जोधा अकबर

Submitted by पलक on 11 June, 2014 - 00:44

Jodha Akabar.jpg

गेले किती दिवस आपण सगळे या मालिकेबद्दल बोलतोय.....मग इतरत्र प्रतिक्रिया मांडण्याऐवजी इथे मांडा....

जोधा अकबर विषयी चर्चा/ गप्पा मारण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विकिपिडीया वर वाचलं की त्या अक्बरला बरीच मुलम होती की... मग ह्या सिरियलीतील अकबराची गाडी का रेंगालतेय?

तो जहगिर कोणाचा मुलगा?
(हे सेपरेट पान कशाला काढलं...) एकाच पानावर शिमगा बरा पडतो. :फिदी

आले आले, जोधाच्या भावी गरोदरपणाचे वारे वाहु लागले आता शिरेलमधे!! Proud
त्या शहनाजचा बदला काही अगदी सुडाने पेटुन वै. वाटत नाही त्यामुळे अगदी हास्यास्पद झालाय. काहीतरी कथानक घुसडायचं म्हणुन घुसडलं आहे. त्यापेक्षा त्या विषकन्येची एंट्री जोरदार झाली होती.

काहीतरी कथानक घुसडायचं म्हणुन घुसडलं आहे. >>> अगदी.
आणि आता प्रोमोमध्ये ती स्वाभीमान मधील देविका दाखवलीये हातात चाकू वै घेऊन जलालच्या जीवावर उठलेली.
मी ही सिरिअल पाहण बंद होइल अस वाटतयं.

आणि आता प्रोमोमध्ये ती स्वाभीमान मधील देविका दाखवलीये हातात चाकू वै घेऊन जलालच्या जीवावर उठलेली.>>>> पण जलाल कही लवकर मरणार नाही. तो त्याच्या दुश्मनना कस मारतो हे पाहण्यात मजा असते.

आले आले, जोधाच्या भावी गरोदरपणाचे वारे वाहु लागले आता शिरेलमधे!!>>> हो ना आणी त्याला बाळ पण दिसल स्वपनात. मला वाटत पुढच्या महीन्यात बातमी येईल.

जोधा - मला आवडत नाही Proud
जावेदा - मस्त दिसतिये. सिरेलीत पण मला ती आवडते. महमंगाला हताश झालेले बघताना मजा येते Proud
हमिदा बानो - छान दिसतिये. सिरेलीत पण चांगली दिसते Happy
बेनझिर - ओके
रुकैय्या - सिरेलीत आवडते
सलिमा बेगम - Uhoh कसली मस्त दिसते. सिरेलीत कीती पुरषी दिसते

जोधा - ओके

जावेदा - मस्त दिसतिये. सिरेलीत मला पण ती आवडते. महमंगाला हताश झालेले बघताना मजा येते, कितीही रागात असेल तरी तिच्या पुढे शांत होते Proud

हमिदा बानो - छान दिसतिये. सिरेलीत पण चांगली दिसते रुकैय्या आणी जोधा पेक्षा.

बेनझिर - सिरेलीत छान दिसत होती.

रुकैय्या - सिरेलीत आवडते

सलिमा बेगम - मस्त दिसते..>>>सिरेलीत कीती पुरषी दिसते>>>> कदाचित उंची मुळे असेल.

हमिदा बानो छान हसरी आहे!
सलिमा बेगम खरच पुरुषी दिसते...धिप्पाड!
रुकैय्या सिरेलीत स्लीम दिसते
जावेदा तर नुसती बावळटच आहे!

<<कस्कायं केली अन ती प्रेग्नंसी टेस्ट<<
काही नाही ती मुळ हकीमा साहेबा कुणाशी तरी शंका बोलुन दाखवतांना (की रुकैय्या तर कधीच माँ बनु शकणार नाही असं मी सांगितलं होतं मागच्या वेळेस वै वै.) जलाल ऐकतो. आणि तिला बोलवुन खर्र काय ते विचारतो. तेव्हा हकीमा त्याला खरं काय ते शोधण्यासाठी रुकैय्याला पाजण्यासाठी एका कुपीत औषध देते. ते रुकैय्याला पाजल्यावर जर ती खरोखर प्रेग्नंट असेल तर काही होणार नाही पण नाटक असेल तर तिला उलटी होईल असं सांगते. आणि खरं तसच घडतं. आधी जलाल त्या दुसर्या हकीमाला (जिला रुकैय्याने दमदाटी करुन चुप बसायला सांगितलेलं असतं) तिला खर काय ते विचारतो आणि तिला अचानक रुकैय्याच्या हुजर्‍यात (असच म्हणतात ना?) हजर करतो. तेव्हा रुकैय्या आधी तिला पाहुन चपापते, ओरडते, पण जलाल तिला सत्य काय ते सांगायला लावतो. पण तरीही जलाल वैताग वैताग करुन रुकैय्याला मुआफ करतो.
आणि आपली शहाणी जोधा त्याला अजुन समजावते... की तु तिच्यापासुन दुर दुर रहातोय म्हणुन ती तुझ्या जवळ येण्यासाठी हे नाटक करतेय, तीची मानसिकता समजौन घे इ.इ.

अति अति अति समजूतदार.>>>> हो ना, काल ती रुकैय्या ईतक वचावचा बोलत होती तर जोधा बोलते तु निदान मला मदत कारन्याचा विचार तरी केला हेच खुप आहे.

कॄपया या धाग्यावर अपडेट्स येवूद्यात. मला खूप आवडते ही मालिका पण सोमवारपासून काही कारणांमूळे बघताच आली नाहीये..

स्मिता विशेष काही घडल नाही, जलाल ने हेमुला हरवुन सत्ता मिळवली होति तेव्हा त्याची party दिलि आणी एका नवीन नाण्याची जानते मधे वाटणी केली.

़काल त्याच्या अजुन एका सावत्र आईची entry दाखवली तिच नाव चोचक आहे आणी ति खुप क्रुर असते अस दाखवल आहे.

<<अजुन एका सावत्र आईची entry दाखवली तिच नाव चोचक आहे आणी ति खुप क्रुर असते अस << तीच ती मीता वसिष्ठ!!

<<'शहनशाह'चा उच्चार 'श्येन्शा' असा करताना ऐकलं<< Lol अग्दी असाच उच्चार करते ती

अगदि सुरुवातिला हा जलाल नि त्याचे खरी आई यान्चे नाते कसे दाखवले होते हे लेखक महशय विसर्लेत असे दिसतेय.
ती त्याला भेटायला येते, नि जलाल किती अपमान करतो तिचा.. बिचारी आसव गाळात रहाते.

ते मीनाबाजार, मीनाबाजार काय असतं? मागे दाखवलं त्यात जनानखान्यातल्या स्त्रीया दुकान मांडुन बसतात. असं व्हायचं खरच तेव्हा? Uhoh
काल-परवा शेन्शाच्या खास बेगमांचीच फक्त त्यात कॉम्पीटीशन होती. शुक्र है या वेळेसपण जोधाला जिंकवल्न नाही., ती सलिमा बेगम जिंकली.
मीता वसिष्ठने महा चोचक की चुचक चांगली रंगवलीये. पण काल दाखवतांना ते काय हिमवर्षावात कलिंगड खाणारे लोक कोण हे कळलं नाही. परवाच्या भागात महा चुचक तिच्या लेकींना निकाहसाठी राजी करते आणि नंतर त्यांची ओळख,' ये तुम्हारे अब्बाहुजुर' असं म्हणुन तो कुठल्या खानाशी करते.
अब्बाहुजुर म्हणजे वडील ना? की सासरा?
मला आधी वाटलं, ही स्वतःच लग्न करते की काय त्या खानाशी?

इथे संदर्भ नाहीये तरी विचारते, राणा प्रताप शिरेल कोणी पाहातं का? त्या शिरेल मध्ये जे काही दाखवत आहेत त्याबद्दल थोदा डाऊट आहे.

अग हो. राणा प्रतापचे वडिल राणा उदय्शिंग इतके ऐषोआरामात अशा राजमहालात इतके दागिने वगैरे घालून आणि असे राजेशाही पदार्थ कुठे खात होते कधी राहात होते समजून घ्यायचं होतं माझ्या वाचनाप्रमाणे ते कुंभलगडावर राहायचे आनी बरेचदा पळतीवर असायचे मोगल सैन्याविरुद्ध लढत. ...

Pages