रिलायन्स आयुर्विमा फसवणूक

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 13 June, 2014 - 03:04

श्री. राहूल जैन व श्री. गौरव चौहान यांनी रिलायन्स आयुर्विम्याच्या खात्रीशीर परतावा योजनेबाबत माझ्याशी केलेल्या फसवणूकीचा तपशील.

२२.०६.२०१३ रोजी मला श्री. राहूल जैन (भ्रमणध्वनी क्रमांक ८४५९४३००४६) यांनी संपर्क साधून रिलायन्स आयुर्विमा योजनेची माहिती दिली. त्यांनी आपल्या rahuljain.reliance@gmail.com या ईमेल पत्त्याद्वारे माझ्या chetangugale@gmail.com या ईमेलपत्त्यावर ईमेलदेखील पाठविले ज्यासोबत त्यांनी रिलायन्स आयुर्विम्याच्या खात्रीशीर परतावा योजने च्या अर्जाच्या प्रती देखील पाठविल्या होत्या. सोबत मला खालील गोष्टी पाठविण्यास सांगितले.
ओळखपत्र,
निवासी पुरावा,
२ छायाचित्रे,
रिलायन्स लाईफ इन्शुरअन्स कंपनी लिमिटेड च्या नावे धनादेश
o इसीएस करिता एक रद्द केलेला धनादेश.
वरील सर्व गोष्टी संपूर्ण भरलेल्या अर्जासह रिलायन्स लॊगिन डिपार्टमेंट, यू-२०३, तिसरा मजला, विकास मार्ग, शकरपूर दिल्ली – ९२ य पत्त्यावर पाठविण्यास सांगितल्या.

· २५.०६.२०१३ रोजी त्यांनी पुन्हा अजून एक ईमेल पाठवून कंपनीसोबत थेट व्यवहार करीत असल्याने दरवर्षी २०% कमिशन आणि ०.५ ग्रॆम सुवर्ण नाणे या अतिरिक्त लाभांविषयी सांगितले.

मी त्यामुळे त्यांना खालील गोष्टी पाठविल्या
o आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रती
§ आधार कार्ड ,
§ पॆन कार्ड ,
o रिलायन्स लाईफ इन्शुअरन्स कंपनी लिमिटेड च्या नावे रु.३०,०००/- (रुपये तीस हजार फक्त) रकमेचा धनादेश क्र.२८५९६६ दिनांक २४.०६.२०१३.
o रद्द केलेला धनादेश क्र. २८५९६३ इसीएस करिता
o दोन छायाचित्रे
o रिलायन्स आयुर्विमा खात्रीशीर परतावा योजनेचा संपूर्ण भरलेला अर्ज क्र. डी६४७१५९९.

०९.०७.२०१३ रोजी श्री. राहूल जैन यांनी मला ईमेलद्वारे रू.३०,०००/- चा रिलायन्स आयुर्विमा हप्ता भरल्याची पावती क्र.ड्ब्लूसी००१९९८८४७३ दि.२८.०६.२०१३ पाठविली.

त्यापुढील आठवड्यातच मला स्पीड पोस्टाने पाठविण्यात आलेली एक पुस्तिका मिळाली ज्यात मी भरलेल्या अर्जाच्या स्कॆन केलेल्या प्रती होत्या. परंतु मी भरलेला अर्ज आणि स्कॆन केलेल्या प्रतींमध्ये फरक होता. मी भरलेल्या अर्जाचा क्रमांक डी६४७१५९९ होता तर स्कॆन केलेल्या प्रतींवर डी५६९४६०१ हा क्रमांक होता. तसेच माझ्या ९५५२०७७६१५ या योग्य भ्रमणध्वनी क्रमांकाऐवजी ०८५०६९५८७६७ हा चूकीचा भ्रमणध्वनी क्रमांक देखील टाकला गेला होता.

मी त्वरीत श्री. राहूल जैन यांस संपर्क करून या चूकांविषयी कळविले. याविषयी स्पष्टीकरण देताना श्री. जैन यांनी सांगितले की मी भरून पाठविलेला अर्ज स्पष्ट दिसत नसल्याने त्यांनी पुन्हा दुसरा अर्ज भरला. तसेच यात वेगळा भ्रमणध्वनी क्रमांक नजरचूकीने टाकण्यात आला. त्यांनी असेही सांगितले की ही कागदपत्रे तात्पुरत्या स्वरुपाची असून शिक्क्यांसह पक्की कागदपत्रे काही दिवसांतच मला पाठविली जातील.

परंतु मला शिक्क्यांसह पक्की कागदपत्रे मिळालीच नाहीत. म्हणून मी श्री राहूल जैन यांस २८.०७.२०१३, ०९.०९.२०१३ व १६.०९.२०३ रोजी पुन्हा पुन्हा ईमेल पाठवून याविषयी पाठपुरावा करीत राहिलो. याशिवाय मी त्यांस भ्रमणध्वनीवर देखील संपर्क करीत राहिलो. परंतु मला त्यांचेकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.

यास्तव मी rlife.customerservice@relianceada.com वर २४.०९.२०१३ रोजी ईमेल करून सर्व हकीगत कळविली. तसेच मी त्यांना श्री. राहूल जैन यांनी कबूल केलेल्या “कंपनीसोबत थेट व्यवहार करीत असल्याने दरवर्षी २०% कमिशन आणि ०.५ ग्रॆम सुवर्ण नाणे” या अतिरिक्त लाभांविषयी देखील विचारले
.
त्यानंतर २५.०९.२०१३ रोजी मला त्यांचा खालीलप्रमाणे प्रतिसाद आला:

“आम्ही आपणास कळवू इच्छितो की, आमचे विक्री प्रतिनिधी आणि त्यांची कार्यालये संपूर्ण देशाच्या विविध भागात पसरलेली आहेत. सध्या आम्ही या प्रकरणाचा तपास करीत आहोत आणि त्यावर योग्य ती कारवाई करू. कृपया खात्री बाळगा की भविष्यात पुन्हा असा प्रसंग घडणार नाही. तुम्हाला दलालाकडून कबूल करण्यात आल्याप्रमाणे कोणत्याही योजना रिलायन्स लाईफ इन्शुअरन्सकडून दिल्या जात नाहीत. यास्तव अशा बनावट दूरध्वनी कॊल्सकडे आणि त्यांच्या वचनांकडे दुर्लक्ष करावे.”

मी रिलायन्स लाईफ इन्शुअरन्सच्या ग्राहक सेवा केंद्रास १८००३०००८१८१ या क्रमांकावर देखील संपर्क साधला. त्यांनी मला सांगितले की, जी कागदपत्रे मला मिळाली आहेत तीच पक्की असून शिक्क्यांसह अजून कुठलीही वेगळी कागदपत्रे मला पुन्हा पाठविली जाणार नाहीत.

रिलायन्स लाईफ इन्शुअरन्सच्या ग्राहक सेवा केंद्राने मला हेदेखील सांगितले की श्री. राहूल जैन यांनी कबूल केलेल्या अतिरिक्त लाभांची हानी वगळता मला पाठविण्यात आलेली विमा पॊलिसी पूर्णत: योग्य असून त्यात व्यक्त केलेले इतर सर्व फायदे मला मिळतील तरी मी याबाबत निश्चिंत राहावे. यावर मी समाधान व्यक्त करीत हा विषय इथेच थांबविला.

०९.६.२०१४ रोजी मला (०११)६५४९८३७८ या क्रमांकावरून एक दूरध्वनी आला आणि पूर्वी कधी रिलायन्स आयुर्विमा खरेदीचा मला वाईट अनुभव आला आहे का अशी विचारणा केली गेली. दूरध्वनीकर्त्याने स्वत:चे नाव गौरव चौहान असे सांगितले आणि त्याने हेदेखील सांगितले की तो ग्राहक संपर्क विभागातून बोलत आहे. त्याने पुढे सांगितले की, मी श्री. राहूल जैन यांस दिलेली रक्कम त्याने रिलायन्सला दिलीच नसून म्युचूअल फंडात गुंतविली होती. आता म्युचूअल फंड परिपक्व झाले असून ही फलित रक्कम घेण्यास ग्राहक (म्हणजे मी – चेतन सुभाष गुगळे) इच्छुक नसून त्या रकमेवर श्री. राहूल जैन यांनी दावा सांगितला आहे. एवढे बोलून श्री. गौरव चौहान यांनी मला सांगितले की ते पुन्हा काही वेळाने माझ्याशी संपर्क साधतील.

त्यानंतर काही वेळातच श्री. गौरव चौहान यांनी मला पुन्हा संपर्क केला. यावेळी मी सावध असल्याने संभाषणाचे ध्वनिमुद्रण सुरू केले. त्यांनी मला पुन्हा विचारले की मी म्युचूअल फंडाची फलित रक्कम रु.२,६२,४००/- (रुपये दोन लाख बासष्ट हजार चारशे फक्त) घेण्यास खरोखरच इच्छूक नाहीये का? जर का मी ती रक्कम स्वीकारण्यास इच्छूक असेल तर मी या रकमेच्या दहा टक्के रकमेचा अर्थात रु.२६,२४०/- (रुपये सव्वीस हजार दोनशे चाळीस फक्त) चा धनादेश आर्केड एन्शुअर च्या नावे लिहून तो श्री. गौरव चौहान यांस आर्केड एन्शुअर, कार्यालय क्रमांक १६६, पहिला मजला, वाधवा संकूल, लक्ष्मीनगर मेट्रो स्थानकाजवळ, फाटक क्रमांक १, नवी दिल्ली – ११००९२ या पत्त्यावर पाठवावा.

श्री.गौरव चौहान यांनी खालील बाबीदेखील धनादेशासोबत पाठविण्यास सांगितल्या.
रिलायन्स आयुर्विमा पॊलिसीच्या पहिल्या व शेवटच्या पानाच्या छायाप्रती.
निवासी पत्त्याच्या छायाप्रती (निवडणूक ओळखपत्र / वाहन परवाना)
२ पासपोर्ट आकाराची छायाचित्रे.
ग्राहक संपर्क व्यवस्थापकाच्या नावे म्युचूअल फंडाच्या फलित रकमेची मागणी करणारा हस्तलिखित व स्वाक्षरीसह असलेला अर्ज

श्री. गौरव चौहान यांस या सर्व बाबी त्वरीत हव्या होत्या व त्यांनी मला त्या ०९.०६.२०१४ च्या १४:०० वाजण्यापूर्वी कुरिअर मध्ये देवून कुरिअरचा कन्साईन्मेन्ट क्रमांक कळविण्यास सांगितले.
मी इतर कामांत व्यग्र असल्याने इतक्या त्वरीत हे सर्व करणे शक्य नसल्याचे कळविले.

त्यानंतर श्री. गौरव चौहान यांनी मला (०११)६५४९८३७८, (०११)६५४९५५०७ आणि ०७८३८५४९५७७ या क्रमांकांवरून ०९.०६.२०१४ रोजी पुन्हा पुन्हा संपर्क साधला. एकूण १६ संभाषणांदरम्यान त्यांनी आपल्या योजनेत पुन्हापुन्हा बदल केला आणि अंतिमत: त्यांनी मला हस्तलिखित व स्वाक्षरी असलेल्या अर्जाची स्कॆन केलेली प्रत निवडणूक ओळखपत्र व पॆनकार्ड सह Rajiv.V.Chouhan@Gmail.com या ईमेल पत्त्यावर पाठविण्यास सांगितले आणि १० टक्के रक्कम अर्थात रु.२६,२४०/- (रुपये सव्वीस हजार दोनशे चाळीस फक्त) श्री. उमेश शर्मा यांच्या पंजाब नॆशनल बॆंकेतील खाते क्रमांक ०६३५०००१०३०४७३२० वर १०.०६.२०१४ रोजी ११:०० वाजण्यापूर्वी जमा करण्यास सांगितले. हा खाते क्रमांक आणि ईमेल पत्ता त्यांनी मला आपल्या भ्रमणध्वनी क्रमांक ०७८३८५४९५७७ वरून एसेमेस करून पाठविला. त्यांचे सर्व संभाषण (अगदी सुरुवातीचे पहिले संभाषण वगळता) मी माझ्या भ्रमणध्वनीवर मुद्रित करून ठेवलेले आहे. श्री. गौरव शर्मा यांनी मला आश्वासित केले की मी रु.२६,२४०/- त्यांच्या सूचनेनुसार जमा केल्यावर लगेचच मला म्युचूअल फंडाची फलित रक्कम मिळेल. ही रक्कम त्यांचेपाशी कॊसमॊस बॆंकेच्या खालील धनादेशांच्या रुपात तयार आहे.
धनादेश क्रमांक ०००००६ रू.२,००,०००/-
धनादेश क्रमांक ०००००६ रू.६२,४००/-
धनादेश क्रमांक ०००००६ रू.९०,०००/-

हे उघड आणि स्पष्ट आहे की गौरव चौहान म्हणविल्या गेलेल्या तथाकथित व्यक्तिकडून केली जाणारी ही एक मोठ्या प्रकारातील आर्थिक फसवणूक आहे. तसेच हे देखील स्पष्टच आहे की त्यांस केवळ रू.२६,२४०/- (रुपये सव्वीस हजार दोनशे चाळीस फक्त) माझ्याकडून लुबाडायचे असून तो कबूल केल्यानुसार कुठलीही म्युचूअल फंडाची फलित रक्कम मला देणार नाहीये.

नोंद घेण्याजोगे ह्या प्रकरणातील महत्त्वाचे मुद्दे:-
· २२.०६.२०१३ मला नवी दिल्ली येथून श्री. राहूल जैन या व्यक्तिने संपर्क साधला होता आणि सर्व कागदपत्रे नवी दिल्ली ११००९२ येथे मागविली होती. आता श्री. गौरव जैन ही व्यक्तिही नवी दिल्लीहूनच संपर्क साधत असून कागदपत्रेही नवी दिल्ली ११००९२ येथेच मागवित आहे.
· श्री. राहूल जैन यांचे प्रकरणात रिलायंस ग्राहक सेवा केन्द्राने त्यांनी केलेल्या फसवणूकीची जबाबदारी नाकारली होती. परंतु, त्यांनी वापरलेला भ्रमणध्वनी क्रमांक ८४५९४३००४६ ट्रुकॊलर वेबसाईटवर तपासला असता रिलायन्स इन्शुअरन्सच्या नावावर आढळला.
· श्री. राहूल जैन यांनी माझी केलेली फसवणूक केवळ मला, श्री. राहूल जैन आणि रिलायन्स आयुर्विमा ग्राहक सेवा केन्द्र यांनाच ठाऊक होती. या वर्तूळाबाहेरच्या कुणालाही याविषयी काहीच कल्पना नव्हती.
· श्री. गौरव चौहान यांनी वापरलेला भ्रमणध्वनी क्रमांक ०७८३८५४९५७७ ट्रूकॊलर च्या वेब साईटवर तपासला असता प्लंबर उमेश श्रीराम च्या नावावर आढळला.

हे नक्कीच घोटाळेबाज व्यक्तींकडून चालविले जाणारे मोठे षड्यंत्र असून त्यात रिलायंस इन्शुअरन्सचेही एक वा अनेक कर्मचारी सामिल असू शकतात. याचा मूळापासून तपास होऊन दोषींवर सक्त कायदेशीर कारवाई होण्याची गरज आहे.

माझ्यापाशी सर्व लेखी (ईमेल स्नॆपशोट्स आणि स्कॆन्ड कागदपत्रे) तसेच मुद्रित (भ्रमणध्वनी संभाषण) सबळ पुरावे असून ते दोषींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यास पुरेसे आहेत.
हे सर्व पुरावे खाली दिलेल्या दुव्याद्वारे आंतरजालावर पाहता येऊ शकतील:-

https://drive.google.com/folderview?id=0B9-2hmnBdOPQcmhYQ1RNcUE0aTQ&usp=...

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हि ठगांची नवीन पध्दत दिसतेय, तुम्ही पोलीसात तक्रार केलीत का.
नसेल तर तक्रार करा. जमल्यास रिलायन्स आयुर्विमा कार्यालयात जाऊन अधिकार्यांची भेट घ्या.

खरंच तूम्ही पोलिसात तक्रार करा. शिवाय सर्व वर्तमानपत्रांना कळवा.
या व्यक्तीने अनेकांना फसवले असण्याची शक्यता आहे. तूम्ही सर्व एकत्र आलात तर कोर्ट केस चालवणे शक्य आहे नपेक्षा त्यातच जास्त पैसा व वेळ जाईल.
आयुर्विमासाठी असे कुठलेही कमिशन पॉलिसी होल्डरला दिले जात असेल असे वाटत नाही.

फार भयंकर प्रकार आहे नवनवीन फसवणुकीचे मार्ग काढतात हे लोक. एवढे पुरावे तुमच्या जवळ असताना वे़ळ दवडू नका त्वरीत पोलिसांत तक्रार दाखल करा.

बापरे !!

ईथे हे सर्व शेअर करुन आपण एक उत्तम पाऊल उचलले आहे, जेणेकरुन इतर लोकं तरी अश्या ठगांपासुन दूर राहातील.
>>तुम्ही पोलीसात तक्रार केलीत का. नसेल तर तक्रार करा. जमल्यास रिलायन्स आयुर्विमा कार्यालयात जाऊन अधिकार्यांची भेट घ्या.<< +१००

एजंट मार्फत पॉलिसी काढायची काय हौस असते लोकांना. सरळ ऑफिस मधे जाउन का नाही काढत? इतका कसला आळस?

LIC सोडुन कुठल्याही विमा कंपनी च्या नादी लागु नये हे माझे वैयक्तीक मत आहे

ग्राहक मंचात आणि पोलिसात तक्रार करा. तज्ञ माणसाच सल्ला घ्या.
थोडा फार असाच अनुभव मला एच.डी. एफ.सी. स्टार लाईफ कडुन आलेला आहे त्यात माझे १२५००० चे फक्त १०००० च परत मिळाले तेही, भरपुर कसरत करून. Sad तेव्हा ह्याच्या मार्गावर देखील कुणी जावू नये.

तुम्ही IRDA ह्या इंश्युअरन्स रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी ला तक्रार करा. इंश्युअरन्स तक्रारी साठी अ‍ॅपेक्स बॉडी आहे ही. पत्ता तुम्हाला नेट वर मिळेल. हैदराबाद ला कार्यालय आहे त्यांचं सगळी कागद्पत्र जोडा. तुमच काम होईल.

ही रिलायन्स आयुर्विमा फसवणूक नाही तर रिलायन्स आयुर्विमाच्या नावाने फसवणूक आहे.
असे कुणालाही पैसे देण्यापेक्षा भरवशाच्या , शहरात स्वतःचे ऑफिस असलेल्या आणि / किंवा पर्सनली एखाद्या ओळखत असल्यसाच कुणाच्या हाती चेक सोपवावा.

तुम्ही IRDA ह्या इंश्युअरन्स रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी ला तक्रार करा. इंश्युअरन्स तक्रारी साठी अ‍ॅपेक्स बॉडी आहे ही. पत्ता तुम्हाला नेट वर मिळेल. हैदराबाद ला कार्यालय आहे त्यांचं सगळी कागद्पत्र जोडा. तुमच काम होईल.>>>>>>>>>>>> IRDA ला तक्रार करुन काहीही होणार नाही.
ही फसवणुक काही वीमा कंपनीने केलेली नाही. कोणी दुसर्‍याने वीमा कंपनीच्या नावाने जर फसवणुक केली तर त्याला IRDA काही करु शकत नाही.

हा दावा/तक्रार ग्राहकमंचात पण टिकु शकत नाही कारण ही शुद्ध फसवणुक आहे. त्याचा कंपनीशी काहीही संबंध नाही.

रिलायन्स लाईफ इन्शुअरन्स कंपनी लिमिटेड च्या नावे रु.३०,०००/- (रुपये तीस हजार फक्त) रकमेचा धनादेश क्र.२८५९६६ दिनांक २४.०६.२०१३.

हा चेक क्रॉस्ड होता का ? तूमच्या शाखेत चौकशी केल्यास त्याची प्रत तूम्हाला मिळायला हवी. ( भारतातली मला नेमकी कल्पना नाही. केनयात मिळते )
जर तो चेक त्या कंपनीच्या खात्यात जमा झाला नाही तर तो वठवणारी बँक पण दोषी आहे.

जर कंपनीचा संबंध नाही तर जैनचा नंबर रिलायन्सच्या नावे कसा?प्रत्यक्ष एजंटला न भेटता थेट पैसे कसे पाठवतात लोक!

खुपदा असे इमेल्स, जीमेल वरुन पाठवतात. ऑफिशियल सर्व्हर वरून नाहीत ( या केसमधे पण तसेच आहेत. ) ऑफिशियल वेबसाईटवरुन पाठवलेल्या वेबसाईटवरच्या इमेलमधेही खुपदा डिसक्लेमर असतो.

चेतन जी दिल्ली वरुण आलेल्या नम्बर वरुण आलेल्या अशा कॉल बद्दल जरा सावध रहा
कोणताहि पैशाचा व्यवहार करायचा असेल तर त्यंचा मुमुंबई ऑफिस चा पत्ता मागा आणि तिथे चौकशी करा
आणि नसेल देत तर काहीतरी गडबड आहे समजा
अशी कोणती कंपनी आहे जिचे ऑफिस मुंबई मधे नाही
आणि शक्यतो online पेमेंट ाताळ आ

शेअर केल्याबद्दल धन्यवाद. जितक्या जास्त लोकांना कळेल तितकी चोर पकडले जाण्याची शक्यता जास्त. तुम्ही तक्रार करणारच असाल..पुढे काय होतं ते कळवा इथेच..तुमचे सर्व पैसे तुम्हाला लवकर मिळोत ही शुभेच्छा...

TV News channels na baatami dyaa...mail pathavun sangata yete. nantar te ghari yetat.

http://www.business-standard.com/article/finance/irda-warns-customers-ag...

http://timesofindia.indiatimes.com/business/india-business/Reliance-Life...

गेले कित्येक महिने या आशयाच्या बातम्या वाचनात येत आहेत.

अशाच प्रकारचे फसवणुकीचे प्रकार नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून देण्यासंबंधाने होतात. इमेलद्वारे मुलाखतीकरता बोलविले जाते व काही रक्कम फी म्हणून मागितली जाते.

आणखी एका माझ्या ओ़ळखीच्या व्यक्तीच्या प्रकारणात इमेलद्वारे जॉब ऑफर देऊन फोन नंबर मागवला गेला व ऑनलाइन रजिस्ट्रेशन व अ‍ॅप्लिकेशन करण्यासाठी फोनवर बोलत बोलत सूचना दिल्या गेल्या. काही वेळाने आपल्या खात्यातून रुपये सव्वीस हजार फक्त वळते झाल्याचा साक्षात्कार सुविद्य महिलेला झाला.

हे गुन्हेगार जर दिल्लीचे असतील तर दिल्ली शहर यासाठी आजच नाही तर अनेक वर्षे बदनाम आहे. इन्शुर्न्स एजंट आपल्या ओळखीचा हवा हे सुत्र वाचकांनी लक्षात घ्यावे.

राहूल जैन आणि गौरव चौहान या दोघांनी केलेल्या फसवणूकीत मोठा फरक आहे.

राहूल जैनने रु.६,०००/- इतके एजंट कमिशन परत केले जाईल असे आश्वासन देऊन ते परत केले नाही. इतपतच ती फसवणूक आहे. मी धनादेश रिलायंस कंपनीच्या नावाने क्रॊस्ड केला असल्याने ती रक्कम रिलायन्सकडेच पोचली आणि मला पॊलिसी देखील मिळाली. रु.६,०००/- चा परतावा वगळता पॊलिसीत बाकी सर्व लाभ मिळत आहेत. त्यामुळे त्या फसवणूकीची तक्रार मी पोलिसांत केलेली नाही. शिवाय ही घटना एक वर्षापूर्वीची आहे.

अर्थात अशीच पॊलिसी मी इतर एजंटकडे काढू शकलो असतो परंतु ती दिल्लीस्थित राहूल जैन च्या मार्फत काढावी म्हणून त्याने मला असे अमिष दाखविले व त्यानंतर ते आश्वासन पाळले नाही त्याच्या या कृत्याबद्दल त्याचे एजंन्सी लायसेन्स रद्द व्हावे म्हणून मी कंपनीकडे अनेक वेळा तक्रार केली.

मी कंपनीकडे केलेल्या तक्रारीचा संदर्भ घेऊन गौरव जैन ने मला अशी विचारणा केली की, "तुम्हाला रिलायन्स च्या कुठल्या एजंटने कधी असमाधानकारक सेवा दिली आहे का?" मी होकारार्थी उत्तर देताच त्याने लगेचच एजंट राहूल जैन ने संपूर्ण रक्कमच म्युचूअल फंडात गुंतवली असल्याचे सांगणे व ती फलित रक्कम मिळण्य़ाकरिता दहा टक्के रकमेची मागणी करणे हा या फसवणूक नाट्यातला दुसरा अंक आहे. परंतु यात मी गौरव यास सदर दहा टक्के रक्कम दिलीच नाही कारण ही फसवणूक आहे हे माझ्या ध्यानात आले होते. माझी पॊलिसी चालू असल्याचे मला संकेतस्थळावर तसेच रिलायन्सच्या कार्यालयातदेखील दिसून आले होते. तेव्हा मी दहा टक्के रक्कम न देताच केवळ गौरव यास संभाषणात गुंतवून त्याचे सर्व बोलणे ध्वनिमुद्रित केले आणि पोलिसांत तक्रार दाखल करण्यास गेलो असता या प्रकारात मी रक्कम न दिल्याने माझी फसवणूक झालीच नाही व त्यामुळे मी तक्रार दाखल केली तरी पोलिस कारवाई करणार नाहीत असे त्यांनी मला सांगितले.

तरीही सदर सर्व घटनेचा वृत्तांत व पुरावे मी खाली ईमेल पत्त्यांवर पाठविले आहेत.

dcm@maharashtra.gov.in,
min.indemp@maharashtra.gov.in,
min.pwdtourism@maharashtra.gov.in,
min.home@maharashtra.gov.in,
min.socjustice@maharashtra.gov.in,
min.coop@maharashtra.gov.in,
min.revenue@maharashtra.gov.in,
cm@maharashtra.gov.in,
cbiccic@bol.net.in,
punepolice@vsnl.com,
officer@cybercellmumbai.com,
cybercell.mumbai@mahapolice.gov.in
centraloffice@bjp.org,
bjpdelhi13@gmail.com,
bjpdelhioffice@gmail.com,
mumbaibjp@yahoo.co.in,
info@mahabjp.org,
rlife.customerservice@relianceada.com,
contact@aamaadmiparty.org,
donation@aamaadmiparty.org,
aaplegal@gmail.com,
connect@inc.in,
girishlokhande27@gmail.com

LIC सोडुन कुठल्याही विमा कंपनी च्या नादी लागु नये हे माझे वैयक्तीक मत आहे

>>>
ह्ये माह्ये पब्लिक मत्त हाये Happy

चेसुगु , तुम्ही या मेल्स महाराष्ट्र सर्कारच्या मंत्र्याना कशासाठी पाठवल्या आहेत? या मेल्स कधीही उघडल्या जात नाहीत हे तुम्हाला माहीत नसावे....

गुगळे साहेब ,एकदंर आपण फारच उपद्व्यापी स्वभावाचे आहात .प्रत्येक वेळी काहितरी उपद्व्याप करुन बसलेल्या घटनेचे विवरण देता, कधी दिल्लीला २४ तासात जाता, कधी काय तर काय..

LIC सोडुन कुठल्याही विमा कंपनी च्या नादी लागु नये हे माझे वैयक्तीक मत आहे >>> LIC मधे ही घोटाळा झालेला ऐकुन आहे, पण त्याची झळ सरकार ग्राहकांपर्यन्त पोहोचू देत नाहीत.

LIC मधे ही घोटाळा झालेला ऐकुन आहे, पण त्याची झळ सरकार ग्राहकांपर्यन्त पोहोचू देत नाहीत.>>> करेक्ट मलाही पुर्वी LICच्या नावावर फोन आला होता. मी योग्य ठिकाणी चौकशी केली आणि फ्रॉड असल्याची खात्री करुन घेतली आणि तो फोन नंबर त्यांना दिला. त्यांनीही कन्फर्म केले की त्यांच्याकडे अश्या तक्रारी येत आहेत आणि त्यांनी त्याचा बंदोबस्त केला आहे. त्यानंतर त्या फोन करणार्‍यालाच उलटा फोन करुन दम दिला की परत माझ्या वाटेला असलं काहीतरी घेऊन गेलास तर पोलिसात देईन. त्या माणसाने तो कसला तरी 'कमिशनर' आहे अशी बतावणी केली होती. आता एखादा कमिशनर कशाला मला फोन करुन माझे पैसे वाचवायला मदत करेल? Biggrin तो फोन नंबर नंतर 'अस्तित्वात नाही' ह्या कॅटेगरीत गेला.

Pages