नाम दलिया मेरा नाम
हिंदु मुस्लिम सिख्ख इसाइ सबको मेरा सलाम. >>>>

दलिया वाढून घेताना हे गाणं म्हणा ----

"जरा सामने तो आओ दलिये"

पतंजलीचं दुकान मला वाटेवरच आहे. आज विचारते आहे का.

पतन्जलीची मिक्स दलिया मधे खडे होते. २ दिवस आधि केल होत. तर जरा साफ करुन घ्याल.
पतन्जलीची मिक्स दलिया मधे - तान्दुल, दलिया, सालिचे मुग इत्यादि सगळे थोडेसे भरडलेले (half cut). Take Quantity of each as you like.
बाजरी आख्खि थोडिसि, ओवा, तिळ थोडेसे.

This way we can make it at home easily.

मृण्मयी छान प्रकार सांगीतलास...
सायो. अमेरिकेत राहाता होय! मग ग्रोसर शिवाय पर्याय नाही,..

लगो, तुम्ही दलियाचा उपमा करता तेव्हा दलिया धुवून कुकरला वाफवून घेता का? नसल्यास काय रेसिपी आहे?
इथे मला दलियाची व्हरायटी दिसली नाही. एकच टाईप दिसला.

दलिया उपमा करताना बाकी सगळे उपम्यासारखेच करून मग रवा शिजण्यासाठी नुसती वाफ काढतो त्याऐवजी कुकरला शिट्टी काढते मी.

माझी आई म्हणते नुसता कुकरला लावण्यापे़क्षा फोडणीच्यावेळेस परतून मग कुकर (किंवा झाकण लावून) शिजवावा. कुकरला शिजवलेला दलिया ती गूळ घालून केलेल्या खिरीसाठी वापरते.

सायो किन्वाच्या खिचडीत इतक्या डाळी घालून जास्त प्रोटिन्स होतात (अनलेस तू ते साइड आयटम म्हणून वापरत असशील) मी त्याऐवजी कलर पेपर्स्,ब्रोकोली अशा भाज्याबिज्या घालते.

इथले प्रतिसाद वाचून दलिया कुकरमधे तांदळासारखा २ शिट्ट्या मारून शिजवला. मग फोडणी वगैरे सोपस्कार केले. बेस्ट पा़ककृती.
धन्यवाद. कुकरमधे शिजवायची आयडीया खूप आवडली.
सायो सगळ्या इंग्रोत वेगवेगळ्या आकारात cracked wheat नावाने (रव्यापेक्षा थोडा जाड ते अगदी मोठा) दलिया मिळतो.

दही दलिया ज्या ताटात कालवला तो त्याचा फोटो आहे. मी एकटाच खाणारा असल्याने त्याच ताटात मी खातो.

Pages