निसर्गाच्या गप्पा (भाग २०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 June, 2014 - 05:56

निसर्गाच्या गप्पांच्या २० व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन तसेच पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज पर्यावरण दिनाच्या शुभ मुहुर्तावर पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने आपण आपाअपल्या परीने प्रयत्न करुन ह्या निसर्गाशी जडलेले नाते अजुन वृद्धिगत करुया.

"पा ऊ स" - निव्वळ तीन अक्षरातच त्याच्या कृतीचा भास होतो. "नेमेची येतो मग पावसाळा" असे असले तरी तो प्रत्येकाला हवाहवासा वाटत असतो. ग्रीष्मात "तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी" अशी सर्वत्र स्थिती असताना त्याचे आगमन हा एक सुखद अनुभव असतो. तो येतो तेच गारव्याची आणि नवचैतन्याची चाहुल घेऊनच. एरव्ही उजाड वाटणारी धरतीही त्याच्या आगमनाने सुखावते. उन्हाळ्यात ज्या डोंगरावर साधे झुडुपही दिसत नाही तेथे हिरव्यागार झाडाझुडपातून लपंडाव खेळत दुधाच्या सहस्त्र जलधारा वेगाने दरीत झेपावताना दिसू लागतात. "बेरंगसी है बडी जिंदगी, कुछ रंग तो भरो" असे म्हणणार्‍या धरतीला तो आपल्या "हिरव्या" रंगात रंगवून घेतो. बरे या हिरव्या रंगाच्या छटा तरी किती विविध! झाडाझुडपांचा गर्द हिरवा, नवीन पालवीचा कोवळा हिरवा, डोंगर-पठारावर व्यापलेल्या गवताचा पोपटी हिरवा, जीर्ण पानांचा वाळका हिरवा, शेवाळ्याचे भस्म फासलेल्या दगडाचा शेवाळी हिरवा. अगदी "ऋतू हिरवा, ऋतू बरवा" सारखाच. निसर्गाला, कवीमनाला साद देणारा असा हा पावसाळा. ह्याच्या पहिल्या सरींचे तर सगळ्यांना अप्रुप. पहिल्या पावसाच्या आगमनानंतर येणारा मातीचा सुगंध तर कोणत्याही कृत्रिम सुगंधापेक्षा अधिक सुंदर असतो. अगदी "जाई जुईचा गंध मातीला आला" या गीताप्रमाणेच.

आभाळात आले काळे काळे ढग,
धारा कोसळल्या निवे तगमग
धुंद दरवळ धरणीच्या श्वासांत,
आला पाऊस मातीच्या वासात,
मोती गुंफीत मोकळ्या केसांत.

वरील फोटो व त्या खालचा मजकूर जिप्सी कडून.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पावसाळा म्हणजे हिरवळ, स्वच्छ झाडी, रानभाज्या, रानफुले, भरलेल्या विहिरी, तलाव, पावसाळी गाभोळीने भरलेले मासे, भरलेल्या पाण्यात डुबुक डुबुक करत चालणे, हिरवीगार शेते हे सगळे डोळ्यासमोर येते.

हे सगळे मलाही आवडते, पण इथे कुठे आहे हे सगळे.... इथे जे आहे ते कोणाला आवडतेय Angry

जागु, तुही हल्ली दिसत नाही, शाळा सुरू झाल्या ना....

तुमचा घसा निषेध करुन कोरडा पडला असेल तर पन्हे देते पण मला मुंबई अज्जिब्बात आवडत नाही हे मात्र त्रिवार खरे>>>>साधना, तुला नवी मुंबई म्हणायचे आहे का? Proud

मानुषीताई, नो प्रॉब्लेम Happy ह्या शनिवारी जर वेळ मिळाला तर विक्रमच्या नक्षत्रवनाला भेट देवून, त्याची सविस्तर माहिती घेणार आहे, सोबत ट्रि रेस्क्युबद्दलही डिटेल्स घेऊन दुसरा लेख प्रदर्शित करण्याचा विचार आहे. Happy

रच्याकने मला एक गाणं आठवलं Proud

पुष्पास वाटते का भय ऊनपावसाचे
आयुष्य त्यास आहे एकाच ना दिसाचे
हसुनी करी परि ते वर्षाव सौरभाचा
झटकून टाक जिवा दुबळेपणा मनाचा
फुलला पहा सभोती आनंद जीवनाचा...

नि.ग. जोरातच चाललाय.

परवा कैलासपतीची दोन झाडं दिसली पुण्याच्या सेव्हन वंडर्स बागेत. भरपूर फुलं होती.

kailash_1.jpgkailash1.jpgkailash2.jpg

फळं पण होती
kailash fr.jpg

पुण्यातल्या पु.ल. देशपांडे उद्यानात काही वेगळी झाडे आहेत असे वाचले. तिथले फोटो कुणी टाकलेले मात्र आठवत नाहीत.

जिस्पी मस्त...

माझ्या पोस्टी कोन्नी कोन्नी वाचत नाही.. कित्ती महत्वाचे मेसेज असतात.. कोण्णाकोण्णाचे लक्ष नाही...... Sad जाउद्या. मला काय त्याचे.

साधना हो ग श्रावणीची शाळा चालू झाली आणि ऑफिसमध्ये पण हल्ली जरा जास्तच काम असत त्यामुळे कमी येण होत.

माझ्या पोस्टी कोन्नी कोन्नी वाचत नाही..>>>>साधना, मी वाचतो हो. Happy

तूमच्या लाहौल स्पितीच्या तारखा ठरल्या का ? ८ जुलैला संध्याकाळी मी बहुतेक पुण्यात असेन.>>>>हो दिनेशदा. आम्ही ५ जुलैला सकाळी निघतोय आणि १३ जुलैला रात्री परत येतोय. तुम्ही किती तारखेपर्यंत आहात?

हे लबाड जिप्स्या आणि साधना सांगत नाहीत

जा तिकडॅ, आता तर अज्जिबात नाही सांगणार..

दिनेश, जिप्स्या मला नाय नेतय लाहौल्ला.. Sad Sad मी म्हटले तर बायका नक्कोच आम्हाला म्हणाला....

मग आपण त्याला कटाप करू ( आणि सुनबाईंनाच बोलावू )
जागू, फोन करेनच मी.. आषाढी एकादशीची सुट्टी आहे का ? ९ तारखेला मी कोल्हापूर - मलकापूर - देवरुख - रत्नागिरी असा प्रवास करणार आहे ( पावसाचे प्रमाण बघून ) .

सगळ्यांना धन्यवाद. तो नर्सरीतला माणूसही काहीतरी सांगेलच.
अरे वा दिनेश..........भारतवारी?
माझ्या पोस्टी कोन्नी कोन्नी वाचत नाही.. कित्ती महत्वाचे मेसेज असतात.. कोण्णाकोण्णाचे लक्ष नाही>>>>>>>>>>>>>> अगं मी वाचते ना साधना :स्मितः
जो एस .......सुंदर फोटो.

जागू, मनीमोहोर, अन्जू, मानुषी धन्यवाद
दिनेश पुल देशपांडे मधे फोटो काढु देत नाहीत. काहीजण तरीह काढतातच

हा एक डीसीतला वॉकिंग ट्रेल. लेकीच्या घरापासून अगदी २ मि. अंतरावर. इथे खूप चालले.

आधी वाटलं किडाच आहे पण हे फूल आहे.

हनिसकलच्या झुडुपांच्या जवळपास अद्भुत सुगंधाने वातावरण भरून गेलेले असते!

अहा... .किती सुंदर परिसर मानुषीताई! अशा वॉकिंग ट्रेलमधुन मैलोनमैल चाललं तरी आवडेल! Happy

Pages