अमानवीय...? - १

Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34

अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

http://www.maayboli.com/node/12295

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उदयन,
टाईमर वगैरे परकार असेल रे .. लगेच एका दिव्याचा किस्सा घेऊन अमानवीय अनुभव घेतल्याचा भाव खाऊ नकोस Wink

टाईमर वगैरे परकार असेल रे . >>> करेक्ट. घरात लाईट चालू आहेत असे दिसले की कुणीतरी आहे असा अंदाज केला जातो. चोरी वगैरे टाळण्यासाठी असे केले जाते सहसा. टाईमरविषयी कधी ऐकले नाही पण असेलही. त्याना शेजारी घरफोडी करतील अशी भिती वाटत असेल. म्हणून शेजार्‍याना दिसेल अशी लाईट चालू ठेवत असतील.
उदयन, तुम्ही जरा त्यांचे शेजारी कोण आहेत ते चेक करा.

अभि मी कशाला भाव खाउ......... ? उलट भुत मला घाबरतील Biggrin आपला यावर विश्वास नाही.. म्हणुन समोर घरी जाउन टाळा आहे हे बघुन घेतलेले.. Happy
त्यामुळे काहीही असु शकते ........ भुतच आहे हा काय नियम आहे का..... असेल शॉटसर्किट त्यावेळॅला पावर जास्त येत असेल आणि दिवा ऑटोमॅटीक चालु असेल Happy

हबा.. एक चावी सेक्रेटरी कडे द्यायची हा नियम आहे.. कारण कधी नळ चालु वगैरे राहिल्यास अथवा गॅलरीतुन काही काम असल्यास गरज लागते.. कारण मालकाला मुंबई मधुन बोलवता येत नाही.. आणि सगळीच म्हातारी राहतात.. रिटायर्ड लाईफ एंजोय करत..

पण तू तर तरुण आहेस ना? >>>>>> चिखल्या........ ??? प्रश्नचिन्ह ??? तुला काय संशय आहे का यावर ? Wink

>>बायको हे प्रकरण मानवीय असल्याने ते त्रास यात न मोजलेलेच बरे

तुमचे लग्न झालेलं दिसत नाही बहुतेक म्हणून बायकोला 'मानवीय' म्हणताय Wink

>>माझा इन जनरल भुतांवर विश्वास नाही, पण एखाद्या भागात जर काही सुपरनॅचरल असेल तर मात्र मला ते फार लवकर समजतं.

सुपरनॅचरल शक्तींनाच crudely भूत म्हटलं जातं ना?

सुपरनॅचरल शक्तींनाच crudely भूत म्हटलं जातं ना? >>>>> भूत म्हणजे आत्मा (शक्यतो माणसाचा) आणि सुपरनॅचरल शक्ती म्हणजे स्पायडरमॅन सुपरमॅन यांच्या चित्रपटातील व्हिलन लोक्स.

तुमचे लग्न झालेलं दिसत नाही बहुतेक >>>>> दुखांचे आणि त्रासांचे भांडवल करून लोकांची सहानुभूती मिळवावी असा माझा स्वभाव नसल्याने तसे वाटत असेल Happy

आपन भेटु ........आणि मिळुन प्रयत्न करु Happy

अन्यथा .. कवठीचाफा यांना गाठा......... त्यांचे भुतयोनीत बरेच मित्र आहेत....... बिनाप्लँचेट ने देखील भेटायला बोलवु शकतात Happy

<<अरे प्लँचेट कस करतात ते लिहा कि कुणीतरी !<<
आसा, मी सांगेन तुम्हाला! रात्री १२ला फोन करा.

फिरुनफारुन विषय प्लॅंचेटवर येतोय. नक्की कुठल्यातरी भुताला काहीतरी माबोच्या माध्यमातुन सांगायचय! Wink

<<<<< फिरुनफारुन विषय प्लॅंचेटवर येतोय. नक्की कुठल्यातरी भुताला काहीतरी माबोच्या माध्यमातुन सांगायचय! डोळा मारा >>>>>> Lol

मग त्या भुताला एक माबो आयडी काढून देता येयील; मराठी मधून लिहायला शिकवता येयील. मग तो खुशाल इथे लिहित बसू देत. त्यासाठी प्लान्चेत चा त्रास कशाला. उगीच वाट्या फिरलेल्या पाहून मंडळी घाबरणार. जर ते भूत माबोवर आले तर इतर बर्याच वैज्ञानिक मंडळींना पण त्याला प्रश्न विचारता येतील. Lol

आसा, मी सांगेन तुम्हाला! रात्री १२ला फोन करा. >>> डन Happy

नक्की कुठल्यातरी भुताला काहीतरी माबोच्या माध्यमातुन सांगायचय! >>>> Biggrin

इथले वाचून उगाच प्लन्चेट करु नका लोकहो.......नाहीतर फारच करायची इच्छा असेल तर आधी भुताला घालवायची प्रकिया नीट्च वाचा..... नाहीतर चुकुन माकून यश मिळाल तर भूत घरात....... आणि तुम्ही मान्त्रिकाच्या शोधात घराबाहेर अस व्हायच........:P Proud Lol

हा किस्सा माझे बाबांकडून ऐकलेला. त्यांना अमानवीय असे काहीतरी खूपदा जाणवायचे....
या किस्स्याबद्दलही खरे खोटे काही माहित नाही. आता बाबा हयातही नाहीत Sad

तर तो किस्सा म्हणजे माझे बाबा रिक्षा चालवायचे पुण्यात ७८-७९ साली. एकदा रात्री ससूनमधून एका मृत व्यक्तीला घेऊन दोघं जण चलण्यासाठी आग्रह करायला लागले. तेव्हा अँब्युलन्स का नाही मिळाली माहित नाही. त्यांना वारजेला जायचे होते. आता रात्रीची वेळ. तेव्हा पुण्यात एवढी वस्ती, रहदारी नसे. त्यामुळे बाबा जरा घाबरले. स्टँडवरच्या त्यांच्या अजून एका मित्राला सोबतीला चल म्हटले. माझ्या रिक्षाच्या मागूनच तुझी रिक्षा चालव असे ठरले. ती दोन माणसं मधे त्या मयत व्यक्तीला धरून बाबांच्या रिक्षात बसले. बाबांच्याच शब्दात सांगायचे तर " माझी असली टरकली होती. रिअर व्ह्यू मिरर मधे बघितलं की तो मुडदाच दिसायचा सारखा" Uhoh

तर एकदाचं सोडलं त्यांना वारजेला. बाबा त्यांच्या मित्राला म्हणाले चल लवकर घर गाठू आता. फक्त वाटेत लघवीसाठी एका झाडापाशी थांबले. काम उरकल्यावर बाबा जायला निघाले आणि झाडावरून काहीतरी खाली टपटप आवाज करत पडतंय हे समजलं. वर बघितलं तर एका करंगळीतून रक्त ठीपकत असलेले दिसले. तंतरून जे काही सुसाट रिक्षा मारली दोघांनी की बास. पुढे गेल्यावर एक पानाची टपरी चालू असलेली दिसली. बाबांच्या मित्राला सिगरेट पिण्याची हुक्की आली. दोघांच्या हे लक्षात आलंच नाही की निर्जन रस्त्यावर एकाकी पानाची टपरी कशी काय आली? दोघं धापा टाकत, घामाघुम पोचले तेव्हा पानवाला विचारायला लागला "काय झालं बाबांनो. एवढा काय घामाघूम झालाय?" मग बाबांनी सगळी स्टोरी सांगितली त्याला आणि तो पानवाला पान लावता लावता त्याची रक्ताळलेली करंगळी वर करून म्हणाला 'हीच का ती करंगळी' Uhoh

महेश पुढे म्हणजे काय दोघांनीही तिथून पळ काढला. Happy
पण नंतरही त्यांनी त्या रोडला जाऊन खरंच अशी पानट्परी होती की नाही हे बघायला हवे होते असे वाटते.

अन्जली बापरे काय मनस्थिती झाली असेल त्यान्ची त्या वेळी. वाचुनच काटा येतो.

कधि कधि भयाणक स्व्पन पडत आनि खर्या खर्या साबा रहायला येतात>>>>:हाहा:

<<मग बाबांनी सगळी स्टोरी सांगितली त्याला आणि तो पानवाला पान लावता लावता त्याची रक्ताळलेली करंगळी वर करून म्हणाला 'हीच का ती करंगळी' <<
अरेच्चा... ही भुताची गोष्ट आम्ही शाळेत असतांना फार्र्फार फेमस होती. थोड्या वेगळ्या तर्‍हेने...
एक माणसाला अचानक काही कामासाठी जंगलातुन जावं लागतं. त्याच्याजवळ गाडी नसते. नेमकी अमावस्येची रात्र. घाबरत घाबरत तो चालायला सुरवात करतो. जंगलातील रस्ता, रातकीड्यांचा कीर्र आवाज! थोड्या अंतरावर गेल्यावर त्याला 'टप, टप, टप' असा आवाज येतो. इकडे तिकडे पाहतो... कुणीच नाही. परत मार्गक्रमण सुरु करतो. पुन्हा 'टप, टप्,टप' आवाज. पुन्हा कानोसा घेतो... कुणीच नाही. वरती बघतो तर त्याच्या बरोबरीनेच एक रक्ताळलेला हात येत असतो.त्यातुन रक्त पडतानाचा टप टप आवाज. किंचाळत, ओरडत, ठेचकाळत ... धुम्म ठोकतो. जंगलाच्या काठावर येउन पोहोचतो. तिथे अशीच एकाकी पानटपरी. हा घाबरत घाबरत पानटपरीवाल्याला सांगतो, की मी जंगलातुन येत असतांना असा असा हात दिसला.. आणि तो पानटपरीवाला त्याला म्हणतो," हाच का तो हात??". इकडे हा माणुस बेशुद्ध. आणि आम्ही 'ऑ' वासलेले!!

अजुन एक भुताची कथा आम्ही शाळेत असतांना 'भाव' खाउन होती. एकदा एक एस्.टी. अमावस्येच्या रात्री कीर्र जंगलातुन जात असते. एस्.टी.मधे फक्त दोघच... कंडक्टर नि ड्रायव्हर. अचानक ड्रायव्हर करकचुन ब्रेक लावतो. ४ खेडुत बायका गाडीसमोर हातवारे करुन गाडी थांबवायला सांगत असतात. कंडक्टरला दार उघडुन त्यांना आत घेतो. त्या बायका अगदी पुढे म्हणजे ड्रायव्हरच्या केबिनच्या मागच्या सिटवर बसतात. कंडक्टर मागे त्याच्या जागेवर. तो तिकीटासाठी पैसे मागतो. त्या बायांमधली एक बाई पैसे काढुन हात लांब करते...ते डायरेक्ट कंडक्टरच्या तोंडापर्यंत!
आणी इकडे आमचे चेहरे भितीने पांढरेफट्ट!! Lol

आणी इकडे आमचे चेहरे भितीने पांढरेफट्ट!!

..............आय्ला, म्हनजे फेयर आन लवलि पेक्शा स्वस्त अन मस्त. १च दिवसात गोरि

आर्या >> अगदी , पण आमच्यावेळी त्या गोष्टित एक म्हातारी असायची ... कहाणी जरा वेगळी होती पण हेच ते हात हे वाक्य शेवटी भस्सकन असे हात समोर करुन म्हणायचो तेव्हा सर्वान्चि हितभर ... Lol

मागे मी एक मुंबई मंत्रालायाचा किस्सा टाकला होता ......तिथे पुन्हा आग लागली . 23/06/2014

www.loksatta.com/mumbai-news/mantralaya-catches-fire-again-354064/

किस्स्याची लिंक
www.maayboli.com/node/12295?page=59

Pages