भगरीचे पाव

Submitted by स्वप्नाली on 9 July, 2014 - 12:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

भगरीचे पाव

साहित्य: 2 वाट्या भगर, 1/4 वाटी दही, 4/5 हीराव्या मिरच्या, 1 चमचा जीरे, 1/2 वाटी शेंगदाणे कूट, मीठ, साखर चवीनुसार, 1/4 चमचा खाण्याचा सोडा, पाणी, तेल.

क्रमवार पाककृती: 

कृती:
1. भगर धुवून, 4-5 वाट्या पाण्यामाधे 4 तास भीजत घालावी.
2. नंतर मिक्सर मधे दोश्यासारखी चांगली वाटावी.
3. जीरे, मिरची वाटून पीठामधे मिक्स करावी.
4. चवीपुरती साखर मिक्स करावी.
5. दही घालून पीठ मिक्स करावे आणि झकून 2 तास ठेवून द्यावे.
6. पाव करायच्या आद्धे 1/2 चमचा खाण्याचा सोडा पीठामद्धे मिक्स करावा.
7. नॉन-स्टिक तव्यावर तापला की तेल टाकून पळीने पीठ टाकावे.
8. दोन्ही बाजूने पाव चांगला भाजला की काढून घ्यावा. हा पाव चांगला फुगतो आणि जळी पडते. (अगदी आपल्या पाव-भाजी च्या पावसारखा नाही :))

सोबत उपवासाची बटाटा भाजी, शेंगडाण्याची आमटी (उपासाची) , एखादी चटणी सर्व करावी.

एकदम मस्त बेत होतो आणि पुन्हा पुन्हा उपास करावा वाटतो Happy

वाढणी/प्रमाण: 
साधारण 7/8 पाव होतात 2 वाट्या भगरी चे.
अधिक टिपा: 

दही घातळयानंतर 2-3 तास पीठ भीजले की पाव चांगले होतात.
नॉन-उपास डे ला कोथिंबीर, आले-लसूण पेस्ट घालू शकता.

माहितीचा स्रोत: 
आई. आषाढी एकादशी, महा शिवरात्र अश्या ग्लोबल उपासंचे पुण्य हे भागरीचे पाव केल्याशिवाय / खल्य्याशीवय मिळत नाही :)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी चुकुन मगरीचे पाव वाचलं.

पाव का म्हटलय? डोसा का नाही?(उगाच विचारात पडलेय)

छान आहे प्रकार. फोटो?

>>>> थोडंसं कुलचासारखं वाटतंय का? (कुलचा कसा करतात हे माहित नाहीये) >>>> Lol किती confidence तो, वरदे.

आमच्याकडे दोन्ही नावे आहेत, पण भगरच जास्त म्हणले जाते.

स्वप्नाली झकास कृती. फोटो पण मस्त.

भगरीचा शिरा पण मस्त लागतो. फक्त मिक्सर मधुन कोरडा दळुन घ्यावा.

मस्त..
मि करते ... त्याच्यात अजुन मुग पन टाकते...[ रात्री दोन्हि भीजत घालते ] मस्त होतो डोसा...

छान आहे पाककृती. मला नाव वाचुन वाटले एकदम पावासारखे असतील पण हा प्रकार साधारण डोश्यासारखा दिसतोय. डीविनिता यांच्या प्रमाणे मला ही प्रश्न पडलाय खाण्याचा सोडा उपवासाला चालेल का?

मामे Proud माझा माझ्या 'असुगरण'पणाबद्दल ठाम आणि व्यवस्थित आत्मविश्वास आहेच.

पण बघ की तो पाव कुलचासारखाच दिसतोय.कुलचापण आतून मस्त जाळीदार असतो म्हणून मला आठवला.

मामे Proud माझा माझ्या 'असुगरण'पणाबद्दल ठाम आणि व्यवस्थित आत्मविश्वास आहेच.

पण बघ की तो पाव कुलचासारखाच दिसतोय.कुलचापण आतून मस्त जाळीदार असतो म्हणून मला आठवला.

भगर म्हणले की राजगिर्‍याचे लाडु करताना ते फसले की जे काही होते तेच आठवते. Happy नुसत्याच लाह्या रहातात लाडु वळलाच जात नाही. (लहानपणी ते तसे फसावे असे कायम वाटायचे. कारण वळलेला लाडु विकला जात असे, भगर घरातच खावी लागायची) Happy

असो. थोडक्यात वर्‍याच्या तांदुळाचे डोसे/घावन दिसतंय हे. भारी लागेल की. त्यात नॉन उपासाला आले लसुन पेस्ट घालुन आणखी चांगले लागेल.