काळ हल्ली हाय, सरता सरत नाही!

Submitted by profspd on 15 June, 2014 - 12:27

काळ हल्ली हाय, सरता सरत नाही!
यायची तू शक्यताही दिसत नाही!!

राख झाल्यावर अखेरी हे कळाले....
आसवांनी आग कुठली विझत नाही!

‘हो’ म्हणावेसे न वाटे या मनाला....
पण तुला ‘नाही’ म्हणूही शकत नाही!

समजते सूर्यास मावळत्या अरे, हे.....
ढळत असतो त्यास कोणी पुसत नाही!

लाट आलिंगन कितीदा देत असते....
पण किनारा हाय, केव्हा भिजत नाही!

ओहटी-भरती तशी चालूच असते....
पण, तसूभरही किनारा हलत नाही!

गझल डोळ्यांच्या पुढे साक्षात असते....
लेखणीला मात्र काही सुचत नाही!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६

Group content visibility: 
Public - accessible to all site users