Submitted by जयदीप. on 15 June, 2014 - 04:49
पाऊस साठलेला जेव्हा पडून घेतो
कोणी लपून घेतो कोणी भिजून घेतो
माझ्या मनाप्रमाणे काहीच होत नाही
जितके मिळेल तितके आता हसून घेतो
रस्ता तुझ्या घराशी कुठलाच जात नाही
रस्ता वळेल तिकडे हल्ली वळून घेतो
वादळ बनून येतो सगळ्यांसमोर आता
उसने हुरूप वारा माझ्याकडून घेतो
हल्ली तुझ्या वयाचा अंदाज येत नाही
मी आरशात बघतो तेव्हा म्हणून घेतो
साखर मला म्हणाली होतीस का कळाले
पाणावतेस डोळे, मी विरघळून घेतो!
जयदीप
विषय:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रस्ता मस्त !!
रस्ता मस्त !!
वादळ बनून येतो सगळ्यांसमोर
वादळ बनून येतो सगळ्यांसमोर आता
उसने हुरूप वारा माझ्याकडून घेतो<<< वा वा
खालील ओळी, स्वतंत्रपणेही आवडल्या.
माझ्या मनाप्रमाणे काहीच होत नाही<<<
रस्ता वळेल तिकडे हल्ली वळून घेतो<<<
हल्ली तुझ्या वयाचा अंदाज येत नाही<<<
सुंदर गझल.. सगळेच शेर
सुंदर गझल..
सगळेच शेर कमी-जास्त प्रमाणात आवडलेत. पण 'वळून' आणि 'हसून' फारच खास.
वाऱ्याचा शेरही खूप मस्त. त्यात हुरुपाचं अनेकवचन का केले आहे ?
आवडली गझल जयदीप.
आवडली गझल जयदीप.
छान
छान
वादळ बनून येतो सगळ्यांसमोर
वादळ बनून येतो सगळ्यांसमोर आता
उसने हुरूप वारा माझ्याकडून घेतो
मस्त शेर!
वा गझल आवडली
वा गझल आवडली
>> हल्ली तुझ्या वयाचा अंदाज
>>
हल्ली तुझ्या वयाचा अंदाज येत नाही
मी आरशात बघतो तेव्हा म्हणून घेतो
<<
मस्त!
वार्याचाही आवडला.
छान गझल.
मस्त!
मस्त!
सुंदर!
सुंदर!
सर्वांचे मनापासून आभार
सर्वांचे मनापासून आभार
सुंदर गझल... खूप
सुंदर गझल...
खूप आवडली
शुभेच्छा
बेहतरीन ! खासमखास !!
बेहतरीन !
खासमखास !!
अरविंद सर, सुशांत धन्यवाद
अरविंद सर, सुशांत धन्यवाद