क्रोशा वर्कशॉप कम गटगचा वृतांत

Submitted by विनार्च on 4 July, 2014 - 08:07

ग्रुपवर गप्पा मारता मारता सामी अवलला म्हणाली," तु ये ना ग मुंबईला, आम्हाला विणकाम शिकवायला".तिच्या सुरात आम्ही पण जोरदार सुर मिसळला आणि बिलकूल आढेवेढे न घेता अवलही तयार झाली.तिने लगेच क्रोशा वर्कशॉपला येणार्‍यांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनवला आणि लागली लगेच कामाला...२९ जून तारीख ठरली.

त्यादिवशी किती वेळात काय काय शिकायचे याच वेळापत्रक तसच लागणार्‍या साहित्याची यादी तिने आम्हाला देऊन टाकली...पण आम्ही (आम्ही = प्रदिपा,साक्षीमी,वेल्,सामी,विनार्च ) इतक्या नाठाळ की तिला त्याबद्दल एक प्रश्न विचारला असेल तर शप्पथ ;-).......खादाडीच्या तेवढ्या चर्चा रंगायला लागल्या. कोण कोण काय काय आणणार ? (खायला बरं का....उगाच फालतू गैरसमज नको Proud ).. याची लिस्ट एवढी वाढली की खाण्यासाठी वेळ अपूरा वाटू लागला. ह्या बाया बहूदा आपल्या क्लासमध्ये झोपा काढणार अशी पक्की खात्री झाल्यावर , अवलने सगळ्यांची लगाम खेचली आणि पदार्थ कमी करायला लावले. प्रदिपाच्या हातची भरली वांगी आणि भेंड्याच्या भाजीला मिळालेला रेड सिग्नल आमच्यापेक्षा तिलाच जास्त दु:ख देऊन गेला... कशी बशी ती रव्याच्या लाडवांच्या बोलीवर त्या दु:खातुन बाहेर पडली Wink

तशी आम्ही अवलची पण तयारी करून घेतली हो...मुंबईत ती नक्की कोणत्या संकटांना सामोरी जाणार आहे हे अगदी स्पष्ट शब्दात सांगितले. या विषयातली आमची गती तिच्या लक्षात आणून द्यायचा आटोकाट प्रयत्न केला पण बाई मोठी धाडसी हो....आलीच ती आम्हाला शिकवायला. Happy

तिला भीती फक्त मुंबईच्या लोकलची..ती तर मलाही थोडीफार, सो मी नवरोबाला मस्का लावून त्याचा चक्रधर केला Wink ... अवलला दादर स्टेशनवरुन वर्कशॉपच्या ठिकाणी नेण्याच काम माझं होत.त्याप्रमाणे मी पोहचले स्टेशन बाहेर. हि आमची पहिलीच भेट ती झाली ही मोठ्या फिल्मी अंदाजमें.... ती स्टेशन बाहेर यायला न मी रस्त्याच्या पलीकडे पोहचायला एकच गाठ पडली..दोघींनी हात हलवले आणि एकमेकांच्या दिशेने चालू लागलो इतक्यात आमच्या मधून एक तरूण धावत गेला ( ऑलंपिक का रेस या पुलीस का केस टाईप Proud ) आणि त्याच्या मागोमाग चोर ...चोर ओरडत मोठा घोळका....मुंबईच पब्लीक ते... सोडतय होय चोराला.... रिले मॅच खेळत पकडलच त्याला.. मला धास्ती, ही मागच्या मागे परत जावून ट्रेनमध्ये तर बसत नाही ना... पण नाही ती आली पुढे अन भेटलो आम्ही. मी मनात म्हटल आता हरकत नाही हिला न्यायला. तशी हिमतीची बाई दिसतेय अगदीच चक्कर येऊन नाही पडायची माझी विणकामातली प्रगती पाहून... Wink

साडे अकरा - पावणे बाराच्या सुमारास पोहोचलो साक्षीमीच्या घरी... प्रदिपा आधीच हजर होती. आमच्या मागोमाग समोसे आले सामी बरोबर Proud लेट येण्याबद्द्ल वेलला वर्गाबाहेर कान धरुन उभं कराव की ओणवं उभ कराव यावर चर्चा सुरु असतानाच वेल आली. साक्षीमीने मस्त फालूदा पाजून सगळ्यांना गारेगार केल. सोबत समोसे व रवा लाडू होतेच. Happy

बारा वाजेपर्यंत सगळ आटपून वर्गात बसा...बाईंचा हुकूम सुटला. त्याबरोबर पोरी पटापट आवरुन बसल्या आपापल्या वर्गात.... मी आणि सामी बिगरीतल्या मुली. प्रदिपा व साक्षीमी वरच्या वर्गातल्या, कारण त्या आधी शिकल्या होत्या पण आता आठवत नव्हत म्हणून त्या आमच्या वर्गात येऊन बसल्या...वेल डिग्रीची स्टुडंट.

अवलने साखळी शिकवायला सुरुवात केल्याबरोबर डोक्याला मार बसल्या बसल्या हिरोईनला कसं सगळ आठवायला लागत तसच प्रदिपा आणि साक्षीमीच झालं.... मग लग्गेच मी व सामीने मिळून त्यांना आमच्या वर्गाबाहेर काढलं.... एकतर आमची सुरुवात कोणत्या बोटात दोरा न कोणत्या बोटात सुई इथपासून होती आणि ह्या दोघी विणायला लागल्या की भरभर... सामी म्हणाली, "लक्ष देऊ नकोस त्यांच्याकडे, आपल्याला आपल बेसिक पक्क करायचय...पाया महत्वाचा नाही तर विसरायला होतात गोष्टी (टोमणा बरं का Wink )

हे होतय तोवर वेलने तिच्या बॅगेतून विणलेल्या पर्स अन काय काय भारी आयटम काढले... मी लग्गेच बाणेदारपणे अवलला म्हटल," काही तरी अत्यंत कठिण करायला दे ह्या वेलला आणि काढ वर्गाबाहेर". (नाहितर काय...उगीच आमच मॉरल डाऊन करण्यासाठी मुका खांब , सरकता टाका यासारखे अगम्य शब्द ती वापरत होती Happy )
इतका मोठा प्रवास करुन आली तरी अवल लगेच आम्हाला शिकवायला बसली...प्रत्येकी सोबत बसून तिने खूप छान शिकवल. अटी घालायला शिकवता शिकवता आमच्या मनातली विणकामाची अढी पण तिने अलवार काढून टाकली....हॅट्स ऑफ टू हर _____/\______
दोर्‍यापासून फक्त सुईच्या सहाय्याने इतक्या सुंदर सुंदर वस्तू कशा काय बनू शकतात, याच कायम आश्चर्य वाटणार्‍या माझ्यासारखी कडून तिने एक फूल व पर्सची सुरुवात करुन घेतली ह्याबद्द्ल तिचे मानावे तितके आभार थोडेच आहेत.आम्ही एकाच वेळी चारीबाजूने चार प्रश्न विचारत असतानाही ती जराही गोंधळली नाही की आमची कछुआ छाप चाल पाहून चिडली नाही. प्रत्येकाला तिने त्याच्या लेव्हलला उतरुन शिकवल...खरच हाडाची शिक्षिका आहे ती Happy ( चिकन बिर्यानीवर आडवा हात केलेल्या विद्यार्थ्यांना तिने झोपू न देता इतक शिकवल हे ही कौशल्यच नाही का Wink )

ह्यासगळ्यात तिची जाण्याची वेळ येऊन ठेपली. बाकी सगळ्यांना पण मी पहिल्यांदाच भेटत होते पण तसं जाणवलच नाही. (माबो गटग वृतांतात हे वाक्य वाचल की कायम मला वाटायच, असं असत का कधी? ....पण स्वतः अनुभवल्यावर समजल की माबो पे सब कुछ पॉसिबल है बॉस Happy ) जाता जाता ही आम्हाला अवलकडून होमवर्क मिळाला आहे सध्या तो जमेल तसा पुर्ण करतोय आणि वाट पाहतोय पुढच्या वर्कशॉपची (गटगची Wink Proud )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह नो.. मी कसं मिस केल हे...
सामी एकदा तरी सांगायच्स ना..
एनी वे. मस्त बेस्ट ऑफ लक पुढ्च्या विणकामांसाठी Happy

अरे वा,
शेवटी चिबि गटग झालं म्हणायचं!
Happy
अरे नाही नाही , क्रोशापण शिकलात ना!
या वेलला नेमकं काय येत नाही त्याची पण लिस्ट करा.
अवलला नेमकं काय येत नाही याची लिस्ट करायची गरज नाही.
'झिरो आयटेम्स फाऊंड' असं उत्तर येईल.
Happy

सगळ्याजणींचं गटगबद्दल खूप खूप अभिनंदन.
आणि सगळ्यांनी अवलच्या सहाय्याने डिग्रिधारी बना ही शुभेच्छा.

हे हे, छान लिहिलस ग.... बाईंच कवतिक जरा जास्तच झाल... पास करावं लागणार बरं Wink
जोक्स अपार्ट तुम्हा सगळ्यांचे कौतुक करावे तेव्हढे कमीच. आपले सगळे उद्योग सांभाळून, नोक-या, मुलं सगळं सांभाळून काही नवं शिकण्याचा प्रयत्न तुम्ही करताय, तुमच्या चिकाटीला सलाम.
विनार्च तुझ्या नव-याला स्पेशल धन्यवाद ग, मुंबईतला माझा सारा प्रवास इतका सुखकर झाला, त्यांच्यामुळे.
या निमित्ताने अनन्यासारख्या कलाकाराला भेटतापण आलं Happy
साक्षीचे पिल्लू खरच गुणी आहे. इतक्या बायकांच्यात जराही रडला नाही की त्रास दिला नाही.
विनार्च, साक्षीमी, सामी, प्रदिपा, वल्लरी, माझ्या या वर्कशॉपच्या पहिल्याच प्रयोगाला तुम्ही साथ दिलीत, मनापासून धन्यवाद Happy

विनार्च मस्त व्रुतांत. सही!. वाचता वाचता डोळ्यासमोर आपले सुरवातीचे केविलवाणे चेहरे आले आणि मग सुरू झालेल्या धमाल कमेट्स .
हुशार विद्यार्थ्यां चा आपला मॉरल डाऊन करायचा प्रत्येक प्रयत्न आपण कसा निष्फळ केला ते आठवले.
मी तर बाईंच्या बाजूचीच जागा पकडली होती. त्यामुळे बाईंनी बरेच समजावून घेतले आणि फटके पण दिले. म्हणजे एकच फटका दिला. (माझी खात्री आहे आता मी नक्कीच एक्स्पर्ट होणार ..)
आरती ताई खरच ग्रेट आहे. खूप पेशन्स आहेत तिच्यात. हातात पहिल्यांदा सूई घेतलेली मी, पण वर्कशॉप च्या शेवटी माझा कॉन्फिडन्स बराच वाढ्ला होता.
आम्ही तिला मुंबई ला ये म्हणालो , ती ही लगेच तयार झाली. आमच्यासाठी लोकरीचे सगळे सामान आणि स्पेशल तिने केलेल्या कोथींबीर वड्या आणि मिठाई (?) घेऊन पहाटे ६ ची ट्रेन पकडून आम च्यासाठी आली.
(प्रश्न चिन्हाचा अर्थ साक्षी ला नक्कीच कळला असणार Happy )
आरती ताई मनापासून धन्यवाद. तसेही तुला आमच्या सारखे उत्साही विद्यार्थी कुठे मिळाले असते, नाही का? Happy
प्रदिपा,साक्षीमी,विनार्च आणि आरती ताई यांना पहिल्यांदा भेटले असे वाटलेच नाही. माबो ईफेक्ट. Happy

मस्त वृत्तांत. इतक्या कलांमध्ये प्रवीण असलेल्या अवल यांना भेटायची उत्सुकता लागून आहे. अमेरिकेत क्रोशा गटग होईल तेव्हा भेटेनच म्हणा.

मस्तच वृत्तांत विनार्च, खरंच खुप धमाल आली. त्या निमित्ताने माबोकरांचे चरण स्पर्श म्या पामराच्या झोपडीला लागले.. अहोभाग्य.. Happy ... आम्हा सर्वांचीच अलमोस्ट सेकंन्ड इनिंग असल्यागत होतं हे वर्कशॉप म्हण्जे.. आणी फक्त ४-५ तासात अवल दि ने आम्हाल मस्त रिफ्रेश केलं, नवा हुरुप दिला. अ‍ॅक्चुअल शिकवणीपेक्षा प्रवासातच तिचा जास्त वेळ गेला, तरीही ती आमच्यासारख्या अनोळखी विद्यार्थांसाठी एवढया लांब आली हे खरंच खुप कौतुकास्पद आहे.
सामी, काळजी नको बरं का, (टिचर बघा बरं, सगळ्यांच लक्ष मिठाईवरच होतं शिकवणी सोडुन तरी को. व. लवकर संपावी म्हणुन मी कित्ती हातभार लावला नई.. Wink ) ... रोज प्रत्येकीची आठवण काढुन एकेक पीस खातोय ग आम्ही.. Wink रव्याचे लाडु ही जपुन जपुन खाल्ले हो आम्ही. Wink प्रदिपा नोट कर हा..

Angry

छान छान वृत्तांत टाकून जाळवतात smileycrying.gif

पुढच्या वेळेला मी येणारेय तेंव्हा पण असाच वृ हवा Proud
रच्याकने मिठाई पुढच्या प्रचि चा अर्थ मला पण कळालाय Proud

हा साक्षीचा पहिला प्रयत्न. वरती परपल रंगात आहे ती पर्सची सुरुवात आहे. लवकरच पूर्ण पर्स आपल्याला तिच्या हातात दिसेल Happy
आणि खाली आहेत दोन फुलं. शाब्बास साक्षी

IMG-20140704-WA0033.jpg

आणि हे प्रदिपाने वर्कशॉपमधे विणलेले पर्स आणि फुल. आणि खाली तिने घरी केलेला प्रयोग शाब्बास दिपा

IMG-20140629-WA0016.jpgIMG-20140629-WA0025.jpg

आणि खाली डावीकडचे विनार्च ने वर्कशॉपमधे विणलेले फुल आणि उजवीकडे घरी गेल्यावर स्वता केलेला प्रयोग Happy शाब्बास अर्चना

IMG-20140630-WA0015.jpg

हे खालचे पहिले वल्लरीने वर्कशॉपमधे विणलेले फुल अन दुसरा तिने घरी केलेला प्रयोग. शाब्बास वल्लरी
IMG-20140704-WA0030.jpgIMG-20140704-WA0035.jpg

सहीच ग. पुढच्या वेळी मी ही येणार तुमच्यात Happy ह्यावेळी ट्रेकचं पारडं जड झालं होतं थोडं Wink

ठरल्याप्रमाणे माझ्या नावाचा चिबीचा घास बाजूला काढून ठेवलात का टवळ्यांनो मला विसरलात? Proud

विनार्च मस्त वृत्तांत.>>>> प्रत्येकाला तिने त्याच्या लेव्हलला उतरुन शिकवल...खरच हाडाची शिक्षिका आहे ती>>>अगदी पट्णार.दुरशिक्षणातला भक्कम अनुभव आहे तिच्या गाठीला.थोड्या वेळात नेमक आणि विविध लेव्हल्च्या विद्यार्थ्याना शिकवाव लागत तिथे.अर्थात दूरशिक्षणातील सर्वाना अस् जमत अस नाही.कुशाग्र बुद्धी, हातात घेतलेल जिव ओतुन अणि परफेक्ट करायच या वृत्तीमुळे हे होत.मी मायबोलीवर आहे तीही एका दिवसात सन्गणक हाताळण्या पासुन ते मराठी टाइप करेपर्यंत सगळ तिने शिकवल्यामुळे.काही अडचण वाटली तर हसतमुखाने बोल ग! म्हणत सोडवायला ति आहेच.

क्रोशे गटग कल्पनाच अफलातुन आहे.
वृतांत वाचायला मजा आली.
अवलने टाकलेल्या फोटोंवरुन सगळ्या शिष्या गुरुला सवाई होणार असं दिसतयं.
क्रोशेकाम माझही आवडतं असल्याने आवर्जून वाचला हा वृतांत.

मी रागवलीय...मला कोणीच सांगितलं नाही..... मी कित्ती रडले तुमचे फोटो बघुन....मी बोलणारच नाही जा कोणाशी ( दुखा:चे बांध फुटुन घळाघळा रडणारी बाहुली )

खूप मस्त झाले आहेत सर्व विणकामाचे नमुने. अभिनंदन. सारखे क्रोमा गटग असे वाचले जात आहे लेखाचे नाव. Happy

क्रोशे गटग कल्पनाच अफलातुन आहे.
वृतांत वाचायला मजा आली.
अवलने टाकलेल्या फोटोंवरुन सगळ्या शिष्या गुरुला सवाई होणार असं दिसतयं.>>>>>++1
मलाही शिकायचं आहे कधी मुहुर्त लागतो़़़़़़.......

Pages