बाप

Submitted by anjali maideo on 30 June, 2014 - 13:12

बाप

रोजची रात्र,
दारुच्या वासाची.
बापाच्या अर्वाच्य शिव्यांची,
त्याच्या अखंड बडबडीची,
शब्दाने अब्रूचे लचके तोडणारी,
त्याने न मारताही
होणा-या असंख्य वेदनांची.
न लागणारी झोपही सकाळची वाट पहात
झोपेच्या गोळ्या विकत घ्यायचा निर्धार करणारी.

रोजची सकाळ,
बापाच्या प्रेमळ हाकेने उठवणारी.
त्याने केलेला आयता चहा ढोसणारी.
बापाने चिरुन दिलेली भाजी
फोडणीस टाकणारी.
त्याने टिपून आणलेली फुलं
गज-यात माळणारी.
न चुकता कामावर जाताना
त्याला दारुला पैसे देणारी.
अंजली मायदेव

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त, दारुच्या अधीन झालेल्यांच्या कुटुंबाच्या मनाची घालमेल अगदी बरोबर व्यक्त केलीये.

धन्यवाद कविताजी !!!(माझ्या कामवाल्या बाईशी साधलेल्या संवादातून सुचलेली आणि पक्की बाबावेडी असल्यामुळे........)