गंडवतो साला

Submitted by लाल्या on 30 June, 2014 - 02:15

येतो येतो म्हणतो...आणि गंडवतो साला?
आम्ही वाट पाहतो - आला, नाही आला!

टांग द्यायची त्याची सरकारी खोड,
कधीच नाही घेत, कश्याचं लोड!
मनात येईल तेव्हाच येईल कामाला,
येतो येतो म्हणतो...आणि गंडवतो साला?

कधी कधी त्याच्यावर ढग वारा चिडतात,
ह्याच्या अश्या वागण्याने ते खोटे पडतात.
उगाच त्यांचा हेलपाटा गावा-गावाला!
येतो येतो म्हणतो...आणि गंडवतो साला?

बाबा रे किती वेळ रुसून असा राहणार?
तहानलेल्या जमिनीचा अंत असा पाहणार?
बळीराजा बघतोय किती वर्ष वाट,
यंदा तरी जाऊन त्याला शेतामध्ये गाठ.
त्याचे हाल बघून तुही अश्रु जरा ढाळ,
इतका रड की फुटून जाउ दे आभाळ,
पुन्हा नको म्हणू दे कुणीही कुणाला,
"येतो येतो म्हणतो...आणि गंडवतो साला?"

- माधव आजगांवकर.

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरी गोष्ट आहे...इकडे तर शेतकरी डोळे लावून बसलेत...

इतका रड की फुटून जाउ दे आभाळ,<< असे काही नको पण...

अवांतरः-पण ही कविता लिहीण्याआधी जुलै मध्या पर्यंत वाट पहायला हवी होती.कदाचीत मग तुम्हाला कविता इथे टाकायची संधी हुकली असती.. Happy सिझन शिफ्ट ..

mast!

mast!

सगळ्यांचे आभार! राहिली वाट बघायची बाब...माझ्यासाठी "हा क्षण" महत्त्वाचा. जेव्हा जुलैला पाऊस येईल, तेव्हा "त्या क्षणाची" कविता लिहू कि! Happy

ऑन अ सिरीयस नोट....मी काही कवी नाही....काही मनापासून वाटलं तरच लिहीतो! माझी सलगी शब्दांपेक्षा सुरांशी जास्त आहे! पण तुम्हा सर्वांच्या प्रोत्साहनाने खरंच हुरूप येतो!

मोहिनीजी, तुम्हाला "साला" शब्द रुचला नाही याबद्दल सॉरी. पण मला त्यात वावगं काहीच वाटलं नाही. साला हा शब्द इथे अर्वाच्य नसून एक बोली भाषेतला शब्द म्हणून वापरला आहे. तरी त्याने कुणालाही दुखवायचा हेतू नव्हता. माझी पुढची कविता आता मी खरंच इथे टाकू कि नको हा विचार करीत आहे.....त्यच्यात अश्या बोली भाषेचा भडीमार आहे! Proud तुमच्या अभिप्रायाबद्दल मनापासून आभारी. Happy

लाल्या, साला हा शब्द 'पावसाला' उद्देशुन म्हणलेलं आवडलं नाही कारण तो आमचा 'लाडका' आहे असं काहीसं म्हणायचं असावं त्यांना Happy

साला या शब्दावर आक्षेप नसुन ज्याला वापराला त्याला वापरला म्हणून Proud

आय गेस साधीशी कमेंट आहे ती Happy

त्यांना तसं म्हणायचं नसेल तर मला हेच म्हणायचंय Proud