जीभ नाही, एक ही म्यानातली तलवार आहे!

Submitted by profspd on 8 July, 2014 - 14:28

जीभ नाही, एक ही म्यानातली तलवार आहे!
सभ्यतेने वाग, माझ्या सभ्यतेला धार आहे!!

कोण जाणे, कोण नेतो चोरुनी सारीच किरणे?
सूर्य आकाशात आहे, अन् इथे अंधार आहे!

काय डोळे झाकुनी त्यांनी मते होती दिली ती?
शहर आहे डोळसांचे, आंधळा दरबार आहे!

काय ही संसद असे की, एक कुस्तीचा अखाडा?
आरडाओरड किती ही, काय हाहाकार आहे!

हिकमतीने अन् शिताफीने पहा निवडून आले.....
ठेवला त्यांनीच त्यांचा चौकडे सत्कार आहे!

काय माझ्या कनवटीला? कोणते स्थावर नि जंगम?
मी सडा आहे अरे, माझे कुठे घरदार आहे?

वेड घेवोनीच जाती पेडगावी नेहमी ते.....
हा हवेमधलाच त्यांचा एक गोळीबार आहे!

घोषणा पोकळ, नि हाकाट्या नि डांगोराच नुसता.....
फक्त स्वप्नांचाच त्यांनी मांडला बाजार आहे!

आज बाजारात चालू लागली नकलीच नाणी.....
ऐट नाण्याची अशी की, ते जणू कलदार आहे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

घेउनी आपापल्या त्या टोपल्या बसलेत शायर.....
चक्क कोळ्यांचाच भरला मासळीबाजार आहे!

.............प्राचार्य सतीश देवपूरकर

कंड सुटल्यागत विधाने काय रे करतोस हल्ली
हा तुझ्या बुद्धीस कुठला खाजरा आजार आहे

तुमची ही रचना वाचून सुचला त्याला मी काय करू Sad

ओ प्राध्यापक साहेब, आवरा आता स्वतःला. गझला ठीकेत पण आता विनाकारण वाह्यात आणि क्रॅन्की प्रतिसाद का देत सुटलाहात??

हे भांडण आवरणे कठिण आहे. त्यांच्या एकमेकांच्या प्रतिसादावरून ते लक्षात येत आहेच. त्यामुळे सध्या आपण सर्व फक्त प्रेक्षक.

आता ही पण तलवार मॅन होणार बहुतेक. ( मॅन होणार म्हणजे इथेही रणतुम्बळ युद्ध झाले तर हा बाफ पण उडणार)

आता ही पण तलवार मॅन होणार बहुतेक. ( मॅन होणार म्हणजे इथेही रणतुम्बळ युद्ध झाले तर हा बाफ पण उडणार)>>
'गजरा' शहिद झाला का? दिसत नहिये तो धागा कुठे?

'गजरा' शहिद झाला का?>>>>>> हो असच वाटतेय. मी पाहिलेला २००+ प्रतिसादांचा गझलेचा पहिला धागा. बाकी कश्यामुळे हे बहुतेकांना माहितच आहे.

कोण आहे रे तिकडे ? Happy

धुंद रविंना पाचारण करण्यात यावे, म्हणींच कॉपीराईट तपासण्यासाठी .

आज्ञेवरून !!

जीभ नाही, एक ही म्यानातली तलवार आहे!

>>>

हा शेर जर गर्लफ्रेन्डला ऐकवला तर परत कधी किस (आणि इतर बरेच काही ) करु द्यायची नाही Rofl

Pages