प्रश्न हे भरपूर अन् आयुष्य थोडे!

Submitted by profspd on 23 June, 2014 - 10:12

प्रश्न हे भरपूर अन् आयुष्य थोडे!
कोण जाणे, हे कधी सुटणार कोडे?

वाटते की, मीच मुखदुर्बल असावा.........
दामटे जो तो स्वत:चे फक्त घोडे!

योजना कुठल्या, कशी आश्वासने ही?
कागदाचे फक्त नाचवतात घोडे!

नजर ती, दिसते तशी साधी न भोळी........
नित्य नूतन घालते ती एक कोडे!

काळजी घ्यावी किती मी, ते कळेना........
नेहमी त्यांचाच पापड काय मोडे?

का न या पायांमधे रुतणार काटे?
घातले पायांमधे नाहीत जोडे!

संपले तारुण्य तेव्हा जाग आली........
आज समजू लागले मज दु:ख थोडे!

फक्त ऐकू येत होत्या स्पष्ट टापा.......
समजले नाही कुठे जातात घोडे!

बुद्धिबळपट वाटते दुनिया अता ही.........
माणसे झालीत प्यादी, उंट, घोडे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

३ घोडे आले !>>> ४ आहेत.

चांगली गझल.

आपल्या गझलांवर येणार्‍या प्रतिसादांचा पार्श्वभाग उघड दिसत नसला तरी काहितरी विशेष घटना आपण इथे घडवली असणार हे नक्की. असो. पुवास!

अरे हो खरेच की चार घोडे आहेत .. पुढच्या गझलेत चार उंट ...मग चार हत्ती ... असे करुन एक पुर्ण बुध्दीबळाचा पट तयार करावा अशी सरांना नम्र विनंती !!::खिखि: