Submitted by विनार्च on 1 July, 2014 - 07:47
माझ्या लेकीने शाळेत देण्यासाठी काढलेली ही चित्रे.
यातल पहिल चित्र मला इतक आवडल की, मी ते शाळेत न्यायला मिळणार नाही ...हव तर दुसर काढ म्हणाले म्ह्णून हे दुसर चित्र.... अर्थात ते काढण्या आधी कस ही असल तरी मी ते तिला नेऊ देणार हे प्रॉमीस घ्यायला विसरली नाही
ह्या चित्रांमधले रंग तिने बोटाने घासून ब्लेन्ड केले आहेत. तिला कापूस वा टिश्यूपेपरचा पर्याय सुचवला असता हवा तसा इफेक्ट मिळत नाही म्हणाली.....(इतक घासून बोट दुखायला लागली. ) कलर्स ब्लेन्ड करायला अजून काही पर्याय आहेत का?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूपच छान.....कित्ति हुषार आहे
खूपच छान.....कित्ति हुषार आहे तुमचि मुलगी....
थोड खोबरेल बोटांना लवून गरम पाण्यात ठेवून शेका....कमि होइल असे वाटते
काय सुंदर रंग वापरलेत !! हि
काय सुंदर रंग वापरलेत !!
हि सर्व चित्रे वेगवेगळ्या (क्राय सारख्या ) चॅरीटेबल संस्थांकडे पाठवायला हवीत. त्यांच्या भेटकार्डावर छापण्यासाठी.
अनन्या सिंपली ग्रेट. कलर्स
अनन्या सिंपली ग्रेट. कलर्स सुंदर वापरले आहेत. मस्तच.
awesome!!!!!!!!!!!
awesome!!!!!!!!!!!
धन्यवाद गोपिका बोटांवर
धन्यवाद
गोपिका बोटांवर उपचार झाले हो....मला इथे रंग ब्लेन्ड करण्याच्या पद्धती बद्दल विचारायचे होते....चुक ध्यानात आणुन दिल्याबद्द्ल धन्यवाद ...मी आवश्यक तो बदल करते
व्वा मस्त चित्र. दूसरं
व्वा मस्त चित्र. दूसरं बघितल्यावर नक्कीच वाटलं असेल की प्रॉमीस करायला नको होते.
सुंदर आहेत चित्रं!
सुंदर आहेत चित्रं!
अप्रतिम!!! खुप सुंदर चित्रे
अप्रतिम!!!
खुप सुंदर चित्रे
सुन्दर चित्र! blending
सुन्दर चित्र!
blending techniques:
ls/
Great, Ananya!!!
Great, Ananya!!!
सही....खुपच सुंदर ग...
सही....खुपच सुंदर ग... अनन्या.... love u baby...
ऑसम!!
ऑसम!!
सुंदर.. कला जोपासा.
सुंदर.. कला जोपासा.
खुप सुंदर.... लेकीच खुप खुप
खुप सुंदर.... लेकीच खुप खुप कौतुक
खूप सुंदर.
खूप सुंदर.
अफाट आहे....
अफाट आहे....
खूप सुंदर चित्रं
खूप सुंदर चित्रं आहेत!
अनन्याची बाकी चित्रंपण भन्नाट असतात! केवढी टॅलेंटेड आहे!
सुरेख!!
सुरेख!!
अफाट जन्मजात देणगी घेऊन आलेय
अफाट
जन्मजात देणगी घेऊन आलेय ग लेक.
सुरेख चित्रं.
सुरेख चित्रं.
भारी!
भारी!
पहिलं फारच मस्त आलंय..
पहिलं फारच मस्त आलंय.. पावसाचा इफेक्ट झकास जमलाय..
सुरेख !
सुरेख !
अप्रतिम......................
अप्रतिम................................
अनन्याची दोन्ही चित्रे मस्त
अनन्याची दोन्ही चित्रे मस्त
चंद्राला डोळे-नाक-कान काढलंय
चंद्राला डोळे-नाक-कान काढलंय (किंवा काढून खोडलंय) का?
मला डोळे आणि भुवया स्पष्ट दिसताहेत.
खुप छान.
खुप छान.
सुंदर वर तुम्ही ऑईल पेस्टल
सुंदर
वर तुम्ही ऑईल पेस्टल ब्लेंड करण्याबद्दल विचारले आहे.
ऑईल पेस्टल बोटाने किंवा बोटाला पेपर टॉवेल / तलम कामड गुंडाळुन करावे लागते . याशिवाय पेपर स्टंप्स/Tortillon ( जे घरीही बनवु शकतो) वापरता येतात. इथे http://raw.rawmaterialsarts.netdna-cdn.com/catimg/aa17483_x.jpg याची इमेज बघता येईल.
इथे http://www.wikihow.com/Make-a-Tortillon हे स्टंप्स बनवायचा प्रोसेस आहे किंवा आर्ट स्टोअर मधे वेगवेगळ्या नंबरचे स्टंप्स मिळतात.
ब्लेंडींगचे वेगवेगळे टेक्निक्स आहेत त्याचे व्हीडीओ ट्युटोरिअल्स शोधा आणि मुलिला दाखवा. उदा. क्रॉस हॅच स्ट्रोक्स करुन ते सर्क्युलर ब्लेंड केले किंवा येकाच दिशेने बोट फिरऊन केलेले ब्लेंड यात वेगळे ईफेक्ट मिळतील.
तसेच पुर्ण चित्र ब्लेंड न करता काही ठिकाणी तसेच टेक्चर ठेवता येते.
ऑईल पेस्टलच्या वर दुसरा रंग देताना खालचा रंग मिक्स होतो. म्हणुन वर पांधरे ढग निळ्यावर न रंगवता वेगळे रंगवायला हवे होते. सॉफ्ट पेस्टल्मधे येक येक लेयर फिक्स करुन काम करता येते तेथे पुर्ण निळा रंग मारुन तो फिक्स करुन त्यावर पांढरा पेस्टल वापरता येतो.
शेवटी अगदिच फाईन ब्लेंड हवा असला तर टर्पेंटाईन सारखे सॉल्व्हंट वापरता येते ( अगदी थोडया प्रमाणात) मात्र त्याचा वापर अगदीच हवा असेल तरच करावा. लहान मुलांना हे सॉल्व्हंट्स देण्याचे टाळावे.
शुभेच्छा.