अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग १

Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09

सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.

पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?

ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.

.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरविंद केजरीवाल आणि त्यांनी स्थापन केलेली आम आदमी पार्टी हे सध्या तरी प्रचंड चेष्टेचा आणि तिरस्काराचा विषय झाले आहेत. 'बलात्कारांची राजधानी' समजल्या जाणार्‍या दिल्लीत महिलांच्या सुरक्षिततेसाठी, दिल्ली पोलिस हे केंद्राच्या अखत्यारीत न राहता राज्य सरकारच्या अखत्यारीत यावेत ह्यासाठी ४ डिग्री तापमान असताना रस्त्यावर धरणं देऊन बसण्याने आणि जनलोकपालबिल पास होऊ शकलं नाही म्हणून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने एखादी व्यक्ती एवढी तिरस्करणीय कशी काय होऊ शकते हे एक नवलच आहे.
पण ते असो.

२०१४ च्या लोकसभा निवडणूकीत 'लाटे' मुळे अनेक पक्ष भुईसपाट झाले. १६५२ पक्षांना शून्य जागा मिळाल्या. त्यात बहुजन समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इण्डिया, द्रविड मुन्नेत्र कळघम ह्या जुन्याजाणत्यांचा उल्लेख करावा लागेल.
शिवाय सध्या "लॅण्डस्लाइडिंग" विजय मिळवून (though just 31% votes!) सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीला त्यांच्या पहिल्या लोकसभा निवडणूकीमध्ये २ जागा मिळाल्या होत्या.
ह्या पार्श्वभूमीवर पाहिलं तर अवघ्या दीड वर्षे जुन्या आम आदमी पार्टीला -
१. पहिल्याच लोकसभा निवडणूकीमध्ये ४ जागा मिळाल्या.
२. दिल्ली व्यतिरिक्त आणखी एका राज्यात म्हणजे पंजाबमध्ये स्टेट पार्टीचा दर्जा मिळाला.
३. एक कोटी सोळा लाख मतदार मिळाले.
४. दिल्लीमध्ये विधानसभा निवडणूकीपेक्षा ४% मते जास्त मिळाली.

दिल्लीमध्ये काँग्रेस अवघी १५% मते मिळवून तिसर्‍या स्थानावर ढकलली गेली आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजपा अशा पारंपारिक लढतीला भाजपा विरुद्ध आप असं स्वरूप आलंय.

आपच्या अनेक उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होणं, मतांची टक्केवारी वाढूनही दिल्लीत एकही जागा न मिळणं ह्यासारखं मोठ्या प्रमाणावर नुकसानही झालं. पण त्या गोष्टींवरून आप ला धोपटण्यासाठी इतर धागे आहेतच.
मला स्वतःला आवडलेली एक महत्वाची गोष्ट म्हणजे काळा पैसा वापरून निवडणूका लढवण्याच्या पद्धतीला पक्षाने फाटा दिलाय.मिळालेल्या देणग्या पक्षाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. गुड फॉर अस.

दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या वेळी आपचं कौतुक करणारी प्रसारमाध्यमे आप लोकसभा निवडणूक लढवणार हे कळल्यावर अचानक आपच्या विरुद्ध शड्डू ठोकून उभी राहिली.
पक्षांतर्गत मतभेदांमुळे राजीनाम्याचे प्रकार झाले.
ह्या सगळ्याला तोंड देत आप उभी आहे. दीड वर्षांत दोन मोठ्या निवडणूकांना तोंड द्यावं लागल्याने मागे पडलेल्या पक्षबांधणीचं काम चालू झालं आहे असं दिसतंय.

पक्षबांधणीसोबतच आपचे आमदार त्यांच्या विभागात मोहल्ला सभा घेत आहेत. 'स्वराज' चं मॉडेल राबवताना दिसत आहेत.
(मला दिसत आहेत कारण मी टीव्ही पाहत नाही ! चॅनेलवाल्यांना मोहल्ला सभांचा जनतेच्या हिताचा प्रयोग दाखवायला वेळ मिळत नसावा असं वाटतंय किंवा त्यापेक्षा त्यांना पक्षाच्या सदस्यांनी एकमेकांना लिहिलेली आणि लीक झालेली पत्रे चघळण्यात जास्त रस असावा.)

प्रसारमाध्यमे सर्व बातम्या दाखवण्यापेक्षा चाळणी लावून, फेरफार करून दाखवत आहेत असे अनेक आवाज अनेक बाजूंनी ऐकू येत आहेत. ४००० कोटी देऊन एक उद्योगपती प्रसारमाध्यमे विकत घेतो असं चित्र असल्यावर त्यांच्याकडून उद्योगपतींविरुद्ध आवाज उठेल असं वाटत नाही, जरी त्यात जनतेचं हित असलं तरी.

माझ्या वाचण्यात,ऐकण्यात आप कडून केली जाणारी जी काही चांगली कामे येत आहेत ती इथे मांडण्याचा मानस आहे. कारण अजूनही मला आप हा एक पारंपारिक राजकारणी पक्ष नसून जनतेच्या हितासाठी झटणार्‍या लोकांचा समूह वाटतो. दुमत असू शकतं. नव्हे असणारच.
ज्यादिवशी मला स्वतःला असं वाटेल की आप त्यांच्या मूळ उद्देशापासून परावृत्त होऊन फक्त राजकारण करण्यात अडकलाय त्यादिवशी राजकारण ह्या विषयाला पुन्हा टाटा-बाय बाय. तब तक दिल की आवाज सर-आंखोंपर...

इथे विरोधी मतांचं, बातम्यांचं, अनुभवाचं ही स्वागतच आहे. लिहिताना शक्यतो कसलाही आधार किंवा पुरावा नसलेली विधाने टाळूया आणि सभ्य भाषा वापरू या.

महत्वाची सूचना - हा धागा सर्वस्वी वैयक्तिक मतं आणि टिप्पणीवर आधारलेला आहे. ही आम आदमी पक्षाची मते आहेत असा कुठलाही दावा किंवा दूरान्वये संबंध नाही. नाहीतर इथलं एखादं विधान उचलून "इस घंटे की सबसे बडी खबर" म्हणून दिवसभर आपला झोडपायला चॅनेलवाले मागेपुढे पाहणार नाहीत. हो, दिन अच्छे असले तरी रात्र अजून वैर्‍याचीच आहे !

अगदी अस्साच्या अस्सा एक धागा आधीच होऊन गेला आहे काय ?
जस्साच्या तस्सा कॉपी पेस्ट केल्यासारखा का वाटतोय ? Uhoh

महेश, लिन्क द्याल का? असेल तर बरंच. हा उडवून टाकते आणि तिथेच लिहिते.

MLA-LAD fund - आमदार निधी हा किती मिळतो आणि कशासाठी खर्च होतो हे जनतेपर्यंत नीट पोहोचत नाही. बर्‍याचदा तर निवडणूका तोंडावर आल्या की सुस्थितीत असलेले रस्ते खोदायचे आणि परत बुजवायचे ह्यातच खर्च होतो असं वाटतं.
दिल्लीमध्ये आपचे आमदार मोहल्ला सभा घेत आहेत. प्रत्येक आमदाराला ४ कोटी रूपये आमदारनिधी मिळाला आहे. ह्या निधीतून त्या विभागासाठी अतिशय गरजेचं काय आहे ह्यावर विभागातील रहिवासी एकत्र येऊन चर्चा करत आहेत आणि सर्वानुमते (किंवा बहुमताने ठरवलेलं) काम करण्यात प्राधान्य दिलं जात आहे.

सोबतच आप चे कार्यकर्ते समाजोपयोगी कामेही करत आहेत.
८ जून २०१४ ला हैदराबादमध्ये आप च्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळे बांगड्या बनवण्याच्या कारखान्यात धोकादायक परिस्थितीत काम करणार्‍या २५ बालमजूरांची सुटका झाली.

शोधून पहावे लागेल, या अशा विषयावर एक दोन धागे येऊन गेलेले असल्याने असे वाटत असेल.
लिखाण जरा वेगळे असेल.

शरद, धन्यवाद.
इब्लिस, घाबरायचेच दिवस आहेत ओ! आप चं नाव बाहेर पडलं की लोक एकदम सणसणीत तु.क. टाकतात आणि सगळी शस्त्रे परजून उभे राहतात Proud

खालची पोस्ट जर इच्छा प्रदर्शित केली तर डिलीट केली जाऊ शकते.

मोदींच्या विलक्षण इलेक्षन कॅपेनचा खर्च ४००० कोटीपेक्षा खूप जास्त असावा. अनेक ठिकाणी तो ४०००० कोटी इतकाही सांगितला जातोय. दोन - अडीच वर्षांपासून मेडीयाने मोदींबद्दलच्या नकारात्मक बातम्या देण्याचं बंद केलं होतं. चर्चेतही कुठले पाहुणे बोलवायचे हे व्यवस्थित ठरत होतं. त्यावरून मेडीया विकत घेतला असं म्हटलं जातं.

हे जर खरं असेल तर ज्या पक्षाचा जन्मही झालेला नव्हता त्या पक्षाचे रवी श्रीवास्तव, शाजिया इल्मी, साने, वारे, दमानिया बाई, अजय सावंत, बोबडं मराठी बोलणारे पो अधिकारी वाय पी सिंग, कुमार विश्वास, मयंक गांधी, अण्णांबरोबर असताना विश्वंभर चौधरी, काढून टाकलेले ग्लाससेवक पठारे या सर्वांना पॅनेल डिस्कशन मधे कशासाठी बोलावले जात होते. निखील वागळे आत्ता दमानिया बाईंना म्हणतात की मी ३५ वर्षे पत्रकारिता करतो, कोण आहात तुम्ही, काय तुमची लायकी आहे... हे त्यांना गेली अडीच वर्षे समजत नव्हतं का ? जर आता त्यांनी त्यांच्या पात्रतेबद्दल साक्षात्कार झालेला असेल तर गेली अडीच वर्षे या पक्षाचं सदस्यत्व कसं घ्यायचं, फॉर्म कसा भरायचा हे सर्वच्या सर्व वाहीन्यांनी सांगण्याची गरज काय ? इतका वेळ अन्य कुठल्या पक्षाला दिलेला आहे ? भाजपा-काँग्रेस-आप आणि बास. ज्या पद्धतीचा क्वालिटी टाईम आप ला मिळाला त्यानंतरही त्यांना चारच जागा मिळत असतील तर लोकांनी हा प्रचार नाकारलेला आहे असं म्हणूयात का ?

इतका क्वालिटी टाइम मेडीयाने दिला असेल तर त्याचा खर्च कुणी दिला ? केजरीवालांच्या हिट अ‍ॅण्ड रन पत्रकार परिषदांचा खर्च कुणी केला ? अण्णांच्या आंदोलनाला २४ बाय ७ प्रसिद्धी देण्याचा खर्च कुणी उचलला ? याची टोटल किती होते ? कुणी नाटा, बाटा, पाटा उद्योगसमूह तर हे बिल भरत नव्हता ना ?

हे प्रश्न उपस्थित होतात.

MLA-LAD fund - आमदार निधी हा किती मिळतो आणि कशासाठी खर्च होतो हे जनतेपर्यंत नीट पोहोचत नाही. बर्‍याचदा तर निवडणूका तोंडावर आल्या की सुस्थितीत असलेले रस्ते खोदायचे आणि परत बुजवायचे ह्यातच खर्च होतो असं वाटतं.

बोल्ड केलेल्या वाक्याकडे लक्ष खेचून आणते. यासंदर्भात काही आकडेवारी, रिपोर्ट वगैरे नसेलच ना?

सध्या "लॅण्डस्लाइडिंग" विजय मिळवून (though just 31% votes!) सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीला त्यांच्या पहिल्या लोकसभा निवडणूकीमध्ये २ जागा मिळाल्या होत्या.>>> भाजपाने तेव्हा किती जागांवर निवडणुक लढवली होती ते सांगा बघू!!!

४००० कोटी देऊन एक उद्योगपती प्रसारमाध्यमे विकत घेतो असं चित्र असल्यावर त्यांच्याकडून उद्योगपतींविरुद्ध आवाज उठेल असं वाटत नाही, जरी त्यात जनतेचं हित असलं तरी.>>> प्रसारमाध्यमं हाही एक उद्योगच आहे, आण तो उद्योगपतींकडूनच चालवला जातो, त्यात फारसं काही भुवया उंचावण्यासारखं नाही.

मला स्वतःला आवडलेली एक महत्वाची गोष्ट म्हणजे काळा पैसा वापरून निवडणूका लढवण्याच्या पद्धतीला पक्षाने फाटा दिलायंं>>> लोकसभा निवडणूकीला तिकीटवाटप कसे झाले होते त्याची प्रक्रिया समजू शकेल का?

पक्षबांधणीसोबतच आपचे आमदार त्यांच्या विभागात मोहल्ला सभा घेत आहेत. 'स्वराज' चं मॉडेल राबवताना दिसत आहेत<<<< देशामध्ये पंचायती राज आधीपासून आहे आणि ग्रामसभा बहुतांश निर्णय घेत असते. यात आपने काही नवीन काम केलेले नाही. मी ग्रामपंचायत भागामध्ये राहिलेली आहे आणि ही निर्णयप्रक्रिया पाहिलेली आहे. प्रत्येक ग्रामसभेची बातमी न्युज चॅनलवर येणे शक्य नाही. लोकल केबलवर वगैरे मात्र येत असते.

दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या वेळी आपचं कौतुक करणारी प्रसारमाध्यमे आप लोकसभा निवडणूक लढवणार हे कळल्यावर अचानक आपच्या विरुद्ध शड्डू ठोकून उभी राहिली.>>> या दोन घटनांच्यामध्ये काहीच घडले नाही? दिल्ली विधानसभा निवडणूकांमध्ये मतदारांनी पाच वर्षे राज्य चालवण्याची जबाबदारी दिली होती ना? मग अचानक लोकसभा निवडणुकीमध्ये उडी मारण्याचे काही खास कारण? हा त्या मतदारांच्या विश्वासाचा अपमान होत नाही का?? आपच्या कुणी कानपट्टीवर बंदूक ठेवली होती का लोकसभा निवडणुका लढवायलाच हव्यात म्हणून? हा निर्णय आपचा होता. अख्ख्या भारतभर आपने मीडीयाकडून सुरूवातीला चांगली सहानुभुती गोळा केली होती. दिल्ली निवडणुकानंतर त्यांचे प्रचंड कौतुक झाले, पण तेच कौतुक आपच्या डोक्यात शिरले. आणि आपण काहीही केले तरी लोक आपल्याला मत देतील असला फाजील आत्मविश्वास त्यांच्यामध्ये दिसू लागला (आणी इथून आप वैयक्तिकरीत्या माझ्या मनातून ऊतरला) लोकांना, मतदारांना "गृहित" धरण्याची चूक जशी काँग्रेसने केली (त्यांचं ठिक आहे, माज करण्यासाठी साठ वर्षाचा अनुभव आहे, २०१९ साठी अनुभवी कार्यकर्ते आहेत) त्याहून जास्त आपने केली.

केजरीवालने नरेंद्र मोदींच्याच विरोधात निवडणुक लढवायचा घेतलेला निर्णय अगम्य होता. मोदी खासदार होणार ही स्पष्ट गोष्ट होती. भाजपा किती सीट्स घेणार हा कळीचा मुद्दा होता. त्यामुळे मोदीला हरवून संसदेमध्ये जायचे रोखण्यापेक्षा (मोदी ऑलरेडी सेफ बेट खेळून होता, गुजरातमधून हारलाच नसता- हे काँग्रेसलाही माहित होतं.) भाजपाच्या सीट्स कमी करण्यासाठी केजरीवालने धोरणं आखायला हवी होती. त्याऐवजी मोदीला शिव्या घालणारी प्रेस कॉन घेणे, गुजरातमध्ये आचारसंहिता लागू झाल्यावर जाऊन तमाशे करणे यातच त्याचा जास्त वेळ गेला होता. या मोदीविरूद्ध निवडणुक लढवण्यामागे कारणमीमांसा काय होती? याबद्दल वाचायला आवडेल.

आपचा प्रचार फिल्डवर मी स्वतः पाहिलाय. आमच्या दारात येऊन पत्रक भिरकावून "ओदेसाई, मत द्यायचं हां.. आआपच्या उमेदवार ***** यांना" आणि निघाले. ब्वा, कोण तुम्ही? तुमचा उमेदवार कोण? त्याने आजवर काय केलंय? कशासाठी मत द्यावं? याबद्दल प्रश्न विचारल्यावर "ते आमाला मायत नाय, फोन करून विचारा" हे उत्तर. उगाच नाही डिपॉझिट जप्त झाले!!! यांच्यापेक्षा राणेपुत्र किमान हात जोडून वगैरे तरी गेला. (तेही पडलेच ते सोडून द्या!!!)

दिवशी मला स्वतःला असं वाटेल की आप त्यांच्या मूळ उद्देशापासून परावृत्त होऊन >>> हे एक बरे केलेत. मला अद्याप आपचा मूळ उद्देशच समजलेला नाही... त्यांना राजकारण करायचंय की नाही? ते जरा एक समजावलंत तर बरे.

यासंदर्भात काही आकडेवारी, रिपोर्ट वगैरे नसेलच ना? <<< आता तोही मिळवून काय करणार त्याचं,दिसतंच आहे की समोर,

प्रसारमाध्यमं हाही एक उद्योगच आहे, आण तो उद्योगपतींकडूनच चालवला जातो, त्यात फारसं काही भुवया उंचावण्यासारखं नाही. <<< उद्योगाचे काही एथीक्स असतात.उद्योगाच्या नावाखाली 'Sale Of Rights' कितपत योग्य असतो. तुम्ही पण अनुभवी आहात यात.

देशामध्ये पंचायती राज आधीपासून आहे<<< आआप याबाबत मॉडेल तेच असेल तरी कंन्सेप्ट वेगळी आहे.तुलना होणं शक्यच नाही.

आआपवाल्यांनी घाई केली पण अनुभव कमी पडला आणि ती चूक केजरीवालांनी मान्य केली आहे.पुढचं बघू ना आपण.जुनं काय काढताय आणि पाठींबा द्यायचा सोडून तुम्ही तुलना कशी करू शकता?आआप अगदी नवीन आहे तरी दिल्लीने निवडून दिलाच होता.

नंदीनीताई मुद्दे उलट-सुलट करताय आपण.माफ करा राहावलं नाही म्हणून लिहीले.

आआप अगदी नवीन आहे तरी दिल्लीने निवडून दिलाच होता.>>>> माफ करा आपला निवडुन दिले या मागे नुसतेच केजरीवाल नव्हे तर अण्णान्चे पण काहीतरी पुण्य होतेच. पटत नसेल तर खाजगीत विचारा, लोक हेच म्हणतात.

मूळात केजरीवाल कशावरच ठाम रहात नाहीत. वास्तवीक त्याना मोठा जॅकपॉट लागला होता. जॅकपॉट या अर्थाने की गुन्डाची, बलात्कार्‍यान्ची राजधानी अशी दिल्लीची प्रतिमा ते पुसु शकले असते.

काही गोष्टी तात्पुरत्या बाजूला ठेवुन मुख्य न्याय व्यवस्था सुधरणे, पाणी- वीज इत्यादी मूलभूत सुविधा याकडे लक्ष देणे सोडुन ते निव्वळ उपोषण वगैरेच्या मागे लागले. आणी लोकान्चा विश्वास गमवुन बसले. विधान सभा नुकतीच हातात आली आहे तर ते ५ वर्ष नेटाने मार्गी लावण्या ऐवजी लोकसभेत उडी कशाला मारायची?

याला म्हणतात तेल गेले, तुप गेले, हाती आले धुपाटणे.

अजून तुम्ही जुन्याच गोष्टींवर बोलता आहात रश्मी. आण्णा हजारेंच्या का होईना पुण्याईने आले होते निवडून की.ठीक आहे अनुभव कमी पडला,थोडे उत्तेजीत झाले आणि गडबड झाली खरी.पण तो पक्ष टाकाऊ कसा होतो लगेच हो.

आणि लोकांचा विश्वास गमवुन बसले<<< कोणीच कुणाचाही विश्वास गमावत नसतो. तो परत मिळव्ण्याची संधी कधी देणार त्यांना.मराठी लोकांची विचारसरणी बाजूला ठेवा की आता.

तेल गेले, तुप गेले, हाती आले धुपाटणे.<<< इतक्यात अशा ठाम मानसिकता करताय तुम्ही बरेच लोक.चूक झाली ,तुम्ही संधी देणार का आआपला? परत चुकला तर आपण म्हणाल तसं अगदी.यावर बोला... भूतकाळावर का बोलतोय त्यांच्या?

माफ करा पण नंदिनी यांनी मांडलेली मतं जुनाट आहेत आणि पूर्वग्रह्दूषित सुद्धा... एकाच बाजूने लिहीलेली आणि तीसुद्धा आआपचा भूतकाळ सोबत ठेवून लिहीली आहेत.

मूळात केजरीवाल कशावरच ठाम रहात नाहीत<<< यावर अनुभव कमी पडला हे वर लिहीलं आहे.

विद्न्यानदासजि, आपन सांगितल्याप्रमाणे हळुहळू सुधारना केली आहे. तरी आपण आता प्रकट व्हाव ही विनंती.

विज्ञानदासजी केजरीवाल अनूभवातुन शिकतील म्हणताय, मग सत्तेसाठी आता कॉन्ग्रेसची परत कशाला मनधरणी? निवडणूका झाल्यावर कळेलच की लोकान्ची मानसीकता. आधी आआप ने आपला पक्षाचा जाहिरनामा नीट आणी ठाम बनवावा.

आणी ते ( केजरीवाल वगैरे ) अनूभवातुन शिकतील, त्याना सन्धी द्या म्हणताय तर मग आता सत्तेत असलेल्या मोदी आणी भाजप ला पण ५ वर्षे नीट राज्य करु द्या की. नाही काही केले तर लोक बडवतील मग.

महिना नाही झाला नव्या सरकारला, पण आत्ता पासुनच विरोधकानी हातपाय आपटायला सुरुवात केली तर कसे व्हायचे?

http://www.youtube.com/watch?v=4aWDbd9Zm9M

हा आहे आप आणि अन्य परदेश-प्रायोजित एन जी ओ चा मूळ उद्देश !

या महाभागांच्या कॄष्णकॄत्यांमुळे जी डी पी ३ % नी खाली आली...!

माफ करा पण नंदिनी यांनी मांडलेली मतं जुनाट आहेत आणि पूर्वग्रह्दूषित सुद्धा... एकाच बाजूने लिहीलेली आणि तीसुद्धा आआपचा भूतकाळ सोबत ठेवून लिहीली आहेत.>>> अहो, भूतकाळ कसला पार्टी फॉर्म होऊन अठराच महिने तर झालेत. मते जुनाट असायला ती काय शंभर वर्षं पुराणी काँग्रेस नव्हे. पूर्वग्रहदूषित असणारच. आपचं काम कसं चालू आहे ते वर लिहिलंय माझ्या पोस्टमध्ये. माझे मत अमूल्य आहे. मी ४९ दिवसांत सरकार सोडून पळणार्‍या माणसाला ते का द्याव? तेदेखील निव्वळ प्रसिद्धीसाठी मोदीविरोधात निवडणुक लढवण्यासाठी!! त्याने मला माझ्या मताच्या बदल्यात पाच वर्षाचं स्थिर सरकार देणं अपेक्ष्हित आहे की नाही??

आण्णा हजारेंच्या का होईना पुण्याईने आले होते निवडून की.ठीक आहे अनुभव कमी पडला,थोडे उत्तेजीत झाले आणि गडबड झाली खरी.पण तो पक्ष टाकाऊ कसा होतो लगेच हो.>>> नक्की काय केल्याने पक्ष टाकाऊ होतो हेही समजू द्यात.

तुम्ही संधी देणार का आआपला? परत चुकला तर आपण म्हणाल तसं अगदी.यावर बोला... भूतकाळावर का बोलतोय त्यांच्या?<<< हेच सेम वाक्य जेव्हा कधी काँग्रेस, बीजेपी वगैरे पक्षांना बोलत सुटाल तेव्हा लक्षात ठेवा. मी तरी आआपला सद्यस्थितीमध्ये मत देणार नाही. एक वेळ काँग्रेसला काय मनसेला (हाही पक्ष नुसताच न्युसन्स व्हॅल्यु!!) देईन, पण आआपला देणार नाही.

गेले दोन महिने निवडणूकीदरम्यास फिल्डवर होते (कुठल्याही पक्षाकडून नाही) त्यावेळेला लख्खपणे जाण्वलेली एक गोष्ट म्हणजे काँग्रेस-बीजेपी-शिवसेना-यांना लोक पक्ष म्हणून ओळखतात. आपला कुणीही ओळखत नाही. आपची ओळख निव्वळ सोशल मीडीयामध्ये आहे. नेटीझन्स आपचा प्रचंड प्रचार करताना दिसतात. पण तो प्रचार ग्रासरूट लेव्हलला पोचत नाही. नेटीझन्सना आप म्हणजे प्रचंड वेगळं काहीतरी वेगळं वाटतं (तितकं बहुतेकांचं नागरिकशास्त्र कच्चं असतं!!) पण मुळात त्यांना भारतीय राजकारण, त्यामधले व्यामिश्र भाग, इतर कॉम्प्लेक्सिटीज यांचं आकलन जवळपास शून्य असतं. मुळात ज्या लेव्हलवर जाऊन काम करायला हवं तिथे काम करायचीच त्यांची तयारी नसते. अशा लेव्हलला जिथे खर्‍या अर्थाने निर्णाय्क मतदान होतं- जिथे कार्यकर्ते दिवसरात्र प्रचारासाठी झटताना दिसतात. (ते कुठल्य पक्षाचे आहेत तो मुद्दा बाजूलाच ठेवू!!) पण आपचे कार्यकर्ते फेसबूक आणि ट्विटवर बरंच बोलताना दिसले होते.... फिल्डवर शुकशुकाट!!! मतदानासाठी घरतून बाहेर पडा असे सांगत इतर सर्व कार्यकर्ते फिरत असतना आप गायबच होतं!!! (हे मी चार वेगवेगळ्या मतदार संघातली परिस्थिती बघून लिहत आहे!!) कायको मत देनेका?

२०१४ च्या मतदानामधली शिस्त आर एस एस ने ज्या पद्धतीने हाताळली होती, ती खरंच एकदा आपने बघून घ्यायला हवी. जिथे नरेंद्र मोदीची सभा झाली तिथली पद्धत आणी जिथे झाली नाही तिथली पद्दह्त दोन्हींचा खचितच अभ्यास करायला हवा. (आर एस एस ची समर्थक नाही तरीदेखील या स्वयंसेवकांचा जनसंग्रह सर्वच जातीवर्गधर्मामध्ये अफाट आहे!! या निवडणूकीमध्ये मतदारसंघ काय, घर न घर पिंजून काढलेले लोक पाहिलेत)

उलट आपने जनसंग्रह हा विषयच ऑप्शनला टाकलेला दिसतोय. काही मोजक्या सभा वगळ्ता (ज्यांना मीडीयाने पुरेपूर प्रस्दिद्धी दिली होती) इतरत्र देशामधे ४००+ उमेदवार उभे करून काहीही साध्य केले नाही. कित्येक उमेदवारांना मतदारसंघ सुद्धा माहित नव्हता. ही असली घाई करण्याचं काय कारण होतं?? ते आपने अद्याप स्पष्ट केलेले नाही. मोदीविरोधातच निवडणूक लढवण्यामागील कारणमीमांसा स्पष्ट केली जाईल का?

केजरीवाल "चुकले" असं म्हणून त्यांच्या चुकांची माफी द्यायची असेल तर पुन्हा ते अशीच चूक करणार नाही कशावरून?

४९ दिवसांत सरकार सोडून पळणार्‍या माणसाला ते का द्याव?

मोदीविरोधातच निवडणूक लढवण्यामागील कारणमीमांसा स्पष्ट केली जाईल का?

सहमत नदिनी जी!

मोदीविरोधातच निवडणूक लढवण्यामागील कारणमीमांसा स्पष्ट केली जाईल का?>>>>> याचे खरे कारण कधीच कळणार नाही नन्दिनी.

बाकी वर आता लिहीलेली अतीशय अभ्यासु पोस्ट आहे तुझी.

ब्र.आ., पोस्ट डिलीट कशाला करायची? लिहा बिनधास्त.

<<इतका क्वालिटी टाइम मेडीयाने दिला असेल तर त्याचा खर्च कुणी दिला ? केजरीवालांच्या हिट अ‍ॅण्ड रन पत्रकार परिषदांचा खर्च कुणी केला ? अण्णांच्या आंदोलनाला २४ बाय ७ प्रसिद्धी देण्याचा खर्च कुणी उचलला ? याची टोटल किती होते ? कुणी नाटा, बाटा, पाटा उद्योगसमूह तर हे बिल भरत नव्हता ना ? >>

तुम्ही मांडलेल्या मुद्द्यावर लिहायचं आहे. मला हे सगळं बुद्धिबळाच्या डावासारखं वाटतं. लिहिते जरा सवडीने.

<<यासंदर्भात काही आकडेवारी, रिपोर्ट वगैरे नसेलच ना? >>

आकडेवारी दिली तर तुम्ही आकडेवारीवर विश्वास नाही म्हणता. आणि माझ्याकडे नाहीये. तुम्ही दिलीत तरी चालेल. दिल्लीमध्ये सध्या आपचे २७ आमदार प्रत्येकी ४ कोटी आमदार निधीचा वापर करताना दिसत आहेत. भाजपचे ३१ आणि काँग्रेसचे ८ आमदार प्रत्येकी ४ कोटीचं सध्या काय करत आहेत एवढं सांगितलंत तरी चालेल.

<<भाजपाने तेव्हा किती जागांवर निवडणुक लढवली होती ते सांगा बघू!!! >>

त्याने काय आणि कसा फरक पडेल?

<<प्रसारमाध्यमं हाही एक उद्योगच आहे, आण तो उद्योगपतींकडूनच चालवला जातो, त्यात फारसं काही भुवया उंचावण्यासारखं नाही. >>

फार दुर्दैवी आहे हा अ‍ॅटिट्युड. भारतीय प्रसारमाध्यमांचा आकडा "फ्रीडम ऑफ प्रेस" मध्ये ३९ क्रमांकांनी खाली घसरला आहे. काहीच फरक पडत नाही का ह्याने?

<< लोकसभा निवडणूकीला तिकीटवाटप कसे झाले होते त्याची प्रक्रिया समजू शकेल का? >>

नाही मला माहीत नाही. पण बाँग्रेसमध्ये होतं त्यापेक्षा चांगलंच असणार ह्याची मनातून खात्री आहे. फॅक्टस नाहीयेत माझ्याकडे त्यामुळे तुम्ही हा मुद्दा इन्वॅलिड ठरवू शकता.

पंचायत राजबद्दल विज्ञानदासांनी लिहिलंच आहे. अगदी धरून चालू की पंचायत राज आधीपासूनच आहे, आपने काही नवीन केलं नाही. पण मला इम्प्लिमेन्टेशन दिसलं नाही. असतं तर ६५ वर्षांत ही अवस्था झाली नसती.

<<केजरीवालने नरेंद्र मोदींच्याच विरोधात निवडणुक लढवायचा घेतलेला निर्णय अगम्य होता.>>

तो केजरीवालांचा व्यक्तिगत निर्णय नव्हता. इथे वाचा.
"केजरीवाल: उसमें था, लोक सभा चुनाव के दौरान मैंने पार्टी में बोला था और मेरा निजी और एक दो बार आपने देखा होगा मैंने इंटरव्यू में भी बोल दिया था कि लोक सभा चुनाव हमें नहीं लड़ना चाहिए. आपको याद होगा जनवरी के महीने में फिर दो तीन दिन बाद काफी सारे पार्टी वाले मेरे खिलाफ हो गए, जैसे ही मैंने ऐसा बोला. तो मेरा अपना ये मानना था कि हमें या तो दिल्ली के अंदर कि लोक सभा सीट से लड़नी चाहिए, या मैक्सिमम दिल्ली के आस पास की दो तीन राज्यों की सीट से लड़ना चाहिए था. हम इस पोजीशन में नहीं थे, कि पूरे देश के अंदर इसको विस्तार करते. लेकिन पार्टी का निर्णय था और ये यह भी दिखाता है कि पार्टी में सबकुछ मेरा नहीं चलता"

आपण त्यांना ऑटोक्रॅटिक, हटवादी, वेडसर ठरवून मोकळे झालो आहोत.

<<आपचा प्रचार फिल्डवर मी स्वतः पाहिलाय. >>

शक्यता आहे. मी पाहिलेला नाही. पण त्यांना लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी फारच कमी वेळ होता. पक्षबांधणी अजून झालेली नव्हती.

<<मला अद्याप आपचा मूळ उद्देशच समजलेला नाही... त्यांना राजकारण करायचंय की नाही? ते जरा एक समजावलंत तर बरे.>>

त्यांना प्रस्थापित राजकारण करायचं नाहीये आणि म्हणूनच मी अजूनही त्यांना समर्थन देतेय. कारण प्रस्थापित राजकारण आणि राजकारणी ह्यांना पाहून मला मळमळतं..अतिशयोक्ती नाही. ह्या बोटावरची थुंकी त्या बोटावर करणे, स्वार्थासाठी पक्ष बदलत राहणे, जनतेशी खोटं बोलत राहणे. मला तरी हे समर्थनीय वाटत नाही. माबुदोस.

बाकी लिहिते जरा वेळाने.

>>देशामध्ये पंचायती राज आधीपासून आहे आणि ग्रामसभा बहुतांश निर्णय घेत असते. यात आपने काही नवीन काम केलेले नाही

असे असेल तर आप चे आमदार आपल्या निधिचा विनियोग कसा करावा याबद्दल मोहल्ला सभा घेतात याची बातमी कशी होते? माझ्या पहाण्यात तरी एकाही आमदाराने अशी मोहल्ला सभा घेतलेली नाही. आपने केलेल्या चांगल्या प्रयत्नांना दाद दिलीच पाहिजे. आपल्याला मिळालेल्या देणग्या इंटरनेट वर टाकणारा हा पक्ष आहे.

यावेळी आप बरोबर अण्णा हजारे नव्हते तरीही दिल्लीत आपचा टक्का वाढला आणी पंजाबात चार जागा मिळाल्या.

>>प्रसारमाध्यमं हाही एक उद्योगच आहे, आण तो उद्योगपतींकडूनच चालवला जातो, त्यात फारसं काही भुवया उंचावण्यासारखं नाही.

प्रसार माध्यमे एकाच व्यक्तीच्या / उद्योगसमूहाच्या ताब्यात असणे घातक आहे. न्यूज कॉर्प च्या मालकाला इराक युद्ध सुरु झाले तर आपला टी आर पी वाढेल असे वाटत होते. त्याने टोनी ब्लेयर च्या मागे 'युद्ध सुरु करा कि राव' असा लकडा लावला होता. भारतातली माध्यमे एकाच व्यक्तीच्या ताब्यात गेली तर तो 'आम्ही म्हणू ते सरकार' असे का म्हणणार नाही ? 'आजचा सवाल!' ओरडणारे वागळे शालेय शिक्षण मंत्र्यच्या दालनात एकाला लाच घेताना अटक झालेतेव्हा गप्प का बसले ? मोदींना मारायला चार आतिरेकी आले याची ब्रेकिंग न्यूज करणारी माध्यमे अक्षरधाम च्या निकालाला तिसर्‍या पानावर का ढकलतात ?

मै ना आ..प समर्थक हूँ.. ना विरोधक...मै तो केवल एक दास हूँ... जो पॉलीटील 'सायन्स' होता है ये समझने की (घोड)चूक करके आपसे लढ रहा हूँ... आप महीलाए हैं.... तो मैं...आपके विरोध में;और क्या बोल सकूँगा..
(हे मोदी स्टायल मध्ये वाचावत) Happy

आणि ते ( केजरीवाल वगैरे ) अनूभवातुन शिकतील, त्याना सन्धी द्या म्हणताय तर मग आता सत्तेत असलेल्या मोदी आणी भाजप ला पण ५ वर्षे नीट राज्य करु द्या की. नाही काही केले तर लोक बडवतील मग.<< इकडे मोदींना विरोध कोणी केलाय?.

त्याने मला माझ्या मताच्या बदल्यात पाच वर्षाचं स्थिर सरकार देणं अपेक्ष्हित आहे की नाही??<<<पटला,पण त्यासाठी त्याला संधी देणंही आवश्यक् बनतं.त्यांना घडवलं पण आपल्यालाच पाहीजे.त्यांचे मुद्दे स्ट्राँग बेस आहेत.प्रॅक्टीस मध्ये आणल की झालं.कदाचीत त्यांची चारी बाजूंनी गळचेपी झाली आहे ज्यामुळे काँग्रेसच्या पाठी ते लागलेत. पण तसं सांगायला हवं ना. थोडं अ‍ॅबसर्ड आहे वाटणं,पण केजरीवाल पोरगं आहे हो अजून...आमचे थोरले बंधूसमच म्हणा ना. आत्ता आयाआयटीतून पासाऔट झालेत अस काहीसं..वगैरे..म्हणजे बघा ना.. (नायजावकर सरांची स्टायल) Wink Happy

नंदिनी आपला बाकीचा प्रत्येक मुद्दा वरच्या कमेंटमधला पटला.जनसंग्रह्,फिल्डवर्क्,पाय रोवून भक्कम करण्यासाठी लागणारा संयम ये बात तो बनती है. आआपकडे फक्त् पुस्तकी ज्ञान आहे,हे मात्र योग्य..

केजरीवाल पुन्हा चूक करणार नाही कशावरून<<< याचं समर्पक उत्तर मिर्चीताई देतील. Wink

मला इतकंच म्हणायचंय की अठरा(च) महिन्यात आआपला खोडून काढणं कितपत योग्य आहे? थोडी संधी अजून देऊयात की.भारताने संधी द्यायला हवी होती ती दिलीच नाही असं केजरी नंतर म्हणायचे तरी नाहीत. Happy थोडी संधी,वेळ देऊयात आपण त्यांना.रुळावर आले तर ठिकच नाहीतर पत्ता आपोआप कट.

मला फक्त नंदिनी तुमच्या आधीच्या पोस्ट्मधले काही मुद्दे पटले नवते त्यावर प्रतिसाद दिला आहे,त्या मुद्यांवर लिहिलं आहे... ते खटकले...(पुन्हा बघा वाटल्यास)आआपला थोडी सहानुभूती आहे आणि ती माझ्या बाजूने असणं सहाजीक आहे.पण मीही आपचा उमेदवार उभा राहिलाय बाबा त्याला मत देऊ असं नाहीच ना केलंय पण त्यांच्यावरचा विश्वासपण तसाच आहे... मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न करत होतो आणि करतोय.भाजपला विरोध तो फिलहाल दूर की बात है.लेट देम डू वॉट दे वाँट...देन वी'ल डिसाईड अबाउट क्रिटीसीझम ...

मोदीभरोसे आहोत बरेचजण... त्याबद्दल नि:शंक आहोत आम्ही(ही)..

कल्पना करा की ५० माणसाचे एकत्र कुटुम्ब आहे. तर त्यातले ४९ लोक समाज्सेवा , धरणे किवा त्याप्रकारची कामे करु शकतात. पण किमान १ माणसाला तरी अर्थाजन करावे लागते.

तसेच कुठल्याही राष्टीय पार्टी मध्ये किमान एक तरी अर्थ्शात्राचा माणुस लागतो नाहीतर ती पार्टी long term मध्ये चालु शकत नाही. कोग्रेस्स मध्ये हे काम मनमोहन सिंग नी १९९१ ते २०१२ पर्यन्त केले नन्तर ते almost निव्रुत झाले होते ज्याचामुळे पार्टी कमकुवत झाली. BJP मध्ये अशी बरीच माणसे आहेत. म्हणुन कोग्रेस्स ची पण मागच्या वर्षापासुन वाताहतीला सुरवात झाली.

आप्चे पण तसेच आहे. सगळेच social worker आहेत. उदा. विजेची बिल ५०% कमी करुन २ महिने विज देउ शकत पण नंतर काय?

समजा जर आप ला २८२ जागा मिळाल्या असत्या आणी मेधाताई पाटकर infrastructure minister झल्या तर किती ५ वर्षात किती प्रोजेक्ट मार्गी लागतील. (I have respect for Mrs. Meshaa Patkar as social worker but not as AAP party memeber. She is good for fighting for poor people to get their basic rights. But not good as ruling party member or minister). Similar arguments are applicable to all party members.

कोग्रेस गांधी परिवारात घुटमळत असताना, आप ला एक चांगली संधी आहे. त्यानी दिल्ली ला लक्ष करुन जिकुन, काही economic development चे निर्णय घेतले तर राष्ट्रीय पार्टी म्हणुन उदयास येईल.

BJP पण २ वरुन २८२ वर आली पण त्या ३० वर्षात बर्याच राज्यात सरकार स्थापन करुन ५ वर्ष राज्य केले होते.

नंदिनी,

>> मोदीविरोधातच निवडणूक लढवण्यामागील कारणमीमांसा स्पष्ट केली जाईल का?

हा सवाल अगदी समर्पक आहे. मी याहून पुढे जाऊन विचारेन की आआप हा एक पक्ष आहे का? समान राजकीय विचारधारेचे लोक एकत्र आले की पक्ष बनतो. अगदी शिवसेनेनेसुद्धा सुरुवातीला समान विचारांचे लोक संघटीत करण्यावर भर दिला होता. निवडणुका लढवणे हा सेनेचा मूळ हेतू नव्हता. अनपेक्षित यश मिळाल्यानंतर मगच बाळासाहेबांनी निवडणुकांत उडी घेतली.

आआपमध्ये कुठला समान विचार दिसतो? मलातरी कुठलाच दिसत नाही.

आ.न.,
-गा.पै.

<<असे असेल तर आप चे आमदार आपल्या निधिचा विनियोग कसा करावा याबद्दल मोहल्ला सभा घेतात याची बातमी कशी होते? माझ्या पहाण्यात तरी एकाही आमदाराने अशी मोहल्ला सभा घेतलेली नाही. आपने केलेल्या चांगल्या प्रयत्नांना दाद दिलीच पाहिजे. आपल्याला मिळालेल्या देणग्या इंटरनेट वर टाकणारा हा पक्ष आहे.>>

विकु, कोणी दाखवलं तरच दिसणार ना आपल्याला ? चॅनेलवाले कव्हरच करायला तयार नाहीत.

सत्येन्द्र जैन, दिल्लीचे पूर्व आरोग्यमंत्री, आप चे आमदार ह्यांच्या मोहल्ला सभांचे फोटो टाकते इथे.

सत्येन्द्र जैन हे Central Public Works Department मध्ये आर्किटेक्चरल कन्सल्टन्ट म्हणून काम करत होते. जॉब सोडून ते अण्णांच्या आंदोलनात आले आणि राजकारणात जावंच लागणार अशा मताच्या लोकांसोबत त्यांनी आपमध्ये प्रवेश केला.
समाजोपयोगी कामे - ते 'स्पर्श' ह्या मेन्टली चॅलेन्जड मुलांसाठी काम करणार्‍या संस्थेसाठी काम करतात. आर्थिकदृष्ट्या कमकुवत मुलींचे सामुदायिक विवाह जमवण्याच्या कामातही ते सहभागी असतात. चित्रकूट येथे 'दृष्टी' ह्या अंध मुलींसाठी काम करणार्‍या संस्थेची इमारत बांधण्यात त्यांची मदत होती.

मोहल्ला सभा - वेस्ट एन्क्लेव
S jain west enclave 12.6.14.jpg

देरीवाला बाग येथे एका रहिवाशाच्या हस्ते पाण्याच्या पाइपलाइनचं उद्घाटन -
Sa jain Deriwala baug 10.6.14.jpg

मोहल्ला सभा- जवालहरी व्हिलेज
s jain Jawalaheri village 3.6.14.jpg

पश्चिम पुरी- पाण्याच्या पाइपलाइनचं उद्घाटन
sa jain pipeline Paschim puri 10.6.14.jpg

विभागातील बागांचं संवर्धन करण्यासाठी हॉर्टिकल्चर स्टाफसोबत चर्चा -
Sa jain horticulture 4.6.14.jpg

वरील कुठलीही बातमी खोटी असल्यास प्लीज लिहा. कारण मी स्वतः तिथे उपस्थित नव्हते.

बाकी लिहिते सवड होईल तसतसं.

केजरीवालने नरेंद्र मोदींच्याच विरोधात निवडणुक लढवायचा घेतलेला निर्णय अगम्य होता.>>

तो केजरीवालांचा व्यक्तिगत निर्णय नव्हता. इथे वाचा.
"केजरीवाल: उसमें था, लोक सभा चुनाव के दौरान मैंने पार्टी में बोला था और मेरा निजी और एक दो बार आपने देखा होगा मैंने इंटरव्यू में भी बोल दिया था कि लोक सभा चुनाव हमें नहीं लड़ना चाहिए. आपको याद होगा जनवरी के महीने में फिर दो तीन दिन बाद काफी सारे पार्टी वाले मेरे खिलाफ हो गए, जैसे ही मैंने ऐसा बोला. तो मेरा अपना ये मानना था कि हमें या तो दिल्ली के अंदर कि लोक सभा सीट से लड़नी चाहिए, या मैक्सिमम दिल्ली के आस पास की दो तीन राज्यों की सीट से लड़ना चाहिए था. हम इस पोजीशन में नहीं थे, कि पूरे देश के अंदर इसको विस्तार करते. लेकिन पार्टी का निर्णय था और ये यह भी दिखाता है कि पार्टी में सबकुछ मेरा नहीं चलता">>>

पुन्हा पुन्हा वाचले तरी केजरीवालने मोदीविरोधात निवडणूक (वाराणसी येथून) का लढवली या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नाही!! ते कूठे मिळेल?

साहिल शहा, तुमचा पॉइण्ट बरोबर आहे. प्रत्येक वेळेला सर्वांचे समाधान करणारा निर्णय सरकार घेऊच शकत नाही.

नाही मला माहीत नाही. पण बाँग्रेसमध्ये होतं त्यापेक्षा चांगलंच असणार ह्याची मनातून खात्री आहे. फॅक्टस नाहीयेत माझ्याकडे त्यामुळे तुम्ही हा मुद्दा इन्वॅलिड ठरवू शकता.>>> बाँग्रेसम्धे (किंवा कुठल्याही पक्षामध्ये) निवडून येणार का? त्या मतदार संघामध्ये तुमची पत काय आहे? यावर तिकीट मिळते. आआपने ही पद्धत डोनेशनवर स्विकारली. थोडक्यात, पैसे द्या, तिकीट घ्या. मतदारसंघ कुठला वगैरे बाबी गौण. विश्वास नसेल तर माझी विपु बघा. इतर पक्ष तिकीट दिल्यावर त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी व्यूहरचना करतात. त्यांचे कार्यकर्ते गावोगाव फिरतात, घरोघरी जातात. आआपचे कार्यकर्ते इंटरनेटवर प्रचार करतात.

त्याने काय आणि कसा फरक पडेल?>> प्रचंड फरक पडेल. आपचे लोक "आम्हाला भाजपापेक्षा ५०% जागा जास्त मिळाल्या" असे ओरडत असतात (जो मुद्दा तुम्ही हेडरमध्ये मांडलेला आहे) तेव्हा त्यांना तेव्हाची राजकीय परिस्थिती, तेव्हाच्या निवडणूकीची अवस्था, तेव्हाचा राजकीय माहौल याबद्दल काहीही माहित नसतं. त्याच निवडणुकीमध्यी काँग्रेसने काय फटाके उडवले होते ते बघा. तेव्हाचा विरोधी पक्ष टीडीपी होता. (३० की ३२ जागांवर)... तिथून भाजपाने सुरूवात करून तीस वर्षांनी पूर्ण बहुमत मिळवलंय. त्यामागे कार्यकर्ते कसे घडवलेत यावर विचार करून बघा. आपसारखे ४००+ उमेदवार उभं करून अठरा महिन्यात बहुमताच्या दृष्टीने हालचाली केल्या नाहीत.

पण मला इम्प्लिमेन्टेशन दिसलं नाही. असतं तर ६५ वर्षांत ही अवस्था झाली नसती.>> प्लीज यावर सविस्तर लिहाल का? ६५ वर्षापूर्वीचा भारत आणि आजचा भारत या "अवस्थेमध्ये" काय काय फरक आलेत हे सांगू शकाल का?

भारतामध्ये गेल्या ६५ वर्षात काहीही प्रगती झाली नाही, असं कुणी म्हणत असेल तर त्याला "कृतघ्न" हेच एक विशेषण लागू आहे. आपल्या आज्जीआजोबांना विचारा, त्यांनी कसे दिवस काढलेत आणि आपण कसे जगतोय त्याची तुलना करून बघा.

ण त्यांना लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी फारच कमी वेळ होता. पक्षबांधणी अजून झालेली नव्हती.>?>>> मग काय "चला लगोरी खेळू या, म्हणून निवडणुका लढवायल गेले होते का? पक्षबांधणी करून २०१९मध्ये लढवल्या असत्या तर काहीतरी राजकीय परिपक्वता दिसली असती!!! वेट, डिड आय से, राजकीय परिपक्वता???आपमधे एक्झॅक्टली हेच तर नाहिये.

नंदिनी,
राजकारणाविषयीच्या आपल्या दोघींच्या बेसिक मतांमध्येच जमीन-अस्मानाचा फरक आहे !

<<उत्तम राजकारणी होण्यासाठी तो अत्यंत आवश्यक गुण आहे. त्यामध्ये काही चुकीचे नाही. खोटं बोलणं हा तर राजकारणाचा पाया.>> हे तुमचं मत आहे , तर
<<प्रस्थापित राजकारण आणि राजकारणी ह्यांना पाहून मला मळमळतं..अतिशयोक्ती नाही. ह्या बोटावरची थुंकी त्या बोटावर करणे, स्वार्थासाठी पक्ष बदलत राहणे, जनतेशी खोटं बोलत राहणे. मला तरी हे समर्थनीय वाटत नाही.>> हे माझं मत आहे.

आता असं दोन ध्रुवांवर उभं राहून आपल्यात चर्चा कमी आणि कण्ठशोषच जास्त होणार असं दिसतंय. पण तरी देते उत्तरं. बघा पटतायेत का.

<<केजरीवालने मोदीविरोधात निवडणूक (वाराणसी येथून) का लढवली या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नाही!! ते कूठे मिळेल? >>

केजरीवाल पहिल्या दिवसापासून ओरडून सांगत आहेत की ते भ्रष्टाचाराविरुद्ध लढतायेत. मोदी, गांधी किंवा फॉर दॅट सेक सध्याची सिस्टीम हे भ्रष्टाचाराचं प्रतिक आहे. त्यांना त्याविरोधात उभं रहायचं होतं. ते राहिले. हरले. हरू देत. जिंकणारे कसे जिंकले हे भक्तांपर्यंत पोहोचलं नसेल पण बाकी अनेकांपर्यंत पोहोचलं.
इव्हीएमशी छेडछाड करून,
लोकांना नमो रोटी खायला घालून,
आणि रॅलीसाठी लोकांच्या घामाच्या कमाईतले कोट्यावधी रूपये खर्चून, आणि 'रघुपती राघव राजाराम' म्हणत प्रचार करणार्‍यांना हाणामार्‍या करून !

सर्वात 'सेफ सीट' म्हणून मोदींनी निवडलेल्या वाराणसीत कुठलाही बेस नसताना एका महिन्यात सुमारे २ लाख मतं मिळवणं ही मोठी गोष्ट आहे. काँग्रेस, सपा, बसपा ह्या जुन्या पक्षांपेक्षाही जास्त.
केजरीवाल जागा जिंकू शकले नाहीत म्हणून आता निकामी झाले असं ठरवलं तर १९४७ पूर्वी इंग्रजांविरूद्धच्या बंडाचे जेवढे काही प्रयत्न झाले ते बिनडोकपणाचे होते असं समजायचं का???

'मोदीविरूद्धच का? राहुल गांधी विरुद्ध का नाही?' इतका बालिश प्रश्न तुम्ही विचारला नाहीये ना?

Pages