शल्य काळजातले कुणाला सांगत नाही!

Submitted by profspd on 3 July, 2014 - 03:13

शल्य काळजातले कुणाला सांगत नाही!
दु:ख स्वत:चे नोंदनीय मज वाटत नाही!!

बेरंगी दुनियेचे झाले रंग पाहुनी....
रंगांवरती मी आताशा भाळत नाही!

अलीकडे आरसा मनाचा रोज तडकतो....
मी आताशा तडा कोणता सांधत नाही!

सवय द्यायची आहे माझ्या या हातांना....
भागवतो जे आहे त्यातच, मागत नाही!

छोट्या छोट्या गोष्टींनी आनंद लाभतो....
सुखी व्हायला दुसरे काही लागत नाही!

ध्यास पैलतीराचा मजला असा लागला....
कुठल्या गोतावळ्यात मन हे नांदत नाही!

वाटसरूंना लुबाडणारी झाडे दिसती....
वाटेमध्ये मी कोठेही थांबत नाही!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अलीकडे आरसा मनाचा रोज तडकतो....
मी आताशा तडा कोणता सांधत नाही!

सवय द्यायची आहे माझ्या या हातांना....
भागवतो जे आहे त्यातच, मागत नाही!

हे चांगले आहेत.