जोधा अकबर

Submitted by पलक on 11 June, 2014 - 00:44

Jodha Akabar.jpg

गेले किती दिवस आपण सगळे या मालिकेबद्दल बोलतोय.....मग इतरत्र प्रतिक्रिया मांडण्याऐवजी इथे मांडा....

जोधा अकबर विषयी चर्चा/ गप्पा मारण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

महा चुचक त्या तरुण खानाशीच निकाह करणार आहे हे कालच्या भागावरुन स्पष्ट झालं.
परवा त्या खास बेगमांच्या तोहफांच्या स्पर्धेत एक मज्जा झाली. शहेनशहा त्याच्या खास दरबारात बसुन ते तोहफे कुबुल करणार होता. आणि एकेक बेगमने येउन त्याला तोहफा द्यायचा असं फर्मान होतं.
आधी रुकैय्या येते. पडद्याआडुन बाहेर येतांना तोंडाला रुमाल बांधते. सलिमा पण तसचं.शेवटी जोधा ओढणीचा हनुवटीपर्यंत घुंघट घेते. मला प्रश्न पडला...अशा मागे कितीतरी भागांमधे या बेगमा शहेनशहाजवळ चेहर्‍याचा दिदार करत बसलेल्या दाखवत होते. तेव्हाही दरबारी असायचेच. मग याच भागात अशी काय जरुर पडली पर्दानशीं व्हायची! Proud

काल जोधा आणी जलाल यांना शेहनाजच खर रुप कळाल, ती तर जोधाला पण भारी पडली, हात पाय बांधुन टाकले जोधाचे, मग सांगीतल ती कोण आहे आणी काय उद्देश आहे ईथे येण्याचा, तेव्हा तीथे जलाल आल जोधा ला या असे बांधलेल पाहुण जलाल विचारतो हा काय प्रकार आहे तेव्हा जोधाच सांगते शेहनाज कोण आहे, हे प्रकरण पण लवकर संपेल बहुतेक.

आज ती रहीम ला घेउन पळताना दाखवली आहे

जोधा हे कॅरेक्टर महा माठ वाटत आहे. काय त्या शहनाझ वर आंधळा विश्वास ठेवते, तो तोडरमल जीव तोडून सांगत असला तरी ती शक्यताही विचारात न घेता , शह्नशाह च्या मागे स्त्री का सम्मान या कारणावरून लहान मुलासारखा हट्ट धरते तोडरमल ला शिक्षा द्याच म्हणून. रागच येत होता तिचा. ही कसली हुषार बेगम. अन तो जलाल तर तिच्याहून भारी अन हलक्या कानाचा. हल्ली बघावेसे वाटत नाही जोधा अकबर.

ह्म्म आता गंडलीये थोडी. रुकैया आणि महामंगा मस्त आहेत अजुनही. त्या चुचक ताई आणि जोधाबाई काहीही न करता महानतेचा आव आणताहेत

शह्नशाह च्या मागे स्त्री का सम्मान या कारणावरून लहान मुलासारखा हट्ट धरते तोडरमल ला शिक्षा द्याच म्हणून. रागच येत होता तिचा. ही कसली हुषार बेगम. अन तो जलाल तर तिच्याहून भारी अन हलक्या कानाचा. हल्ली बघावेसे वाटत नाही जोधा अकबर.
>>>>>>>>>> +११११११११११११११११११११११११११११

जोधा हे कॅरेक्टर महा माठ वाटत आहे>>> जोधा तर माठ आहेच पण सगळ्याच मालीकेतल्या हिरवीणी माठ असतात. डोक नावाचा भाग नसतो Angry

मुळात अकबर सारख्या अत्यंत **** अशा माणसावर बनलेली सिरियल आपण का बघतो? भारताचा इतिहास विसरलो की काय आपण?

आज जोधा ची गोड बातमी कळणार, एकीकडे युद्ध आणि दुसरीकडे गोड बातमी जलाल ची मजा आहे, जलाल साठी आबुल माली एका झापडी चा पण नाही कशाला दरवेळी सोडतो त्याला हा.

वाटलच होतं, जोधाच्या 'गोड बातमी'चं कौतुक होणार नाही...किंवा वेळ तरी लावणार हे प्रोड्युसर.
त्यागाची पुतळी जोधाबाईंना जन्तेचा लईच कळवळा आल्याने त्या ही गोड बातमी लढाई होईस्तोवर कुण्णा कुण्णाला सांगणार नाहीयेत. आणि तरीही लढाईवर जलालसोबत जाणारैत.
कुठल्याही बर्‍या/ वाईट कृत्यांचा बरोब्बर वास येणार्‍या महामअंगेला जोधाच्या 'कोरड्या उलट्या' ई. समजणार नाहीतच. आणि समजल्या तरी त्या अशी 'चांगली' बातमी जलालपर्यंत जाउ देणार नाही. आता ही लढाई ४-६ महिने चाल्ले तर डायरेक्ट 'सलीम'ला जलालच्या मांडीवरच बसवणार की काय जोधाबाई? आणि त्यात जलाल ला काही झालं तर??/ Uhoh

काल चा भाग छान होता, जलाल ला पकड्ल्या मुळे त्याच्या हरम वर हल्ला केला आबुल माली ने, त्याचा परीणाम म्हणुन सगळ्या बेगम एक झाल्या आणी आबुल माली बरोबर आपआपल्या हत्याराने लढताना दाखवल्या, सलीमा बेगम तर झाशीची राणी रोल मधे आलि रहीमला पाठीवर घेउन बंदुक चालवत होती. छानच वाटत होते कालचे सीन. काहीतरी वेगळ पाहायला मीळाल.

अगदी अगदी.
कालचा भाग खुप छान वाटला. एरवी नाजुक-साजुक दिसणार्या बेगमा, लढवय्येगिरी करताना पाहुन समाधान वाटले.
जोधाला 'जोश दाखवायचा असेल' तर फक्त जोरजोरात श्वास घेणे इतकच सान्गितलय वाटत डायरेक्टरने. Lol

त्याकाळी बंदूक होती का? कारण माझ्यामाहीती प्रमाणे इंग्रज आले त्यानंतर बंदू़का आल्या..आणि ह्या अकबराचा काळ तर खूप आधिचा होता.
आणि जर ती सलीमा खरेच तेंव्हा तशी रहिमला पाठीवर घेवुन लढ्ली असेल तर ती झाशीच्या राणीसारखी लढली म्हणण्यापेक्षा झाशीचीराणी तिच्यासारखी लढली असे म्हणावे लागेल.. Happy

जे काही हत्यार होत ते बंदूक सारख दिसत होत.

सलीमा खरेच तेंव्हा तशी रहिमला पाठीवर घेवुन लढ्ली असेल तर ती झाशीच्या राणीसारखी लढली म्हणण्यापेक्षा झाशीचीराणी तिच्यासारखी लढली असे म्हणावे लागेल.. >>> हो तीने रहिमला पाठीवर बांधल होत Happy

moghul_begum_jung_jodha_akbar.jpg

अबुल मालीसारखा लम्पट क्रुरकर्मा, या बेगमा लढाईसाठी 'तयार' होईपर्यन्त त्यान्ची वाट बघत बसला होता.....मिरची मसाला वाटेपर्यन्त आणि विष करेपर्यन्त! Lol

Pages