साद देती सह्यशिखरे

Submitted by RJ28 on 12 June, 2014 - 12:28

साद देती सह्यशिखरे

या मातीशी अमुचे नाते
दर्‍या कड्यांची ओढ सांगे
निसर्गा संगतीच आम्हा
स्वर्ग-सुखाची चाहूल लागे

हरपून भूक तहान
विसरुन देहभान
गाठणे गडमाथा
हाच अमुचा सन्मान

केवळ भटकणे अन् फिरणे
जरी असे हाच छंद
धडपडूनही न थांबणे
यातच अमुचा आनंद

सह्यभ्रमंतीच्या ह्या क्षणांची
करितो मनी साठवण
तरिही क्षुधा शांत न होई
फिरूनी येई आठवण

महाराष्ट्राचा इतिहास सांगत
सह्याद्री असे उभा खडा
त्याला भेटून येताना मात्र
ओलाविती अमुच्या नेत्र कडा

शिवछत्रपती दैवत अमुचे
आम्हीच त्यांचे मावळे खरे
शिव-शंभूचे पराक्रम सांगत
साद देती सह्यशिखरे

-सौ. अर्जिता आदित्य गोखले

मायबोलीवर ( किंबहुना लिखाण करण्याचाच) लिखाण करण्याचा पहिलाच प्रयत्न आहे.
Happy
तेव्हा अनुभवींच्या काही सुचना असल्यास वेलकम. Happy
चू.भू. द्या.घ्या.

धन्यवाद Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थँक्यू. रिया Happy
आता मी आम्ही केलेल्या ट्रेक्स चं वर्णन लिहायला सुरुवात करणार आहे.
कवितेनी श्रीगणेशा केलाय.
Happy

छान आहे कविता आणि येऊ द्या वृत्तांत लवकर .

कर्नाटकमधल्या सह्याद्री भ्रमंतीवर (ट्रेकिंग)कोणी लिहिले आहे का ?केमेनागुडी ,कुमारपर्वता ,माडिकेरी(कूर्ग) ,कुद्रेमुख ,श्रिंगेरी परीसर इत्यादी .

छान

छान !